Wednesday 28 February 2018

मातृभाषा समृद्ध करण्याची जबाबदारी प्रत्येकाची : वसंत लिमये

          



 








नवी दिल्ली 28 : मातृभाषा समृद्ध करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे, मत प्रसिद्ध लेखक वसंत लिमये यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केले.
         मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने  महाराष्ट्र परिचय केंद्रात आज दुस-या दिवशी  लॉक ग्रीफींग, विश्वस्त, धुंद- स्वच्छंद आणि कॅम्प फायर या पुस्तकांचे लेखक वसंत लिमये  यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. लिमये यांचे तुळशी वृंदावन देऊन स्वागत केले. यावेळी अनुवादिका हेमांगी नानीवडेकर यांनी श्री लिमये  यांची प्रकट मुलाखत घेतली.
            मातृभाषा समृद्ध करण्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येकाची असून तसे प्रयत्न प्रामाणिकपणे होणे गरजेच आहे. आधुनिकता व तंत्रज्ञानामुळे वेगाने बदल होत आहे, काही जुने शब्द लुप्त होत आहेत तर काही नव्या शब्दांची भरही पडत असल्याचे श्री लिमये म्हणाले.
प्रगट मुलाखत घेतांना श्रीमती नानीवडेकर यांनी श्री लिमये यांना बोलत करत त्यांचा लेखक बनण्याचा प्रवास उलगडला.  दै. महानगरमध्ये  लेखांच्या रूपात लिहीलेले सह्याद्री भटकंतीचे अनुभव पुढे धुंद- स्वच्छंद  या पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झालेला प्रवास रोचक असल्याचे  सांगितले.
लॉक ग्रीफींगया पुस्तकांसाठी परदेशी वा-या, प्रत्येक गोष्टीचे केलेले बारीक निरिक्षणे, कथानक सत्य आणि कल्पनेच्या आटयापाटयावर रंगत जावे आणि वाचकांला लय मिळण्यासाठी घेतलेली मेहनत, याविषयी श्री लिमये यांनी यावेळी सांगितले.
विश्वस्त ही कादंबरी वाचताना वाचकाला लेखकाने केलेला नवीन प्रयोग असल्याचे जाणवते. यामध्ये  इतिहास आणि भुगोलाची सांगड घातलेली आहे. वाचकाला कादंबरी वाचताना चित्तथरारकते सोबतच रसरसशीत पणा असायला हवा यासाठी 17 मजली इमारतबांधीत असताना प्रत्येक मजल्यासाठी केलेली वेगवेगळी रचना लक्षात घेतल्यावर जसे बांधकाम केले जाते. तशीच ही कादंबरी लिहीलेली असल्याचे श्री लिमये यांनी मुलाखतीत व्यक्त केले.
विश्वस्तकांदबरी यावरचे सादरीकरण दाखविण्यात आले. आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांची त्यावरील प्रतिक्रियेचेही सादरीकरण यावेळी सादर केले गेले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी केले. 
आजच्या कार्यक्रमास दिल्लीकर मराठी वाचक मंडळी, पत्रकार, कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.  दिनांक 27 व 28 फेब्रुवारी या दोन्ही दिवस आयोजित प्रगट मुलाखतीचे फेसबुकवर थेट प्रेक्षपण करण्यात आले.  

             

महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी महाराष्ट्र परिच...

Tuesday 27 February 2018

रंगभूमीच्या माध्यमातून मराठी भाषेची सेवा हा सार्थ अभिमान -दिग्दर्शक प्राजक्त देशमुख





