Monday 31 July 2017

IIMC LAUNCHES PG DIPLOMA IN MARATHI JOURNALISM FROM TODAY : MOVE AIMS AT BOOSTING REGIONAL MEDIA :




New Delhi, 31: The Indian Institute of Mass Communication, premier media training institute and communication think-tank of the country, would be launching the first ever Post Graduate Diploma programme in Marathi Journalism from its Western Regional Campus at Amravati, in Maharashtra from today, 1st August, 2017.
Union Minister of State for Home Affairs, Shri Hansraj Gangaram Ahir, would unveil the bust of great freedom fighter Lokmanya Bal Gangadhar Tilak at the inaugural function at IIMC, New Delhi. The students and faculty members from IIMC, Amravati would be attending the inaugural ceremony online from their District.
Members of Parliament from Amravati Shri Anandrao Vithoba Adsul & Shri Anil Shirole from Pune Constituency would grace this occasion as special guests.
Paving this new initiative, the Director General IIMC, Shri K G Suresh was contacted for this regional venture, he said, “The introduction of the course is expected to give a boost to Marathi journalism and aims at providing skilled manpower to the burgeoning regional language media in the State”. Adding further he said, “1st August has been decided as the day of inauguration by IIMC for it is the 97th Punya Tithi of the icon of fearless & ideal journalism, Lokmanya Bal Gangadhar Tilak. We salute his selfless service to the nation”.
Speaking on the new curriculum, he emphasized, “Besides important journalistic aspects such as reporting, editing, media laws and ethics, the new course will have components of Marathi language and history of Marathi media. Eminent academicians in media and Marathi language and senior journalists would impart training to these students”.
The All India entrance examination for the course was held on 27th May, 2017. Examination centres were in Nagpur and Mumbai, while interviews for the shortlisted candidates were held in Amravati. The launch of Marathi Journalism would strengthen the regional media and would go a long way to help students to carve a niche for themselves in their careers.
Follow Us on : http://twitter.com/micnewdelhi

आयआयएमसीच्या मराठी पत्रकारिता डिप्लोमा अभ्यासक्रमाचा आज शुभारंभ



 नवी दिल्ली, ३१ : जनसंज्ञापन व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत देशातील नामांकित भारतीय जनसंज्ञापन संस्थेच्या (आयआयएमसी) मराठी भाषेतील पत्रकारिता डिप्लोमा अभ्यासक्रमाचा मंगळवार दिनांक १ ऑगस्ट २०१७ रोजी केद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

            केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत आयआयएमसीच्या येथील अरूणा आसफअली मार्गस्थित मुख्यालयाच्या लोकमान्य बाळगंगाधर टिळक सभागृहात मंगळवारी दुपारी ३ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ आणि पुण्याचे खासदार अनिल शिरोळेही यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. त्याचवेळेस महाराष्ट्रातील अमरावती विद्यापीठातील आयआयएमसी केंद्राच्या डॉ. श्रीकांत जिचकार भवनातून गणमान्य व्यक्ती, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी ऑनलाईन स्वरूपात या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

              आयआयएमसी आपल्या पश्चिम (प्रादेशिक)विभागातून अमरावती येथील केंद्रात प्रथमच मराठी डिप्लोमा सुरू करीत आहे. याबाबत अधिक माहिती देताना संस्थेचे महासंचालक के.जी.सुरेश यांनी सांगितले, संस्थेच्या महाराष्ट्रातील केंद्रात स्थानिक भाषेमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरु करून मराठी भाषेला प्रोत्साहन देणे आणि  कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. मराठी मातीतील निर्भय आणि आदर्श पत्रकारितेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणा-या लोकमान्य बाळगंगाधर टीळक यांचा १ ऑगस्ट हा पुण्यतिथी दिन असल्याने या दिनाचे औचित्य साधून आम्ही हा अभ्यासक्रम सुरु करून  त्यांना विनम्र अभिवादन करीत आहोत.    
            मराठीतील डिप्लोमा अभ्यासक्रमांतर्गत वार्तांकन, संपादन, माध्यमविषय कायदे आणि आचारसंहिता, मराठी भाषा, मराठी प्रसार माध्यमांचा इतिहास आदी  पत्रकारीतेच्या  विविध पैलुंचा समावेश करण्यात आला आहे. मराठी भाषा व पत्रकारीतेतील तज्ज्ञ आणि वरिष्ठ पत्रकार या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील असेही श्री. सुरेश यांनी सांगितले.   
                                                                    

