नवी
दिल्ली दि. १४ :
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र
परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात
निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश
चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त
डॉ. किरण कुलकर्णी, अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय
केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही
यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या माहिती
अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. माहिती
अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार, पत्रकार निवेदिता वैशंपायन, कु. नेहा सोनवनणे, व्यंकट बनसोडे,
रामेश्वर बरडे, रघुनाथ सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबाबत
माहितीपर भाषणे दिली. यावेळी कार्यालयात आलेल्या अभ्यागतांसह कार्यालयातील
कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
000000
No comments:
Post a Comment