Tuesday 30 April 2019

राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

                                                          

                                                         






नवी दिल्ली, 01 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापन दिन महाराष्ट्र सदन येथे आज उत्साहात साजरा करण्यात आला.   निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कोपर्निकस मार्ग स्थित आणि कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिनानिमित्त  ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत गायनासह उपस्थितांनी ध्वज वंदन केले.या कार्यक्रमास सहायक आयुक्त सुमन चंद्रा आणि विजय कायरकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, महाराष्ट्रातून आलेले व महाराष्ट्र सदनात निवासी असणारे अभ्यागत, दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi        
 000000 

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.117/  दिनांक  01.05.2019

राजधानीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी















नवी दिल्ली दि. 30 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

  महाराष्ट्र परिचय केंद्रात तुकडोजी महाराजांना अभिवादन
 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी  करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.116/  दिनांक  ३०.०४.२०१९ 


Tuesday 16 April 2019

लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन आवश्यक - रणजीत थिपे


नवी दिल्ली, दि 14 : लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन असणे आवश्यक  आहे, त्यासोबतच ठराविक तसेच निवडक अभ्यास केल्यास  इच्छुक विद्यार्थ्यांना निश्चितच यश संपादन करता येईल, असा विश्वास नुकतेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेले रणजीत हरिशचंद्र थिपे यांनी व्यक्त केला.

            श्री. थिपे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.  उपसंचालक दयानंद कांबळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी श्रीमती अमरज्योत कौर अरोरा उपस्थित होत्या. श्री. थिपे हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत  480 गुणक्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

            केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारीबाबत, ठराविक तसेच निवडक अभ्यास करणे खूप आवश्यक असल्याचे  मत त्यांनी  यावेळी व्यक्त केले. मूळचे चंदपूर जिल्ह्याचे  श्री. थिपे यांनी नागपूर येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले असून ते कोल्हापूर इंस्टिटयुट ऑफ टेकनालॉजी या संस्थेतून पर्यावरण अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत.

प्रतिभेला मेहनत व शिस्तीची जोड आवश्यक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या प्रश्नावर श्री. थिपे यांनी सांगितले की, परिक्षेसाठी नव्या ऊर्जेने अभ्यासाला लागा व प्रतिभेला मेहनत आणि शिस्तेची जोड द्या. प्रत्येक विद्यार्थी हा प्रतिभावान असतो, मात्र, इच्छित यश मिळविण्यासाठी मेहनत आणि शिस्तही असणे अत्यंत गरजेचे आहे. अभ्यास करतांना विषय समजून घेणे व तो समजावून सांगता येणे आणि त्या विषयाचे उचित विश्लेषण करणे या बाबींवर लक्ष दिल्यास अभ्यास सुकर होतो. महाराष्ट्रातील विद्यार्थी मेहनती आहेत असे सांगून, प्रशासकीय सेवेच्या परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना यशवंत व किर्तीवंत व्हावे अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

Thursday 11 April 2019

डॉ आंबेडकर इंटरनॅश्नल सेंटरच्या उपक्युरेटर पदी शुध्दोदन वानखेडे





नवी दिल्ली दि. 11 : येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅश्नल सेंटरच्या उपक्युरेटर पदी शुध्दोदन वानखेडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या डॉ.आंबेडकर फाऊंडेशनअंतर्गत येथील 15, जनपथ रोडवर उभारण्यात आलेल्या भव्य  डॉ. आंबेडकर इंटरनॅश्नल सेंटर च्या उपक्युरेटर पदी श्री वानखेडे यांची प्रतिनीयुक्तीतत्वावर नेमणूक करण्यात आली आहे. 

श्री. वानखेडे हे केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयात 1991 पासून आर्टिस्ट पदावर कार्यरत आहेत. त्यांनी नागपूर येथील शासकीय चित्रकला महाविद्यालयातून चित्रकलेची पदवी संपादन केली आहे. पुढे  मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्हयातील योहानी येथील नवोदय विद्यालयात चित्रकला शिक्षक म्हणून  ते कार्यरत होते. आदिवासी विकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला आहे.
श्री. वानखेडे हे विविध निमंत्रण पत्राचे डिझाईन करतात, वृत्तपत्रांमध्येही  त्यांनी विविध कलात्मक कामे  केली आहेत. त्यांनी तयार केलेले माजी राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्यावरील ‘मॅनऑफ द मिलेनियम’ हे कॅरीकेचर विशेष गाजले होते. ‘अजिंठा भित्ती चित्रातील अलंकारिक रेषा’ या विषयांवर त्यांनी  लघुशोध प्रबंध सादर केला आहे. दिल्लीस्थित ऑल इंडिया सिध्दार्थ वेल्फेअर सोसायटीचे सामाजिक सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.    