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
                                       
                                                  0000000


Ghatkopar building collapse: PM announces Rs 2 lakh ex-gratia for kin



New Delhi, 31:  The Prime Minister, Shri Narendra Modi has on Monday approved ex-gratia of Rs 2 lakh each for next of kin of those who died in Ghatkopar building collapse.  He has also approved Rs. 50,000 each for those injured in the collapse.  
The four-storey building in Ghatkopar collapsed around 10.45 am on July 25 in which 17 people were crushed, including two toddlers and reportedly more than 30 injured.

The announcement was made through a series of tweets from the Prime Minister's official handle.

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील मृतक व जखमींना प्रधानमंत्र्यांची मदत जाहीर


 नवी दिल्ली, ३१ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील घाटकोपर येथील इमारत दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबीयांना  रूपये २ लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपयांची मदत जाहीर  केली आहे.

               घाटकोपर येथील दामोदर पार्क जवळील सिध्दी साई ही चार मजली इमारत  २५ जुलै २०१७
   रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबियांना व जखमींना  प्रधानमंत्री कार्यालयाकडून मदत
   जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर देण्यात आली आहे.  
                                                                     
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
                                       
                                                  0000000

Thursday 27 July 2017

दमनगंगा आणि पिजांळ नदीजोड प्रकल्पासाठी 4500 कोटी रूपये अपेक्षित : महाजन



नवी दिल्ली, 27 : दमनगंगा आणि पिजांळ नदीजोड प्रकल्पासाठी 4500 कोटी रूपये खर्च होणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
येथील विज्ञान भवनात आज नदीजोड संदर्भातील 13 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीची अध्यक्षता केंद्रीय जलसंपदा, नदीविकास राज्यमंत्री डॉ. संजीव बालियान यांनी केली. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. यासह विविध राज्यांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
दमनगंगा आणि पिजांळ हा नदीजोड प्रकल्प लवकर सुरू व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने 21 जूलैला श्वेतपत्रिका काढली असल्याचेही श्री महाजन यांनी सांगितले. नाशिकमध्ये दमणगंगा आणि पिंजाळ नदीचे खोरे आहे. याला लागुनच पार-तापी-नर्मदाचे खोरे आहेत. या पाच नदया एकत्रित जोडण्याचा प्रकल्प सुरू होत आहे. याभागातील पाणलोट क्षेत्राचा काही भाग महाराष्ट्रात तर काही गुजरातमध्ये येतो. नदीजोडअंतर्गत जर या नदयांना जोडण्यात आले तर समुद्रात वाहून जाणारे पाणी अडविता येणार आणि या पाण्याचा वापर शेतीसाठी आणि पिण्यासाठी करता येईल, यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. यासह या भागातील इतर खो-यांमध्ये जिथे पाण्याची तुट आहे, त्याठिकाणी नदीजोड माध्यमातून पाणी वळविता येईल. यावर जो काही खर्च होणार आहे, तो खर्च केंद्र शासन करणार आहे. हे प्रकल्प राज्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

नदीजोड प्रकल्पांतर्गत वैंनगंगा आणि नळदुर्ग ही भविष्यात जोडल्या जाणार आहेत, याचाही आज आढावा घेण्यात आला. यासह आजच्या बैठकीत केन-बेटवा नदीजोड प्रकल्प-1, 2, महानदी-गोदावरी याया नदीजोड प्रकल्पाच्या प्रारूपाविषयी चर्चा झाली, मानस-संकोश-तिस्ता-गंगा नदीजोड प्रकल्प, नदीजोड अंतर्गत येणारे नदीखोरे, नदीजोडची आंतरराज्य स्थिती या इतर अनुषांगिक विषयांवर चर्चा करण्यात आली.

