Monday 31 July 2023

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1 अगस्त को पुणे का दौरा करेंगे प्रधानमंत्री पुणे मेट्रो ट्रेनों को हरी झंडी दिखाएंगे प्रधानमंत्री आवास योजना के तहत निर्मित मकानों का शिलान्यास कर, पिंपरी चिंचवाड के लोगों को सुपुर्द करेंगे, ऊर्जा संयंत्र का भी उद्घाटन करेंगे प्रधानमंत्री को लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित किया जाएगा

नई दिल्ली, 31: महाराष्ट्र राज्य के विविध विकास परियोजनाओं का उद्घाटन और शिलान्यास, प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी 1 अगस्त को पुणे में करेंगे। वहाँ के पवित्र दगडूशेठ मंदिर में दर्शन और पूजा-अर्चना सुबह लगभग 11 बजे करेंगे। इसके बाद उन्हें लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित किया जाएगा। दोपहर 12:45 बजे, प्रधानमंत्री पुणे मेट्रो ट्रेनों को झंडी दिखाकर, विभिन्न विकास परियोजनाओं को वहाँ की जनता को समर्पित करेंगे. प्रधानमंत्री, श्री मोदी पुणे मेट्रो के पहले चरण के दो गलियारों के पूर्ण हो चुके खंडों पर सेवाओं के उद्घाटन के अवसर पर मेट्रो ट्रेनों को झंडी दिखाएंगे। ये खंड फुगेवाड़ी स्टेशन से सिविल कोर्ट स्टेशन और गरवारे कॉलेज स्टेशन से रूबी हॉल क्लिनिक स्टेशन तक है। प्रधानमंत्री ने 2016 में इस परियोजना की आधारशिला भी रखी थी। पुणे शहर के महत्वपूर्ण स्थानों जैसे शिवाजी नगर, सिविल कोर्ट, पुणे नगर निगम कार्यालय, पुणे आरटीओ और पुणे रेलवे स्टेशन को जोड़ेंगे। यह उद्घाटन देशभर में नागरिकों को आधुनिक और पर्यावरण के अनुकूल मास रैपिड शहरी परिवहन प्रणाली प्रदान करने के प्रधानमंत्री के विज़न को साकार करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। इस रूट पर कुछ मेट्रो स्टेशनों की रूपरेखा छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरणा लेकर बनाई गई है। छत्रपति संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन और डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनों की एक अनूठी रूपरेखा है जो छत्रपति शिवाजी महाराज के सैनिकों द्वारा पहने जाने वाले हेडगियर से मिलती-जुलती है, जिसे "मावळा पगड़ी" भी कहा जाता है। शिवाजी नगर भूमिगत मेट्रो स्टेशन की एक विशिष्ट रूपरेखा है जो छत्रपति शिवाजी महाराज द्वारा निर्मित किलों की याद दिलाती है। एक और अनूठी विशेषता यह है कि सिविल कोर्ट मेट्रो स्टेशन देश के सबसे गहरे मेट्रो स्टेशनों में से एक है, जिसमें 33.1 मीटर का सबसे गहरा बिंदु है। स्टेशन की छत को इस तरह से बनाया गया है कि सीधी धूप प्लेटफॉर्म पर पड़े। प्रधानमंत्री पिंपरी चिंचवाड़ नगर निगम (पीसीएमसी) के तहत अपशिष्ट से ऊर्जा संयंत्र का उद्घाटन करेंगे। लगभग 300 करोड़ रुपये की लागत से विकसित, यह बिजली का उत्पादन करने के लिए सालाना लगभग 2.5 लाख मीट्रिक टन अपशिष्‍ट का उपयोग करेगा। सभी के लिए आवास अर्जित करने के मिशन की दिशा में आगे बढ़ते हुए, प्रधानमंत्री पीसीएमसी द्वारा प्रधानमंत्री आवास योजना के तहत निर्मित 1280 से अधिक घरों को सुपुर्द करेंगे। वह पुणे नगर निगम द्वारा निर्मित 2650 से अधिक पीएमएवाई घरों को भी सुपुर्द करेंगे। इसके अतिरिक्‍त, प्रधानमंत्री पीसीएमसी द्वारा निर्मित किए जाने वाले लगभग 1190 पीएमएवाई घरों और पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण द्वारा निर्मित 6400 से अधिक घरों की आधारशिला भी रखेंगे। प्रधानमंत्री श्री मोदी को लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित किया जाएगा। लोकमान्य तिलक की विरासत का सम्मान करने के लिए 1983 में तिलक स्मारक मंदिर ट्रस्ट द्वारा इस पुरस्कार का गठन किया गया था। यह पुरस्कार उन लोगों को प्रदान किया जाता है जिन्होंने राष्ट्र की प्रगति और विकास के लिए काम किया है और जिनके योगदान को केवल उल्लेखनीय और असाधारण के रूप में देखा जा सकता है। यह प्रत्‍येक वर्ष 1 अगस्त को लोकमान्य तिलक की पुण्यतिथि पर प्रदान किया जाता है। प्रधानमंत्री इस पुरस्कार के 41वें प्राप्तकर्ता होंगे। इससे पहले, यह पुरस्कार डॉ. शंकर दयाल शर्मा, श्री प्रणब मुखर्जी, श्री अटल बिहारी वाजपेयी, श्रीमती इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंह, श्री एन. आर. नारायणमूर्ति, डॉ. ई. श्रीधरन जैसे विख्‍यात व्‍यक्तियों को प्रदान किया जा चुका है। **************** Amarjyot Kaur Arora /31.07.2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या विभागाचे करणार लोकार्पण पिंपरी-चिंचवाड येथील प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरांचे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरण, कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या संयंत्राचेही उद्घाटन लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधानांना सन्मानित करण्यात येणार

