Saturday 30 April 2016

राजधानीत ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा













                                  
नवी दिल्ली, ०१ : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 56 वा वर्धापन दिन महाराष्ट्र सदन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

           निवासी आयुक्त कार्यालय व महाराष्ट्र सदन येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत होऊन उपस्थितांनी ध्वज वंदन केले. या कार्यक्रमास
अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त भारती झाडे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, सहायक निवासी आयुक्त अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, महाराष्ट्रातून आलेले व महाराष्ट्र सदनात निवासी असणारे अभ्यागत, दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


                                           ***** 


मराठी भाषा व संस्कृती जतन करण्यास प्रत्येकाने पुढाकार घ्यावा : सुरेश प्रभू



                                                                         
                                                              
                     राजधानीत महाराष्ट्र दिन समारोहाला सुरुवात

नवी दिल्ली, ३० : मराठी भाषा व संस्कृती जतन करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.  

येथील रफी मार्गस्थित मावळणकर सभागृहात आयोजित महाराष्ट्र दिन समारोहाला आज सुरुवात झाली, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रभू बोलत होते. लोकसभेच्या अध्यक्ष सुमीत्रा महाजन, गोवा विधान सभेचे उपसभापती  विष्णू सूर्या वाघ, सार्वजनिक उत्सव समितीचे रा.मो.हेजीब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
            यावेळी प्रभू म्हणाले, महाराष्ट्राबाहेर राहताना मराठी भाषा व संस्कृतीचे महत्व अधिक वाटायला लागते. महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला राजधानी दिल्लीतमहाराष्ट्र दिन समारोहाला उपस्थित राहताना अत्यांनद होत असल्याचे ते म्हणाले. मराठी साहित्य, नाटक, चित्रपट आदींनी मराठी संस्कृतीला समृध्द करण्याचे काम केले आहे. मराठीचा हा समृध्द वारसा जतन करण्याची गरज असल्याचे सांगत ,मराठी भाषा व संस्कृती जतन करण्यास प्रत्येक मराठी माणसाने पुढाकार घेण्याचे आवाहन  श्री. प्रभू यांनी केले.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे सुरेश साखवळकर होते.  उद्योजक भोजराज तेली आणि लेखापाल विजकांत कुलकर्णी यावेळी मंचावर उपस्थित होते. श्री. साखवळकर यांनी प्रास्ताविक केले तर श्री. तेली आणि श्री कुलकर्णी यांची यावेळी भाषणे झाले. अवंती बायस यांनी आभार मानले.
 
 सार्वजनिक उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र दिन समारोह २०१६ चे आयोजन करण्यात आले आहे.

उदघाटनाच्या कार्यक्रमानंतर या समारोहाच्या पहिल्या दिवशी पुणे येथील संगीत रसिक मंडळ निर्मित संत कान्होपात्राया संगीत नाटकाचा प्रयोग सादर झाला. या नाटकाचे लेखन ना.वि. कुलकर्णी यांनी केले असून मास्टर कृष्णराव यांनी संगीत दिले आहे. या नाटकामधे सुरेश साखवळकर, अस्मिता चिंचाळकर, रविन्द्र कुलकर्णी, कविता टिकेकर, निरंजन कुलकर्णी आदींच्या प्रमूख भूमिका साकारल्या .  
             

*********






महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी ७१ हजार ७०१ घरे बांधण्यास मंजुरी









   
नवी दिल्ली, ३० : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकांतील जनतेसाठी ७१ हजार ७०१ घरे बांधण्यास  केंद्र सरकारने मंजुरी दिली, तसेच यासाठी १ हजार ६४ कोटींच्या अर्थ सहाय्यास मंजुरी दिली आहे.

            पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १० शहरांमधील मंजूर ७१ हजार ७०१ घरे बांधण्यास मंजुरी देण्यात आली. यापैकी ६१ हजार ९४६ घरे ही  किफायतशिर गृहनिर्माणा अंतर्गत खाजगी भागीदारांच्या मदतीने बांधण्यात येणार आहेत. ७ हजार ३९९ घरे ही  लाभधारकाने वैयक्तीक खर्च करून बांधावयाची असून याकामी सरकारी अनुदान देण्यात येणार आहे तर २ हजार ३५६ घरे ही झोपडपट्टी पुनर्विकास कामांतर्गंत बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी ८ हजार ९३२ कोटी  खर्च येणार असून केंद्राने यासाठी १ हजार ६४ कोटींच्या आर्थिक सहाय्यास मंजुरी दिली आहे.

        योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील विरार, कल्याण, ठाणे, गोठेगर यांच्यासह मुंबई महानगर क्षेत्रातील पालघर, पेण, निलजे पाडा, रायगड, वाव्हे आणि केळावाळी या शहरांचा समावेश आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाने शुक्रवारी ही मंजुरी दिली आहे. मंत्रालयाच्या सचिव डॉ. नंदिता चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखालील  केंद्रीय आंतर मंत्रालयीन चाळणी व देखरेख समितीने चालू आर्थिक वर्षासाठी देशभर बांधण्यात येणा-या परवडणा-या किमंतीतील घरांच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली. महाराष्ट्रासह  पंजाब आणि जम्मू व काश्मीर या राज्यांचा यात समावेश आहे.
                             ७३ हजार २०५ अतिरीक्त  घरे बांधण्यास केंद्राची  मंजुरी
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासह पंजाब आणि जम्मू व काश्मीर राज्यांमधील शहरी भागातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी ७३ हजार २०५ अतिरीक्त घरे बांधण्यास केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली, तसेच या कामी ९ हजार ५ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसही मंजुरी देण्यात आली आहे.
            
               मागील वर्षी जून महिण्यातपंतप्रधान आवास योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत वर्ष २०२२ पर्यंत देशातील शहरांमधील गरिबांसाठी २ कोटी घरे बांधण्यात येणार आहेत.

                                             *********

Friday 29 April 2016

राजधानीत ‘महाराष्ट्र दिन समारोह’


नवी दिल्ली, २९: राजधानीत महाराष्ट्र दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३० एप्रिल आणि १ मे रोजी साज-या होणा-या या समारोहात वैविद्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

सार्वजनिक उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने‘महाराष्ट्र दिन समारोह २०१६’ चे येथील रफी मार्गस्थित मावळणकर सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.

या समारोहाच्या पहिल्या दिवशी दिनांक ३० एप्रिल ला सायंकाळी ६ वाजता पुणे येथील संगीत रसिक मंडळ निर्मित ‘संत कान्होपात्रा’ या संगीत नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.

दिनांक १ मे रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या पाश्चिमात्य संगीत प्रकाराची गाणी, गप्पा आदींचा उत्तममेळ घालून तयार झालेला ‘लय पश्चिमा’ हा कार्यम होणार आहे. या कार्यक्रमानंतर सुरेश साखळकर यांची संकल्पना असणारा ‘देणे गंधर्वाची’ हा बालगंधर्वांच्या जीवनातील हृद्य प्रसंगांचा संदर्भ असणा-या गीतांचा व नाटयगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
                                                   *********




Maharashtra Launches eTribe Validity Web App



New-Delhi,29: Maharashtra government has in its latest notification available for caste validity certificate online . The state Governor C.Vidyasagar Rao and Chief Minister Devendra Fadnavis  launches ‘eTribe Validity’, an online application today at Raj Bhawan in Mumbai.

The program was organised by Tribal Development Department of the state. The Minister for Tribal Development Shri Vishnu Savara was present on the event. The CM informed that this facility is going to curb of bogus certificates and will ensure speedy delivery of services in transparent ways. He said all such services should be online. He told the state government was working with an aim to bring more &more services online,  that too on citizens mobile phones.

     The web application is for online application of caste scrutiny & to avail validity certificates for scheduled tribes       One has to visit etribevalidity.mahaonline.gov.in . Through this facility of online service Candidates can track his/her application status, updates on sms & e-mail and even avail caste validity certificate online via eTribe validity.

