Thursday 30 January 2020

राजधानीत हुतात्म्यांना आदरांजली













                                              
नवी दिल्ली, ३० : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणा-या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आज महाराष्ट्र सदनात तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

    महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली
        महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना मौन पाळून आदराजंली वाहण्यात आली. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे  यांच्यासह  कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी आणि अभ्यागत  उपस्थित होते.                                                          
              आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                                        00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र. 23 /दि.30.01.2020



Monday 27 January 2020

विशाल भुजबळ यांना 'राष्ट्रीय युथ आयकॉन पुरस्कार'















    केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली, 27 :  पुणे जिल्हयातील नारायणगांव  येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रनिर्माण युवक संघाचे अध्यक्ष विशाल दिलीप भुजबळ यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते 'राष्ट्रीय युथ आयकॉन पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले.

            येथील वाय.एम.सी.ए. सभागृहात दिल्लीस्थित राष्ट्रीय युथ फेडरेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात  'राष्ट्रीय युथ आयकॉन पुरस्कार-2020'  चे  25 जानेवारी 2020 ला वितरण करण्यात आले.
           
विशाल भुजबळ हे मागील  10 वर्षांपासून  सामजिक क्षेत्रात पुर्णवेळ कार्यरत आहेत. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा पुढाकार राहिला असून त्यांच्या कार्यामुळे समाज दूत म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी शिक्षण,सहकार,कृषी व सामाजिक क्षेत्रात  उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या वैविद्यपूर्ण कार्याची दखल घेवूनच त्यांना  राष्ट्रीय युथ फेडरेशनने राष्ट्रीय युथ आयकॉन पुरस्कार 2020' पुरस्कराने सन्मानित केले आहे .

                                                         
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic 
वृत विशेष क्र. 22/ दि.27.01.2020
                                      00000





Saturday 25 January 2020

महाराष्ट्राला 13 पद्म पुरस्कार : आनंद महिंद्रा यांना पद्म भूषण











नवी दिल्ली 25 : सर्वोच्च नागरी पद्म पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी श्री. जॉर्ज फर्नाडिस, श्री. अरूण जेटली, श्रीमती सुषमा स्वराज यांना मरणोपरांत पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्राला यावर्षी 13 पद्म पुरस्कार मिळाले आहे.
दरवर्षी गणराज्य दिनाच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा होते. यावर्षी विविध क्षेत्राती 7 मान्यवरांना पद्म विभूषण, 13 मान्यवरांना पद्म भूषण आणि 118 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक श्री. आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्म भूषण पुरस्कार जाहिर झाला आहेत. तर विविध क्षेत्रातील 12 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहिर झाला आहे. पद्मश्री पुरस्कार जाहिर झालेल्या मान्यवरांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
श्री. सुरेश वाडकर – कला
श्री. पोपटराव पवार – सामाजिक कार्य
श्रीमती राहीबाई पोपेरे – इतर- कृषी
डॉ रमण गंगाखेडकर - विज्ञान व अभियांत्रिकी
श्री. करण जोहर – कला
श्रीमती एकता कपूर – कला
श्रीमती सरिता जोशी – कला
श्रीमती कंगना रानावत – कला
श्री. अदनान सामी – कला
श्री. झहिरखान बख्तीयारखान – क्रीडा
डॉ सॅड्रा डिसुझा – वैद्यकीय
श्री सय्यद मेहबूब शहा कादरी उर्फ सय्यदभाई – सामाजिक कार्य

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
वृत विशेष क्र. 21 दि.25.01.2020

कोकण रेल्वेतील दोघांना उत्कृष्ट कार्यासाठी पोलीस पदक जाहिर




नवी दिल्ली, दि. 25 : रेल्वेची सुरक्षा करणा-या रेल्वे पोलीस दलातील उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलिस पदक केंद्रीय रेल्वेमंत्रालयाने आज जाहिर केले आहेत. देशातील 18 रेल्वे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर झाले असून यामध्ये कोकण रेल्वेतील दोघांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वेमंत्रालयाने रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे सुरक्षा विशेष दलासाठी आज राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर केली आहेत. विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक दिले जाणार आहेत.

उत्कृष्ट सेवेसाठी रेल्वेतील 15 पोलीस अधिका-यांना पोलीस पदके जाहिर झाली आहेत. राष्ट्रपती पोलीस पदक विशिष्ठ सेवेसाठी 2 रेल्वे पोलीस अधिका-यांची नावे जाहिर झाली आहेत. तर पोलीस पदकासाठी 1 पोलीस कर्मचा-याचे नाव जाहिर झाले आहे.

