Thursday 28 September 2017

मुंबई उपनगरासाठी 100 नवीन लोकल










केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याहस्ते शुभारंभ

नवी दिल्ली 28 : मुंबई उपनगरीय क्षेत्रासाठी 100 नवीन लोकल रेल्वे मिळणार असून याचा शुभारंभ उद्या 29 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

            मुंबईची जीवन वाहिणी लोकल सेवेला अधीक प्रोत्साहन देण्यासाठी  भारतीय रेल्वे मंत्रालयाच्यावतीने मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेत 100 अधिक नवीन लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे रेल्वे मंत्री श्री गोयल यांनी सांगितले. सध्या पश्चिमी रेल्वे आणि मध्य रेल्वेमध्ये एकूण 2983 लोकल धावतात. त्या वाढून 3083 लोकल धावतील.  या अधिक लोकल सेवांचा लाभ 77 लाख दैनिक प्रवाश्यांना पोहोचणार आहे.

            या 100 लोकल सेंवामध्ये  32 लोकल या पश्चिम रेल्वे आणि 68 लोकल या मध्य रेल्वेसाठी असणार आहेत.
पश्चिम रेल्वे :  यामध्ये 17 लोकल या 1 ऑक्टोबर 2017 पासून अप दिशेने तर 15 लोकल सेवा या डाउन दिशेने सुरू होतील.  वर्तमानात पश्चिम रेल्वेसाठी एकूण 1323 उपनगरीय लोकल सेवा आहेत, आता त्यात वाढ होऊन 1355 लोकल रूळावरून धावतील.


मध्यरेल्वे :  यामध्ये हार्बर लाइनआणि ट्रांस-हार्बर लाइन वर  प्रत्येकी 14 लोकल सेवा 2 ऑक्टोबर 2017 पासून सुरू होतील. तर मुख्य लाइनवर 16 लोकल सेवा या 1 नोव्हेंबर 2017 पासून होणार आहे. यासह 31 जानेवारी 2018 पासून हार्बर आणि ट्रांस हार्बर लाइनवर 24 लोकल सुरू करण्यात येणार आहेत. सध्या मध्य रेल्वेवर 1660 लोकल धावीत असून नव्या 68 लोकल ‍मिळवून 1728 लोकल रूळावरून धावतील. 

Wednesday 27 September 2017

संत ज्ञानेश्वर जागतिक दर्जाचे तत्वज्ञ : डॉ. विश्वनाथ कराड










नवी दिल्ली : संत ज्ञानेश्वर जागतिक दर्जाचे तत्वज्ञ असल्याचे मत एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केले.
डॉ. विश्वनाथ कराड यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यावेळी  डॉ. कराड बोलत होते. यावेळी विश्ववशांती केंद्राचे सल्लागार तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाणयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हानेकर्नल तांबडेज्येष्ठ पत्रकार अरूण कोरे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळेमाध्यम प्रतिनिधी जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरामाहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, कार्यालयातील कर्मचारी  आदी उपस्थित होते.
याप्रसंगी परिचय केंद्राचे उपसंचालक श्री कांबळे यांनी डॉ. विश्वनाथ कराड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यासह श्री कांबळे यांनी डॉ. एस.एन.पठाणडॉ. सुधीर गव्हानेकर्नल तांबडे आणि ज्येष्ठ पत्रकार अरूण कोरे यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी  डॉ. कराड म्हणाले, संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी मराठी भाषेत लिहून महाराष्ट्र, देशासह जगालाच नवीन अध्यात्माचा मार्ग दिलेला आहे. अध्यात्माची नवीन दिशाच ज्ञानेश्वरामुळे मिळाली असल्याने ख-या अर्थाने संत ज्ञानेश्वर हे जागतिक दर्जाचे तत्वज्ञ होते. त्यांचा भारतीय मानव समाजावर सकारात्मक परिणाम झाला असल्याचेही डॉ. कराड म्हणाले.
आपण ज्या शैक्षणिक संस्था उभारल्या आहेत त्या आपल्या हातून  घडत गेल्या आहेत, आपण केवळ माध्यम होतोअसे डॉ. कराड यांनी यावेळी विनम्रपणाने सांगितले. त्यांनी विश्वशांती स्तुपांच्या बांधकामाविषयी सांगितले, या स्तूपामध्ये जगभरातील तत्ववेत्त्यांची ग्रंथसंपदा व त्यांचे पुर्णाकृती पुतळे असणार आहेतअशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रमप्रकाशित करण्यात येणारी विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी श्री. कराड यांना दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने डॉ. कराड यांना भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन डॉ. कराड यांनी यशस्वी वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राला विविध श्रेणीतील तीन ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार’