                 *************************************

      Note : photos are been attach with



.

Maharashtra Marching Ahead on PDS




New Delhi,29: Maharashtra government is planning for  digitisation of Public Distribution System (PDS) with online ration cards management system.

      Chief Minister of Maharshtra Devendra Fadnavis today reviews the progress of flagship projects monitored by CMO war room at mantralaya.

      In the review round the presentation was done on digitisation of Public Distribution System (PDS) .In state most of the ration cards already digitized and 5.76crore Adhaar card seeding is already done, after the  Acknowledgement of the presentation  CM directs to complete this project by October 2016.
  
   Mr. Fadnavis  discussed on the redevelopment of Bhendi Bazaar, Coastal Road, Metro-3, Elevated Metro, MTHL, NIMA and some irrigation projects. He  directs to start the civil work for Metro 3 by May 2016 and praises officials for better coordination and saving 2 years of time. He also directed  to complete RFQ process for work contract and signing of loan agreement for ‘MTHL’ .

    Mr. Fadnavis  asks officials to speed up the pre-development works for Navi Mumbai International Airport (NIMA) At last he reviewed Rehabilitation and land acquisition status for Lower Wardha, Bembla and Gosikhurd irrigation projects .


            ***********************

Note:photos are been attach with

Wednesday 27 April 2016

देशातील दुष्काळग्रस्त भागात जलसंवर्धनाची कामे हाती घेणार : नितीन गडकरी

                                                                                

नवी दिल्ली, २७: देशातील दुष्काळग्रस्त भागात जलसंवर्धनाच्या कामाला गती  देणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली , तसेच राज्यातील २८ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या ३ मे रोजी मुंर्बत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले

         केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने देशातील दुष्काळग्रस्त भागांत रस्त्यांच्या कामांअंतर्गत जलसंवर्धनाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला  आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी ट्रान्सपोर्ट भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. गडकरी यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने देशातील दुष्काळी राज्यांमधे शेतक-यांच्या सहमतीने मोफत शेततळी  बांधण्यात येणार आहेत.

दुष्काळी भागात शेततळे, नाला खोलीकरणाच्या कामातून निघणारी माती व मुरूम हे रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येईल. यामुळे शेतक-यांना त्यांच्या शेतात खोदलेल्या तळयांमधे पावसाचे पाणी साठवणे शक्य होईल तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय रस्ते पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांना रस्ते बांधणी आणि रूंदीकरणासाठी मोफत माती उपलब्ध होणार आहे.

            भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने देशातील विविध भागांमध्ये महामार्गांच्या विकासाची कामे हाती घेतली आहेत. या कामांसाठी रस्ते बांधकाम कंत्राटदारांना नियमितपणे मातीची आवश्यकता भासते. ही माती कंत्राटदारांना संबंधित राज्य सरकारांच्या तरतूदीनुसार छोटया- मोठया खनिकर्मातून योग्‍य मोबदला देऊन संपादित करावी लागते. याला फाटा देऊन ग्रामीण भागात जल संवर्धनाची कामे हाती घेऊन मोठया प्रमाणावर मातीची आवश्यकता भागवणे शक्य आहे. मोठया प्रमाणात शेततळयांचे काम झाल्याने देशात जलसंवर्धनाची मोठी व्यवस्था निर्माण होऊन त्यातून दुष्काळाच्या स्थितीवर मात करता येईल असेही त्यांनी सांगितले.

                   राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी ३ मे रोजी मुंबईत बैठक

वेगवर्धित सिंचन लाभ योजनेअंतर्गत(एआयबीपी) महाराष्ट्रातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांबाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंपदामंत्री उभा भारती, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यात मुंबईतील सहयाद्री अतिथीगृहात येत्या ३ मे रोजी एक बैठक होणार असल्याची माहिती श्री. गडकरी यांनी यावेळी  दिली. देशातील १० राज्यांमधे दुष्काळ असून दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने ‘वेगवर्धित सिंचन लाभ योजना’ तयार केली आहे. ८० हजार कोटी  रूपयांच्या  या योजनेअंर्तगत ४ वर्षात देशातील एकूण ८९ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील २८ सिंचन प्रकल्पांचा यात समावेश आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंर्तगत राज्यातील कालव्यांची रखडलेली कामे पूर्ण करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.  