नवी दिल्ली, 31: पुणे तसेच पिंपरी –चिंचाड येथील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करून जनतेला समर्पित करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर असणार आहेत. सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. पंतप्रधान यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सकाळी 11.45 वाजता प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा कंदील दाखवून, विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प 2 ला हिरवा झेंडा दाखवून, पंतप्रधान, श्री मोदी हे पुणे मेट्रो टप्पा 1 च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करणार आहेत. फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत मेट्रो रूट असणार आहे. 2016 मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणांना जोडून, या प्रकल्पांचा लोकार्पण एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या संयंत्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 2.5 लाख मेट्रिक टन कचरा वापरून वीज निर्मिती केली जाईल. सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीच्या ध्येयाकडे वाटचाल करत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली 1280 हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत बांधलेली 2650 हून अधिक घरे देखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. यासोबतच, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणार्‍या सुमारे 1190 घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6400 हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी 1 ऑगस्ट रोजी असल्याने, लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा सन्मान म्हणून दिल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधानांना प्रदान केला जाणार आहे. पंतप्रधान या पुरस्काराचे 41 वे मानकरी असतील. या पूर्वी या मानाचे पुरस्कार प्राप्त करणारे, डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, प्रणव मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, एन आर नारायण मूर्ती, डॉ. ई‌. श्रीधरन या मान्यवरांचा समावेश आहे. ***************** महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi अमरज्योत कौर अरोरा /वृत्त क्र.136/ 31.7.2023

Thursday 27 July 2023

09 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात 'मेरी माटी मेरा देश अभियान' राबविण्यात येणार देशातील सुमारे 7,500 ब्लॉकमधून तरुण त्यांच्या राज्यातील माती आणतील.