नवी दिल्ली 27 : महाराष्ट्राला विविध श्रेणीतील तीन राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट पर्यटक गाईडच्या पुरस्काराने रामा खांडवाला यांना सन्मानित करण्यात आले. तर  सर्वोत्कृष्ट एकल रेस्टॉरन्ट पुरस्कार मुंबईतील खैबर या रेस्टॉरन्टला  मिळालेला आहे.

छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल मुंबईतील छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाला वर्ष 2015-16 चा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
विज्ञान भवनात राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची अध्यक्षता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली.  केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री के.जे. अल्फोंस, पर्यटन विभागाच्या सचिव रश्मी वर्मा, महासंचालक सत्यजीत राजन, आर्थिक सल्लागार लीना सरन मंचावर उपस्थित होत्या. यासह राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवसायाशी निगडीत व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित होते.

मुंबईतील छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाला देशभरातील महानगराच्या विमानतळामधून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल आज पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय तनेजा आणि कॉरपोरेट व्यवहार विभागाचे महाव्यवस्थापक राहूल बॅनर्जी आणि यांनी स्वीकारला.
मुंबईतील छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळ हे दक्षिण अशियातील सर्वात मोठे दुसरे विमानतळ असून एकूण देशभरातील विमानतळाच्या 17.2% टक्के वर्दळ एकटया या विमानतळावर असते.  रोज किमान 25 ते 40 लाख प्रवासी या विमान प्रवास करण्यासाठी चढउतार करतात. 2015 मध्ये या विमानतळाला गुणवत्ता नियंत्रणासाठी अंतराराष्ट्रीय विमानतळ परिषदेचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.  हे विमानतळ देशातील मध्य, दक्षिण आणि पश्चिम प्रदेशातील 29 शहरांना जोडते. या विमानतळावरून  दररोज जवळपास 190 विमानांची ये-जा होते. देश-विदेशातील 90 ठिकांणासाठी छत्रपती शिवाजी अतंरराष्ट्रीय विमानतळ प्रवाश्यांना सोयीस्कर होते. पर्यटनाचा विचार करता हे विमानतळ देश-विदेशातील पर्यटकांसाठी आवडते विमानतळ आहे.

मुंबईच्या रमा खांडवाला यांना सर्वोत्कृष्ट पर्यटक गाईड राष्ट्रीय पुरस्कार

मुंबईच्या रमा खांडवाला यांना 50 वर्ष  पर्यटक मार्गदर्शक म्हणुन निभावलेल्या कामाबद्दल सर्वोत्कृष्ट पर्यटक मागदर्शकया  राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने आज राष्ट्रपती रामनाथ कोंविद  यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

श्रीमती रमा खांडवाला या वरिष्ठ पर्यटक गाईड आहेत. मागील 5 दशकांपासून त्या पर्यटन क्षेत्रात काम करित आहेत. सध्या त्या 91 वर्षाच्या असून आजही पर्यटक गाईड म्हणून सक्रीयपणे अनेकांना मागदर्शन करतात.  भारतीय स्वातंत्र्य लढयात त्यांनी सक्रीय सहभाग निभावला असून त्यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या राणी झांसी  महिला सैन्य तुकडीत सेकंड लेफ्टनंट म्हणून काम सांभळले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश सेवा करावी या उद्देशाने त्यांनी पर्यटन मार्गदर्शक म्हणून 1968 पासून सुरूवात केली. महाराष्ट्रातील विविध ठिकाणंच्या पर्यटन क्षेत्राचा अभ्यास करून महाराष्ट्र दर्शन घडविले. त्यांनी जपानी भाषाही शिकून घेतली . जपानी पर्यटकांसाठी  त्या भारतीय दूवा म्हणून काम करीत होत्या.  त्यांनी अनेक देशांच्या मान्यवरांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे  पर्यटन घडविले आहे.
पुरस्कार प्राप्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करत त्या म्हणाल्या जर तुमचे काम चांगले असेल तर तुम्हाला लोक बोलवूनच घेतील. माझ्या कामामुळे आज मला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आपला देश मनाने खूप श्रीमंत आहे. अनेक पर्यटकांनी माझ्याकडे ईच्छा व्यक्त केली होती की, आम्हाला भारतातच राहायचे आहे. आज पर्यटक मार्गदर्शकांना अनेक संधी आहेत त्यांनी त्याचे सोने करावे असे श्रीमती खांडवाला म्हणाल्या.

