Tuesday 30 January 2024

महाराष्ट्र सरकार ने हरित हाइड्रोजन परियोजनाओं के विकास के लिए किया एनजीईएल ने साथ समझौता ज्ञापन पांच साल में 80,000 करोड़ रुपए के निवेश की उम्मीद

नवी दिल्ली, 30: महाराष्ट्र सरकार ने एनटीपीसी हरित एनर्जी लिमिटेड (एनजीईएल) द्वारा प्रति वर्ष एक मिलियन टन क्षमता तक हरित हाइड्रोजन और डेरिवेटिव (हरित अमोनिया, हरित मेथनॉल) के विकास के लिए एनजीईएल के साथ एक समझौता ज्ञापन (एमओयू) पर सोमवार को हस्ताक्षर किए. इसमें 2 गीगावॉट के पंप स्टोरेज परियोजनाओं सहित राज्य में 5 गीगावॉट तक भंडारण के साथ अक्षय ऊर्जा परियोजनाओं का विकास शामिल है। महाराष्ट्र सरकार की हरित निवेश योजना के एक भाग के रूप में अगले पांच वर्षों के लिए समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए गए हैं। इस समझौते में लगभग 80,000 करोड़ रुपए के संभावित निवेश की उम्‍मीद है। इस समझौता ज्ञापन का आदान-प्रदान 29 जनवरी, 2024 को महाराष्ट्र सरकार के उप सचिव (ऊर्जा) श्री नारायण कराड और एनजीईएल के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोहित भार्गव के बीच हुआ। इस अवसर पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फड़नवीस और अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। एनजीईएल एनटीपीसी की पूर्ण स्वामित्व वाली सहायक कंपनी है और इसका लक्ष्य 7 गीगावॉट अक्षय ऊर्जा के परिचालन को शुरू करने के साथ 3.4 गीगावॉट और 26 गीगावॉट से अधिक की परिचालन क्षमता पर काम करते हुए एनटीपीसी की अक्षय ऊर्जा यात्रा का ध्वजवाहक बनना है। ************** ट्विटर पर फॉलो करे: http://twitter.com/MahaGovtMic अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.28 / दिनांक 30.1.2024

शिवरायांचा आठवावा प्रताप ! मराठ्यांच्या 12 किल्ल्यांची नावे युनेस्कोच्या मान्यतेसाठी "मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया" 2024-25 या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसासाठी भारताकडून नामांकन

नवी दिल्ली, 30: महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला सादर केला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत (UNESCO World Heritage List) समावेश होण्यासाठी प्रत्येक देश नामांकने पाठवत असतो. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्कोला वर्ष 2024-25 करिता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने मराठा रणभूमीला नामांकन देण्याचे प्रस्ताव पाठविले आहे. यामध्ये किल्ले रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, खंडेरी, प्रतापगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग किल्ल्यांचा समावेश आहे. हे किल्ले सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात बांधले गेलेले आहेत. हे किल्ले मराठा सैन्याच्या विलक्षण तटबंदीचा आणि असामान्य लष्करी व्यवस्थेचा प्रमाण आजही देतात. 2024-25 या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळण्यासाठी भारताचे “मराठा मिलिटरी लँडस्केप्स” हे नामांकन आहे. नामांकन दोन श्रेणींमध्ये करता येऊ शकते - सांस्कृतिक आणि नैसर्गिक निकष. मराठा लष्करी भूदृश्ये सांस्कृतिक निकषांच्या श्रेणीमध्ये नामांकित आहे. भारतात सध्या 42 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यापैकी 34 सांस्कृतिक स्थळे, सात नैसर्गिक स्थळे तर एक मिश्र स्थळ आहे. यापैकी, महाराष्ट्रात सहा जागतिक वारसा स्थळे आहेत, पाच सांस्कृतिक आणि एक नैसर्गिक स्थळ आहे. अजिंठा लेणी (1983), एलोरा लेणी (1983), एलिफंटा लेणी (1987), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) (2004), व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स ऑफ मुंबई (2018) आणि महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळचा पश्चिम घाट ही नैसर्गिक श्रेणी (2012) मध्ये अनुक्रमिक मालमत्ता आहे. ************** आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.27 / दिनांक 30.1.2024

Saturday 27 January 2024

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम ; ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान

