Tuesday 31 October 2017

शेतक-यांना खुल्या बाजारात हमी भावापेक्षा जास्त दर देण्यासाठी शासन प्रयत्नशील : पाशा पटेल


नवी दिल्ली दि.31-  डाळ व तेलबिया उत्पादक शेतक-यांना खुल्या बाजारात हमी भावापेक्षा जास्त दर देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.
          नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थान या तेलबिया व डाळ उत्पादक राज्यात हमी भावा संबंधी प्रश्न निर्माण झाला आहे. या चार राज्यात हमी भावापेक्षा कमी दर डाळी व तेलबियांना मिळत आहे. सोयाबीनचा दर तर आता 2 हजार 700 रुपये  आला आहे. सोयाबीचा हमी भाव 3 हजार 50 रुपये इतका आहे, असे नमूद करुन पाशा पटेल म्हणाले हमी भावापेक्षा  कमी दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यावर उपाय म्हणून मध्यप्रदेश सरकारने भावांतर ही योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यामातून  किमान हमी भाव व खुल्या बाजारात शेतक-यांना मिळालेला दर यातील जो फरक असेल तो फरक सरकार शेतक-यास देणारी ही योजना आहे. या योजनेमुळे शेतक-यास तात्पुरता दिलास मिळेल पण कायम स्वरुपी उपाय शोधणे आवश्यक आहे.
आयात तेलावर शुल्क वाढवावे
बाजारात किमान हमी भावापेक्षा जास्त दर शेतक-यास द्यायचे असतील तर परदेशातून आयात केलेल्या तेलावर आयात शुल्क वाढविणे आणि सोयबीन पासून निघणारी पेंड यावर निर्यात अनुदान देणे या दोन बाबी जर झाल्या तर हमी भावपेक्षा जास्त दर मिळू शकतो, असा विश्वास श्री. पटेल यांनी व्यक्त केला. 15 सप्टेंबर रोजी डाळी निर्यात करण्याचा निर्णय झाला आहे. निर्यातीच्या या यादीत चनाडाळ, मसूर या डाळीचा समावेश करावा व आयातीवर निर्बंध घातले पाहिजेत तरच आपण शेतक-यांना चांगला भाव देऊ शकतो असेही पाशा पटेल यावेळी म्हणाले.  


सरदार पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांची पूण्यतिथी साजरी




 


नवी दिल्ली, ३१ : देशाच्या  पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची ३३ वी पूण्यतिथी आणि देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची १४२ वी जयंती  महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  साजरी करण्यात आली.
                कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी इंदिरा गांधी व सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, राजीव मलिक यांच्यासह महाराष्ट्र सदनातील व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी -कर्मचारी  उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी इंदिरा गांधी व सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
            सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून तर इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून पाळण्यात येते. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना  राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्याची शपथ दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात सरदार पटेल व इंदिरा गांधी  यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात  सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांची पूण्यतिथी साजरी करण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी यावेळी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
            उपसंचालक श्री. कांबळे यांनी यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
दिली.      
       महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                             http://twitter.com/micnewdelhi                       
000000


Thursday 26 October 2017

यात्रा ऑनलाईन करणार अजिंठा लेणीचे संवर्धन











                
नवी दिल्ली, २६ : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वारसास्थळ दत्तक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचे संवर्धन होणार आहे. यात्रा ऑनलाईन प्रायव्हेट लिमीटेड. या कंपनीची या कामासाठी निवड करण्यात आली आहे.

             केंद्रीय पर्यटन मंत्रलयाच्यावतीने येथील राजपथ लॉन वर आयोजित पर्यटन पर्वकार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी बुधवारी देशातील १४ स्मारकांच्या संवर्धनासाठी ७ कंपन्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. राज्यातील औरंगाबाद जिल्हयातील प्रसिद्ध अजिंठा लेणीच्या विकासासाठी यात्रा ऑनलाईन प्रा.ली. कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ही कंपनी स्मारक मित्र म्हणून ओळखली जाणार असून सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) अजिंठा लेणीच्या  ठिकाणी पर्यटन पूरक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे तसेच  या लेण्यांच्या सवंर्धनासाठी काम करणार आहे. 
        