मुंबईतील खैबर रेस्टॉरन्टला सर्वोत्कृष्ट रेस्टॉरन्टचा एकल राष्ट्रीय पुरस्कार

मुंबईतील खैबर रेस्टॉरन्टला सर्वोत्कृष्ट रेस्टॉरन्ट या एकल राष्ट्रीय पुरस्काराने पर्यटन राज्यमंत्री के.जे अल्फोंस यांनी सन्मानित केले.  खैबर रेस्टॉरन्ट 1956 पासून सुरू असून आग लागल्यामुळे जूने बांधकाम पाडून 1988 ला नवीन बांधकाम केले आहे. या रेस्टॉरन्ट चे डिसाइन हे परवेश्वर गोदरेज यांनी केले असून या रेस्टॉरेन्टच्या आतील भिंतीवरील चित्रे ही जगप्रसिद्ध चित्रकार एमएफ हुसेन आणि एंजोली एला मेनन यांनी काढली आहेत.  खैबर रेस्टॉरन्ट मध्ये 175 लोकांच्या बसण्याची सुविधा आहे. अनेक राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय ख्यातमान्य व्यक्तींनी इथल्या व्यंजनांचा लाभ घेतला आहे.

Saint Dnyaneshwar is one of the Greatest Philosopher of All Times -Founder Chairman, MIT, Dr. Vishwanath Karad




New Delhi, 27:  “Saint Dnyaneshwar is one of the Greatest Philosopher of All Times”, expressed the Founder President of Maharashtra Information Technology and World Peace University, here today.  He visited Maharashtra Information Centre and had an informal discussion with the media and the staff of the office.
          Dy.Director Dayanand Kamble presented a bouquet to  Dr. Vishwanath Karad. PRO Amarjyot Kaur Arora, Information Officer Anju Nimsarkar and all the staff and media persons were present during this informal chat. 

To attain peace and balance in today’s competitive world, one has to understand the ultimate reality, which comes from the teachings and preachings of Saint Dnyaneshwar, a 13th Century Marathi Saint, who was a poet, philosopher and a Yogi in true sense and spirit, expressed Dr. Karad. A person of high intellect, a mechanical engineer by profession and a strong believer in World Peace, Dr. Karad spoke on spiritual, philosophical and educational issues. He said, we are surrounded by an invisible force.  What we do, what we intend to do, but, end up doing entirely different is nothing but the invisible force that guides us or compels us to do so.  Initially we do not realize, but subsequently, when we analyze it, the end result is nothing else but the “Invisible Force”.

Dr. Vishwanath D Karad, is an eminent educationist, thinker and a social worker, having a great vision.  He has immensely contributed in the field of Technical Education and has taken tremendous efforts to raise the quality of life of the Indian masses for a better tomorrow.
Dr. Karad said that the entire globe today is witnessing and   experiencing the mind boggling Scientific and Technological developments like artificial intelligence, internet and web management. Dr. Karad said that he is a firm believer of Swami Vivekanada’s teachings, which says that “Union of Science and Religion alone will bring peace to the World. All the teachings of both these philosophers preach nothing but ‘Self Consciousness’. His brief and positive approach in looking up at all aspects of life mesmerized one and all present and created a positive aura all around.

Dr. Karad was accompanied by Dr. Sudhir Gawhane, Former VC of Rashtrasant Tukdoji Maharaj University, Nagpur who has joined Dr. Karad in forming a World Peace University, Dr. Prof. S.M.Pathan, a Botanist from Nagpur University, who works as an advisor to Dr. Karad, Col. Tambde, Dr Arun Kore, a journalist worked in leading Marathi Dailies like Prabhat, Pudhari and Lokmat who has associated with Dr. Karad.