नवी दिल्ली, 27: महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद सलग तिसऱ्यांदा पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ 2023-24 च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास (122 कॅडेट चा सहभाग), मेजर जनरल योगेंद्र सिंग आणि नेवल कॅडेट सृष्टी मोरे यांनी प्रधानमंत्री बॅनर स्विकारला व एअर कॅडेट प्रितीलता झा यांनी ट्रॉफी स्विकारली. महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट काजल सातपुते,नचिकेत मेश्राम, खुशी झा, विवेक गांगुर्डे यांच्यासह सर्व कॅडेट उपस्थित होते. देशातील एकूण 17 एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी 1 ते 27 जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आज ‘प्रधानमंत्री बॅनर’ चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्राला विजेत्याचा तर कर्नाटक आणि गोवा एनसीसी संचालनालयास उपविजेतेपदाचा बहुमान विभागून प्रदान करण्यात आला. यावेळी, नागपूरच्या रिमाउंट व वेटेरिनरी स्काड्रन कॅडेट ने सर्वोत्कृष्ट टेंट पेगर ट्रॉफी जिंकली. महाराष्ट्र संचालनालय यांनी सलग तिसऱ्यांदा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला आहे. महाराष्ट्राला सात वर्षानंतर सलग तीसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनर महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण १९ वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. राज्याने मुसंडी घेत मागील दोन वर्षांपासून प्रधानमंत्री बॅनरचा मान पटकाविला होता. यावर्षीही महाराष्ट्राने हा बहुमान मिळविल्याने राज्याला तब्बल आठ वर्षाने सलग तीन वर्ष प्रधानमंत्रीबॅनर पटकावून उत्तम कामगिरी केली आहे. महिनाभर चाललेल्या शिबिरात छात्रसैनिकांनी कवायती, राजपथ संचलन, पंतप्रधानांना मानवंदना, पंतप्रधानांच्या रॅलीचे नियोजन, फ्लॅग एरिया ब्रीफिंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. संपूर्ण शिबिरात सर्व स्पर्धांमध्ये तुकडीच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीमुळे एनसीसी महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा मान मिळाला. 27 जानेवारी रोजी करिअप्पा संचलन मैदानावर आयोजित पंतप्रधानांच्या रॅलीमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालयाला पंतप्रधान ध्वज निळाला. *********************** आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic अ.क.अरोरा/ वृ.क्र.२५ /दि. २७.०१.२०२४

Thursday 25 January 2024

महाराष्ट्राला 12 पद्म पुरस्कार महाराष्ट्र ठरला सहा पद्मभूषण तर सहा पद्मश्रींचा मानकरी दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ नेते राम नाईक, संगीतकार प्यारेलाल यांच्यासह महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मभूषण पुरस्कार महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री, सामाजिक कार्यकर्ते शंकर पापळकर, मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, नेत्रतज्ञ मनोहर डोळे यांचा समावेश

नवी दिल्ली, 25: सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज रात्री उशीरा करण्यात आली. प्रसिध्द साहित्यिक हरमसजी कामा यांना (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता) क्षेत्रात, अश्विनी मेहता यांना (वैधक), ज्येष्ठ नेते राम नाईक यांना (सार्वजनिक सेवा), दिग्दर्शक राजदत्त आणि प्यारेलाल शर्मा यांना (कला) तर कुंदन व्यास यांना (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता) क्षेत्रात पद्म भूषण यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमधे महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश यात सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू, ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, संगीतकार प्यारेलाल, हृदयरोग तज्ञ आश्विन मेहता, जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक, कुंदन व्यास, जेष्ठ पत्रकार होर्मुसजी एन कामा यांचा समावेश आहे. विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पापळकर अनेक बालकांच्या जीवनाला आधार देत योग्य दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून . जागतिक स्तरावर या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी आणि अनेक मल्लखांपटू घडवण्यासाठी उदय देशपांडे यांनी अथक परिश्रम घेत मोठे योगदान दिले आहे . 50 देशांतील 5,000 हून अधिक लोकांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षित करून महिला, दिव्यांगजन, अनाथ, आदिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध गटांना त्यांनी मल्लखांबची ओळख करून दिली. वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ.मनोहर कृष्णा डोळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. मनोहर डोळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी झहीर काझी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मेंदू रोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. व्यावसायाने बँकर असलेल्या कल्पना मोरपारिया यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कल्पना यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर तसेच भारत सरकारच्या अनेक समित्यांवर देखील त्यांनी काम केले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री श्री कर्पूरी ठाकूर यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार (मरणोत्तर) नुकतेच जाहीर झाले आहे. या वर्षी एकूण 132 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 05 पद्म विभूषण, 17 पद्म भूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. भारतरत्न नंतर भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखल्या जाणार्याे पद्म पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनी 2024 रोजी करण्यात आली. 1954 मध्ये स्थापन करण्यात आलेले, हे पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी व्यक्तींना ओळखतात. पद्म पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी, दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला जाहीर केली जाते. यामध्ये कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध श्रेणींचा समावेश होतो. ***** महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi अमरज्योत कौर अरोरा / वृत्त वि. क्र. 24 दि.25.01.2024

