Monday 29 August 2016

धावपटू ललीता बाबरला अर्जुन पुरस्कार प्रदान













नवी दिल्ली, 22 : धावपटू ललीता बाबरला आज राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.
मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचेच औचित्य साधून केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण सोहळयाचे  आयोजन करण्यात आले. यावेळी, केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री विजय गोयल, यासह क्रीडा मंत्रालयाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराने चौघा खेळाडूंना गौरविण्यात आले. यंदा झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावणारी पी.व्हि सिंधू, कुस्तीमध्ये कांस्य पदक पटकावणारी साक्षी मलिक तसेच जिमनॉस्टीकमध्ये चमकदार कामगिरी करणारी दिपा कर्माकर आणि नेमबाज जितु राय यांनाराजीव गांधी खेळ रत्नपुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप 7.5 लाख रूपये रोख असे आहे.
रमेश नागापूरी यांना एथलेटिक्ससाठी, सागार माल धायल यांना मुष्ठियुद्धसाठी, राज कुमार शर्मा यांना क्रिकेटसाठी, बिश्चेश्वर नंदी यांना जिमनॉस्टीक,  प्रदीप कुमार यांना जलतरणासाठी (जीवनगौरव), महाबीर सिंग यांना कुस्तीसाठी (जीवनगौरव) यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले. द्रोणाचार्य पुरस्कार हा उत्कृष्ट खेळाडू घडविणा-या प्रशिक्षकांना प्रदान केला जातो. पुरस्काराचे स्वरूप द्रोणाचार्य यांची प्रतिमा, प्रमाणपत्र आणि 5 लाख रूपये रोख असे आहे.
धावपटू ललिता बाबर, तिरंदाज खेळाडू रजत चव्हाण,  बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळाडू सौरव कोठारी, मुष्ठियोद्धा शिवा थापा, , फुटबॉलपटू सुब्राता पॉल, हॉकीपटू राणी व वी.आर. रंगनाथ, नेमबाज गुरप्रीत सिंग व अपुर्वी चंदेला, टेबल टेनिसपटू सौम्याजित घोष, कुस्तीगीर विनेश व अमित कुमार, पॅरा ऐथलेट संदीपकुमार सिंग मान व कुस्तीगीर विरेंद्र सिंग(कर्णबधीर)यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
क्रिकेटपटू अजिंक्य राहाणे यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला मात्र ते परदेश दौ-यावर असल्यामुळे आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत. पुरस्काराचे स्वरूप अर्जुनाची प्रतिमा, प्रमाणपत्र आणि 5 लाख रूपये रोख असे आहे.
रोंईगसाठी राजेंद्र प्रल्हाद शेळके, एथलेटिक्स सत्ती गीथा, हॉकीपटू सिल्वॉनस डुंग डुंग यांना आज ध्यानचंद पुरस्काराने गौवरविण्यात आले. एखादया खेळासाठी संपूर्ण जीवन वाहीलेल्या खेळाडुंना हा पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्काराचे स्वरूप ध्यानचंद यांची प्रतिमा प्रमाणपत्र आणि 5 लाख रूपये रोख असे आहे.
तरूण पिढीला खेळाकडे आकृष्ट करण्यासाठी विविध संस्थाना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार प्रदान केले जातात. मुंबई येथील दादर पारसी झोरोस्ट्रेंन क्रिकेट क्लबला पुरस्कार प्रदान करण्यात आला. या क्लबचे मंगेश भालेकर यांनी पुरस्कार स्वीकारला.
  हॉकी सिटीझन ग्रुप, उषा स्कूल ऑफ ऐथलिटिक्स, स्टाईरस, इंडियन इनफ्रास्ट्रक्चर फायनांन्स लीमीटेड या कंपनीला क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 रिर्झव बँक ऑफ इंडियाला कर्मचां-याना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन तसेच क्रीडा कल्याणकारी योजना राबविण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सुब्रोतो मुखर्जी क्रीडा शिक्षण संस्थालाही राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये पुरस्काराचे स्वरूप चषक तसेच प्रमाणपत्र प्रदान केले गेले.

मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी वर्ष 2015-16 पंजाब विद्यापीठ पतीयाळाला प्रदान करण्यात आली. आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी करणा-यांना विद्यापीठाला हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रूपये रोख आणि प्रमाणपत्र असे आहे. 