नवी दिल्ली 27 :आझादी का अमृत महोत्सव (AKAM) 12 मार्च 2021 रोजी साबरमती ते दांडी या पदयात्रेने सुरू झाला. आता 'मेरी माटी मेरा देश' मोहिमेची संकल्पना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून करण्यात येणार आहे. या अभियानात ग्रामीण भागात वसुधा वंदन, शिलाफलकम (स्मारक) यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेणारी बैठक बुधवारी ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव श्री शैलेश कुमार सिंह आणि युवा कार्य विभागाच्या सचिव श्रीमती मीता राजीवलोचन यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. युवा कार्य सचिव यांनी कार्यक्रमाच्या स्वरूपाबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे 09 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. देशभरातील सुमारे 7,500 ब्लॉकमधून निवडलेले तरुण दिल्लीच्या कर्तव्य पथावर या कार्यक्रमासाठी एकत्र येतील. ऑगस्ट 2023 मध्ये होणाऱ्या या मेगा इव्हेंटमध्ये ते त्यांच्या राज्यातील सर्व गावे/ग्रामपंचायतींमधून माती आणतील. ‘वसुधा वंदन’ कार्यक्रमाच्या परिणामी, दिल्लीतील कर्तव्य मार्गावर उभारण्यात येणाऱ्या अमृत वाटिकेत देशी वनस्पती आणि शिलाफलकम असणार आहेत. ग्रामविकास सचिव, श्री शैलेश कुमार सिंह यांनी वसुधा वंदन आणि शिलाफलकमचे महत्त्व सांगत, प्रत्येक ग्रामपंचायत/गाव वसुधा वंदन अंतर्गत देशी प्रजातींची 75 रोपे लावून पृथ्वी मातेचे नूतनीकरण करण्याबाबतची माहिती दिली. पुढे ते म्हणाले की, वसुधा वंदन कार्यक्रम अमृत सरोवर किंवा कोणत्याही जलकुंभावर किंवा शाळा, ग्रामपंचायत इमारती किंवा ग्रामपंचायतीने ठरविल्यानुसार योग्य ठिकाणी / सार्वजनिक ठिकाणी आयोजित केला जाऊ शकेल. देशासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व वीरांप्रती आपल्या मनातील भावना व्यक्त करणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. ग्रामीण विकास सचिवांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लोकसहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन केले असून सर्व स्तरातील लोकांना कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे. 0000000000 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi अमरज्योत कौर अरोरा /वृत्त क्र.134 / 27.7.2023

अबसे महाराष्ट्र सरकार के हर सरकारी पत्र पर लगेगा शिवराज्याभिषेक का चिन्ह! -सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

नई दिल्ली 27 : छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक का यह 350 वां साल है। जिसे महाराष्ट्र सरकार ने राज्य में बडे पैमाने पर मनाने के लिए विविध कार्यक्रम आयोजित किए गए है । इसके चलते अब राज्य सरकार ने हर सरकारी पत्र पर शिव राज्याभिषेक समारोह का प्रतीक चिह्न लगाने का महत्वपूर्ण निर्णय लिया है । इसके तहत सरकार ने एक सरकारी ऑर्डर जारी किया है । जिससे हर सरकारी कार्यालय के दर्शन परिसर में यह प्रतीकचिन्ह प्रदर्शित होगा । छत्रपति शिवाजी महाराज के 350वें राज्याभिषेक वर्ष के अवसर पर श्री. सुधीर मुनगंटीवार के नेतृत्व में, सांस्कृतिक मामलों का विभाग कई विविध और अनोखी गतिविधियाँ चला रहा है। इसमें छत्रपती शिवाजी महाराज की वीरता और पराक्रम को उजागर करने वाले प्रतीक को महाराष्ट्र के कोने-कोने में पहुंचाने का बेहद रचनात्मक प्रयास सफल रहा है। 24 जुलाई को सरकारने फैसला लिया है कि, छत्रपति शिवाजी महाराज के विचारों को एक बार फिर से जागृत करने, छत्रपति शिवाजी महाराज के ज्ञान और पराक्रम को दुनिया भर के हर व्यक्ति तक पहुंचाने के उद्देश्य से यह फैसला लिया गया है। विशेष रूप से प्रत्येक सरकारी कार्यालय के दर्शनी परिसर पर यह प्रतीक चिन्ह लगाना अनिवार्य कर दिया गया है। छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक के 350 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य 1 जून से 6 जून तक रायगढ़ किला, राजमाता जिजाऊ की समाधीस्थल पाचड़ गांव तथा गेटवे ऑफ इंडिया पर विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया था। एक और अनोखी पहल महाराज के समय के सिक्के, किले, अष्टप्रधान मंडल आदि प्रेरणादायक हैं। सांस्कृतिक कार्य विभाग ने इन प्रेरक विचारों को सभी के लिए आसानी से उपलब्ध कराने के लिए कई गतिविधियाँ शुरू की हैं। अब इसमें छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक समारोह का प्रतीक चिन्ह हर व्यक्ती को अवगत कराने का निर्णय भी जुड़ गया है। 00000000000 अमरज्योत कौर अरोरा /27.07.2023