कोकण रेल्वेतील दोन अधिका-यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस पदक जाहीर झाली आहेत. यामध्ये सहायक सुरक्षा आयुक्त पी.पी जॉय आणि उपनिरीक्षक देवकुमार गौंड यांचा समावेश आहे.

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अंजू निमसरकर/वृत विशेष क्र. 20 दि.25.01.2020

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली विद्युत रोषणाईने उजळून निघाले त्याची कांही छायाचित्रे



 










सैन्य दलातील 7 मराठी सैन्य अधिकारी आणि जवांनाना सेना मेडल जाहीर




नवी दिल्ली, दि. 25 : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने आज सैन्य दलातील अदम्य साहसासाठी सेवा मेडल जाहीर केले आहेत. यामध्ये 7 मराठी सैन्य अधिकारी आणि जवांनाचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने आज शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारामध्ये परम विशिष्ट सेवा मेडल, उत्तम युध्द सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, शौर्य चक्र, बार सेना मेडल(शौर्य), सेना मेडल(शौर्य), बार सेना मेडल (विशिष्ट), सेना मेडल (विशिष्ट) विशिष्ट सेवा मेडल जाहीर केले आहेत. यासोबतच ऑपरेशन रेनो, ऑपरेशन रक्षक ही विशेष मोहिम यशस्वी करणा-या जवांनानाही विशेष जाहीर झाले आहेत.
सेना मेडल(विशिष्ट) साठी, असम लष्करी तुकडीतील मेजर मोहित खरे, नायक दिलीप पोळ यांची नावे जाहीर झाले आहेत.
विशिष्ठ सेवा मेडल पुरस्कारसाठी मराठा लष्करी तुकडीतील ब्रिगेडीयर प्रवीण शिंदे (निवृत्त), कर्नल धर्नुजीवन ज्योती रानडे आणि लेफ्टन्न कर्नल हर्षवर्धन सत्रे या सैन्य अधिका-यांची नावे जाहीर झालेली आहेत.

‘ऑपरेशन रक्षक’साठी मराठा तुकडीतील 2 मराठी जवान होणार सन्मानित

सैन्यदलातर्फे वर्षभरात राबविलेल्या विविध सैन्य मोहिमांमध्ये अदम्य साहास दाखविणा-या सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये ‘ऑपरेशन रक्षक’ या विशेष मोहिमेमध्ये मराठा तुकडीतील सुभेदार मच्छीद्रनाथ गोविंद पाटील आणि सुभेदार संभाजी गोविंद भोगन या 2 मराठी जवानांचा सहभाग होता. यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.


आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अंजू निमसरक/वृत विशेष क्र. 19 दि.25.01.2020

महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक










नवी दिल्ली, दि. 25 :  उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलिस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहिर केले आहेत. देशातील 1040 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील 54 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज राष्ट्रपती पोलिस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरीसेवा दल पदक आदींची  घोषणा केली आहे. राष्ट्रपती पोलिस पदकांमध्ये उल्लेखीनय कामगीरीसाठी पोलिसांना दिले जाणारे शौर्य पदक, विशिष्ठ सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदक जाहिर करण्यात आले आहेत. यामध्ये देशातील 1040 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

देशातील 4 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक, 286 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्य पदक तर 93 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ठ सेवा पदक आणि 657 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहिर झाले आहे.

महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक

            महाराष्ट्रातील 10 पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस शौर्य पदक, 4 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक तर 40 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहिर झाले आहे.

शौर्य पदक – 1.श्री.मिठू नामदेव जगदाळे, 2.श्री.सुरपत बावाजी वड्डे, 3.श्री.आशिष मारूती हलामी, 4.श्री.विनोद राऊत, 5.श्री.नंदकुमार अग्रे, 6.डॉ.एमसीव्ही महेश्वर रेड्डी, 7.श्री.समीरसिंह साळवे, 8.श्री.अविनाश कांबळे, 9. श्री.वसंत अत्राम, 10. श्री.हमीत डोंगरे.
विशिष्ठ सेवा पदक – 1. श्रीमती अर्चना त्यागी (आयपीएस), 2. श्री.संजय सक्सेना (आयपीएस), 3.श्री.शशांक सांडभोर (सहा.पोलिस आयुक्त), 4. श्री.वसंत साबळे (सहा.पोलिस निरिक्षक).