Monday 22 August 2016

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार- 2016 ची घोषणा : ललीता बाबर आणि अजिंक्य राहाणे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर


नवी दिल्ली, 22 : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2016 ची घोषणा आज झाली. महाराष्ट्राच्या धावपटू ललीता बाबर आणि क्रिकेटर अजिंक्य राहाणे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला. यासह राजेंद्र शेळके यांना ध्यानचंद तर दादर पारसी झोरोस्ट्रेन क्रिकेट कल्ब यांना राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवन येथे होणार आहे.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने पुरस्कार जाहीर करण्यात येतात. क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कारासाठी यंदा चार खेळाडूंचे नावे जाहीर झाले आहेत. यामध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये बंडमिंटनसाठी रजत पदक पटकावणारी पी.वी सिंधू,  कुस्तीमध्ये कांस्य पदक पटकावणारी साक्षी मलिक तसेच जिमनॉस्टीकमध्ये चमकदार कामगिरी करणारी दिपा कर्माकर, शुटींग खेळाडू जितु राय यांचा समावेश आहे. सलग चार वर्ष उत्कृष्ट कामगिरी करणा-या खेळाडूंना हा पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्काराचे स्वरूप 7.5 लाख रूपये रोख असे आहे.
द्रोणाचार्य पुरस्कारासाठी 6 गुरूंची निवड

द्रोणाचार्य पुरस्कारासाठी रमेश नागापूरी यांना एथलेटिक्ससाठी, सागार माल धायल यांना मुष्ठियुद्धसाठी, राज कुमार शर्मा यांना क्रिकेटसाठी, श्री बिश्चेश्वर नंदी यांना जिमनॉस्टीक, श्री प्रदीप कुमार यांना तैराकीसाठी (जीवनगौरव), महाबीर सिंग यांना कुस्तीसाठी (जीवनगौरव) हा पुरस्कार प्रदान केला जाईल. द्रोणाचार्य पुरस्कार हा उत्कृष्ट खेळाडू घडविणा-या शिक्षकांना जाहीर केला जातो. पुरस्काराचे स्वरूप द्रोणाचार्य यांची प्रतिमा, प्रमाणपत्र आणि 5 लाख रूपये रोख असे आहे.

अर्जुन पुरस्कासाठी 15 खेळाडूंची नावे जाहीर





अर्जुन पुरस्कारसाठी तिरंदाजी खेळाडू रजत चव्हाण, धावपटू ललिता बाबर, बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळाडू सौरव कोठारी, मुष्ठियुद्ध खेळाडू शिवा थापा, क्रिकेटर अजिंक्य राहाणे, फुटबॉलपटू सुब्राता पॉल, हॉकीपटू राणी व वी.आर. रंगनाथ, नेमबाजीसाठी गुरप्रीत सिंग व अपुर्वी चंदेला, टेबल टेनिससाठी सौम्याजित घोष, कुस्तीसाठी विनेश व अमित कुमार, पॅरा ऐथलेटिक्ससाठी संदीपकुमार सिंग मान व कुस्तीसाठी विरेंद्र सिंग(कर्णबधीर) यांची नावे जाहीर. जे खेळाडू सलग चार वर्षे उत्तम कामगिरी करतात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. पुरस्काराचे स्वरूप अर्जुनाची प्रतिमा, प्रमाणपत्र आणि 5 लाख रूपये रोख असे आहे.
ध्यानचंद पुरस्कार वर्ष 2015 साठी 3 खेळाडूंची निवड

ध्यानचंद पुरस्कार 2015 साठी एथलेटिक्स सत्ती गीथा, हॉकीपटू सिल्वॉनस डंग डंग, राजेंद्र प्रल्हाद शेळके यांना रोंइगसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. एखादया खेळासाठी संपूर्ण जीवन वाहीलेल्या खेळाडूंना हा पुरस्कार बहाल केला जातो. या पुरस्काराचे स्वरूप ध्यानचंद यांची प्रतिमा प्रमाणपत्र आणि 5 लाख रूपये रोख असे आहे.
राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कारांसाठी 4 संस्थाची निवड