Wednesday 26 July 2023

महाराष्ट्रात 5 हजार 441 किलो मीटर रेल्वेचे विद्युतीकरण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली, 26 : भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज जाळे 59, 096 रूट किलोमीटरचे विद्युतीकरण (RKM) झालेले आहे. यापैकी महाराष्ट्रात 5 हजार 441 किलो मिटर रेल्वेचे विद्युतीकरण झालेले आहे. ही माहिती 30 जुन 2023 पर्यंतची अद्यावत आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ‍ि भारतीय रेल्वे ने वर्ष 2030 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जक बनण्याचे उद्द‍िष्ट ठेवले आहे. यासाठी विविध उपाय योजले जात आहे, यातंर्गत ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, जसे हेड ऑन जनरेशन (HOG) तंत्रज्ञानाचा वापर, कोचमध्ये एलईडी लाईट्सचा वापर, उच्च दर्ज्याचे तारांकित (स्टार रेटेड) उपकरणाचा वापर करण्यात येत आहे. पाण्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन यासह मोठया प्रमाणात वनीकरण करण्यात येत आहे. विद्युतीकरणाच्या कामांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या वैधानिक परवानग्या मिळण्यास थोडा विलंब होत आहे. हा विलंब टाळण्यासाठी काही ठोस पावले रेल्वे मंत्रालयाकडून उचलली गेली असल्याचीही माहिती श्री वैष्णव यांनी यावेळी दिली. विद्युतीकरणाचे कार्य करण्यात काही अडचणी दूर करण्यासाठी प्रोजेक्ट मॉनिटरिंग ग्रुप (PMG) पोर्टल बनविले आहे. तसेच रेल्वे बोर्ड स्तरावरील प्रकल्पांना सुरळीत आणि जलद मंजूरीसाठी रेल्वे बोर्डामध्ये ‘गती शक्ती संचालनालय’ उभारले आहे. प्रभावी प्रकल्प देखरेख यंत्रणा सुनिश्चित करणे, याशिवाय, मोठ्या आकाराचे प्रकल्प ‘इंजिनीअरिंग प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन’ (EPC) कॉन्ट्रॅक्ट मोडमध्ये कार्यान्वित केले जात आहेत. खात्रीशीर निधीची व्यवस्था केली जात आहे. प्रकल्प अंमलबजावणी आणि पूर्णत्वास गती देण्यासाठी फील्ड युनिट्सना आर्थिक अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जात आहे. अशी लिख‍ित माहिती श्री वैष्णव यांनी रेल्वेच्या विद्युतीकरणा सदंर्भात लोकसभेत दिली. 00000000000 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi /वृत्त क्र.133 / 26 .7 .2023

महाराष्ट्रातील 85.66 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेतंर्गत मिळणार 1866.40 कोटी रुपये लाभ

नवी दिल्ली, 26: महाराष्ट्रातील 85.66 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 1866.40 कोटी रुपयांचा लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, गुरुवार, 27 जुलै 2023 रोजी देण्यात येणार आहे. हा निधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएमकिसान) योजनेतंर्गत त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जाईल. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी, केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना सुरू केली असून, या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति हप्ता रु. 2000/- च्या तीन समान हप्त्यांसह प्रति वर्ष रु. 6000/- चा लाभ दिला जात आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PMKISAN) अंतर्गत देय असलेल्या चौदाव्या हप्त्याचा (एप्रिल, 2023 ते जुलै, 2023) लाभ देशातील लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पंतप्रधान, श्री मोदी यांच्या शुभ हस्ते वितरित केला जाईल. खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे यांसारख्या कृषी निविष्ठा खरेदीसाठी ही रक्कम निश्चितच उपयुक्त ठरेल आणि कृषी उत्पादन वाढीला चालनाही मिळेल. फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून, 110.53 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण रु. 23731.81/- कोटी लाभ हस्तांतरित झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण 85.66 लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 1 एप्रिल 2023 ते 31 जुलै 2023 या कालावधीसाठी सीकर येथे होणाऱ्या समारंभात अंदाजे रु. 1866.40/- कोटी रुपयांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल. केंद्र सरकारने या योजनेचा लाभ आधारशी जोडलेल्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 88.92 लाख लाभार्थ्यांची बँक खाती आधार लिंक्ड लाभांच्या रकमेसाठी नोंदणी करण्यात आली आहेत. उर्वरित सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करण्यासाठी संबंधित बँकेला भेट द्यावी आणि केंद्र सरकारच्या विनंतीनुसार पंतप्रधान किसान योजनेचे लाभ मिळविण्यासाठी आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेकडे आवश्यक अर्ज सादर करण्याचे सूचित केले आहे. या सोहळ्याला, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर, मा. केंद्रीय रसायन व खते आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया उपस्थित राहणार आहेत. परिसरातील शेतकरी कृषी विज्ञान केंद्र (KVK) येथे https://pmindiawebcast.nic.in लिंक वापरून या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील.