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.112/  दिनांक  ११.०४.२०१९ 




राजधानीत महात्मा फुले जयंती साजरी















नवी दिल्ली दि. 11 : थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त  सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

  महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा फुले यांना अभिवादन
 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.111/  दिनांक  ११.०४.२०१९ 




Tuesday 9 April 2019

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 62 शैक्षणिक संस्था



        
विद्यापीठ रँकिंग मध्ये राज्यातील 11 विद्यापीठे 
नवी दिल्ली, दि. 9 : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग जाहीर केली. देशातील उत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्रातील विविध 62 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.  

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात सोमवारी उच्च शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-2019 जाहीर झाली. शिक्षण, शैक्षणिक साधने, संशोधन तसेच  व्यावसायिक पध्दती या मापदंडांवर एकूण 9 श्रेणींमध्ये  सर्वोत्कृष्ट 610 संस्थांची यादी जाहीर करण्यात आली असून यात 8  श्रेणींमध्ये  महाराष्ट्रातील 62 संस्थांचा समावेश आहे.

सर्वोत्कृष्ट समग्र संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या  12 संस्था
संस्थात्मक रँकिंगच्या यादीत समग्र संस्थांच्या श्रेणीमध्ये निवडलेल्या देशातील 100 शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 12 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 17 व्या स्थानावर आहे. पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेस 23 वे  स्थान मिळाले आहे. इन्स्टिटयूट ऑफ केमीकल टेक्नॉलॉजी -पुणे (27), होमीभाभा नॅशनल इन्स्टिटयूट -मुंबई(30), टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस -मुंबई (56), डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ –पुणे(70), सिंबायोसिस इंटरनॅशनल इन्स्टिटयूट –पुणे (82), एस.व्ही.के.एम नरसी मॉन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज –मुंबई  (83), भारती विद्यापीठ –पुणे(88),  कॉलेज ऑफ इंजिनियरींग -पुणे  (91) आणि वर्धा येथील दत्ता मेघे इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायंसेस 92 व्या क्रमांकावर  आहे. 
विद्यापीठ रँकिंग मध्ये राज्यातील 11 विद्यापीठे
यादीत देशातल्या 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 11 विद्यापीठांचा समावेश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे विद्यापीठ रँकिंगमध्ये 10 व्या स्थानावर आहे. मुंबई स्थित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी  या विद्यापीठास 15 वे स्थान मिळाले आहे, तर होमी भाभा नॅशनल इन्स्टिटयूटला 17 वी रँकिंग देण्यात आली आहे.  टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस -मुंबई (35), डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ –पुणे(46), सिंबायोसिस इंटरनॅशनल इन्स्टिटयूट –पुणे (56), एस.व्ही.के.एम नरसी मॉन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज –मुंबई  (57), भारती विद्यापीठ –पुणे(62),  मुंबई विद्यापीठ-मुंबई (81), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ- औरंगाबाद (85) आणि मुंबई येथील पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ  88 व्या क्रमांकावर  आहे.   