नवी दिल्ली, २७ : मराठी रंगभूमीवरील अभिनय, लेखन व दिग्दर्शनाच्या माध्यमातून आपण मराठी भाषेची सेवा करीत आहोत, याचा सार्थ अभिमान असल्याच्या भावना कलावंत व संगीत देवबाभळी या नाटकाचे दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केल्या.
            मराठी भाषा दिनानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्रात आज प्राजक्त देशमुख यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी हे मत मांडले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. देशमुख यांचे तुळशी वृंदावन देऊन स्वागत केले. यावेळी मुक्तपत्रकार निवेदिता मदाने वैशंपायन यांनी श्री देशमुख यांची प्रकट मुलाखत घेतली.
            श्री. देशमुख म्हणाले,  महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या संतांनी समाज मन घडवले. विविध लोककला, साहित्य , नाटक यांनी ही पंरपरा सक्षमपणे पुढे नेली. त्यामुळे मराठी माणूस हा ख-या अर्थाने कलाप्रेमी असल्याचा अनुभव आपणास येतो. मराठी माणसांच्या कला प्रेमामुळे मराठी  भाषा समृध्द होत गेली आहे असे त्यांनी सांगितले.
            श्रेष्ठ कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, त्यांच्या जन्मभूमीत श्री देशमुख यांची झालेली जडणघडण याविषयी माहिती दिली. बालपणापासून सुरु झालेला अभिनयाचा प्रवास  सुमेत थिएटर सोबतची नाटके. आता समविचारी मित्रांच्या संकल्पनेतून साकार झालेला अश्वमेध थिएटर ग्रुप व   लेखक व दिग्दर्शकाच्या भूमिकेत नुकतेच दिल्लीतील राष्ट्रीय नाटय शाळेच्या वतीने आयोजित ८ व्या थियेटर ऑल्म्पीकमधील सहभाग याविषयी त्यांनी विविध अनुभव सांगितले. राजधानीत मराठी नाटक करताना महाराष्ट्रा प्रमाणेच प्रेक्षकांकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद  याचाही उल्लेखही त्यांनी यावेळी केला. संगीत देव बाभळीनाटकाचे लेखन  व दिग्दर्शनाची  निर्मिती प्रक्रिया व यापुढे चित्रपटाच्या माध्यमातून करावयाचे कार्य यासंदर्भात त्यांनी माहिती दिली.
            परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी भाषेच्या विकासाचे विविध टप्पे उलगडून दाखविले आणि मराठी भाषा दिन साजरा करण्यामागील भूमिका मांडली. उपसंपादक रितेश भुयार यांनी सूत्रसंचालन केले. 
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic
                                                                     00000
सूचना : सोबत छायाचित्र जोडले आहे.





युवा संशोधक जव्वाद पटेल यांस आयईआरपी पुरस्कार


नवी दिल्ली, २७ : अकोला येथील युवा संशोधक जव्वाद पटेल यांना औषध व अरोग्य क्षेत्रातील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय अनुकरणीय संशोधन सादरीकरण (आयईआरपी) संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे.  
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(एम्स) व आयईआरपीच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी पीएचडी चेंबर मध्ये आयईआरपीच्या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात औषध व आरोग्य क्षेत्रातील संशोधनासाठी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी एम्सचे वैद्यक व प्राध्यापक डॉ. राजेश मलहोत्रा यांच्या हस्ते युवा संशोधक जव्वाद पटेल यांना  वैद्यक क्षेत्रातील तीन संशोधनांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयईआरपीचे प्रमुख डॉ. देवानंद गुप्ता यावेळी उपस्थित होते. स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कारासाठी निवड झालेले तीन संशोधन

जव्वाद यांना सामाजोपयोगी संशोधनात विशेष आवड आहे. त्यांनी आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे डयुड्रॉप यंत्र तयार केले आहे. हवेच्या आर्द्रतेपासून पाणी तयार करणारे हे यंत्र अल्कलायीनचे पाणी तयार करते त्यामुळे कर्करोगाच्या पेशी नियंत्रित होतात. गेल्यावर्षीच जव्वादने डयुड्रॉप यंत्र तयार केले असून या यंत्रास पेटंटही मिळाले आहे.

  जव्वाद यांनी स्तनांचा कर्करोग चाचणी घेणारे इपीडर्मस  यंत्र  तयार केले आहे. मायक्रो पालपेशन या विज्ञानाच्या सूत्रावर आधारीत इपीडर्मस यंत्राद्वारे डॉक्टरांच्या मदतीशिवाय स्वत: व्यक्तीच स्तनांच्या कर्करोगाची चाचणी करू शकते. जव्वाद यांनी तयार केलेल्या रक्त नमुना न घेता मधुमेह चाचणी करणारे नॉन इनव्हेसीव शुगर डिटेक्शन डिवाईसची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