Sunday 23 July 2023

राजधानीत लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी




 


नवी दिल्ली दि. 23 : भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची  जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.

 

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी  व  कर्मचाऱ्यांनी  लोकमान्य टिळकांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

      

00000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र.130, दि.23.07.2023

Saturday 22 July 2023

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी घेतली सहकुटुंब केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट










नवी दिल्ली , 22 : महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री व  सहकार मंत्री अमित शहा  यांची त्यांच्या  शासकीय निवासस्थानी  सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.

            यावेळी श्री. शिंदे  यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री शहा  यांना  पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ प्रतिमा भेट दिली. 

         या भेटीत श्री शिंदे त्यांचे वडील संभाजी शिंदे, सुविद्य पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी वृषाली शिंदे  नातु रूद्रांश यांच्या सोबत होते.

             याप्रसंगी श्री. शहा यांनी  श्री. शिंदे यांच्या सोबत महाराष्ट्रासंबंधी विविध विषयांवर चर्चा केली.

  

००००००

महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे






मुख्यमंत्री यांनी घेतली सहकुटुंब  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सद‍िच्छा भेट

 

 

नवी दिल्ली , 22 : राज्यात सुरू असलेल्या  विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.  

 

आज मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी प्रधानमंत्री श्री मोदी यांची त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी  सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. श्री शिंदे यांनी त्यांचे वडील संभाजी शिंदे, सुविद्य पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी वृषाली शिंदे  नातु रूद्रांश यांच्या समवेत भेट घेतली.

 

या भेटी दरम्यान कुटुंबीयांची प्रधानमंत्री यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली असल्याचे भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.  यासोबतच राज्याच्या सर्वंकष विषयांवर चर्चा करून राज्यात सुरू असलेल्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पाठबळ असल्याचे आश्वासक आश्वासनही यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी यांनी दिले असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या ईशाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या घटनेबाबत सहवेदन प्रधानमंत्री श्री मोंदी यांनी व्यक्त करत या दुःखाच्या समयी केंद्र सरकार खंबीरपणे पाठीशी उभे असल्याच्या भावना प्रधानमंत्री यांनी यावेळी व्यक्त केल्या असल्याचे  श्री शिंदे यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबतची माहिती जाणून घेतली.


धारावी प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असून यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार आहे. या प्रकल्पामुळे येथील लोकांचे जीवनमान उंचावेल त्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी अपेक्षा प्रधानमंत्री मोदी यांनी श्री शिंदे यांच्याकडून व्यक्त केली. त्याचबरोबर मुंबईतील पुनर्विकासांचे रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याची चर्चा यावेळी झाली. यासोबतच प्रत्येक कुटुबांला हक्काचे घर  मिळावे, असे केंद्र शासनाचे धोरण असून राज्य त्या दिशेनेही काम करीत असल्याचे समाधान प्रधानमंत्री यांनी  व्यक्त केले असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.


  राज्यातील रखडलेले पुर्नविकासाचे प्रकल्प मार्गी लावावेत. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे राज्यातील असे सर्व प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशाही सूचना प्रधानमंत्री श्री मोदी यांनी यावेळी केल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासह राज्यात वांरवार होणारी अतिवृष्टी त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचे होणारे नुकसान याबाबतही प्रधानमंत्री यांनी  विचारपूस केली. कोकणात येणारा उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळविता येईल, यावर भविष्यात काही उपाययोजना आखता येतील का याबाबतही चर्चा करण्यात आली.  मराठवाडा  वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनेबाबतची माहिती श्री मोदी यांनी  घेतली. यासह राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा याबाबतही विचारणा केली असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.