गुणवत्ता सेवा पदक – 1. श्री.धनंजय कुलकर्णी (पोलिस अधिक्षक), 2. श्री.नंदकुमार ठाकुर (पोलिस उपायुक्त, मुंबई), 3. श्री.अतुल पाटील (अतिरिक्त आुयक्त मुंबई), 4. श्री.नंदकिशोर मोरे (सहाय्यक आयुक्त, मुंबई), 5. श्री.स्टीव्हन मॅथ्यू ॲनथनी (सहा.आयुक्त मुंबई), 6.श्री.निशिकांत भुजबळ (सहा.आयुक्त, औरंगाबाद), 7. श्री.चंद्रशेखर सावंत (उपाधिक्षक, अकोला), 8. श्री.मिलिंद तोतरे (निरिक्षक, नागपूर), 9.श्री.सदानंद मानकर (निरिक्षक, अकोला), 10. श्री मुकुंद पवार (वरिष्ठ निरिक्षक, मुंबई) 11. श्री.संभाजी सावंत (निरिक्षक, सांगली), 12. कायोमर्ज बोमन इरानी (सहा.आयुक्त, मुंबई), 13. श्री.गजानन काबदुले (वरिष्‍ठ निरिक्षक, मुंबई शहर), 14. श्रीमती निलिमा अरज (निरिक्षक, अमरावती), 15. श्री.इंद्रजीत कारले (सहा.आयुक्त ठाणे) 16. श्री.गौतम पराते (निरिक्षक औरंगाबाद), 17. श्री.सुभाष भुजंग (निरिक्षक जालना), 18.श्री सुधीर दळवी (निरिक्षक, मालाड, मुंबई), 19. श्री किसन गायकवाड (निरिक्षक, तुर्भे,नवी मुंबई),    20.श्री जमिल सय्यद (उपनिरिक्षक, नांदेड), 21. श्री मधुकर चौगुले (उपनिरिक्षक, गगनबावडा, कोल्हापूर), 22.श्री भिकन सोनार (उपनिरिक्षक, जळगांव), 23. श्री. राजू अवताडे (सहा.पोलिस उपनिरिक्षक, अकोला), 24. श्री.शशिकांत लोखंडे (सहा.पोलिस निरिक्षक, मुंबई), 25. श्री अशफाखअली चिस्तीया (मुख्य हवालदार, गडचिरोली), 26. श्री. वसंत तराटे (सहा.पोलिस उपनिरिक्षक, मुंबई शहर), 27. श्री.रविंद्र नुल्ले (सहा.पोलिस उपनिरिक्षक, कोल्हापूर), 28. श्री. मेहबूबअली सय्यद (सहा.पोलिस उपनिरिक्षक, नाशिक शहर), 29. श्री.साहेबराव राठोड (सहा.पोलिस उपनिरिक्षक), 30. श्री दशरथ चिंचकर (सहा.पोलिस उपनिरिक्षक, मावळ, पुणे) 31. श्री.लक्ष्मण टेंभुर्णे (सहा.पोलिस उपनिरिक्षक, गडचिरोली), 32. श्री.बट्टुलाल पांडे (सहा.उपनिरिक्षक, नागपूर शहर), 33. श्री.विष्णू गोसावी (सहा.उपनिरिक्षक, नाशिक), 34. श्री प्रदीप जांभळे (सहा.उपनिरिक्षक, पुणे), 35. श्री. चंद्रकांत पाटील (सहा.उपनिरिक्षक, जळगांव), 36. श्री.भानूदास जाधव (मुख्य हवालदार, मुंबई शहर), 37. श्री. नितिन मालप (इटिलीजन्स अधिकारी, मुंबई), 38. श्री.रमेश शिंगाटे (मुख हवालदार, मुंबई), 39. श्री.बाबुराव बिऱ्हाडे (इटिलीजन्स अधिकारी, नाशिक), 40. श्री.संजय वायचळे (मुख्य हवालदार, नाशिक)

महाराष्ट्राला 5 जीवन रक्षा पदक

संकटात सापडलेल्यांना वाचवून मानवतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींना जीवन रक्षा पदक दिले जाते. महाराष्ट्रातील 5 व्यक्तींना जीवन रक्षा पदक जाहिर झाले आहे. यामध्ये महेश पांडुरंग साबळे यांना सर्वोत्तम रक्षा पदक जाहिर झाले आहे. मुंबईतील कमला मिल आग दुर्घटनेत साबळे यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचविले होते.
जीवन रक्षा पदक जाहिर झालेल्यामध्ये 1. श्री एन.कार्तिकेयन, 2. कुमारीप्रमोद बाळासाहेब देवडे, 3. मास्टर शिवराज रामचंद्र भांडारवड, 4. श्री दत्तात्रय सुरेश टेंगळे यांचा समावेश आहे.