Maharashtra Bags Three National Tourism Awards





New Delhi, 27:  On the occasion of ‘World Tourism Day’ Maharashtra received three National Tourism Awards 2015-16 at the hands of the President, Shri Ram Nath Kovind, here today. These three awards were bagged by Chhatrapati Shivaji International Airport, Smt. Rama Khandwala and the Khyber Restaurant under the categories of Best Airport, Tourist Guide and Best Stand Alone
Restaurant.

            In a function held at Vigyan Bhawan, the other awards presented were to various segments of the travel, tourism and hospitality industry at a function organised by the Ministry of Tourism on the occasion of “World Tourism Day”. Minister of State (I/C) for Tourism Shri Alphons Kannanthanam presided over the function. Tourism Ministers of States, Central and State Government Officials, Members from the Travel and Hospitality Industries, including leading Hoteliers, Travel Agents and Tour Operators, Students from Tourism and Hospitality Institutes, Mainstream and Travel Media attended the function.

            Shri Sanjeev Taneja CEO and Rahul Banerjee, GM of Chhatrapati Shivaji International Airport, CSIA, Mumbai received the Award at the hands of the President. Chhatrapati Shivaji International Airport (CSIA), Mumbai is the 2nd busiest airport in South Asia and represents 1702% of all India Traffic. Despite being the most operationally challenged city airport in the world, efforts have been made to augment passenger experience by providing State of the Art facilities.  CSIA has been awarded as the World’s Best Airport globally in the category of 25-40 million passengers at Airport Service Quality Awards 2015 by Airports Council International. More than 190 daily flights operate to 90 destinations in India and globally. The CSIA has significantly contributed towards environment and its sustainability and efforts to develop a conducive eco system has also been a major consideration.

The Best Tourist Guide (Special Award) was bagged by Smt. Rama Khandwala of Mumbai.  She received this prestigious award at the hands of Hon. President. Smt. Khandwala, one of the senior most guide and has served Tourism Industry for over 50 years.  She is still active at the age of 91, and has contributed significantly as a cultural ambassador of Indian tourism industry. Fluent in Japanese language, she has contributed in building cultural relations and promotion of Buddhist sites in Maarashtra and other parts of the country.  She has also served as a Second Lieutenant in the Rani Jhansi Regiment of the Azad Hind Fauj in Rangoon under Netaji Subhash Chandra Bose’s struggle for freedom.

The third Award in the kitty was the Best Stand Alone Restaurant Award bagged by Khyber Restaurant of Mumbai. Shri Sudhir and Smt Rashmi Behl received this Award. This Restaurant, a 175 seat restaurant, was started by Om Parkash Bahl in 1958.  Destroyed in fire in 1985, it was reopened in 1988 designed by Parmeshwar Godrej.  Serving North-West Frontier cuisine, the Restaurant plays host to a number of international celebrities including Prince (now King) of Luxembourg, Demi Moore, Goldie Hawn and Brad Pitt and the Defence Minister of Canada.

 The President also launched the “Incredible India 2.0 Campaign”; ‘Adopt A Heritage’ Project and new Incredible India Website on the occasion. “Incredible India 2.0 Campaign” marks a shift from the present generic promotions being undertaken across the world, to market specific promotional plans and product specific creative, with greater focus on digital presence and social media. ‘Adopt A Heritage’ Project plans to entrust heritage sites to the public sector and private sector companies and individuals for the development of tourist amenities. They will become ‘Monument Mitras’ and adopt the sites. The “New Incredible India Website” is an advanced version of the website with more useful features.


Tuesday 26 September 2017

राजकीय क्षेत्राकडे तरूणांनी सकारात्मक दृष्टीने पाहावे : प्रा. राहूल कराड


नवी दिल्ली दि. 26 : राजकीय क्षेत्राकडे तरूणांनी सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे एमआयटी, पुणे या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. राहूल कराड यांनी आज परिचय केंद्रात व्यक्त केले.