Tuesday 23 January 2024

राजधानीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

 



नवी दिल्ली, 23: नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती  महाराष्ट्र सदनात आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.

 कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त, रूपिंदर सिंग यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम, स्मिता शेलार यांनी  आणि  उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

 महाराष्ट्र परिचय केंद्रात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

       महाराष्ट्र परिचय केंद्रात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यालयातील उपस्थित कर्मचा-यांनी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

***************

0 0 0 0 0

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.20 दिनांक 23.01.2023

 

 

 


Monday 22 January 2024

महाराष्ट्रातील नंदुरबारच्या आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान




नवी दिल्ली, २२: महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. येथील विज्ञान भवनात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुम्मू यांच्या हस्ते पुरस्कार  प्रदान करण्यात आले.

आदित्य यांनी आपल्या चुलत भावाचा जीव वाचवण्यासाठी आपला प्राण गमावला. आदित्य यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री आरुष, त्याच्या छोट्या भावाने हा पुरस्कार स्वीकारला.

आदित्य आणि त्याचा चुलत भाऊ नदीच्या किनाऱ्याजवळ खेळत होते. खेळताना त्याचा चुलत भाऊ बुडू लागला. हे पाहून आदित्यने धोका असलेला उतार लक्षात न घेता खोल पाण्यात उतरून आपल्या चुलत भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, आदित्य खूप खोल गेला, त्यामुळे त्याला लगेच शोधणे कठीण झाले. आदित्यचा प्रयत्न व्यर्थ गेला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. मात्र, कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखविले. त्याच्या या शौर्यपूर्ण प्रयत्नाबद्दल त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

आदित्य ब्राह्मणे यांनी आपल्या चुलत भावाचा जीव वाचवण्यासाठी आपला प्राण गमावला. हा त्याचा शौर्यपूर्ण प्रयत्न आहे. या प्रयत्नाबद्दल त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी)असामान्य क्षमता आणि अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना दिला जातो. शौर्य, कला आणि संस्कृती, पर्यावरण, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा या श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या


5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना हे पुरस्कार प्रदान झाले. प्रत्येक पुरस्कारार्थीला पदक, प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी देशातील 18 जिल्ह्यांमधून असामान्य कामगिरी करणाऱ्या 19 मुलांची निवड करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी, 2024 रोजी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतील. 26 जानेवारी, 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पथ संचलनातही ही मुले सहभागी होतील.

निवड झालेल्या मुलांच्या यादीमध्ये शौर्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या श्रेणींमध्ये प्रत्येकी एका मुलाचा तर समाजसेवेच्या श्रेणीत चार मुलांचा; क्रीडा प्रकारात पाच आणि कला आणि संस्कृती श्रेणीत सात मुलांचा समावेश होता. या यादीत 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 9 मुले आणि 10 मुलींचा समावेश होता.

 

0 0 0 0 0

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic


अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.
19  / दिनांक 22.01.2023

 

 

 

 

राजपथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ







 













 

नवी दिल्ली, 22: राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. प्रतिवर्षी देशाच्या राजधानीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथ संचलनाचे आयोजन करण्यात येते. या संचालनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचा समावेश असतो.