भारतीय महिला क्रिकेटपटू पुनम राऊत ने नवी दिल्ली येथे महाराष्ट्र परिचय के...

भारतीय महिला क्रिकेटपटू पुनम राऊत ने नवी दिल्ली येथे महाराष्ट्र परिचय केंद्राशी साधला संवाद, यासाठी बघा व्हिडीयो


Wednesday 26 July 2017

बैलगाडा शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी














                
नवी दिल्ली, २६ : बैलगाडा शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. यामुळे या विधेयकावर  अखेर  शिक्कामोर्तब झाले .
           राज्य विधीमंडळाने बैलगाडा शर्यत विधेयक पारीत केले होते. हे विधेयक राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले होते. या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्याने  या विधेयकातील अटी व शर्तींच्या अधीन राहून राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होणार आहेत.           
                    तामिळनाडूतील जलीकट्टूच्या पार्श्वभूमीवर राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी विविध स्तरातून होत होती. लोकप्रतिनिधींनी ही मागणी विधीमंडळात लावून धरली होती. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी बैलगाडा शर्यत संदर्भात पशु क्रूरता प्रतिबंधक कायद्यामध्ये सुधारणा विधेयक  विधानसभेत ठेवले होते. राज्याच्या विधानसभेनी या  विधेयकाला मंजुरी दिली होती. मात्र, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीमुळे या विधेयकाचे कायदयात रुपांतर झाले नव्हते. आज अखेर राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्याने  राज्यात बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला .
                                                                           0000




Sunday 23 July 2017

लोकमान्य टिळक यांची 161 वी जयंती साजरी




नवी दिल्ली, 23 : भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची  161 वी जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.
       
        कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सचिव तथा आयुक्त आभा शुक्ला  यांनी  लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त इशु संधू ,अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भगवंती मेश्राम यांनी यावेळी लोकमान्य टिळकांच्या योगदानाबद्दल माहिती दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
                                       0000000

सूचना : छायाचित्रे सोबत जोडली आहेत.

Wednesday 19 July 2017

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट








नवी दिल्ली, 19 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली .
             महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात येणारी विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी  श्री. शिंदे यांना दिली. महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने यावेळी श्री. शिंदे यांना भेट स्वरूपात देण्यात आली. ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. शिंदे यांनी माहिती जाणून घेतली. श्री. शिंदे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामा बद्दल समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.               
                                                                       00000

Monday 17 July 2017

Diverse Reading, Deep-rooted Study Necessary For History Writing Eminent Historian Babasaheb Purandare









New Delhi, 17:  Diverse reading, deep-rooted study and willful application of the mind and brain are some of the basic components to write any Historical accounts, said Eminent Veteran Historian, Babasaheb Purandare here today. It happened to be a historic day in the life of Maharashtra Information Centre, when ‘Maharashtra Bhushan’ Babasaheb Purandare paid a visit to this office and had a tete’-e-tete’ with one and all.

    He was accorded warm welcome by the Office, while Deputy Director, Shri Dayanand Kamble presented him a bouquet and senior journalist Vijay Satokar presented him a shawl and a ‘Shreefal’ (Coconut).  Present during this event was PRO Amarjyot Kaur Arora, Information Officer, Anju Nimsarkar, media persons and the office staff.