            प्रा. राहूल कराड यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. या भेटीच्या वेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेत ते बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रा. कराड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे उपस्थित होत्या.
            राजकारणातील वाईट गोष्टी थांबण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी राजकारणात सक्रीय होणे गरजेचे आहे.  शिक्षित युवा वर्ग राजकारणात आल्यास देशाच्या प्रगतीला अधिकच हात भार लागु शकतो. तरुणांनामध्ये राजकारणाविषयी सकारात्मक दृष्टीकोण निर्माण करण्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रतिनिधीव्दारे प्रयत्न व्हावे. जेणे करून तरूण पिढीचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोण सकारात्मक होईल, असे प्रा. कराड यांनी चर्चे दरम्यान म्हणाले.
 राजकाणाचा पाया हा अध्यात्मिक, मौलिक विचारांवर आधारित असावा, असे म्हणत, एमआयटी ही संस्था विश्वशांतीच्या विचारांवर उभी आहे. संस्थेचा उद्देश दर्जेदार शिक्षण देण्यासोबतच चांगले विद्यार्थी घडविणे हा आहे. संस्थेने 2005 पासून राजकीय क्षेत्रातील बारकावे माहिती करून घेण्यासाठी  अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. एमआयटीमधून अभ्यासक्रम पुर्ण केलेले बरेच विद्यार्थी आज राजकारणात सक्रीय होत आहेत, अशी माहिती प्रा. कराड यांनी यावेळी दिली. एमआयटीच्या माध्यमातून विविध अभिनव उपक्रम विद्यार्थी, माहिला, शिक्षक यांच्यासाठी राबविले जातात. ज्याचा फायदा हा समाज बांधणीसाठी होत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी प्रा. कराड यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राव्दारे विविध सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर केला जात असल्याचे सांगुन, परिचय केंद्राच्या एकूणच कामकाजाचे कौतुक केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी  श्री. जाधव यांना दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने श्री. कराड यांना भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. कराड यांनी यशस्वी वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.       

Monday 25 September 2017

चौरई धरण : मध्यप्रदेश व महाराष्ट्र या राज्यातील पाण्याचे पुनर्वाटप करावे - मुख्यमंत्री फडणवीस


नवी दिल्ली दि. 25 : मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे पाण्याचा येवा कमी झाला आहे. यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या पाणी आरक्षणाचे पुनर्वाटप करावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
                केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान हे उपस्थित होते. यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.
                     महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये पाणी वाटपासंदर्भात 1968 मध्ये एक करार झाला होता. या करारानुसार मध्यप्रदेशाचा वाटा 35 अब्ज घनफूट आणि महाराष्ट्राचा वाटा 30 अब्ज घनफूट निश्चित करण्यात आला होता. मात्र, मध्यप्रदेश हद्दीतील पेंच चौराई प्रकल्पाचे घळभरण जुन 2016 मध्ये पूर्ण झाले असून या प्रकल्पात 607.00 दलघमी पाणी अडविण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तोतलाडोह प्रकल्पात पाण्याचा येवा कमी झाला आहे. त्यामुळे नागपूर शहरासह नागपूर जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे.
                    गोदावरी खो-याच्या वैनगंगा उपखो-यातील पेंच नदीवर पेंच प्रकल्प रामटेक तालुक्यात बांधलेला आहे. या प्रकल्प समूहात पेंच जलविद्युत (तोतलाडोह) मुख्य धरण, पेंच पाटबंधारे प्रकल्प- नवे गांव खैरी (उन्नैयी बंधारा), रामटेक जवळील खिंडसी जलाशय या 3 जलाशयांचा समावेश आहे. या जलाशयातुनच नागपूर शहर तेसच जिल्हायाला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. पंरतु चौराई धरणामुळे यावर्षी हे तीन जलाशय भरु शकले नाही. त्यामुळे या भागात पीण्याच्या पाण्याचा प्रश्न उदभवला आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यामध्ये पुनर्वाटप करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली असून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान तत्वत: मान्यता दिली असून यासदंर्भातील बैठक लवकरच होणार असल्याचे ठरले.

