Friday 31 May 2019

राजधानीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी








  

नवी दिल्ली दि. 31 :   पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी  होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
  महाराष्ट्र परिचय केंद्रात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित अभ्यागत, अधिकारी व कर्मचा-यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.  
                                               000000  
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.124/  दिनांक  ३१.०५.२०१९ 



महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागरराव यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे अभिनंदन केले






महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागरराव यांनी आज केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.



Thursday 30 May 2019

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाची शपथ









महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट  व 3 राज्यमंत्री
नवी दिल्ली दि. 30 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रीमंडळास आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली.  या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा समावेश आहे.
             राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित शानदार समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी घटक पक्षांच्या सदस्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये 25 कॅबिनेट मंत्री, 9 राज्यमंत्री (स्वंतत्र प्रभार) व 24 राज्यमंत्री  यांचा समावेश आहे. यावेळी  ब्रेक्सिस्ट देशाचे प्रमुख, उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्यासह विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह  विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.    
महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री
श्री. नरेंद्र मोदी  यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि अरविंद सावंत यांना राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली.   तर रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी राज्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली.
याआधी वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री, जलसंसाधन मंत्री म्हणून तर पियुष गोयल यांनी उर्जा मंत्रालय व कोळसा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून तर प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण मंत्री, पर्यावरणमंत्री आणि मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून मंत्रीपद भुषवीले आहे. तर रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय व अधिकारीता विभागाचे राज्यमंत्री म्हणून पद भुषवीले आहे. रावसाहेब दानवे यांनीही राज्यमंत्री पद भूषविले होते. अरविंद सावंत आणि संजय धोत्रे यांनी प्रथमच केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली  आहे.   
           महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi                                       000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.123/  दिनांक  ३०.०५.२०१९ 

खासदार परिचय पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन






                       सुबक मांडणीसह पुस्तिका तत्परतेने पूर्ण केल्याबद्दल कौतुक 

नवी दिल्ली दि. 30 :  महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने तयार करण्यात आलेल्या खासदार परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज महाराष्ट्र सदनात करण्यात आले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने 17व्या लोकसभेत महाराष्ट्रातून नवनिर्वाचित खासदरांची माहिती असलेली पुस्तिका तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुस्तिकेचे अवलोकन केले. सुबक मांडणी, उपयुक्त माहिती या पुस्तिकेत असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य शपथ घेत असताना अगदी औचित्यपूर्ण समयी तत्परतेने ही पुस्तिका तयार केली आहे, अशा शब्दात श्री. फडणवीस यांनी कौतुक केले. 

मुख्यमंत्री कक्षात पार पडलेल्या या प्रकाशन सोहळयात महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा आणि उपसंपादक रितेश भुयार उपस्थित होते. 
 
या खासदार परिचय पुस्तिकेत महाराष्ट्रातील लोकसभेवर निवडून आलेले  ४८ खासदार, राज्यसभेतील १९  व राष्ट्रपती महोदयांनी मनोनीत केलेले २ अशा एकूण ६९ खासदारांची माहिती देण्यात आलेली आहे. लोकसभेतील खासदारांची माहिती लोकसभा मतदार संघानुसार देण्यात आली असून खासदार महोदयांचा पत्ता, ईमेल, भ्रमणध्वनी, व्टिटर हँडल व स्वीयसहायकाचा भ्रमणध्वनी देण्यात आला आहे. राज्यसभेच्या खासदार महोदयांची माहिती इंग्रजी वर्णमालेनुसार देण्यात आली आहे. राज्यसभा खासदार महोदयांच्या कालावधीसह उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. या पुस्तिकेचे खास वैशिष्टय म्हणजे यात प्रत्येक पानावर संबंधीत खासदार महोदयांची माहिती संकलीत असलेला क्युआर कोड देण्यात आला आहे. 
                                               000000  
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi
 000000  
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.122/  दिनांक  ३०.०५.२०१९ 


Tuesday 28 May 2019

राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी











नवी दिल्ली दि. 28 :   स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर  यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी  स्वातंत्र्यवीर सावरकर  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या   प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
  महाराष्ट्र परिचय केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांच्यासह कार्यालयात उपस्थित पत्रकार आणि अधिकारी व कर्मचा-यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.  
                                               000000  
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.121/  दिनांक  .०५.२०१९ 



Tuesday 21 May 2019

राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनाचे आयोजन


              

नवी दिल्ली दि. 21 : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची 28 वी पुण्यतिथी  दहशतवाद व हिंसाचार विरोधी' दिन म्हणून मंगळवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात पाळण्यात आला

कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. श्री. सहाय यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र परिचय केंद्रात दहशतवाद व हिंसाचार विरोधी' दिनाचे आयोजन 
            महाराष्ट्र परिचय केंद्रात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन पाळण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यांनी उपस्थित अधिकारी व  कर्मचा-यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा ,उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी आणि अभ्यागत उपस्थित होते
      




Friday 10 May 2019

वैजापूर योगाश्रमाच्या योगपटुंची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट













                         प्रगती मैदान येथील 'योगशाळा एक्सपोत' सहभाग

नवी दिल्ली दि. 10 : औरंगाबाद जिल्हयातील वैजापूर येथील योगाश्रमाच्या योगपटुंनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.  
        प्रगती मैदान येथे सुरु असलेल्या 'योगशाळा एक्सपो' मध्ये वैजापूर योगाश्रमाच्या 20 योगपटुंनी  सहभाग घेतला असून आज यातील काही योगपटुंनी परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेमध्ये योगशाळा एक्सपोतील सहभागा विषयी  योगपटुंनी माहिती दिली.

               नमो गंगे ट्रस्ट, गाजीयाबाद यांच्यावतीने येथील प्रगती मैदानमध्ये दिनांक 10 ते 12 मे 2019 दरम्यान  राष्ट्रीय स्तरावरील योगशाळा एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. वैजापूर योगाश्रमाचे संस्थापक तथा प्रख्यात नाडी व योग तज्ज्ञ डॉ. अशोक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली  13 वर्षाची ऋतुजा गाडे आणि 92 वर्षांचे आदिनाथ येखंडे यांच्यासह 8 महिला व 12 पुरुष असे एकूण 20 योगपटू या एक्सपोत सहभागी झाली आहेत.

            या योगशाळा एक्सपोमध्ये योग विषय स्पर्धा आयोजित करण्यात आली असून देशभरातील 900 योगपटुंनी यात सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद, जळगाव, सांगली या जिल्हयांमधून एकूण 35 योगपटू यात सहभागी झाले आहेत. या स्पर्धेमध्ये योग प्रात्याक्षीक, लेखी व तोंडी परीक्षा, तसेच योगावर आधारीत चित्रकला स्पर्धा  आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

            वैजापूर योगाश्रमाचे डॉ. अशोक सरोदे,औरंगाबाद येथील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक कार्यालयाचे सेवानिवृत्त लेखापाल विलास सरोदे, सुनिता सरोदे, डॉ. अन्नासाहेब कदम, कैलास मतसागर, दत्तात्रय सोनवने या योगपटुंचा आज परिचय केंद्राच्या भेटीत सहभाग होता.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.119/  दिनांक  १०.०५.२०१९ 




Tuesday 7 May 2019

राजधानीत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी















नवी दिल्ली दि. 07 : महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी महात्मा बसवेश्वर  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

  महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन
 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांच्यासह कार्यालयात उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.118/  दिनांक  ०७.०५.२०१९