जव्वाद पटेल हे मुळचे अकोला येथील असून ते सद्य: हेद्राबाद येथील एलआयटी संस्थेतून बी.टेक चे शिक्षण घेत आहेत. त्यांनी आतापर्यंत २ हजारांहून अधिक संशोधन केली आहेत, त्यातील २ संशोधनाला पेटंटही मिळाले आहे. त्यांनी आतापर्यंत विविध ठिकाणी ३९ रिसर्च पेपर्सचे सादरीकरण केले आहे.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                                     00000


Monday 26 February 2018

मराठी भाषादिनानिमित्त महाराष्ट्र परिचय केंद्रात कार्यक्रमांचे आयोजन




नवी दिल्ली, २६ : मराठी भाषादिनानिमित्त दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०१८ रोजी महाराष्ट्र परिचय केंद्रात कलावंत व दिग्दर्शक प्राजक्त देशमुख आणि लेखक वसंत लिमये यांच्या प्रकट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.   
          आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याअनुषंगाने महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी ४ वाजता कलावंत व दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून मुक्त पत्रकार निवेदिता वैशंपायन मुलाखत घेणार आहेत. नुकतेच दिल्लीतील राष्ट्रीय नाटय शाळेच्या वतीने आयोजित ८ व्या थियेटर ऑल्म्पीक मध्ये प्राजक्त देशमुख लिखीत  व दिग्दर्शीत संगीत देव बाभळीनाटकाचे सादरीकरण करण्यात आले. यास श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. श्री. देशमुख यांना राज्यपातळीवरील अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचा  वर्ष २०११ व २०१२ चा उत्कृष्ट कलाकार व दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ५० व ५१ व्या महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धा नाशिक विभागातून त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शक व प्रकाश संयोजनाचा पुरस्कार मिळाला आहे.
            मराठी भाषादिना निमित्त दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी ४ वाजता लेखक वसंत लिमये यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून अनुवादिका हेमांगी नानीवडेकर या मुलाखत घेणार आहेत. मुळचे पुणे येथील लेखक वसंत लिमये यांची लॉच ग्रीफींग, विश्वस्त, धुंद- स्वच्छंद आणि कॅम्प फायर ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. दैनिक लोकसत्ता मधून त्यांनी कथा लेखन केले आहे.       
         
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा     :  http://twitter.com/micnewdelhi
                                                                     00000



सृजन’ कार्यक्रमांतर्गत नागपूर व पुणे रेल्वे स्थानक














         

नवी दिल्ली, २६ : सर्वांच्या सहकार्यांतून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास अर्थात सृजन या रेल्वे मंत्रालयाच्या अभिनव उपक्रमांतर्गत नागपूर रेल्वे स्थानकासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आराखडा तर एकात्मीक व्यवस्थापन व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकाची निवड करण्यात आली आहे.
             रेल्वे मंत्रालयाच्या भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळ लिमीटेडच्यावतीने २६ जानेवारी २०१८ रोजी देशातील ६३५ महत्वाच्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी सृजन हा कार्यक्रम MyGov पोर्टलवर सुरु करण्यात आला. भागधारक, रेल्वे प्रवासी, शहर नियोजनकर्ते , वास्तुविषारद,  अभियंते  यांच्या सहभागातून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
            सृजन कार्यक्रमांतर्गत नागपूर रेल्वे स्थानकासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आरखडा तयार करण्याकरिता आयोजित स्पर्धेचा पहिला टप्पा नुकताच पार पडला आहे. नागपूर सह ग्वालीयर आणि बयप्पनहल्ली या रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे. या स्पर्धेचा दुसरा टप्पा ३१ मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होणार आहे.
देशातील ५ रेल्वे स्थानकांसाठी एकात्मीक व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेण्यात आला असून पुणे रेल्वे स्थानकाचा यात समावेश आहे. यासाठी खाजगी संस्थांकडून निवीदा मागविण्यात आल्या आहेत. पुणे सह चंदिगड, आनंदविहार (दिल्ली), सिकंदराबाद, बेंग्लुरू  रेल्वे स्थानकांचा या कार्यक्रमात समावेश आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा     :  http://twitter.com/micnewdelhi