जामघाट योजना : 60 किमी टनेलने पाणी आणण्यात महाराष्ट्र तयार : मुख्यमंत्री

                  नागपूर जिल्ह्यात पाणी आणण्याकरिता जामघाट योजना मंजूर होती, परंतु मध्यप्रदेशमध्ये पुनर्वसन व जंगल जमीनीमुळे हा प्रकल्प रखडला होता, यासाठी महाराष्ट्र 60 किलोमीटरपर्यंत टनेलव्दारे पाणी आणु शकतो. हा पर्याय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचविला. त्यास या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. याबाबत लवकरच सचिव स्तरावर बैठक होणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
                   कन्हान नदी ही गोदावरी खो-यातील प्राणहिता उपखो-यातील (जी-9 )वैनगंगा नदीची उपनदी आहे. या नदीचे उगमस्थान मध्यप्रदेशातील महादेव डोंगरातून झाले असून ही नदी मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसर तालुक्यातून महाराष्ट्रात प्रवेश करते. गोदावरी पाणी तंटा लवादाने ठरविल्याप्रमाणे कन्हान नदीच्या पाण्याचा वापर मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यांनी करावयाचा आहे. याबाबत 7 ऑगस्ट 1978 रोजी दोन्ही राज्यांदरम्यान एक करार करण्यात आला.
               या कराराप्रमाणे कन्हान नदीवर मध्यप्रदेश क्षेत्रात साठा निर्माण करून 15 अब्ज घन फूट पाणी 15 ऑक्टोंबर ते 30 जून या काळात महाराष्ट्र राज्यास मिळवावयाचे आहे. 15 अब्ज घन फूट पाणी नियंत्रित प्रवाह महाराष्ट्र राज्यास देण्याच्या दृष्टीने मध्यप्रदेश क्षेत्रात जे साठे निर्माण करावयाचे आहेत त्यांचा संपूर्ण खर्च तसेच भूसंपादन व पुर्वसनाचा खर्च महाराष्ट्र राज्याने करावयाचा आहे. या तरतूदीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य नियंत्रण मंडळाच्या बैठकीत जामघाट जलविद्युत प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
                      आज झालेल्या बैठकीत जामघाट योजनेसंदर्भातील उपाय म्हणून 60 किलोमीटरपर्यंत टनेलव्दारे पाणी महाराष्ट्रात आणण्याच्या दृष्टीने चर्चा झाली असून आज बैठीत याविषयावर तत्वत: मान्यता देण्यात आली.

Maha CM exclusive byte on Chaurai & Jamghat Dam at New Delhi

Maha CM paid floral tributes to Pandit Deendayal Upadhyay at Maha Sadan ...

Visionary Pandit Deendayal Upadhyay’s Birth Anniversary Celebrated At Maharashtra Sadan











New Delhi, 25:   Great philosopher and Visionary, Pandit Deendayal Upadhyay’s Birth Anniversary was celebrated at Maharashtra Sadan in New Delhi today. The Resident Commissioner Smt. Abha Shukla paid floral tributes to the great leader on his 101st anniversary at Maharashtra Sadan today.

            The Investment and Protocol Commissioner, Lokesh Chandra, Additional Resident
Commissioner, Samir Sahia, all the Assistant Resident Commisioners, Officer of Maharashtra Information Centre, Dy. Direcotor, Dayanand Kamble, PRO Amarjyot Kaur Arora, Information Officer Anju Nimsarkar and other staff also paid tributes to the visionary of the masses.

Pandit Deendayal Upadhyay’s Birth Anniversary Celebrated
at Maharashtra Information Centre

Pandi Deendayal Upadhyay’s 101st Birth Anniversary was celebrated at Maharashtra Information Centre today. Floral tribute were paid by the Deputy Director, DAyanand Kamble, PRO Amarjyot Kaur Arora and Information Officer, Anju Nimsarkar also paid tributes to the great thinker and economist. All the staff of the office paid tributes.


Visionary Pandit Deendayal Upadhyay’s Birth Anniversary Celebrated





New Delhi, 25:  Maharashtra Chief Minister, Shri Devendra Fadnavis paid floral tributes to the great philosopher, Pandit Deendayal Upadhyay on his 101st Birth Anniversary at Maharashtra Sadan in New Delhi, today.