                   राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या वर्षी २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सांस्कृतिक मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या समन्वायातून देशातील स्मारकांच्या विकासासाठी खाजगी कंपन्यांच्या सहभागातून संवंर्धन व विकासासाठी वारसास्थळ दत्तक योजने ची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत देशातील १४ स्मारकांच्या विकासासाठी खाजगी कंपन्यांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, देशभरातून ५७ कंपन्यांचे अर्ज मंत्रालयाकडे प्राप्त झाले होते यापैकी ७ कंपन्यांची निवड करण्यात आली.  
                                          अंजिठा लेणी विषयी       
                  इ.स.पूर्व २०० ते ६५० या काळातील अजिंठा लेणी कोरीव काम व रंगीत भित्तिचित्रासाठी जगप्रसिद्ध आहेत. याठिकाणी कोरीव काम असलेली बौद्ध मंदिरे, गुंफा, बुद्धांच्या जीवनातील कोरलेले अनेक प्रसंग आश्चर्यचकित करणारे आहेत.
   
                                देशातील या स्मारकांचे होणार संवर्धन
           अंजिठयासह देशातील अन्य १३ स्मारकांचे वारसास्थळ दत्तक योजनेअंतर्गत संवर्धन होणार आहे. यात दिल्लीतील जंतर-मंतर, कुतुबमिनार, सफदरजंग कबर, अग्रसेनची विहीर आणि पुराना किल्ला या स्मारकांचा समावेश आहे. तसेच, सूर्य मंदिर (कोणार्क), राजाराणी मंदिर (भुवनेश्वर), रतनगिरी स्मारक (ओडिसा), हंपी (कर्नाटक), लेह राजवाडा (जम्मू आणि काश्मीर),मत्तानचेरी राजवाडा संग्रहालय(कोची), गंगोत्री मंदिर व गौमुख येथील त्रिभुज प्रदेश (उत्तराखंड), स्टॉक कांगरी  लडाख(जम्मू आणि काश्मीर).


                                                                       00000 

Wednesday 25 October 2017

नवीन वर्षात मुंबईला वातानुकूलित लोकलची भेट : रेल्वे मंत्री पियुष गोयल


                        नवी दिल्ली, २५ : वातानुकूलित लोकलच्या रूपाने मुंबईकरांना रेल्वे मंत्रालयाच्यावतीने नव्या वर्षाची भेट मिळणार आहे. यासंदर्भात रेल्वे व खान मंत्री पियुष गोयल यांनी महत्वाची घोषणा करत १ जानेवारी २०१८ पासून मुंबईत वातानुकूलित लोकल धावणार असल्याचे आज सांगितले.
          मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती देण्याकरिता रेल्वे मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. गोयल यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी वातानुकूलित लोकलची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून पुढील वर्षी १ जानेवारी पासून या उपनगरात वातानुकूलित लोकल सुरु करण्यात येणार आहे.  
                   मुंबई उपनगरीय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व फुट ओवर ब्रिज
      मुंबईतील एलफिन्सटन रेल्वे स्थानकावर २९ सप्टेंबर २०१७ रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर श्री. गोयल यांच्या निर्देशानुसार मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांचा तज्ज्ञ समितीकडून अभ्यास करण्यात आला. या समितीने रेल्वे मंत्रालयाकडे अहवाल सोपविला आहे. समितीने अहवालात महत्वाच्या सूचना केल्या असून, यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी आवश्यक फुट ओवर ब्रिज बांधणे, अस्तित्वात असलेल्या फुट ओवर ब्रिजचा विस्तार करणे, फुट ओवर ब्रिज पुनर्स्थापित करणे, फेरीवाल्यांना फुट ओवर ब्रिज प्रतिबंधित करणे, रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, स्वचलित पाय-या (एस्केलेटर) उभारणे आदी सूचना केल्या आहेत.
       समितीने केलेल्या या महत्वपूर्ण सूचनांनुसार विभागीय रेल्वेकडून या संदर्भात सविस्तर कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचे श्री. गोयल यांनी सांगितले.           
                                                                       00000