महाराष्ट्रातील 5 व्यक्तींना ‘प्रधानमंत्री श्रम’ पुरस्कार



 नवी दिल्ली, 26 : पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील टाटा मोर्टस  मधील 5 कामगारांना प्रधानमंत्री श्रम पुरस्कार उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु  यांच्याहस्ते आज विज्ञान भवनातील एका शानदार सोहळयात प्रदान करण्यात आले.  
येथील विज्ञान भवनात  केंद्रीय कामगार व रोजगार  मंत्रालयाच्यावतीने या कार्यक्रामाचे आयोजन करण्यात आले.  कार्यक्रमास केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार तसेच वरिष्ठ आधिकारी उपस्थित होते.   आज आयोजित कार्यक्रमात वर्ष 2011 ते 2016 पर्यंतच्या पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले.  श्रम वीर या  पुरस्कारासाठी 60, हजार रूपये रोख, श्रम श्रीपुरस्कारासाठी 40 हजार रूपये रोख  आणि सनदप्रदान करण्यात आली.
पिंपरी चिंचवड येथील टाटा मोर्टसमधील 5 कामगांराना यावेळी गौरिविण्यात आले. यामध्ये डॉ. वसंत भांदुर्डे  यांना  वर्ष 2012 साठी श्रम वीर या पुरस्काराने स्नमानित करण्यात आले. श्री भादुर्डे  हे  विद्युत देखभाल या पदावर कार्यरत आहेत. टाटा मोर्टसमध्ये ते 25 वर्षापासून कार्यरत आहेत. पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कैलास माळी हे देखील मागील 24 वर्षापासून टाटा मोर्टसमध्ये कार्यरत असून  ते ही विद्यूत देखभाल या पदावर कार्यरत आहेत. त्यांना वर्ष 2014 साठी चा श्रम श्रीपुरस्कार  प्रदान करण्यात आला. पर्यावरणाला पुरक अशा उपाय योजना राबविण्याबाबत आपल्याला हा पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
 हा पुरस्कार मिळाल्यामुळे आयुष्यात मोठी कमाई केली, असल्याची प्रतिक्रिया  राकेश देशमूख यांनी व्यक्त केली. त्यांना वर्ष 2012 चा श्रम श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.  वेल्डर  म्हणून मागील 25 वर्षापासून ते टाटा मोर्टसमध्ये कार्यरत आहेत.  त्यांनी तब्बल  दिड कोटी रूपयांच्या विजेची  बचत केली आहे. यासह  कंपनीतील  इंधनाची मोठी बचत केलेली आहे. यासह गर्जेद्र निंबाळकर यांना वर्ष  2011 चा श्रम श्रीपुरस्कार मिळाला ते फिटर या पदावर मागील 26 वर्षांपासून कार्यरत आहेत. तसेच मनोज कुमार आणेकर यांना वर्ष 2016 चा श्रम श्री पुरस्कार प्राप्त झाला ते मिली राईट मेकॉनिक या पदावर मागील 24 वर्षांपासून कार्यरत आहेत

Friday 23 February 2018

जेजुरीच्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र




             विकिपीडियाच्या जागतिक वारसा छायाचित्र स्पर्धेत मिळाला बहुमान  

नवी दिल्ली, २३ : विकिपीडियाने आयोजित केलेल्या विकी लव्हस् मोनुमेंटस या जगातील सर्वात मोठ्या छायाचित्र स्पर्धेत प्रशांत खरोटे यांनी कॅमेराबद्ध केलेले पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र जगातील प्रथम क्रमांकाचे छायाचित्र ठरले आहे. 
              विकी लव्हस मोनुमेंट्स या संकल्पनेवर आधारित जगातील वारसा स्थळांची छायाचित्र स्पर्धा विकिपीडियाने आयोजित केली होती. जगातील ही सर्वात मोठी छायाचित्र स्पर्धा होती.

                                    १० हजार छायाचित्रकारांचा सहभाग

              या स्पर्धेसाठी जगभरातून २ लाख ४५ हजार छायाचित्रे प्राप्त झाली होती, तर जगातल्या १० हजार छायाचित्रकारांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. आग्रा ते इटली पर्यंत अनेक वारसा स्थळांची  २ लाखांहून अधिक छायाचित्रे या स्पर्धेसाठी पाठविण्यात आली, यापैकी विकिपीडियाने ४८९ छायाचित्रे पुरस्कारासाठी पात्र ठरविली व अंतीमतः यातून १५ छायाचित्रे पुरस्कारासाठी निवडण्यात आली. 