                                   राज्यातील 8 अभियांत्रिकी संस्थाना रँकिंग
अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या रँकिंग मध्ये देशातील 100 अभियांत्रिकी संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 8 संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ही संस्था तियऱ्या क्रमांकावर तर मुंबई स्थित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेला 11 वे स्थान मिळाले आहे. नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीला 31 वी रँकिंग प्राप्त झाली आहे.कॉलेज ऑफ इंजिनीयरींग –पुणे(49), डिफेंस इन्स्टिटयूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी-पुणे (57), नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनीयरींग-मुंबई (66),आर्मी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी –पुणे(91) आणि भारती  विद्यापीठाच्या पुणे स्थित इंजिनीयरींग कॉलेज 93 व्या क्रमांकावर आहे.    
                                 तीन महाविद्यालयांना मिळाली रँकिंग
महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 100 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालय 27 व्या स्थानावर आहे . तर पुण्यातीलच राजीव गांधी इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी 42 व्या आणि मुंबई येथील सेंट झेवीयर्स महाविद्यालय 96 व्या स्थानावर आहे.   
राज्यातील 8 व्यवस्थापन संस्थाना रँकिंग
देशातील 75 उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 8 संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ही संस्था 10 व्या स्थानावर तर मुंबईच्या एस.पी.जैन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मुंबई 16 व्या स्थानावर आहे तर सिंबायोसीस इस्टिटयूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट-पुणे आणि एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज-मुंबई  या दोन्ही संस्था संयुक्तरित्या 20 व्या स्थानावर आहेत. नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनीयरींग -मुंबई(29), के.जे.सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च –मुंबई(54), इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट –पुणे(55)  आणि नागपूर येथील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीला 70 वे स्थान मिळाले आहे.
औषधीय संस्थांमध्ये राज्यातील 18 संस्था
देशातल्या उत्कृष्ट 75 औषधीय संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 18 संस्थांचा समावेश आहे. पहिल्या 10 औषधीय संस्थांमध्ये मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने चौथ्या क्रमांकावर नाव कोरले. एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज-मुंबई  13 व्या स्थानावर तर पुना कॉलेज ऑफ फार्मसी 16 व्या स्थानावर आहे. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी –मुंबई (24),राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ -नागपूर(29), एसव्हीकेएम डॉ. भानुबेन नानावटी एज्युकेशन ऑफ फार्मसी –मुंबई(30), वाय.बी.चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी –औरंगाबाद  (36),आर.सी.पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मासीटयुकल एज्युकेशन अँड रिसर्च –शिरपूर  (42),डॉ. डी.वाय. पाटील   इन्स्टिटयूट ऑफ फार्मासीटयुकल सायंस अँड रिसर्च –पुणे  (45), भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फार्मसी –नवी मुंबई  (49), भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फार्मसी –कोल्हापूर  (54), श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी -काम्पटी(60),प्रिन्सिपल के.एम. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी-मुंबई (61), विवेकानंद एज्युकेशन सोयटीचे कॉलेज ऑफ फार्मसी-मुंबई (67), पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फार्मसी –पुणे(69), एमव्हीपी सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी –नाशिक(70) आणि पी.ई.सोसायटीचे पुणे स्थित मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी 74 व्या स्थानावर आहे.   

 देशातील 15 सर्वोत्कृष्ट विधी महाविद्यालयांमध्ये राज्यातील पुण्याच्या सिबायोसिस विधी माहाविद्यालयाला 7 वे रँकिंग प्राप्त झाले आहे. देशातील 30 सर्वोत्कृष्ट वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाने 20 वा क्रमांक पटकाविला आहे.  
यासोबतच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्था अशा दोन श्रेणींमध्ये नाविन्यपूर्ण उपलब्धीसाठी अटल रँकिंग जारी केली. यात देशातील 10 शासकीय व 5 खाजगी संस्थांना क्रमावरी देण्यात आली. या रँकिंगमध्ये शासकीय संस्थांच्या श्रेणीत ‘इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे’ दुस-या तर ‘इन्स्टिटयूट ऑफ  केमीकल टेक्नॉलॉजी ,मुंबई’ 6 व्या स्थानावर आहे.    
 
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.110/  दिनांक ०८.०४.२०१९ 



Monday 8 April 2019

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 3 शैक्षणिक संस्था




देशातील शैक्षणिक संस्थांची रँकिंग जाहीर

नवी दिल्ली, दि. 8 :  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज देशातील शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग जाहीर करण्यात आली. देशातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 3 शैक्षणिक संस्थांचा 5  श्रेणींमध्ये  समावेश आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात आज उच्च शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-2019 जाहीर झाली. शिक्षण, शैक्षणिक साधने, संशोधन तसेच  व्यावसायिक पध्दती या मापदंडांवर एकूण 8 श्रेणींमध्ये पहिल्या 10  सर्वोत्कृष्ट संस्थांची यादी जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील 3 संस्थाचा श्रेणींमध्ये  समावेश आहे.
                                   
समग्र रँकिंगसह आयआयटी बॉम्बे ने तीन श्रेणींमध्ये उमटवला ठसा  
            शैक्षणिक क्षेत्रात समग्र रँकिंगमध्ये देशातील एकूण 10 सर्वोत्कृष्ट संस्थांची निवड झाली असून  भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी बॉम्बे) ने यात 4 था क्रमांक पटकावला आहे. यासह सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी संस्थाच्या श्रेणीमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी बॉम्बे) ने तिसरे स्थान तर सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांच्या श्रेणीमध्ये याच संस्थेने 10 वा क्रमांक पटकाविला आहे. औषधीय संस्थांच्या श्रेणीमध्ये मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेने (आयसीटी मुंबई) चौथा क्रमांक पटकाविला आहे तर    सर्वोत्कृष्ट 10 विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे  10 व्या क्रमांकावर आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ठ 8 शैक्षणिक संस्थांना विविध श्रेणींमध्ये यावेळी सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-2019 मध्ये देशभरातील 4 हजार शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या.   
  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi      
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.110/  दिनांक ०८.०४.२०१९ 




