महाराष्ट्रात 12 आर्थिक कॉरिडोर - नितीन गडकरी



नवी दिल्ली 25 : भारतमाला  योजनेअंतर्गत देशात 44 आर्थिक कॉरिडोर उभारण्यात येणार असून यातील 12 कॉरिडोर महाराष्टातून जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
          देशात भारतमाला योजनेअंतर्गत एकूण 65 हजार 400 किलोमीटरचे रस्ते तयार केले जाणार असून पहिल्या टप्प्यात  5 लाख 35 हजार कोटी रुपये खर्च करुन  34 हजार 800 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत अशी माहिती देऊन श्री नितीन गडकरी म्हणाले, देशात  26 हजार 200 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आर्थिक कॉरिडोरमध्ये असणार आहे, त्याबरोबर  फिडर रुटस् राष्ट्रीय कॉरिडोर, आंतराष्ट्रीय सीमेवरील रस्ते, कोस्टल व पोर्ट मार्ग, एक्सप्रेस वे व जोड रस्ते असे एकूण 39 हजार 200 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश भारतमाला योजनेत करण्यात आला आहे.  राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाअंतर्गत 10 हजार किलोमीटर लांबीचे रस्तेही तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती  श्री गडकरी यांनी दिली.
 महाराष्ट्रात 12 आर्थिक कॉरिडोर
भारतमाला योजनेअंतर्गत देशातील एकूण 44 आर्थिक कॉरिडोरपैकी 12 आर्थिक कॉरिडोर महाराष्ट्रातून जात आहेत. यामध्ये मुंबई–कोलकत्ता (1854 किमी), मुंबई-कन्याकुमारी (1619किमी), आग्रा-मुंबई(964 किमी), पुणे-विजयवाडा(906किमी), सुरत-नागपूर(593 किमी), सोलापूर-नागपूर (563 किमी), इंदोर-नागपूर (464 किमी), सोलापूर-बेल्लरी-गुटी (434 किमी), हैदराबाद-औरंगाबाद (427 किमी), नागपूर-मंडी दाबवली (387 किमी), सोलापूर-महबुबनगर (290 किमी), पुणे-औरंगाबाद (222 किमी) या कॉरिडोरचा समावेश आहे. या आर्थिक कॉरिडोरची लांबी  8501 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रातून जाणा-या या आर्थिक कॉरिडोरमुळे आठ राज्यांशी महाराष्ट्र जोडला जाणार  आहे.

आर्थिक कॉरिडोर 16 जिल्ह्यातून जाणार
महाराष्ट्रतून जाणा-या 12 आर्थिक कॉरिडोरमध्ये  मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, जालना, नागपूर , रत्नागीरी, धुळे, पुणे, सोलापूर, जळगाव, लातूर, नांदेड, यवतमाळ व वर्धा या 16 जिल्ह्यचा समावेश आहे.  
महाराष्ट्रात तीन रिंग रोड
वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी देशातील 28 शहरांमध्ये रिंग रोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पुणे, नागपूर,धुळे या शहरांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात 9 मालवाहतुक तळ
देशात 24 मालवाहतुक तळ निवडण्यात आले असून  यामध्ये महाराष्ट्रातील 9 शहरे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, जेएनपीटी, मुंबई पोर्ट, ठाणे,रायगड, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांचा समावेश आहे, अशी माहिती श्री गडकरी यांनी या पत्रकार परिषदेत दिली.   


Tuesday 24 October 2017

‘दीपावाली अंक’: महाराष्ट्र की समृद्ध सांस्कृतिक परंपरा का प्रतीक : श्रीवास्तव


 