सन 2024 या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनी चित्ररथ पथ संचलनात 26 राज्ये व सात केंद्रशासित प्रदेश यांना ‘विकसित भारत’ व ‘भारत लोकशाहीची जननी’ या दोन संकल्पनांवरती आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनाने कळविले होते. यास अनुसरून राज्याने, छत्रपती शिवाजी महाराज यांचे 350 वे शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त, या विषयास अनुसरून ‘लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर संरक्षण मंत्रालयास चित्ररथाचे सादरीकरण करण्यात आले होते.

 यावर्षी, भारतदेशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरील राजपथावर 30 चित्ररथ प्रर्दशित होणार आहेत. यामध्ये 16 राज्य, 07 केंद्रशासित प्रदेश व उर्वरित विविध केंद्रीय मंत्रालयांच्या चित्ररथांचा समावेश असणार आहे. देशभरातून एकूण 30 राज्यांनी  राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती, पैकी विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांच्या चित्ररथांची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी झाली आहे.

 महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने प्रजासत्ताकदिनी राजपथावर राज्याच्या वतीने प्रदर्शित होणा-या चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडत असते.

 

दरवर्षी राजपथावर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि परदेशी पाहुणे यांच्यासह गणमान्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात भारत देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्टये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे.

 पथसंचलनात बहुतांश वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवत यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने साकारण्यात येणाऱ्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग दर्शविण्यात आले आहेत.

राष्ट्रीय रंगशाला दिल्ली केंट या परिसरात शुभ ॲड नागपूर या संस्थेमार्फत चित्ररथाची बांधणी करण्यात येत आहे.  तर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील 16 कलाकारांच्या चमुच्या माध्यमातून चित्ररथाच्या सोबतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. रयेताचा राजा, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव वर्णन करणाऱ्या ‘धन्य शिवराय… धन्य महाराष्ट्र !’ गिताची धुनही राजपथावर या चित्ररथासह सादर होणार आहे.

असा असणार यंदाचा चित्ररथ

यंदाच्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनकथा त्यांच्या बालपणापासून ते  राज्याभिषेक दिवसापर्यंत दाखवण्यात आली आहे. चित्ररथाच्या दर्शनीय भागात दोन महिला योध्दा दांडपट्टा करतांना दिसतात व राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारण, समानता, न्याय आणि समतोल यांचे धडे देताना दिसत आहेत.  त्यांच्या मागे न्यायाचे प्रतीक असलेले तराजू दाखवण्यात आले आहे. महाराजांची आज्ञापत्रे आणि काही राजेशाही चिन्हे देखील चित्ररथावर दाखवण्यात आली आहेत. मध्यभागी अष्टप्रधान मंडळ दरबार दाखवण्यात आला आहे. या दरबारात काही महिला आपल्या प्रश्नांसाठी उपस्थित असल्याचे दिसत आहेत. तर मागील भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, राजमाता जिजाऊ आणि इतर दरबारी यांच्या दृश्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दाखवण्यात आला आहे. तर शेवटच्या भागात किल्ला आणि राजमुद्रांची प्रतिकृती दाखवण्यात आली आहेत.

 

00000000000000

 

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 18 दि.22.01.2024


Saturday 20 January 2024

महाराष्ट्रातील नंदुरबारच्या आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार



 

नवी दिल्ली, 20: महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आदित्य यांनी आपल्या चुलत भावाचा जीव वाचवण्यासाठी आपला प्राण गमावला. आदित्य यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

आदित्य आणि त्यांचा चुलत भाऊ नदीच्या किनाऱ्याजवळ खेळत होते. खेळताना त्यांचा चुलत भाऊ बुडू लागला. हे पाहून आदित्यने धोका असलेला उतार लक्षात न घेता खोल पाण्यात उतरून आपल्या चुलत भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, आदित्य खूप खोल गेला, त्यामुळे त्याला लगेच शोधणे कठीण झाले. आदित्यचा प्रयत्न व्यर्थ गेला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. मात्र, कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखविले. त्याच्या या शौर्यपूर्ण प्रयत्नाबद्दल त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. आदित्य ब्राह्मणे यांनी आपल्या चुलत भावाचा जीव वाचवण्यासाठी आपला प्राण गमावला. हा त्याचा शौर्यपूर्ण प्रयत्न आहे. या प्रयत्नाबद्दल त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार 22 जानेवारी, 2024 रोजी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केला जाईल.

‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी)’ असामान्य क्षमता आणि अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना दिला जातो. शौर्य, कला आणि संस्कृती, पर्यावरण, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा या श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना हे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक पुरस्कारार्थीला पदक, प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र दिले जाते.

 

राष्ट्रपतींच्या हस्ते 22 जानेवारी, 2024 रोजी विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी देशातील 18 जिल्ह्यांमधून असामान्य कामगिरी करणाऱ्या 19 मुलांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी, 2024 रोजी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतील. 26 जानेवारी, 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातही ही मुले सहभागी होतील.

निवड झालेल्या मुलांच्या यादीमध्ये शौर्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या श्रेणींमध्ये प्रत्येकी एका मुलाचा तर समाजसेवेच्या श्रेणीत चार मुलांचा; क्रीडा प्रकारात पाच आणि कला आणि संस्कृती श्रेणीत सात मुलांचा समावेश आहे. या यादीत 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 9 मुले आणि 10 मुलींचा समावेश आहे.

00000000000000

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 17 दि.20.01.2024


 

Friday 19 January 2024

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शन स्तुत्य उपक्रम मराठी भाषा आणि संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन – सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार

 






मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन ग्रंथ विक्री प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी केले.

 

कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे पुस्तक विक्री प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी निवासी आयुक्त डॉ. अडपावार बोलत होते.  ते पुढे म्हणाले की, मराठी भाषेचा राजधानीत प्रचार व प्रसार व्हावा, तसेच या भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सारखे विविध  उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून राजधानीत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

 

महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत महाराष्ट्र सदन येथे ग्रंथ विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन  करण्यात आले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम, स्मिता शेलार, परिचय केंद्राच्या  उप‍संचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी आणि सदनातील अभ्यागत याप्रसंगी उपस्थित होते.

ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त एक अनोखी परंपरा पाळली. यावेळी पुष्पगुच्छ ऐवजी सर्व प्रकाशकांना एक छोटेसे रोपटे भेट दिले.

 

या मागचे कारण डॉ. अडपावार यांनी स्पष्ट केले की, मराठी भाषा संवर्धन हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नाही तर एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. रोपटे हे या प्रक्रियेचे प्रतीक आहे. या रोपट्यांना जगवून आणि वाढवून आपण मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यास मदत करू शकतो.या उपक्रमाचे प्रकाशकांनी कौतुक केले. त्यांनी सांगितले की, हे एक अभिनव आणि उपयुक्त उपक्रम आहे. यामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल

 

या ग्रंथ प्रदर्शनात रसिक साहित्य प्रकाशन,पॉप्युलर प्रकाशन, डायमंड बुक्स, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, आणि भारतीय साहित्य कला प्रकाशन दालने आहेत. साहित्य, संस्कृती, अर्थविषयक, राजकीय, ऐतिहासिक, वैचारिक अशा विविध विषयांवर आधारित सुप्रसिद्ध लेखकांसह, नवोदित लेखकांची  पुस्तके मांडण्यात आली आहेत.  पुढील दोन दिवस सकाळी १० ते सांयकाळी ७ पर्यंत हे ग्रंथ विक्री प्रदर्शन राहणार आहे.  राजधानीतील मराठी लोकांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सदन आणि परिचय केंद्राकडून करण्यात येत आहे.याठिकाणी परिचय केंद्राच्या वतीने ‘लोकराज्य’ मासिकाचे दालनही मांडण्यात आले  आहे. राज्य शासनाच्या विकास कामांची माहिती या माध्यमातून राजधानीतील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.

 

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून दररोज महाराष्ट्रातील कवी त्यांच्या स्वरचित रचनेचे  काव्य वाचन करतात. महाराष्ट्र सदन येथे दर्शनीय ठिकाणी मराठीमध्ये़ सुविचार लिहिले जात आहे.

 

मराठी भाषा विभागाच्या शासन निणर्यानुसार दिनांक १४ ते २८ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’चे आयोजन राज्यात व राज्याबाहेरील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये करण्यात येते.