            Floral tributes were also paid by Cabinet Ministers and Ministers of State to Pandit Deendayal Upadhyay. Rural Development Minister, Smt. Pankaja Munde, Tribal Development  Minister, Shri Vishnu Sawra, Medical Education and Water Resources Minister, Shri Girish Mahajan, Agriculture and Horticulture Minister, Shri Pandurang Phundkar, Water Supply Minister, Shri Babanrao Lonikar, Social Justice Minister, Shri Rajkumar Badole  Minister of State for Industries, Mines, Environment and PWD, Shri Pravin Pote-Patil, Minister of State for Tourism, Energy, Food and Drugs, Shri Madan Yerawar were present on the occasion.  Many Members of State Legislative Assembly also paid floral tributes to the great visionary, who advocated the philosophy of Integral Humanism. 

महाराष्ट्र परिचय केंद्रात पं. दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन













नवी दिल्ली दि. २५ : पं. दिनदयाळ उपाध्याय यांची 101 वी जयंती महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.  

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पं. दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्रेचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर- कांबळे यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती महाराष्ट्र सदनात साजरी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मान्यवरांची आदराजंली




नवी दिल्ली : पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी   महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात पं. दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महिला व बाल विकास मंत्री  पंकजा मुंडे, आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा,  वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन, कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, उद्योग आणि खनिकर्म, पर्यावरण सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे, ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह सर्वश्री आमदार शिवाजीराव कर्डिले, नारायण कुचे, हरीभाऊ जावळे, आर.टी. देशमुख, पास्कल धनारे, ऍड. संजय धोत्रे, राजेंद्र पाटणी, बंटी भांगडीया, सुरेश भोळे, डॉ. मिलिंद माने, संजय पवार, सेल्वन कॅप्ट. आर. तमिल, चंदूभाई पटेल, गिरीश व्यास आदी. पं. उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, गुंतवणुक तथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्या सह अन्य अधिकारी-कर्मचारीही उपस्थित होते, यांनीही यावेळी पं. दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण अभिवादन केले.

Tuesday 19 September 2017

बुनियादी सुविधाओं की परियोजनाओं में महाराष्ट्र देश में प्रथम स्थान पर राज्य में 5 लाख 97 हजार करोड़ की परियोजनाएं








नवी दिल्ली, 19 :  बुनियादी सुविधायें निर्माण करणे की दिशा में महाराष्ट्र देश मे प्रथम स्थान पर है. राज्य मे कुल 1 हजार 97 बुनियादी सुविधायें परियोजनायें है, तथा इनकी कुल किमत 5 लाख 97 319 करोड़ है.  देशभर के सारे राज्यों की 30 एप्रिल 2017 तक की बुनियादी सुविधाओं के परियोजनाओं की स्थिती दर्शानेवाली पुस्तिका निती आयोगाने तयार कि है, इसमें यह जानकारी उपलब्ध कराई गई है.
            निती आयोगने जारी कियें रिर्पोट मे सरकारी बुनियादी सुविधा परियोजनायें, सार्वजनिक क्षेत्र की परियोजनायें, सार्वजनिक निजी सहभागीता परियोजना (पी.पी.पी) तथा सरकारी परियोजनाओं का समावेश है.  5 से 50 करोड़ से अधिक किमत की बुनियादी सुविधाओं का उल्लेख निती आयोगने अपनी रिपोर्ट मे किया है.
            देश में कूल 8 हजार 367 बुनियादी सुविधा परियोजनायें है. जिनकी कुल किमत 50 लाख 58 हजार 722 करोड़ है. देश की कुल बुनियादी सुविधा परियोजनाओं की किमत में महाराष्ट्र की सहभागीता  11.8 % प्रतिशत है.
            महाराष्ट्र के बाद  दुसरे स्थानपर  उत्तर प्रदेश यह राज्य है. इस राज्य में कुल 454 बुनियादी सुविधा परियोजनाओं मे कुल 3 लाख 54 हजार 419 करोड़ लागत की है. देश की कुल परियोजनाओं मे उत्तर प्रदेश का  7 % प्रतिशत का हिस्सा है. इसके बाद अरूणाचल प्रदेश राज्य है. इस राज्य की कुल 188 मुलभत सुविधा परियोजनायें है. जिसकी किमत करीब 3 लाख 17 हजार 310 करोड़ की है. तथा देश  के विकास सुविधा परीयोजनाओं की किमत में मे इसकी भागीदारी 6.3 % प्रतिशत का  हिस्सा है. तमिलनाडू  चौथे क्रमांकपर है तथा गुजरात पाचवे स्थान पर है. मुलभुत सुविधा परियोजनाओं मे तमिलनाडू राज्य का हिस्सा 6.2 % प्रतिशत का है तो गुजरात राज्य का 5.7 % प्रतिशत का है. इन राज्य के नीचे कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगाणा, बिहार, राजस्थान आदी राज्यों का क्रमांक है.