*********

Sunday 24 April 2016

'पंचायतीराज' मधे महाराष्ट्राचा गौरव ; राज्याला दुस-या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार



नवी दिल्ली, २४ : पंचायतीराज व्यवस्थेच्या विकेंद्रीकरणासाठी महाराष्ट्राला देशातील दुस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या ग्राम विकास व पंचायतीराज मंत्री पंकजा मुंडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्थांचाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
             केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्यावतीने झारखंड राज्यातील जमशेदपूर येथील जे.आर.डी. टाटा क्रीडा संकुलात आज राष्ट्रीय पंचयातीराज दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध राज्यांना पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय ग्रामीण विकासपंचायतीराज तथा पेयजल आणि स्वच्छता मंत्री चौधरी बिरेन्द्र सिंह, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवरदास उपस्थित होते. महाराष्ट्राच्यावतीने  ग्रामविकास व वित्त राज्यमंत्री  दिपक केसरकर, सचिव व्ही गिरीराज  उपस्थित होते.
पंचयातीराज व्यवस्थेत उत्तम कार्य करणा-या राज्यांना यावेळी  विविध श्रेणींमधे वर्ष 2014-15 साठी चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पंचायतराज व्यवस्थेच्या प्रभावी विकेंद्रीकरणासाठी महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाचा ‘संचयी विकेंद्रीकरण सूचकांक पुरस्कार प्रदान करण्यात  आला. देशातील चार राज्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.  केरळ राज्याचा पहिल्या, कर्नाटकचा  तिस-या तर सिक्कीमचा चौथ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 
           