Babasaheb Purandare, with great ease and poise reminisced many of his incidents, be it his writings on Chhatrapati Shivaji Maharaj, personal and many more. In his informal yet firmly inspirational and brief message to the Office bearers, he said that the real Shivaji can be understood only when one reads all the books thoroughly to get an insight of true Maratha Warrior. A hallow study on any subject will not help in exercising mastery and one will not be able to write perfectly.  Commanding over a particular subject would follow once we become avid, intense readers with analytical bent of mind.
Underlining the Great Shivaji’s works, Babasaheb threw light on the life works of the Maratha Warrior.  He informed, Chhatrapati Shivaji was a Great warrior, a seasoned politician, able administrator, Diplomat of high stature, astute Statesman, a great father, a noble son to which even foreign authors have widely acclaimed.  He had great respect for women. A visionary par-excellence, he has been compared with great leaders like Winston Churchill, Lenin, Netse.
Citing one of the incidents, Babasaheb said, during the British rule, James Douglas was travelling through train from Thane to Mumbai in 1852; he saw many forts constructed on the hills. Out of sheer curiosity to know the Man behind the construction, he went on to describe Chattrapati Shivaji and his achievements in his renowned Book, ‘Book of Bombay’.

Recalling his childhood days, Babasaheb said he is indebted to his father greatly for all that he is today known for.  Fondly remembering his father, he admitted that his father played a major role in shaping Babasaheb, and that he held his father as his best buddy.  Like any other normal child, he also got scoldings from his father, however, he admitted had his father not done that, he would not have been what he is today.  He also recalled of visiting Maharashtra Information Centre in 1960’s when Shri Bha. Kru. Kelkar was the first Chief Information Officer of this office.

Balwant alias  Babasaheb Purandare is popularly known for his works like Raja Shiv Chhatrapati, Purandaryanchi Daulat, Purandaryanchi Naubat and Gadsanch which are considered masterpieces on the life and times of the Chhatrapati Shivaji Maharaj and his most well-known play, Jaanata Raja, a widely popular play on 16th century Maratha warrior king.

Maharashtra Bhushan Shivshahir Babasaheb Purandre's Felicited at MIC, Ne...

अभ्यासपूर्ण वाचन व लेखनामुळे घडलो : महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे









                                                                                                     
                                                                                                          


नवी दिल्ली, 17 : अभ्यासपूर्ण वाचन व लेखनामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घरा-घरात पोचवू शकलोअशा भावना महाराष्ट्र भूषण व ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज व्यक्त केल्या.
            महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार व अनौपचारीक गप्पांचा कार्यक्रम आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्प गुच्छ देऊन बाबासाहेबांचे स्वागत केले तर ज्येष्ठ पत्रकार विजय सातोकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
            बाबासाहेबांनी यावेळी सांगितले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाची उंची विश्वव्यापी आहे. 

योध्दा, मुत्सद्दी नेता, कुटनीतीज्ज्ञ, पूत्र, पती, वडील असे विविध पैलू महाराजांच्या व्यक्तीमत्वाला आहेत. महाराजांच्या व्यक्तीमत्वाची भुरळ विदेशी लेखक व नेत्यांनाही पडली. नेत्से, विस्टन चर्चिल, लेनीन या जागतिक  नेत्यांप्रमाणे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. तत्कालीन ब्रिटीश शासक जेम्स डग्लस यांनी ठाणे-मुंबई या रेल्वे प्रवासात डोंगरावर पाहिलेला भला मोठा किल्ला आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाविषयी त्यांनी केलेला अभ्यास याविषयी बाबासाहेबांनी यावेळी सविस्तरपणे सांगितले. जेम्स डग्लस यांनी लिहीलेलेबुक ऑफ बॉम्बे व त्यातील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे वर्णन आदींबाबतही त्यांनी माहिती दिली.

            छत्रपती शिवाजी महाराजांचे बहुआयामी व्यक्तीमत्व घराघरांमध्ये पोचविण्यासाठी अल्प प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.  हे केवळ अव्याहत लेखन ,वाचन आणि अभ्यासामुळेच शक्य झाले. या सर्वांमुळेच आपण घडलो असल्याच्या नम्र भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. 





                                   मला घडविण्यात वडीलांचा मोठा वाटा
                    माझी आवड आणि क्षमता ओळखून माझ्या वडीलांनी मला कामात प्रोत्साहन दिले म्हणूनच मी आज काही करू शकलो, असे भावोदगार बाबासाहेबांनी काढले. माझ्यातील कला फुलवण्यात वडीलांचा सर्वात मोठा वाटा आहे. कधी बोट धरून तर प्रसंगी कान धरून त्यांनी मला घडविले. माझे वडील हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते अशा शब्दात बाबासाहेबांनी वडीलांबद्दल कृतज्ञ भाव व्यक्त केला.  