तरूण पिढीला खेळाकडे आकृष्ट करण्यासाठी विविध संस्थाना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार प्रदान केले जातात. वर्ष 2016 साठी हॉकी सिटीझन ग्रुप, दादर पारसी झोरोस्ट्रेंन क्रिकेट कल्ब,  उषा स्कूल ऑफ ऐथलिटिक्स, स्टाईरस, यांना जाहीर झाला आहेत. इंडियन इनफ्रास्ट्रक्चर फायनांन्स लीमीटेड या कंपनीला क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. रिर्झव बँक ऑफ इंडियाला कर्मचां-याना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन तसेच क्रीडा कल्याणकारी योजना राबविण्यासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सुब्रोतो मुखर्जी क्रीडा शिक्षण संस्थालाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये पुरस्काराचे स्वरूप चषक तसेच प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी वर्ष 2015-16 साठी पंजाब विद्यापीठ पतीयाळा यांना जाहीर झाला आहे. आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी करणा-यांना विद्यापीठाला हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रूपये रोख आणि प्रमाणपत्र असे आहे. 

Saturday 20 August 2016

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘ईटीसी’ केंद्राला सर्वोत्तम गुणवत्ता पुरस्कार



नवी दिल्ली, 20 : मुंबई महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणा-या अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र अर्थात ईटीसीला दिव्यांग व्यक्तींना गुणवत्तापुर्ण सेवा पुरविण्यासाठी भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फेभारतीय गुणवत्ता परीषद व डी.एल.शहा गुणवत्ता सुवर्ण पुरस्कार-2016  प्रदान करण्यात आला.
येथील ली मेरीडीय या हॉटेलमध्ये भारतीय गुणवत्ता परीषदेतर्फे 11 व्या राष्ट्रीय गुणवत्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भारतीय गुणवत्ता परीषदेचे अध्यक्ष आदील झैनुलभाई व डी.एल.शहा ट्रस्टचे हरी तनेजा यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. ईटीसीच्या संचालका डॉ. वर्षा भगत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ईटीसी हा प्रकल्प सर्व स्तरावर गुणवत्ता पुर्ण राबविण्यात येत असल्यामुळे या प्रकल्पाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. भगत यांनी सादरीकरण्याच्या माध्यमातून प्रकल्पाची वाटचाल दर्शवीली.
     2007 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकातर्फे दिव्यांग व्यक्ती तथा विद्यार्थी यांचे व्यवस्थितरित्या संगोपन तथा पुनर्वसन करण्यासाठी पालकांना आर्थिक पाठबळ मिळावे. अशा व्यक्तींसाठी सर्व सेवासुविधा एका छताखाली मिळाव्यात ही संकल्पना समोर ठेवून नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी अनिवासी कर्णबधिर शिक्षण प्रशिक्षण केंद्र प्रथम: सुरू करण्यात आले. हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर इतरही दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे विविध प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. आज जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्धापर्यंतच्या दिव्यांग व्यक्तींना ईटीसी अंतर्गत सेवा पुरविली जाते. या केंद्रातर्फे वेगवेगळया उपक्रमांसाठी निधी उलब्ध करून दिला जातो. यामध्ये शिक्षण, उच्च शिक्षण, लघु उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत पुरविली जाते. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीबाहेरील दिव्यांग व्यक्तीसाठी सल्लगार म्हणून हे केंद्र काम करीत आहे. यासह राज्यातील तसेच देशातील इतर महानगरपालिकांनाही असा प्रकल्प राबविण्यासाठी लागणारे सर्वोतोपरीही सहकार्य केले जाते, असे केंद्राच्या संचालक डॉ. वर्षा भगत यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगर पालिकेचे  महापौर सुधाकर सोनावणे आणि आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वात ईटीसी प्रकल्प आणखीच नवीन भरारी गाठीत असल्याची प्रतिक्रीया डॉ. भगत यांनी पुरस्कार प्राप्तीनंतर व्यक्त केली.

राजधानीत सदभावना दिन साजरा













नवी दिल्ली, 20 : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सदभावना दिन साजरा करण्यात आला.
कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सदभावना प्रतिज्ञा दिली. यावेळी श्रीमती शुक्ला यांनी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कर्मचा-यांनी स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

         महाराष्ट्र परिचय केंद्रात सदभावना दिनाची प्रतिज्ञा



महाराष्ट्र परिचय केंद्रात सदभावना दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सदभावना प्रतिज्ञा दिली. श्री.कांबळे यांनी यावेळी स्व. राजीव गांधी यांना पुष्पहार अर्पणकरून अभिवादन केले. यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.  