                                      सातारा जिल्हा परिषदेचा सन्मान
पंचायतीराज व्यवस्थेची उत्तम अंमलबजावणी करणा-या सातारा जिल्हा परिषदेचा केंद्रीय ग्रामीण विकासपंचायतीराज तथा पेयजल आणि स्वच्छता मंत्री चौधरी बिरेन्द्र सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हापरिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकरउपाध्यक्ष प्रदीप साळुंखे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
                 वाडीभागाई ग्रामपंचायतीला राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार
ग्रामसभांची सातत्यपूर्ण व गुणात्मक अमंलबजावणी केल्याबद्दल सांगली जिल्हयातील शिराळा तालुक्यातील वाडीभागाई ग्रामपंचायतीचा राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सरपंच रामचंद्र पाटीलउपसरपंच संतोष लुगडे आणि ग्रामसेवक बाबासाहेब नागरगोजे यांनी पुरस्कार स्वीकारला.  महाराष्ट्रासह देशातील  20 राज्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीला या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
                      राज्यातील दोन पंचायत समित्यांचा सन्मान
वर्धा जिल्हयातील कारंजा(घाडगेआणि सातारा जिल्हयातील कराड पंचायत समितीचा राष्ट्रीय पंचायती सक्षमीकरण पुरस्काराने सन्मान करण्यात आलाकारंजा(घाडगेपंचायत समितीच्या सभापती संगिता खोडेउपसभापती शुभांगी फडके आणि गटविकास अधिकारी बाळा यावले यांनी हा पुरस्कार स्वीकारलासातारा जिल्हयातील कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील आणि गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
                                                    चौदा  ग्रामपंचायतींचा बहुमान
या कार्यक्रमात राज्यातील चौदा ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आलासांगली जिल्हयातील तीन तर नागपूर आणि चंद्रपूर जिल्हयातील प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
            सांगली जिल्हयातील तासगांव तालुक्यातील आरवडे आणि मातकुंटी ग्रामपंचायतीचा यावेळी सन्मान करण्यात आलाआरवडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रकाश चव्हाण आणि ग्रामसेवक विजय मस्कर यांनी पुरस्कार स्वीकारलामातकुंटी ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना पाटीलउपसरपंच बंडोपंत निकम आणि   ग्रामसेवक दीपक भंडारे यांनी पुरस्कार स्वीकारलासांगली जिल्हयातीलच शिराळा तालुक्यातील वाडीभागाई ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र पाटीलउपसरपंच संतोष लुगडे आणि ग्रामसेवक बाबासाहेब नागरगोजे यांनी पुरस्कार स्वीकारला.
            नागपूर जिल्हयातील कामठी तालुक्यातील महालगाव आणि हिंगणा तालुक्यातील वागदरा ग्रामपंचायतींचा यावेळी सन्मान करण्यात आलामहालगावच्या सरपंच दिपाली चाणेकर आणि उपसरपंच जिजाबाई निधन यांनी पुरस्कार स्वीकारलावागदरा ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच कल्पना फुलकरउपसरपंच लक्ष्मी देवगाडे आणि ग्रामसेवक रमेश साळुंखे यांनी पुरस्कार स्वीकारला.
             चंद्रपूर जिल्हयातील ब्रहृमपुरी तालुक्यातील भूज आणि बल्लारपूर तालुक्यातील लावरी ग्रामपंचायतींचा यावेळी सन्मान करण्यात आलाभूज ग्रामपंचायतीच्यावतीने माजी सरपंच सुरेश ठिकरे यांनी तर लावरी ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच वैशाली पोतराजेउपसरपंच धिरज निरंजने आणि ग्रामसेवक वर्षा मानकर यांनी पुरस्कार स्वीकारला.
भंडारा जिल्यातील लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत सदस्य मोहनराव कुठे यांनी पुरस्कार स्वीकारलानाशिक जिल्हयातील दुगाव ग्रामपंचायतीला देण्यात आलेला पुरस्कार सरपंच किरण गायकवाड आणि उपसरपंच विकास वाघ यांनी स्वीकारला.        
             उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा तालुक्यातील तालमोदच्या सरपंच मनिषा सुगिरेउपसरपंच सतीश मोरे आणि ग्रामसेवक शेषराव कांबळे यांनी पुरस्कार स्वीकारला.                                                     ,अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातील लोणी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मण बनसोडेउपसरपंच अनिल विखे आणि ग्रामसेवक कविता अहेर यांनी पुरस्कार स्वीकारलासिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील गोळवण-कुमामे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष लाड आणि ग्रामसेवक भुषण बलाम यांनी पुरस्कार स्वीकारला.  
            अकोला जिल्हयातील बारशीटाकळी तालुक्यातील बाभा ग्राम पंचायतीच्या सरपंच अर्चना पाटील आणि गटविकास अधिकारी डॉसंदीप भंडारेसातारा जिल्हयातील फलटण तालुक्यातील खर्डेवाडी  ग्रामपंचायतीच्या सरपंच अरूणा टिळेकर, उपसरपंच सोमनाथ जगताप आणि गजानन राणवारे यांनी पुरस्कार स्वीकारला.  महाराष्ट्रासह   उल्लेखनीय काम करणा-या देशातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थेतील 183 संस्थाचा राष्ट्रीय पंचायती सक्षमीकरण पुरस्काराने  गौरव करण्यात आला.       
केंद्रीय पंचायतीराज मंत्रालयाच्यावतीने वर्ष २०१० पासून २४ एप्रिल हा राष्ट्रीय पंचायतीराज दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रथमच दिल्ली बाहेर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५  व्या जयंतीदिनाचे औचित्य साधत १४ एप्रिल २०१६ रोजी मध्यप्रदेशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महू या जन्मस्थानापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ग्राम उदय से भारत उदय या अभियानाची देशभर सुरुवात झाली. देशातील सर्वच ग्रामपंचायतींमधे राबविण्यात आलेल्या या अभियानाचा समारोपही या कार्यक्रमात झाला .
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचे एकूण १६८ लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

*********
सूचना : सोबत फोटो जोडले आहेत