Sunday 7 April 2019

महाराष्ट्रातील 6 सायकलस्वारांनी इंडियागेट येथे उभारली मतदान जागरूकतेची गुढी










                मुंबई ते दिल्ली अंतर 72 तासात केले पूर्ण

नवी दिल्ली, दि. 7 :  नाशिक सायकलीस्ट फाऊंडेशनच्या 6 सायकलस्वारांनी मतदानविषयक जागरूकतेचा संदेश देण्यासाठी मुंबई ते दिल्ली हा 1440 किलो मिटरचा प्रवास 72 तासात पूर्ण करत गुढी पाडव्याच्या दिवशी राजधानीतील ऐतिहासिक इंडिया गेट येथे  गुढी उभारली.

            सद्या देशात 17 व्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे, याचेच औचित्य साधत मतदारांनी मतदानात सहभाग नोंदविण्याबाबत जागरूकता करण्यासाठी नाशिक येथील सायकलीस्ट फाऊंडेशनच्या सायकलस्वारांनी  मुंबई ते दिल्ली असा प्रवास पूर्ण केला. 3 ते 6 एप्रिल 2019 दरम्यान या सायकलस्वारांनी प्रवास पूर्ण केला आहे.
चंद्रकांत नाईक  यांच्या नेतृत्वाखाली ,श्रीराम पवार, मोहन देसाई, राजेंद्र गुंजाळ, रविंद्र दुसाने आणि प्रथमच मतदानात सहभागी होण्यास उत्सुक असलेला 18 वर्षांचा  पूर्वांश लखलानी या सायकलस्वरांनी या उपक्रमात सहभाग घेतला व उपक्रम यशस्वी केला. हे सर्व सायकस्वार नाशिकचे असून त्यांनी  आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली व आपल्या प्रवासाबाबत त्यांनी माहिती दिली. 
                                                               अशी सुचली संकल्पना
नाशिक जिल्हाधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी मतदार जागरूकतेसाठी ‘नाशिक सायकलीस्ट फाऊंडेशन’च्या सायकलस्वारांना नुकतेच आमंत्रित केले होते. सायकलस्वारांनी मतदान जागरूकतेबाबत केलेल्या यशस्वी प्रयोगामुळे यातील सायकलस्वारांनी दिल्लीतील इंडियागेट पर्यंत सायकलने प्रवास करून मतदान जागरूकता करण्याचा निर्णय घेतला. मतदान जागरुकता कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी मतदानाची नोंद झालेला दक्षिण-मुंबई लोकसभा मतदार संघ निवडून येथूनच सायकल प्रवासाला सुरुवात करण्याचे ठरले . 
               3 एप्रिलला जिल्हाधिका-यांनी हिरवी झेंडी दाखवून दिले प्रोत्साहन    
मुंबई शहरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाकचौरे आणि  वरिष्ठ पोलीस अधिकारी तथा नाशिक सायकलीस्ट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिश बैजल यांनी 3 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7.30 वाजता मुंबई येथील हुतात्मा चौकात या सायकलस्वारांना हिरवी झेंडी दाखवली व त्यांच्या सायकल प्रवासाला सुरुवात झाली.
                      जागोजागी केली मतदान करण्याबाबत जागरूकता
मुंबईहून सुरु झालेल्या प्रवासात वापी (गुजरात), सुरत (गुजरात), ब्यावर (राजस्थान) आदी ठिकाणी चौका-चौकात मतदान जागरूकतेचा कार्यक्रम घेवून या सायकलस्वारांनी मतदान जागरूकता केली. मतदानाचे महत्व समजावून सांगत त्यांनी लोकांना मतदान करण्याची प्रतिज्ञाही दिली. ‘मतदान करा आणि आपला अधिकार बजावा’ असे संदेश या सायकलस्वारांच्या सायकलींवर लिहीण्यात आले हेाते.
                                                 दररोज 480 कि.मीं. चा प्रवास
            या सायकलस्वारांनी रिले  प्रकारानुसार एकावेळी दोन चालक या प्रकारे प्रवास केला. ताशी 20 कि.मी. प्रमाणे दिवसाला(24 तासात) 480 कि.मी. त्यांनी  दिवस व रात्र असा अव्याहत प्रवास केला. त्यांनी  महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि उत्तरप्रदेश या राज्यांतून एकूण 1440 कि.मीं चा प्रवास 72 तासात पूर्ण केला. सद्य: उन्हाळा असल्याने या प्रवासात दररोज एक सायकल किमान तीन वेळ पंक्चर होत असे. जयपूर येथे सोसाटयाचा वारा व गारपीटांसह झालेला पाऊस अशा प्रतिकुल परिस्थितीचा सामनाही या सायकलस्वारांनी केला.  
अखेर 6 एप्रिल रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी दिल्लीतील इंडियागेटवर सकाळी 7.30 वाजता हे सायकस्वर पोहचले व त्यांनी येथे गुढी उभारून या प्रवासाची सांगता केली. भारतीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिका-यांनी या सायकलस्वारांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.  
  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi      
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.109/  दिनांक ०७.०४.२०१९ 