नई दिल्ली, 24 अक्टूबर : ‘दीपावाली अंक महाराष्ट्र की समृद्ध सांस्कृतिक परंपरा का प्रतीक है, दिल्ली में महाराष्ट्र सूचना केन्द्र द्वारा मराठी लोगों के लिए दीपावाली अंक उपलब्ध कराना इस परंपरा के अनुरुप होने की बात पंजाब केसरी अखबार के कार्यकारी संपादक आकू श्रीवास्तव ने कही.
मंगलवार को यहां महाराष्ट्र सूचना केन्द्र में दीपावाली अंक के प्रदर्शनी का उद्घाटन श्री. श्रीवास्तव के करकमलोव्दारा किया गया. उन्होने कहा कि दीवाली में विभिन्न व्यंजनों के आस्वाद के साथ दीपावली का अंक पढने मिलना पाठकों के लिए निश्चित रुप से आनंद को द्विगुणित करने वाला है। श्री. श्रीवास्तव ने इस दौरान महाराष्ट्र की समृद्ध परंपराओं का वर्णन करते हुए अपने स्वानुभव भी व्यक्त किए।
उन्होने आगे कहा, महाराष्ट्र में एक बड़ी वैचारिक परंपरा विद्यमान है। दीपावली अंक के माध्यम से कई बडे तथा नवोदित लेखक विभिन्न विषयों पर अपने मत प्रकट करते है। इससे पाठकों को उत्तमोत्तम पढने का अवसर मिल जाता है। साथ ही कईयों को यह पठन कई मायनों में प्रेरणादायक साबित होता है।     
कार्यक्रम के प्रास्ताविक में सूचना केन्द्र के उपनिदेशक दयानंद कांबले ने दीपावली अंक के महत्व और सूचना केन्द्र के दीपावली अंक प्रदर्शनी की परंपरा के बारे में जानकारी दी। इस मौके पर महाराष्ट्र सूचना केन्द्र की सूचना अधिकारी अंजू निमसरकर-कांबले, पत्रकार निवेदिता वैश्यंपायन, पुस्तक वितरक मेंढके सहित अन्य कर्मचारी मौजूद थे।

सूचना केंद्र में दीपावली अंक पढने के लिए उपलब्ध

सूचना केन्द्र में आज से पाठकों के लिए दीपावली अंक पढने के लिए उपलब्ध करा दिए गए है। इसमें साधना,  उत्सव नात्याचा-झी मराठी, गृहलक्ष्मी, आवाज  (पाटकर), पुढारी, लोकमत, दीपोत्सव, कालनिर्णय,  सा.-सकाल, हास्यधमाल,लोकप्रभा, क्रिस्त्रीम, मार्मिक, मेनका, चारचौघी, माहेर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स,किशोर, उत्तम कथा, अंर्तनाद, पुरूषउवाच, चपराक, पुणे प्रतिष्ठान, श्री व सौ,  पद्मगंधारुचिरासासर माहेरगृहसंकेत, अलख निरंजन  आदि कुल 138 दीपावली अंक शामिल है।  



‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक : कार्य. संपादक आकू श्रीवास्तव






नवी दिल्ली  दि.24 : दिवाळी अंक महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन पंजाब केसरी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आकू श्रीवास्तव यांनी केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. श्रीवास्तव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपसंचालक दयानंद कांबळे, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, पत्रकार निवेदिता वैंशपायन-मदाने, पुस्तक वितरक श्री मेंढके, ग्रंथपाल रामेश्वर बरडे  ग्रंथालयाचे सदस्य, कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्राची सांस्कृतिक पंरपरा समृद्ध असून परिचय केंद्रामार्फत दिल्लीतील मराठी माणसांसाठी दिवाळी अंक वाचण्यासाठी उपलब्ध करून देणे या पंरपरेला साजेसे असल्याचे श्री. श्रीवास्तव म्हणाले. दिवाळीमध्ये दिवाळीतील फराळ आणि त्यासोबत वाचन ही वाचकांसाठी नक्कीच पर्वणी ठरणार.  महाराष्ट्राच्या समृद्ध पंरपरेचे वर्णन करताना त्यांनी त्यांचे स्वानुभवही कथन केले.

महाराष्ट्राला मोठी  वैचारिक चळवळ लाभली आहे. दिवाळी अंकाच्या निमित्ताने अनेक प्रसिद्ध लेखक तसेच नवोदित लेखक विविध विषयांवर लिहीते होतात. यामुळे उत्तमोत्तम वाचन करण्याची संधीही वाचकांना मिळते. हे वाचन अनेकार्थी प्रेरणादायी ठरत असल्याचेही श्री. श्रीवास्तव म्हणाले. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे चालविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दयानंद कांबळे यांनी दिवाळी अंकाचे महत्व आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या दिवाळी अंक प्रदर्शनाची परंपरा याबाबत माहिती दिली. मराठी साहित्याच्या योगदानावरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला.