                                        

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या आठवणींना उजाळा
            दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्राची नुकतीच सुरूवात झाली  होती, तेव्हाच मी या कार्यालयाला भेट दिली अशा शब्दात बाबासाहेबांनी परिचय केंद्राबद्दल आठवण सांगितली. परिचय केंद्राचे तत्कालीन मुख्य माहिती अधिकारी भा.कृ.केळकर यांच्या निमंत्रणावरून या कार्यालयात ७० च्या दशकात भेट दिली. आज या कार्यालयाचा विस्तार झाला असल्याचे पाहून आनंद होत आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून आपणा सर्वांना महाराष्ट्राची सेवा करण्याची उत्तम संधी लाभली असल्याचे ते म्हणाले.
            परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी यावेळी प्रात्साविक केले तर उपसंपादक रितेश भुयार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिचय केंद्राच्या अधिकारी–कर्मचा-यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अधोरेखीत करणारा पोवाडा सादर करून बाबासाहेंबाना मानवंदना दिली. यावेळी परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर कांबळे, पत्रकार आणि कार्यालयाला भेट देणारे अभ्यागत मोठया संख्येने उपस्थित होते.       

             महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॅलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
                                       0000000


Sunday 16 July 2017

Follow Us on Twitter

If you are on twitter follow Maharashtra Information Centre, New Delhi on

http://twitter.com/micnewdelhi

महाराष्ट्राला भारतीय कृषी संशोधन परिषदेचे दोन पुरस्कार












नवी दिल्ली, 16 : परभणी जिल्हयातील मनवत तालुक्यातील मनोली येथील महिला प्रगतशील शेतकरी सुनंदाबाई शिंदे आणि पालघर जिल्हयातील डहाणू येथील गोखले शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राला आज केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
            येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान संस्थेच्या ए.पी.शिंदे सभागृहात आज भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ८९ व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या देशभरातील व्यक्ती व संस्थांना केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
             वैयक्तीक गटात परभणी जिल्हयातील मनवत तालुक्यातील मनोली येथील महिला प्रगतशील शेतकरी सुनंदाबाई शिंदे यांना जगजीवनराम अभिनव किसान पुरस्कार २०१६ प्रदान करण्यात आला. श्रीमती शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रयोग करून सोयाबीन, कपाशी आणि ज्वारी पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले. श्रीमती शिंदे  यांनी पाण्याची प्रभावीपणे साठवण करून जलसंधारण क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले आहे, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि ५० हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
            यावेळी देशभरातून विविध ११ विभागातील कृषी विज्ञान केंद्राना उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानीत करण्यात आले. विभाग-८ मधून राज्यातील पालघर जिल्हयातील डहाणू येथील गोखले शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राला कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पं. दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय कृषी विज्ञान पुरस्कार २०१६-१७ ने सन्मानीत करण्यात आले. गोखले शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.सर एम.एस.गोसावी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.संभाजीराव नालकर आणि शास्त्रज्ञ विलास जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मान पत्र आणि  २.२५ लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.     
             महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॅलो करा :
http://twitter.com/micnewdelhi