Maharashtra Premier State In Country In Infrastructure Projects State Gets Projects Worth Rs 5 Lakh 97K Crore


New Delhi, 19:  Maharashtra has ranked first in pumping up Infrastructure Facilitation projects.  Presently, the State has 1 Thousand 97 Infrastructure Projects amounting to the tune of Rs 5 lakh 97 Thousand 319 crores. This has been mentioned in the NITI Aayog’s Project report on 30th April, 2017.

In the report submitted by NITI Aayog, various government projects like Infrastructural projects, private projects, PPP have been included.  The report has given clear cut details of the projects from Rs 5cr to 50crores.

Presently, there are a total of 8Thousand 367 projects going on in the Country amounting to Rs 50Lakh 58Thousand 722 crores.  However, of the total projects, Maharashtra has the largest number, that is 11.8% of the total infrastructural projects.
Uttar Pradesh follows Maharashtra with 454 infrastructure projects involving an investment of Rs 3Lakh 54Thousand 419 crores, which is 7% of the total projects.  Third in the row is Arunachal Pradesh with 188 Infrastructure projects amounting to Rs 3Lakh 17Thousand 130 crores.  The total cost of these projects amount to 6.3% of the total projects. 

Tamil Nadu is fourth on this list and Gujarat State is on number 5 with total infrastructure projects involving 6.2% and 5.7% of the total projects. These states are followed by Karnataka, Madhya Pradesh, Telangana, Bihar, Rajasthan etc.



पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल राज्यात 5 लाख 97 हजार कोटींचे प्रकल्प




 






नवी दिल्ली, 19 :  पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरले आहे. राज्यात  1 हजार 97 पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत 5 लाख 97 हजार 319 कोटी इतकी आहे. देशातील सर्व राज्यांची 30 एप्रिल 2017 पर्यंतची पायाभूत सुविधा प्रकल्पांची स्थिती दर्शविणारी पुस्तिका निती आयोगाने तयार केली असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
            निती आयोगाने जाहिर केलेल्या या अहवालात पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये शासकीय पायाभूत सुविधा प्रकल्प, सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प, सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प (पी.पी.पी.) व शासकीय प्रकल्पांचा यात समावेश आहे. 5 ते 50 कोटीहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश निती आयोगाने आपल्या अहवालात केला आहे.
            देशात एकूण 8 हजार 367 पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत 50 लाख 58 हजार 722 कोटी इतकी आहे. देशातील या एकूण पायाभूत प्रकल्पांच्या किंमती मध्ये महाराष्ट्राचा सहभाग हा सर्वात जास्त म्हणजे 11.8 टक्के इतका आहे.
            महाराष्ट्रापाठोपाठ दुस-या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य असून, या राज्यात 454 पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत 3 लाख 54 हजार 419 कोटी इतकी आहे, देशातील एकूण प्रकल्प किमतीच्या 7 टक्के वाटा उत्तर प्रदेशाचा आहे. अरूणाचल प्रदेशाचा क्रमांक पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये तिसरा असून या राज्यात 188 पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत 3 लाख 17 हजार 310 कोटी इतकी आहे, तर या राज्याचा वाटा देशाच्या एकूण पायाभूत प्रकल्पांच्या किंमतीत 6.3 टक्के इतका आहे.
            तमिळनाडू चौथ्या क्रमांकावर तर गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये तमिळनाडूचा वाटा हा 6.2 टक्के तर गुजरातचा वाटा 5.7 टक्के इतका आहे. या राज्यांच्या खालोखाल कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगाणा, बिहार, राजस्थान आदी राज्यांचा क्रमांक लागतो.