                       खंडोबाच्या भंडारा यात्रेच्या छायाचित्रात हळदीचा सुगंध

                विकिपीडियाने जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या भंडारा यात्रेचे छायाचित्र जगातील सर्वोत्तम छायाचित्र म्हणून निवड केल्यानंतर या छायाचित्राचे वर्णनही अप्रतिम केले आहे. इतिहास, रंग व भक्तिभाव याचा अपूर्व संगम या छायाचित्रात पाहायला मिळतो व यातून हळदीचा (भंडारा) सुगंध अनुभवता येतो, असे विकिपीडियाने नमूद केले आहे. 

जगातील इटली, बांग्लादेश, थायलंड,जर्मनी,इराण,इजिप्त,कॅनडा,ऑस्ट्रेलिया,जॉर्जिया या देशातील  छायाचित्रांनीही पहिल्या १५ पुरस्कारात स्थान पटकाविले आहे.



छायाचित्रकार  प्रशांत  खरोटे यांच्या विषयी

  प्रशांत सोमनाथ खरोटे हे मूळचे नाशिकचे असून  उत्तम छायाचित्रांसाठी त्यांना आतापर्यंत विविध ३६ पुरस्कार मिळाले आहेत.  यातील महत्वाचे पुरस्कार
१)आंतरराष्टीय फोटो।  हंटर ,पत्रकारीता या विषयात सुवर्ण आणि रजत पदक.

२)महाराष्ट शासनाचा तोलाराम कुकरेजा पुरस्कर.

३)लोकमत अचिव्हमेंट पुरस्कार.

४)वसुंधरा (पुणे) पुरस्कार.

५) सामाजिक वणीकरण, सलग तीन वर्ष पुरस्कार.

६) महाराष्ट्र शाशन ( पर्यटन विभाग, ,२ विजेता ).

७)सिंहस्त कुंभमेळा
सिंहस्त क्लिक, कुंभ दर्पण या संस्थेचे राज्यस्तरीय स्पधेत प्रथम, द्वितीय पुरस्कार.




महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा     :  http://twitter.com/micnewdelhi
                                                                     00000


दत्तक कायदयात शिथिलता आणावी : पंकजा मुंडे


नवी दिल्ली, २३ :  राज्यात मुल-मुली दत्तक घेणा-यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. मात्र, नियम अधिक कडक असल्यामुळे दत्तक घेण्यास अधिक वेळ लागत असल्यामुळे दत्तक घेणा-या पालकांना बराच काळ वाट पाहावी लागते, त्यामुळे या नियमात शिथिलता आणावी, अशी मागणी माहिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांच्याकडे आज  केली.
येथील शास्त्री भवनात  केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री यांच्या कक्षात श्रीमती मुंडे यांनी भेट घेतली. यावेळी केंद्रीय महिला व बाल कल्याण सचिव राकेश श्रीवास्तव आणि राज्याच्या महिला व बाल विकासाच्या सचिव विनिता वेद  यावेळी उपस्थित होत्या. बैठकीनंतर श्रीमती पंकजा मुंडे यांनी माहिती दिली.
            दत्तक देण्यासंदर्भातील कायद्यांमध्ये अधिक गती देण्यासंदर्भातील केंद्रीय मंत्री श्रीमती मनेका गांधी यांनी केलेल्या सूचनांवर राज्यशासन लवकरात लवकर कार्यवाही करेल, असे  श्रीमती मुंडे यांनी सांगितले. राज्यातील काही भागात कुपोषणाचे प्रमाण आहे, कुपोषित  बालकांना पोषण आहार देऊन हे प्रमाण कमी करण्याचे कार्य राज्य शासन करीत असल्याचे श्रीमती मुंडे यांनी श्रीमती गांधी यांना सांगितले.  
अनाथांना आरक्षण देण्याचे कौतुक
राज्य सरकाराने अनाथांना आरक्षण देण्याचा निणर्य नुकताच घेतलेला आहे.  यासंदर्भातील सविस्तर माहिती  माहिती  श्रीमती पंकजा मुंडे यांनी  श्रीमती मनेका गांधींनी यांना दिली. या निणर्याचे कौतुक श्रीमती गांधी यांनी यावेळी केले. यासह राज्यात राबविण्यात येणा-या मातृत्व वंदन योजना, माझी कन्या भाग्यश्री, बेटी बचाओं बेटी पढाओं योजनांची माहिती श्रीमती मुंडे यांनी यावेळी दिली. मुलींसाठी सुरू झालेल्या अस्मिता योजनेची माहितीही दिली असल्याचे श्रीमती मुंडेनी सांगितले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा     :  http://twitter.com/micnewdelhi
                                                                     00000