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा

http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र. 16दि. 19.01.2024


Tuesday 16 January 2024

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र टॉप परफॉर्मर..! नाविन्यता परिसंस्थेस चालना देणारे, स्टार्टअप्सची क्षमता वृद्धी करणारे, अग्रगण्य राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख

 










नवी दिल्ली, १६: केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीमध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मर म्हणून क्रमांक पटकवला.

 

या क्रमवारीवर आधारित २०२२ च्या आवृत्तीच्या निकालाची घोषणा आणि सत्कार समारंभ आज केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, सहायक व्यवस्थापक श्री. अमित कोठावदे व विवेक मोगल या टीमने पुरस्कार स्वीकारला.

 

राजधानी दिल्लीतील भारत मंडपम, प्रगती मैदान येथे राज्यांचे स्टार्टअप रँकिंग पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे भारत सरकारच्या उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाच्या (DPIIT) वतीने आयोजन करण्यात आले होते. वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. यावेळी विशेष सचिव सुमिता डावरा, लॉजिस्टिक्स, उद्योग, ग्राहक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाचे सहसचिव व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

महाराष्ट्रातील संपूर्ण स्टार्टअप परिसंस्थेत, ज्यात राज्य सरकार, इनक्यूबेटर, एंजेल गुंतवणूकदार, शाळा आणि महाविद्यालये यांचा समावेश आहे. या स्टार्टअप्सच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्याने स्टार्टअपसाठी कार्यक्रमाची आखणी आणि उद्दिष्ट्य ठरवून उत्तम यंत्रणा निर्माण करत केलेल्या प्रभावी कार्यासाठी हा बहुमान मिळाला आहे. कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण आणि उद्योजकतेला चालना देणे हे समृद्ध महाराष्ट्राचे ध्येय आहे.

 

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र राज्य टॉप परफॉर्मर म्हणून नावारूपाला आले आहे. अन्य काही रँकिंगमध्येही महाराष्ट्र राज्य पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी, मुंबई २०१८ मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्टार्टअपच्या परिसंस्था वाढीसाठी नियम सुलभ करण्याच्या दिशेने आणि स्टार्टअप परिसंस्थेला बळकट पाठिंबा देण्यास विविध निकषांच्या आधारावर स्टार्टअप रँकिंग हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. वर्ष २०२२ च्या आवृत्तीमध्ये ७ व्यापक सुधारणा क्षेत्रांचा विचार करण्यात आला ज्यामध्ये, २५ कृती मुद्दे होते जे स्टार्टअप्स आणि परिसंस्थेच्या भागधारकांना नियामक तसेच धोरण आणि आर्थिक समर्थन प्रदान करण्यासाठी आवश्यक आहेत. या सुधारणा क्षेत्रांमध्ये संस्थात्मक समर्थन, नाविन्यता आणि उद्योजकता, बाजारपेठेत प्रवेश, इंक्यूबेशन आणि मेंटरशिप सपोर्ट, फंडिंग सपोर्ट, एनेबलर्सची क्षमता बांधणी, शाश्वत भविष्यासाठी रोडमॅप यांचा समावेश होता. महाराष्ट्र स्टार्टअप वीक, स्टार्टअप पोर्टल आणि महिला इनक्युबेशन सेंटर या प्रमुख उपक्रमांमुळे या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मरचा क्रमांक पटकवला.

 

महाराष्ट्र राज्यात स्टार्टअप इको सिस्टम बळकट करण्यासाठी सरकारचे प्रयत्न

 

महाराष्ट्र राज्य सरकार स्टार्टअप इको सिस्टमला अधिक बळकट करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहे. यामध्ये स्टार्टअपसाठी वित्तीय सहायता, प्रशिक्षण आणि सल्ला सेवा, स्टार्टअप्ससाठी सुविधा उपलब्ध करून देणे आदींचा समावेश आहे.‍ राज्य सरकारने स्टार्टअप्ससाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचा वापर स्टार्टअप्सना कर्ज, भांडवल गुंतवणूक आणि अनुदान देण्यासाठी केला जात आहे.

 

            राज्य सरकारने स्टार्टअप्सना प्रशिक्षणासोबत व्यवसाय योजना तयार करणे, बाजार पेठेचा अभ्यास करणे, वित्तीय व्यवस्थापन करणे यावर ही प्रशिक्षण दिले जात आहे.

 

000000000

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.10  / दिनांक 16.01.2024