Friday 5 April 2019

राजधानीत ‘गुढी पाडवा’ साजरा









नवी दिल्ली, दि. 6 :  निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते गुढी उभारून येथील कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात मराठी नव वर्ष ‘गुढी पाडवा’ साजरा करण्यात आला.  श्री. सहाय यांनी गुढी उभारुन उपस्थित अधिकारी , कर्मचारी व  मराठी जणांना नव वर्षारंभाच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर उभारण्यात आलेल्या गुढीची श्री सहाय यांनी पूजा केली. यावेळी उपस्थित निवासी आयुक्त  सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंह नेगी आदींनी गुढीचे पूजन केले. महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी -कर्मचारी  यावेळी  उपस्थित होते. महाराष्ट्र सदनात निवासी असणारे पाहुणे  तसेच  यावेळी उपस्थित दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मराठीजणांनी गुढीचे पुजन केले.

  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :  
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.108/  दिनांक ०६.०४.२०१९ 


Thursday 4 April 2019

महाराष्ट्र परिचय केंद्राची ‘लोकसभा पूर्वपिठीका’ प्रकाशित











    

                   लोकमतचे राष्ट्रीय संपादक हरिश गुप्ता यांच्या हस्ते प्रकाशन

नवी दिल्ली, दि. 4 : महाराष्ट्र परिचय केंद्राने 17 व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसंबंधात उपयुक्त माहिती असलेली ‘लोकसभा पूर्वपिठीका’ प्रकाशित केली आहे. लोकमतचे राष्ट्रीय संपादक हरिश गुप्ता व लोकमत दिल्लीचे संपादक विकास झाडे यांच्या हस्ते आज या पूर्वपिठीकेचे प्रकाशन करण्यात आले.  
            परिचय केंद्राचे हे महत्वपूर्ण प्रकाशन प्रादेशिक व राष्ट्रीय प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व राजकीय विश्लेषकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. आज दैनिक लोकमतच्या कार्यालयात लोकसभा पूर्वपिठीकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, बिहार सूचना केंद्राचे सहायकसंचालक लोकेशकुमार झा  उपस्थित होते.      

                                  या पूर्वपिठीकेचे निवडक वैशिष्टये

1977 पासून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे निकाल या पूर्वपिठीकेत देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील एकूण लोकसभा मतदारसंघ आणि पुनर्र्चनेनंतर प्रत्येक लोकसभा मतदार संघांमध्ये अंतर्भूत झालेले विधानसभा मतदार संघ यांची मतदार संख्येसह  विस्तृत माहिती देण्यात आली आहे. विश्लेषणासाठी उपयुक्त ठरेल अशी 16 व्या लोकसभेतील मतदारसंघ निहाय विजेत्या व उपविजेत्या उमेदवाराला मिळालेली एकूण मते व मतांची टक्केवारी  आणि मतदारसंघात झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी देण्यात आली आहे.
            समाजमाध्यमातून होणारा अपप्रचार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने  प्रथमच नेमण्यात आलेल्या नियंत्रण समित्या, वृत्तचित्रवाहिनी व वृत्तपत्रांमधील पेडन्यूज रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या समित्या व त्यांची कार्यपध्दती  तसेच,  निवडणूक काळातील विविध तक्रारी नोंदविण्यासाठी  उचलण्यात आलेली पाऊले आदींची माहिती देण्यात आली आहे.
            भारतीय निवडणूक आयोग, मुख्य राज्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातील महत्वाचे दूरध्वनी क्रमांक, निवडणूक संबंधित अधिका-यांची जिल्हानिहाय यादी,राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी आणि पोलीस विभागातील महत्वाचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. या पूर्वपिठीकेच्या उपयोगकर्त्यास विशेष सुविधा म्हणून 17 व्या लोकसभा निवडणुकीत निवडून येणारे व उपविजेते ठरणारे उमेदवार व त्यांना मिळालेली मते यांची माहिती नोंदविण्यासाठी पूर्वपिठीकेचे शेवटची पृष्ठे देण्यात आली आहेत.     
  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.107/  दिनांक ०४.०४.२०१९