Friday 30 July 2021

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी प्रसिध्द लेखक व वक्ते जयदेव डोळे यांचे व्याख्यान



             

नवी दिल्ली, दि. ३० : लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेच्या उत्तरार्धात १ ऑगस्ट २०२१ रोजी  प्रसिध्द लेखक व वक्ते जयदेव डोळे यांचे अण्णाभाऊ साठे: साम्यवादी, महाराष्ट्रवादी या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.

 

            महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला सुरु झाली आहे  व पूर्वाधात ४४ व्याख्यान झाले. या व्याख्यानमालेचा उत्तरार्ध सुरु होत असून रविवार  १ ऑगस्ट  रोजी  लेखक व वक्ते जयदेव डोळे हे सकाळी  ११.०० वाजता व्याख्यानमालेचे ४५ वे पुष्प गुंफणार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित या विशेष या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.  

                                             जयदेव डोळे यांच्या विषयी

           जयदेव डोळे हे मराठीतले वैचारिक लिखाण करणारे प्रसिध्द लेखक व वक्ते आहेत. पुणे आणि औरंगाबाद या दोन्ही शहरांत त्यांनी एकूण १८ वर्षे पत्रकारिता केली. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे त्यांनी एकूण २० वर्षे पत्रकारिता विषयाचे अध्यापन केले आहे.

श्री. डोळे यांची एकूण ९ पुस्तके प्रकाशित असून अ लिव्हिंग फेथ (अनुवादित,मूळ इंग्रजी लेखक-असगर अली इंजिनिअर), आरएसएस, खबर, जॉर्ज नेता, साथी, मित्र’, प्राध्यापक लिमिटेड (अनुभवकथन), लालूप्रसाद यादव (अनुवादित चरित्र, मूळ हिंदी लेखक - संकर्षण यादव), विरु(ल)द्ध : महाराष्ट्रीय संस्कृतीवर एक क्रिटिक (कादंबरी), समाचार-अर्थात प्रसारमाध्यमांची झाडाझडती (सामाजिक) आणि  हाल (ललित) या पुस्तकांचा त्यात समावेश आहे.

                       महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि औरंगाबाद , महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांची उत्कृष्ट साहित्य निर्मितीची पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘नरहर कुरुंदकर वाड्मय पुरस्कार आणि लोकसाहित्यिक भास्करराव जाधव यांच्या नावाचा 'कॉम्रेड जाधव स्मृतिपुरस्कारही त्यांना मिळाला आहे. २०१७ मध्ये प्राध्यापकपदाहून निवृत्त झाल्यानंतर श्री. डोळे हे लेखन,व्याख्यान करतात.

                        रविवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

                  रविवार, ऑगस्ट 2021 रोजी  सकाळी 11 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

                     हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share  तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे. 

             आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :https://twitter.com/MahaGovtMic

                                             ०००

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.१५२ /दिनांक .०८.२०२१

 

 

 

 

 

 

 


 

हीरक महोत्सवी व्याख्यानमालेचा उत्तरार्ध 1 ऑगस्टपासून

 









पुर्वार्धामध्ये 44 व्याख्याने ; नेटक-यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले कौतुक  

नवी दिल्ली दि. 30: हीरक महोत्सवी व्याख्यानमालेचा उत्तरार्ध 1 ऑगस्टपासून सुरू होत आहे. पुर्वार्धामध्ये नामवंत 44   वक्त्यांची  व्याख्याने झालेली आहेत. या व्याख्यानमालेचे नेटक-यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले.

महाराष्ट्र राज्य निर्मीतीला 60 वर्ष पुर्ण झालेली आहेत. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत येणा-या दिल्लीस्थित महाराष्ट्र परिचय केंद्राचे हे 60 वर्ष आहे.  यानिम‍ित्त हीरक महोत्सवी व्याख्यानमालेची सुरूवात 19 मार्च 2021 पासून करण्यात आली होती. आतापर्यंत या व्याख्यानमालेमध्ये एकूण नावाजलेल्या 44 वक्त्‌यांनी विविध विषयांवर व्याख्याने दिलेली आहेत.

हीरक महोत्सवी व्याख्यानमालेतील प्रथम व्याख्यान ज्येष्ठ पत्रकार, डॉ. विजय चोरमारे यांनी  गेल्या 60 वर्षातील महाराष्ट्राचे समाजकारण व राजकारण या विषयावर व्याख्यान केले होते. यासह या व्याख्यान मालेत माजी कुलगुरू आणि माजी उच्च शिक्षण संचालक डॉ एस.एन. पठाण , राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार श्री कुमार केतकर, साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड, लेखिका तथा माजी अध्यक्ष  महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ , ज्येष्ठ पत्रकार (गोवा) श्री प्रभाकर ढगे,  राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सदस्य  डॉ. ज्ञानेश्वर मुळे, कृषीतज्‍ज्ञ डॉ. बुधाजी मुळीक, सुप्रसिध्द शाहीर संभाजी भगत, विचारवंत व राज्यशास्त्रज्ञ डॉ. अशोक चौसाळकर, इतिहास संशोधक श्री इंद्रजित सावंत, दै. सकाळ चे दिल्लीतील संपादक अंनत बागाईतकर , मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मेधा कुळकर्णी, प्रसिद्ध कवी, लेखक अशोक नायगावकर, साहित्यिक श्रीकांत देशमुख, विचारवंत व कांदबरीकार श्री संजय सोनवणी, वरिष्ठ पत्रकार व लेखक सचिन परब, तुषार गांधी, दै. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, संतसाहित्य व लोकवाङ् मय याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, ज्येष्ठ पत्रकार व माध्यम तज्ज्ञ श्री राजा माने, प्रसिध्द वक्ते व इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे, साहित्यिक, पक्षीतज्ज्ञ, वृक्ष अभ्यासक मारूती चितमपल्ली, उपसभापती, विधान परिषद डॉ. निलम गो-हे , ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जून डांगळे , ज्येष्ठ पत्रकार व लेखक विजय नाईक,  ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी, सामाजिक कार्यकर्ते संजय नाहर, ज्यष्ठ राजकीय नेते उल्लास पवार , सकाह माध्यम समुहाचे संपादक-संचालक श्रीराम   पवार , मराठी विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे डॉ. रणधीर शिंदे, प्राध्यापक तथा लेखक डॉ. गिरीश मोरे, प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, निवृत्त सनदी अधिकारी तथा लेखक   लक्ष्मीकांत देशमुख,  प्रसिद्ध निवेदिका क्षिप्रा  मानकर ,  माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज  चव्हाण, ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक व तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार, नामवंत इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, चित्रपट अभ्यासक प्रा. डॉ. कविता गगरानी, माजी एयर मार्शल अजित भोसले यांची आतापर्यंत व्याख्याने झालेली आहेत.