 


 

Friday 21 July 2023

पशुधन क्षेत्रासाठीच्या पहिल्या "पत हमी योजने" चा प्रारंभ ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना, 750 कोटी रुपयांच्या पतहमी निधी न्यासाची स्थापना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) जोखीमरहित विनातारण कर्ज


नवी दिल्‍ली, 21: पशुधन क्षेत्रात गुंतलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) कर्ज वितरणाची प्रणाली मजबूत करण्यासाठी तसेच जोखीमरहित विनातारण सुरळीत कर्ज उपलब्ध होण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागकेंद्रीय पशुसंवर्धनमत्स्यपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने पत हमी योजना लागू केली आहे. या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने 750 कोटी रुपयांचा पत हमी निधी न्यास स्थापन केला आहे. हा न्यास पात्र कर्ज देणाऱ्या संस्थांद्वारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विस्तारित पत सुविधांच्या 25% पर्यंत पत हमी कवच प्रदान करेल.

            या पतहमी योजनेमुळे, सेवा न मिळालेल्या किंवा अत्यल्प सेवा मिळालेल्या पशुधन क्षेत्रासाठी सुलभ वित्तपुरवठा सुलभ करू शकेलमुख्यत्वे पहिल्या पिढीतील उद्योजकांना आणि समाजातील वंचित घटकांना, ज्यांना त्यांच्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी संपार्श्विक सुरक्षा नसते.

वैयक्तिक उद्योजक, खाजगी कंपन्या, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) आणि कलम 8 अंतर्गत येणाऱ्या कंपन्या ज्या -डेअरी प्रक्रिया आणि मूल्यवर्धन पायाभूत सुविधा, मांस प्रक्रिया आणि मूल्यवर्धन पायाभूत सुविधा, पशुखाद्य संयंत्र, पशु जाती सुधार तंत्रज्ञान आणि जाती गुणन फार्मपशु कचरा संपत्ती व्यवस्थापन (कृषी कचरा व्यवस्थापन) आणि पशुवैद्यकीय लस आणि औषधे उत्पादन सुविधांची स्थापना यांच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 15000 कोटी रुपयांच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) च्या पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत अभियान प्रोत्साहन पॅकेज अंतर्गत पत हमी निधी न्यासाची स्थापना मंजूर करण्यात आली आहे.  

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे 750 कोटी रुपयांच्या पतहमी निधी न्यासाची स्थापना. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने NAB संरक्षण ट्रस्टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड च्या सोबतीने या ट्रस्टची स्थापना केली आहे. नाबार्डची पूर्ण मालकी असलेल्या ही उपकंपनी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) योजनेंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पतहमी योजनेचा विस्तार करणाऱ्या या न्यासाच्या स्थापनेसाठी  तयार करण्यात आली आहे. मार्च 2021 मध्ये स्थापन झालेला हा निधी न्यास कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) च्या पतहमी योजनेंतर्गत देशातील पहिला फंड न्यास असून पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने (DAHD) हाती घेतलेला एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्यामुळे पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) चा लाभ मिळवणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्रांची संख्या झपाट्याने वाढू आणि बँकांकडून विणातारण कर्ज मिळवण्यासाठीची व्यवस्था मजबूत होईल.

3% व्याज दराची सवलत देणार असूनकोणत्याही शेड्यूल्ड बँक, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) यांच्याकडून एकूण प्रकल्प खर्चाच्या 90% पर्यंत कर्ज देण्याची सुविधा पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये मार्फत देण्यात येणार आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी, या संकेतस्थळाला भेट द्या: https://dahd.nic.in/ आणि https://ahidf.udyamimitra.in/   

 

Wednesday 19 July 2023

परदेशातून भारतात येणा-या प्रवाशांसाठी कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वे सुलभ - केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय



 

नवी दिल्‍ली, 19   : जगभरातील सध्याची कोविड-19ची प्रचलित स्थिती आणि कोविड-19 लसीकरणामध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीची दखल घेवून परदेशातून भारतामध्‍ये येणा-या प्रवाशांसाठी कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिक सुलभ केली आहेत.

भारतीय प्रमाण वेळेनुसार दि. 20 जुलै 2023 च्या मध्‍यरात्रीपासून (रात्री 12.00वाजता) नवीन मार्गदर्शक तत्वे लागू होणार आहेत.  या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भारतात येणा-या आंतरराष्‍ट्रीय  प्रवाशांपैकी 2 टक्के प्रवाशांना आर टी-पीसीआर  चाचणी करणे गरजेचे होते.  आता या चाचणीची  आवश्यकता  रद्द करण्यात आली आहे.