                                      0000000

Friday 14 July 2017



पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी राष्ट्रीय स्मारक व्हावे : प्रा. शिंदे
नवी दिल्ली, 14 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे राष्ट्रीय स्मारक उभारावे, अशी मागणी जलसंधारण आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री महेश शर्मा यांना केल्याची माहिती महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
            येथील शास्त्री भवनात आयोजित बैठकीत श्री शिंदे यांनी केंद्रीय मंत्री श्री शर्मा यांची भेट घेवून पुण्यश्लोक  अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी राष्ट्रीय स्मारकाबाबतचे  निवेदन सादर दिले.  इ.स. 1725 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामधील चौंडी या गावात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला होता. वयाच्या 8 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांचे माहेरचे आडनाव  शिंदे असून लग्नानंतर त्या होळकर झाल्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी आपल्या संपूर्ण कारर्किदीत अनेक ठिकाणी मंदिरे, घाट बांधले, लोककल्याण कार्यात आपले आयुष्य व्यतीत केले.  नगर जिल्ह्यातही त्यांनी अनेक ठिकाणी घाट बांधलेले आहेत.  त्यांचे वास्तव्य असलेले घर आजही चौंडी येथे आहे. हे ठिकाण राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित व्हावे, अशी मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. याबाबत राज्य शासनाकडून तसेच भारतीय पुरात्तत्व विभागाकडून अहवाल मागवून या स्मारकाबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन श्री शर्मा यांनी दिले, असल्याचे श्री शिंदे म्हणाले.

राज्यातील तलावांच्या दुरूस्ती, नुतनीकरणासाठी केंद्र सहकार्य करणार : प्रा. शिंदे
राज्यातील पाझर तलाव, साठवण तलावांचे नुतनीकरण, दुरूस्ती, सुधारांसाठी आवश्यक निधी केंद्राकडून मिळणार असल्याची, माहिती राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज दिली.

आज श्री शिंदे यांनी केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांची श्रम शक्ती भवन येथे भेट घेतली. श्री शिंदे म्हणाले, राज्यातील सात विभागात 2877 जूने पाझर, साठवण तलाव आहेत या तलांवाची डागडूजी होणे अंत्यत आवश्यक आहे. यासाठी अंदाजित 275 कोटींचा निधी आवश्यक आहे. यातंर्गत तलावांमधला गाळ काढणे, तलांवाचे नुतनीकरण, दुरूस्त्या आदी करण्यात येईल, जेणे करून या तलावांचा पुर्नवापर करता येईल. याबाबतचा विस्तारीत प्रकल्प अहवाल पाठविण्यात येईल, केंद्रीय मंत्री उमा भारतींशी या विषयांवरील बैठक सकरात्मक झाली असून त्यांनी या प्रकल्पासाठी आर्थिक सहायतेचे आश्वासन दिले, असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॅलो करा :

Tuesday 11 July 2017

अमरनाथ यात्रेमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 भाविकांचा मृत्यू


नवी दिल्ली, 11 अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. या भाविकांचे मृतदेह हेलीकॉप्टरव्दारे त्यांच्या जिल्ह्यात पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती  मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.


सोमवारी रात्री उशीरा अमरनाथ यात्रेसाठी जाणा-या बसवर श्रीनगर येथे दहशतवादी हल्ला झाला.  या हल्ल्यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू  झाला तर 32 भाविक जख्मी झाले आहेत. मृत भाविकांमध्ये 2 महिला भाविक पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील श्रीमती उषा मोहनलाल सोनकर व श्रीमती निर्मला ठाकूर या आहेत. 

Condemning Amarnath Attack, Maharashtra CM Extends Support to the Victims





New Delhi, 11:  Condemning the cowardly terrorist attacks held at the sacred Shrine of Amarnath in Jammu on 10th July, the Government of Maharashtra has extended full support and has made adequate arrangements to bring in the mortal remains of the two women pilgrims killed in this dastardly attack to their respective home town at Dahanu in Palghar District.
The two women pilgrims killed in this attack have been identified as Nirmala Ben Thakur, a resident of Palghar District and Usha Mohanlal Sonkar of Dahanu Taluka in Palghar District.  Seven pilgrims travelling in the bus have been killed leaving several injured.   Three pilgrims from Maharashtra have been injured and are being treated at the J&K Hospital.
The Government of Maharashtra extends full support to the Vicitims of Maharashtra and has made arrangements for helicopter to bring back the mortal remains of two women pilgrims to Dahanu from Surat, informs the Chief Minister’s Office, Maharashtra.