वक्त्यांनी   महाराष्ट्राच्या  विविध क्षेत्रातील  प्रगतीच्या वाटचालीचा  आलेख मांडला  तसेच भविष्यात उचलावी लागणारी पाऊले यावरही भाष्य केले.  ही व्याख्यानमाला ऑनलाईन माध्यमाने  झाली . नेटक-यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी   या व्याख्यानमालेचे कौतुक केले.

 

या व्याख्यानमालेत झालेली सर्व व्याख्याने आजही आमच्या सर्व समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. ी झालेली  व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर पाहता येईल तसेच फेसबुक   https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येतील.     

 

Friday 23 July 2021

राजधानीत लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी





 


 

नवी दिल्ली दि. २३ : भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १६५ वी जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.   

 कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी  लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांनीही  यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  

महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकमान्य टिळक यांना अभिवादन   

महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. माहिती अधिकारी अंजू निमसरकर,उपसंपादक रितेश भुयार यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित कर्मचा-यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली  वाहिली.  

 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       

 000000 

 

 

                                         

 

Wednesday 7 July 2021

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ; महाराष्ट्रातून एक कॅबिनेट व तीन राज्यमंत्री





 

 नवी दिल्ली दि. 7 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज फेरबदल व  विस्तार  झाला, यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण 43 मंत्र्यांना शपथ दिली. यात महाराष्ट्रातील एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री अशा एकूण चार मंत्र्यांचा समावेश आहे.    

            राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार समारंभात आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी घटकपक्षांच्या सदस्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यपदाची शपथ घेतली. यामध्ये 15 कॅबिनेट मंत्री आणि 28 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यावेळी उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला,  पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीयमंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

                       महाराष्ट्रातून एक कॅबिनेट व तीन राज्यमंत्र्यांची शपथ  

            केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल व विस्तारात आज महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना राष्ट्रपतींनी  कॅबिनेट मंत्री पदाची तर खासदार सर्वश्री कपील पाटील, डॉ. भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना राज्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली.            

                  माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार नारायण राणे, भिवंडी लोकसभा मतदार संघाचे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले खासदार कपील पाटील, दिंडोरी लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आलेल्या  खासदार डॉ भारती पवार आणि नुकतेच राज्यसभेवर निवडून आलेले खासदार डॉ. भागवत कराड पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून कार्यभार पाहणार आहेत. 

 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       

 000000   

रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.१५० /  दिनांक .०७.२०२१ 

 

 

 


आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास लवकरच सुरूवात : क्रीडा मंत्री सुनील केदार

 


नवी दिल्ली दि. 7: पुण्यातील बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज दिली.

            राज्याचे क्रीडा मंत्री यांनी आज विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रो.डी.पी.सिंग  यांची भेट घेतली. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाशी निगडीत महत्वाच्या विषयांसंदर्भात चर्चा झाली असल्याचे श्री केदार यांनी बैठकीनंतर सांगितले.

आज झालेल्या बैठकीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमातंर्गत अंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाला अधिकृत मान्यता देण्यात यावी, विद्यापीठात शिकविण्यात येणारे विषयांची वैधानिक परिभाषा काय असणार आहे, यासह या विद्यापीठाशी विषयांवर चर्चा करण्यात आली असल्याचे श्री केदार यांनी सांगितले. या विषयांशी निगडीत परवानग्या मिळण्यासाठी कुलगुरूंची समिती अभ्यास करून निर्णय घेणार आहे. यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचेही श्री केदार यांनी सांगितले.

            या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम आणि संचार, क्रीडा प्रशिक्षण हे विषय शिकविले जातील त्यामुळे या विषयांमध्ये शिक्षणाच्या तसेच नोकरीच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध होतील. भविष्यात राज्यातील पांरपारिक क्रीडा प्रकारही शिकविले जातील, अशीही माहिती श्री केदार यांनी दिली.  

Thursday 1 July 2021

राजधानीत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी





 

 

नवी दिल्ली दि. 1: हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 

      कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी  वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  


महाराष्ट्र परिचय केंद्रात वसंतराव नाईक यांना अभिवादन  

महाराष्ट्र परिचय केंद्रात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  अमरज्योतकौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  कार्यालयात उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली  वाहिली.  

 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       

 000000 

रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.१४ /  दिनांक  १.०७.२०२१