तथापि, कोविड-19 च्या संदर्भात एअरलाइन्स तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी पाळण्याच्या सावधगिरीच्या उपायायोजना पूर्वीप्रमाणेच लागू असतील.

अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वांची माहिती, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.mohfw.gov.in/) उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने  कोविड-19 स्थितीकडे निरंतर बारीक लक्ष ठेवून आहे.


 

निवडणुकी दरम्यान दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी राष्ट्रीय प्रादेशिक पक्षांना डिजिटल टाइम व्हाउचर जारी करणार – भारत निवडणूक आयोग


 


नवी दिल्ली  19 :निवडणुकीदरम्यान आकाशवाणी आणि दूरदर्शनवर राजकीय पक्षांना दिले जाणारे वेळ आता ऑनलाइन होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने, राजकीय पक्षांद्वारे सरकारी मालकीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वापरासाठी विद्यमान योजनेत सुधारणा केली आहे. माहिती तंत्रज्ञान (IT) प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल टाइम व्हाउचर जारी करण्याची तरतूद सादर करून हे केले गेले आहे. या सुविधेमुळे, राजकीय पक्षांना निवडणुकीदरम्यान वेळेचे व्हाउचर मिळवण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी ECI/CEO कार्यालयात पाठवण्याची आवश्यकता भासणार नाही. निवडणूक प्रक्रियेच्या सुधारणा, सर्व भागधारकांच्या सुलभतेसाठी, तसेच तंत्रज्ञानाची सुविधा घेण्यासाठी आयोगाने महत्वाचे पाऊल उचलेले आहे.  

 

तंत्रज्ञानातील प्रगती ओळखुन आयोग राजकीय पक्षांशी संवाद साधण्यासाठी आयटी आधारित पर्याय उपलब्ध करून देत आहे. अलीकडेच, आयोगाने निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांकडून आर्थिक खाती ऑनलाइन भरण्यासाठी एक वेब पोर्टलही सुरू केले आहे.

 

सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक ला भेट द्यावी.

 

ऑर्डरची लिंक:

https://eci.gov.in/files/file/15138-scheme-for-use-of-govt-owned-electronic-media-by-political-parties-during-elections-modification-of-scheme-%E2%80%93-para-6-sub-clause-iv-%E2%80%93-provision-to-provide-time-vouchers-through-it-platform-%E2%80%93-regarding/

राष्ट्रीय/प्रादेशिक  राजकीय पक्षांना पाठवलेल्या पत्राची लिंक:

https://eci.gov.in/files/file/15140-letter-to-political-parties-digitization-of-time-vouchers-in-respect-of-broadcasttelecast-time-allotted-to-nationalstate-political-parties-during-election/

देशाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशां’कात महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर


नवी दिल्ली 18 :  निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीति आयोगाच्या 'निर्यात सज्जता निर्देशांक-2022' अहवालात 78.20  गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे.तर तामिळनाडू राज्याने पहिले स्थान मिळवले आहे. देशाच्या निर्यात क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या आधारावर, नीति आयोगाचे उपाध्‍यक्ष सुमन बेरी यांनी ‘निर्यात सज्जता निर्देशांक (Export Preparedness Index 2022’ अहवाल जारी केला.

            ‘निर्यात सज्जता निर्देशांक (Export Preparedness Index 2022 ची तिसरी आवृत्तीत चार प्रमुख व 11 उपमानकांच्या आधारे महाराष्ट्र राज्य 78.20 गुण मिळवत दुसरे स्थानावर राहिले आहे, तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आणि कर्नाटक राज्य तिस-या  क्रमांकवर राहिले आहे.

 

काय आहे निर्यातविषयक सज्जता निर्देशांक?