अग्निशमन सेवा पदक

अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनिय कामगीरीसाठी महाराष्ट्रातील 7 अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहिर झाले आहे. यामध्ये श्री. प्रभात सुरजलाल रहांगदळे (मुख्य अग्निशमन अधिकारी), 2. श्री.राजेंद्र चौधरी (उपमुख्य अधिकारी), 3. श्री.रविंद्र अंबुलगेकर (विभागीय अग्निशमन अधिकारी), 4. श्री.मिलिंद दोंडे (सहाय्यक अग्निशमन अधिकारी), 5. श्री.अभिजीत सावंत (स्टेशन अधिकारी), 6. श्री.सुधीर वर्तक (वाहनचालक), 7. श्री. दिलीप पालव (उपमुख्य अग्निशमन अधिकारी) यांचा समावेश आहे.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic 
दयानंद कांबळे/वृत विशेष क्र. 18 दि.25.01.2020

Friday 24 January 2020

‘दोन गडी कोल्हापुरी’ सायकलने दिल्ली व्दारी






नवी दिल्ली , 24 : दोन गडी कोल्हापुरी हा हॅशटॅग घेऊन कोल्हापूरातील आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे या दोन तरूणांनी सायकलव्दारे 2 हजार किलो मीटर प्रवास करून आनंदी जीवनाचा संदेश देत दिल्ली गाठली आहे.
आज या तरूणांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी आकाश आणि अनिकेत यांच्या उत्साह वाढवित पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधीत 26 जानेवारीपुर्वी दिल्लीत येण्याचा संकल्प आकाश आणि अनिकेत यांनी केला होता, तो त्यांनी वेळच्या आताच पुर्ण केला.  आनंदी जीवनाचा संदेश देत हा प्रवास केला असून प्रवासातही आनंद मिळाल्याचा अनुभव आकाश आणि अनिकेत यांना आला.
2 जानेवारीपासून सुरू झालेला प्रवास दिल्लीत 23 जानेवारीला संपला. हा प्रवास मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरीयाणा या राज्यांमधून झाला असल्यामुळे आपला भारत देश हा किती वैविध्यपुर्ण आहे याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव घेता आला असल्याचे आकाश आणि अनिकेत यांनी सांगितले.
            12 किलो वजन घेऊन हा प्रवास केला असून, या दरम्यान कमीतकमी साहित्य वापरून कस जगता येते याचाही अनुभव आकाश आणि अनिकेत यांना आला. सोबतच रात्रीचे वास्तव्यासाठी मंदिर, मश्चिद, गुरूव्दारा अशा धार्मिक ठिकाणीच थांबले असल्यामुळे त्या-त्या भागातील संस्कृती, भाषा समजली आणि खादयपदार्थांचा आस्वाद त्यांनी घेतला.
            फेसबूकच्या माध्यमातून जोडलेले पण कधीही भेट न झालेले आभासी मित्रांचे रियल वास्तव्य या प्रवासामुळे कळले. आभासी जगातील मित्र हे आभासी नसुन खरेच असतात हा विश्वास दृढ झाला. फेसबूकवरील मित्रांनी  या संपुर्ण प्रवासाचा खर्च उचलला हे विशेष,  असल्याचे आकाश यांनी सांगितले.
            फिरस्त्यांना जात, धर्म नसतो, त्यांच्याकडे माणुस म्हणुनच बघितले जात असल्यामुळे माणुसपण किती मोठे आहे हे या प्रवासामुळे शिकता आल्याने विचारांची समृध्दता अधिक वृध्दीगंत झाली, असल्याच्या भावना आकाश आणि अनिकेत यांनी व्यक्त केल्या.

            सायकल प्रवासाचा पुढील टप्पा हा कोकणाचा असणार आहे. लवकरच हा प्रवास सुरू करणार असल्याचे आकाश आणि अनिकेत  यांनी सांगितले.

Thursday 23 January 2020

राजधानीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी
















नवी दिल्ली , 23 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२३ वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली. 

            कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी नेताजी  सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 
  महाराष्ट्र परिचय केंद्रात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित अधिकारी - कर्मचारी आणि अभ्यागतांनी  नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

           महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                     http://twitter.com/micnewdelhi
                                                                       ००००० 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.16/  दिनांक २३.१.२०२०