सूचना – सोबत छायाचित्रे जोडली आहेत.           

राजधानीत संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी





नवी दिल्ली, २३ : संत गाडगे महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली. 
            कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त व प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी संत गाडगे महाराज  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रधान सचिव तथा   गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त  सुमन चंद्रा यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

   महाराष्ट्र परिचय केंद्रात संत गाडगे महाराज यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी संत  गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहीली. यावेळी मुंबई येथील महालेखापाल कार्यालयाचे वरिष्ठ लेखा परिक्षा अधिकारी एस.व्ही. पांडे, सहायक लेखा परिक्षा अधिकारी कुंज बिहारी पंडित व संतोष कुमार, वरिष्ठ लेखा परिक्षक ए.एन.घराळ यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.   
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा     :  http://twitter.com/micnewdelhi
                                                                     00000

Thursday 22 February 2018

प्रधानमंत्री पुरस्कारासाठी देशभरातून २ हजार अर्ज



नवी दिल्ली, २१ : लोकप्रशासन दिनानिमित्त प्रशासकीय सेवेतील अधिका-यांना उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणा-या प्रधानमंत्री पुरस्कारासाठी यावर्षी देशभरातून २ हजार १० अर्ज प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या चार महत्वाकांक्षी कार्यक्रमांच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी  निवड झालेल्या अधिका-यांना २१ एप्रिल या लोकप्रशान दिनी  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 
       लोक प्रशासन -२०१८ कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री पुरस्कारासाठी केंद्र शासनाचे विभाग तसेच राज्य सरकार व केंद्र शासीत प्रदेशातील ६२३ जिल्हयांमधून एकूण २ हजार १० अर्ज प्राप्त झाल्याचे केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक तक्रार निवारण व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. लोकप्रशासन दिनानिमित्त मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी दोन दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमात २१ एप्रिल या लोकप्रशासन दिनी  प्रधानमंत्री यांच्या हस्ते केंद्र, राज्य व केंद्र शासीत प्रदेशात उत्कृष्ट कार्य करणा-या अधिका-यांना प्रधानमंत्री पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
         यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजना, डिजीटल पेमेंट प्रोत्साहन, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण)’ आणि दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. देशभरातून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ४५३, डिजीटल पेमेंट प्रोत्साहन कार्यक्रमासाठी २५८, प्रधानमंत्री आवास योजना (शहरीसाठी ६६५ तर ग्रामीणसाठी ४१२) आणि दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेसाठी २२२ असे एकूण २ हजार१० अर्ज प्राप्त झाले आहेत. या चार कार्यक्रमांशिवाय पर्यावरण संरक्षण,आपत्ती व्यवस्थापन, उर्जा, शिक्षण, आरोग्य, महिला व बाल विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणा-या केंद्र , राज्य व  केंद्र शासीत प्रदेशातील संस्था व व्यक्तींना दोन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.  
       यावर्षी  प्रधानमंत्री पुरस्कार २०१८ साठी आयोजित स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज पाठविण्याची  सोय करून देण्यात आली  होती . मंत्रालयाकडे प्राप्त झालेल्या एकूण अर्जांची उच्च स्तरीय समीतींद्वारे तीन स्तरांवर छाणनी करण्यात येणार आहे. निवड झालेल्या अधिकारी व संस्थांना आपल्या कार्याचे सादरीकरण करावे लागणार आहे या सादरीकरणाबाबत जनतेचे मत विचारात घेण्यात येईल व प्रत्यक्ष कार्यस्थळावर जावून कामाची पाहणीही करण्यात येणार आहे. या चाचणींमधून निवड झालेले अधिकारी व संस्थांना २१ एप्रिल २०१८ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १ लाख रूपये, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
                यापूर्वी, जालनाचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे(२०१७), सोलापूरचे सुपूत्र व चंदीगडचे जिल्हाधिकारी अजित जोशी (२०१६), तत्कालीन अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते व गडचिरोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा (२०१५) यांना मानाचा प्रधानमंत्री पुरस्कार मिळाला आहे.  