आजपासून परिचय केंद्रात दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध
आजपासून दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यामध्ये साधना, उत्सव नात्याचा - झी मराठी , गृहलक्ष्मी, आवाज  (पाटकर), पुढारी, लोकमत दिपोत्सव, कालनिर्णय, सा.सकाळ, हास्यधमाल, लोकप्रभा, क्रिस्त्रीम, मार्मिक, मेनका, मिळून सा-याजणी, चारचौघी, माहेर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, किशोर, उत्तम कथा, अंर्तनाद, पुरूषउवाच, चपराक, पूणे प्रतिष्ठान, श्री व सौ, पद्मगंधा, रुचिरा, सासर माहेर, गृहसंकेत, अलख निरंजन आदी एकूण 138 दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत.   


Wednesday 18 October 2017

दीपावली से पहले महाराष्ट्र के किसानों को मिली सौगात,




पहले चरण में 8.5 लाख किसानों के खातों में
कर्जमाफी की 4 हजार करोड़ रकम जमा

नई दिल्ली, 18: महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना के तहत प्रदेश के किसानों की कर्ज माफी की प्रक्रिया प्रत्यक्ष रुप से शुरु हो गई है। गुरुवार को पहले चरण में साढे आठ लाख किसानों के खाते में 4000 करोड़ रुपये की रकम जमा कर दी गई है। मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ने एक समारोह के दौरान किसानों को उनकी कर्ज माफी का प्रमाणपत्र देते हुए आश्वस्त किया कि कर्जमाफी के निकषों में बैठने वाले सभी किसानों का कर्ज मुक्त होने तक यह योजना कार्यान्वित रहेगी।

सह्याद्री अतिथिगृह में आयोजित समारोह में मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि इस योजना के पहले चरण में कर्जमाफी के लिए 3200 करोड़ रुपये और प्रोत्साहनपर रकम योजना के लिए 800 करोड़ ऐसी कुल 4 हजार करोड रुपये की रकम किसानों के खाते में जमा कर दी गई है। उन्होने उम्मीद जताई कि इस योजना के तहत 15 नवबंर तक 85 फीसदी किसानों को उनके कर्जमाफी की रकम अदा कर दी जाएगी। समारोह में 8 विभागों के कर्जमुक्त किसानों को प्रतिनिधिक रुप में प्रमाणपत्र देकर उनका सत्कार किया गया। इसके अलावा जिले के पालकमंत्री के हाथो किसानों को कर्जमाफी का प्रमाणपत्र दिया गया। इस मौके पर राजस्व मंत्री चंद्रकांत पाटिल, परिवहन मंत्री दिवाकर रावते, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख और मुख्य सचिव सुमित मल्लिक मौजूद थे।

मुख्यमंत्री ने कहा कि सरकार के लिए आज का दिन महत्वपूर्ण और कर्तव्यपूर्ति का है। अन्नदाता पर आए संकंट को दूर करने के लिए कर्जमाफी का फैसला लिया गया। प्राकृतिक आपदा के कारण खेती का विकास दर निचे आ गया था। इसलिए शुरुआत के दो वर्षों में हमने खेती में निवेश बढाने पर जोर दिया। इसमें लगभग तीन गुना निवेश बढाया गया। उन्होने कहा कि जिन भागों में कोई फसल नही उगती थी, वहां अब फलबागवानी को बढावा दिया गया है। इससे खेती का विकास दर बढकर 12.5 प्रतिशत होने के साथ उसका उत्पादन 40 हजार करोड़ रुपये से बढ़ गया है। खेती में निवेश बढने के कारण ही यह कामयाबी मिल सकी है।


मुख्यमंत्री ने आगे कहा कि जलयुक्त शिवार योजना के माध्यम से 20 लाख हेक्टर संरक्षित सिंचाई निर्माण हुई है और खेती के क्षेत्र में इसी तरह अगले पांच व र्ष तक निवेश करते रहे तो निश्चित तौर पर उत्पादन दोगना हो सकेगा। पिछले कई वर्षों से किसान संस्थागत कर्ज रचना के बाहर थे। फिर से सावकार से कर्ज नही लेना पड़े, इसलिए किसानों को संस्थागत रचना के दायरे में लाया गया। इस संकल्पना के माध्यम से किसानों द्वारा लिया गया कर्ज वापस करने की उनमें क्षमता बढे, इसलिए खेती में और निवेश बढाने की ओर सरकार ज्यादा ध्यान देगी। महाराष्ट्र के लगभग नौ लाख किसानों को दीपावली का तोहफा मिला है।