हा अहवाल म्हणजे भारताच्या निर्यातविषयक कामगिरीचे समावेशक विश्लेषण आहे. देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना त्यांच्या सहकारी राज्यांच्या तुलनेत स्वतःच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे आणि उपराष्ट्रीय स्तरावरील निर्यातीवर आधारित विकासाला चालना देण्यासाठी उत्तम धोरणात्मक यंत्रणा विकसित करण्याच्या संभाव्य आव्हानांचे विश्लेषण करणे, यासाठी या निर्देशांकाचा वापर करण्यात येतो.  निर्यातविषयक सज्जता निर्देशांक पुढील चार मुख्य घटकांच्या संदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांची क्रमवारी निश्चित करतो – धोरणव्यवसाय परिसंस्थानिर्यात परिसंस्था आणि निर्यातविषयक कामगिरी. तसेच या क्रमवारीसाठी निर्यात प्रोत्साहन धोरणसंस्थात्मक चौकटव्यवसायाचे वातावरणपायाभूत सुविधावाहतुकीची सुविधाअर्थसहाय्य मिळण्याची सोयनिर्यातविषयक पायाभूत सुविधाव्यापारविषयक मदतसंशोधन आणि विकासविषयक पायाभूत सुविधानिर्यातीचे वैविध्यीकरण आणि विकासाभिमुखता हा 11 उपनिर्देशक विचारात घेतले जातात.

ईपीआय 2022 च्या अहवालात महाराष्ट्र राज्याने  सर्व श्रेणींमध्ये निर्यात सज्जता निर्देशांकात उत्तम कामगिरी बजावली आहे. तसेच बहुतांश ‘तटवर्ती राज्यांनी चांगली कामगिरी केली असूनतमिळनाडू (80.89),  कर्नाटक (76.36) आणि गुजरात  (73.22) गुणांसह ही राज्ये देखील सर्व श्रेणींमध्ये निर्यात सज्जता निर्देशांकात अग्रगण्य स्थानावर आहेत. अहवाचा उद्देश देशातील सर्व राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये निरोगी स्पर्धाची भावना निर्माण करणे  आणि राज्यांमध्ये समतुल्य- शिक्षणाला प्रात्साहन देणे हा आहे.

नीति आयोगाचे उपाध्यक्षसुमन बेरी यांनी अहवालाचे प्रकाशन करताना सांगितले कीआपण 2047 कडे पाहत असताना आणि तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत असतानाउत्पादनासोबत सेवा आणि कृषी निर्यातीत स्पर्धात्मकता वाढवण्यावर भर देणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.


 

Friday 14 July 2023

चंद्रयान-3 चे प्रक्षेपण भारतीयांसाठी अभिमानाची बाब -सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार





नवी दिल्ली 14: चंद्रयान-3 चे सफल प्रक्षेपण आम्हा सर्व भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

 आज श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर सर्वांना शुभेच्छा देताना त्यांनी आशा व्यक्त केली की, लवकरच भारत हे यशस्वी मिशन सुरू करणारा चौथा देश असेल.

 महाराष्ट्र सदन येथे आज महाराष्ट्र राज्याच्या 2010 च्या सांस्कृतिक धोरणाचा फेर आढावा घेण्यासाठी शासनाने नेमलेल्या पूर्नविलोकन समितीची बैठक,सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या  अध्यक्षतेखाली  दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

 यावेळी बोलतांना, श्री मुनगंटीवार म्हणाले, जगामध्ये इकॉनोमी मध्ये आम्ही पाचव्या क्रमांकावर आहोत आता तर फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनोमिक होत आपण जर्मन आणि जपानलाही मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर जाण्याचा एक दृढ संकल्प केला. त्याच पद्धतीने विज्ञानामध्ये जेव्हा हे चंद्रयान यशस्वीपणे 42 दिवसानंतर चंद्रावर पोहोचेल तेव्हा जगातल्या 193 देशात आमचा देश चौथ्या क्रमांकाचा देश असेल ज्याचा अभिमान भारतीयांना निश्चित वाटेल. प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये याचा अभिमान निश्चितपणे निर्माण होईल आणि त्यादृष्टीने या मोहिमेकडे आपण सर्वजण पाहतो आहोत. आपल्या शास्त्रज्ञांनी  रात्रंदिवस मेहनत, कष्ट परिश्रम करत 'पुन्हा एकदा घे भरारी' म्हणत चंद्रयान दोनच्या नंतर सफलतेच्या मार्गावर चंद्रयान तीन चे प्रक्षेपण केले आहे. ही बाब सर्व भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे आणि आम्ही चौथ्या क्रमांक निश्चितच गाठू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 यावेळी सांस्कृतिक धोरण समितीचे कार्याध्यक्ष डॉ विनय सहस्रबुदधे व सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव श्री विकास खारगे उपस्थित होते.

००००००

 

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

http://twitter.com/micnewdelhi  

अमरज्योत कौर अरोरा/वृत्त वि. क्र. 122, दिनांक  14.07.2023