                                                 0000   

Tuesday 20 February 2018

प्रत्येक राज्यात कृषी मुल्य आयोग असावा : पाशा पटेल



नवी दिल्ली, 20 :  राज्यनिहाय जमीनाचा पोत भिन्न असतो. वेगवेगळया राज्यात वेगवेगळे पीक घेतले जाते, त्यामुळे प्रत्येक राज्यात कृषी मुल्य आयोग असावा आणि या आयोगाचे अध्यक्ष हे शेतकरीच असावेत अशी, महत्वपुर्ण सूचना राज्याचे कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पणन, कृषी-पुरवठा आणि कृषी-मुल्य प्रणाली या अभ्यास गटाचे प्रमुख पाशा पटेल यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समोर दिलेल्या सादरीकरणात मांडली. यासह इतरही सूचना त्यांनी मांडल्यात.
येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान कॉप्लेक्स, पुसा येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्यावतीने शेतक-यांचे उत्पन्न 2020 पर्यंत करण्यासंदर्भातील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. आज दुस-या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले. यावेळी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग, केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत बादल कौर यांच्यासह केंद्रातील तसेच राज्य शासनाचे कृषी विभांगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  
 या परिषदेत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भातील अभ्यासासाठी 7 गट बनविण्यात आले आहेत. यापैकी पणन, कृषी-पुरवठा आणि कृषी- मुल्य प्रणाली याविषयावरील समितीचे प्रमुख पाशा पटेल आहेत.  या गटामध्ये 65 सदस्य असून 20 शेतकरी, 5 वैज्ञानिक, 10 अर्थशास्त्री , 10 व्यापार संघाचे प्रतिनिधी, केंद्रीय कृषी आणि विविध राज्यातील कृषी विभागांचे एकूण 20 वरिष्ठ अधिकारी या समितीत सामील आहेत.
        पणन, कृषी-पुरवठा आणि कृषी-मुल्य प्रणाली यासंदर्भातील सादरीकरणामध्ये पाशा पटेल यांनी प्रधानमंत्री यांचे लक्ष प्रमुख मुद्दयांकडे वळविले, यामध्ये भारतात करण्यात येणा-या पेरणीमध्ये आणि जगभरातील राष्ट्रामंध्ये  होणा-या पेरण्यांमध्ये किमान 2 ते अडीच महिण्यांचा अंतर नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे जगभरात कुठे –कुठे काय काय पिकविण्यात येते याचा अंदाज घेऊन पेरणीमधे करण्यात येणा-या  बदलांचा अभ्यास करता येऊ शकतो.
        भारतात शेतकरी हा समाजाचा प्रमुख घटक आहे. इथल्या संस्कृतीशी शेतकरी एकरूप असल्यामुळे वर्षातून एकदा जेव्हा पाडवा असतो तेव्हा गावात सर्व शेतकरी एकत्रित येऊन कोणते पीक पेरावे यासंदर्भात चर्चा करतात. ही महत्वुपुर्ण घटना असते यावेळी शेतक-यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास शेतकरी आपले पेरणीची पीके बदलू शकतात.
भारताचे राजदूत ज्या देशांमध्ये आहेत त्याठिाकणी एक कृषी अधिकारी नेमावा. यामुळे जगभरात काय पेरले जाते हे कळेल, त्याप्रमाणे देशातील शेतीला आकार देता येऊ शकणार. केंद्र सरकारने दरवर्षी शेतक-यांना किमान 10 ठळक पीक ठरवुन दयावे,  जेणे करून शेतक-यांचे नुकसान होणार. अशीही सूचना करण्यात आली.
कोणत्याही पीक हंगामानंतर पीकांना सुरक्षीत आणि योग्य भाव मिळेपर्यंत शीतगृहांची  सोय गावातच उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे श्री पटेल यांनी सादरीकरण सांगितले. कंत्राटकी शेतीला प्रोत्साहन देणे, पीकांना योग्य भाव मिळण्यासाठी एक नवीन स्पर्धात्मक श्रृखंला तयार करण्यात यावी, ज्यामुळे शेतक-यांना अधिकाधिक लाभ होईल.
पुढील पाच वर्षात अशी व्यवस्था तयार करायला हवी की पींकासाठी निर्धारित  किमान आधारभूत किंमतीच्या खाली शेतक-यांचा माल कुणीही घेता कामा नये. आणि हे आधारभूत मुल्य पेरणीच्या आधी निश्चीत करण्यात यावे
आपला देश वैविध्यपुर्ण आहे. आयात-निर्यात संबिधित धोरण निश्चित व्हावे, जे पीक भारतात मोठया प्रमाणात पिकविले जाते त्या संदर्भातील आयात कर हा जास्त असावा तसेच जे निर्यात केले जाते त्याचे धोरणही शेतकर-याला सोयीचे असेल असेच असावे.
पुर्वोत्तर राज्यांच्या भौगोलिक परिस्थिती नुसार तिथल्या शेतक-यांसाठी नियमांमध्ये  शिथीलता आणावी. याठिकाणी वाहतुकीवर होणारा खर्च वाचविण्यासाठी नवीन उपाय योजना अवलंबील्या पाहिजेत. या भागांमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यात यावी. माहिलांनी आणि तरूणांना कृषी पणन संस्थेशी मोठया प्रमाणात जोडले जावेत यासाठी त्यांना प्रशिक्षणही प्रदान करण्याची व्यवस्था असावी.

ऑरगेनीक शेतीला प्रोत्साहन देण्याबाबत विचार करतांना पशुधन कसे वाढेल याकडे ही लक्ष देण्यात यावे. अशा सूचनांचे सादरीकरण श्री पटेल यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समोर केले.

पाशा पटेल यांनी दि.20.02.2018 रोजी महाराष्ट्र परिचय केंद्राशी केलेली बातचीत

भारतीय वनसेवा परिक्षेत १५ मराठी उमेदवार उत्तीर्ण


नवी दिल्ली दि. २० : भारतीय वनसेवेचा निकाल जाहीर झाला असून एकूण ११० उमेदवार या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत यात महाराष्ट्रातील  १५ उमेदवारांचा समावेश आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परिक्षेच्या आधारावर फेब्रुवारी २०१८ मध्ये या उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यासंदर्भातील निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. यानुसार देशभरातून एकूण ११० उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यात महाराष्ट्रातील १४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
निरंजन दिवाकर गुणवत्ता यादीत तिसरा
गुणवत्ता यादीत पहिल्या १० मध्ये महाराष्ट्रातील २ उमेदवारांचा समावेश असून निरंजन सुभाषराव दिवाकर तिस-या तर सुमीतकुमार सुभाषराव पाटील ७ व्या स्थानावर आहे. याशिवाय काजोल(११), श्रीनिवास विनायकराव पाटील (२८), संदीप हिंदुराव सुर्यवंशी (३८), निखील दशरथ थावळ (४६), सुदर्शन गोपीनाथ जाधव (४७), कस्तुरी प्रशांत सुळे (५६), राहुल किसन जाधव (६८), प्रशांत बाजीराव पाटील (६९), अमील लक्ष्मण शिंदे (७३), सतीश अशोक गोंधळी (७९), अक्षय बाळू भोरडे (९५), शंशाक सुधीर माने (१००) आणि राहुल गजबिये (१०२) यांचा समावेश आहे.
एकूण उत्तीर्णांमध्ये ४६ उमेदवार खुल्या प्रवर्गातील, ४० इतर मागास वर्गीय, १६ अनुसूचीत जाती तर ८ अनुसूचीत जमाती प्रवर्गातील आहेत. यातील ३ उमेदवार हे दिव्यांग आहेत.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi
0000