Thursday 18 August 2016

‘Bharat Parv’ ends with Patriotic performances by Maharashtra






          
 New Delhi, 18 : The week-long Bharat Parv at the India Gate lawns here drew to a close with a thrilling dance drama entitled "Azadi se Aazadi tak – Ek Buland Nara" performed by over 300 artists from Maharashtra, whose pavilion attracted over 40,000 visitors. The Union Minister of Urban Development and Information & Broadcasting Venkaiah Naidu, Minister of State for Tourism Dr. Mahesh Sharma,  Minister of State for  Information & Broadcasting Rajyavardhan Singh Rathore and  Maharashtra Minister for Culture Mr.Vinod Tawade besides a host of dignitaries were among those who witnessed the grand finale and were all cheers for the performance.
Whether it was the typical Maharashtrian cuisine, or the handicrafts or the handloom items, they all were in great demand. According to an official, handicrafts and handlooms sold in great numbers.
Whether it was Virtual Tourism or the rich flora and fauna of the state or the  tiger reserve of Tadoba, they were beautifully depicted through giant LED TV screens. In fact, one got the impression as if he was right there at the forest, face to face with the tiger.
The E-PUZZLE showing great Freedom Fighters and Social Reformers of the state was equally popular and turned out to be a great source of information for many a youngsters who had thronged the pavilion in a large number. As a Senior Official at the pavilion put it," it was a roaring success as such events help highlight the overall progress the state has made in different fields of activities". 
The Maharashtra ahead and Lokrajya the states twin publication attracted the lot of visitors as they help them enrich their information and knowledge about the progress and development that the state has made in the recent past. Beside Dr. Mahesh Sharma the minister of state for defence Dr. Subhash Bhamre also had visited the pavilion and shown keen interest in various exhibits put  up their. 

महाराष्ट्राच्या देशभक्तीपर कार्यक्रमाने “भारत पर्व” चा समारोप 40 हजाराहून अधिक पर्यटक व ग्राहकांची महाराष्ट्र दालनास भेट







नवी दिल्ली18 महाराष्ट्राच्या आजादी से आजादी तक- एक बुलंद नारा या देशभक्तीपर कार्यक्रमाने भारत पर्व’ प्रदर्शनाचा आज समारोप झाला. प्रदर्शन काळात महाराष्ट्र दालनास जवळपास 4० हजाराहून अधिक पर्यटक व ग्राहकांनी भेट दिली. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने 70 व्या स्वतंत्र दिनानिमित्त राजपथ लॉनवर दिनांक १२ ते १८ ऑगस्ट या कालावधित भारत पर्व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. आज सुभाष नकाशे यांच्या दिग्दर्शनाखालील राज्यातील 300 कलाकारांचा सहभाग असणा-या आजादी से आजादी तक- एक बुलंद नारा या देशभक्तीपर कार्यक्रमाने या प्रदर्शनाचा समारोप झाला. यावेळी केंद्रीय नगर विकासमाहिती  प्रसारण मंत्री व्यंकय्यानायडूपर्यटन  सांस्कृतिक मंत्री  डॉमहेश शर्मा, माहिती  प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन सिंह राठोड आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे उपस्थित होते. 
विविध हस्तकलाखाद्य पदार्थ आणि विविध क्षेत्रातील उपलब्धी दर्शविणारी राज्यांची तीन दालने या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली.राज्याचा विविध क्षेत्रातील विकास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दर्शविणा-या डिजीटल दालनाला उदंड प्रतिसाद मिळाला याठिकाणी  मेकइन महाराष्ट्राच्या माध्यमातून  राज्यात झालेली गुंतवणूक   विकास हे आकर्षक पॅनलच्या माध्यमातून दर्शविण्यात ले. महात्मा ज्योतीबा फुले,छत्रपती शाहु महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांचे देश विकासातील योगदानआद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासह लोकमान्य टिळक आणि स्वातंतत्र्यवी दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान,कलासंस्कृती आदींमध्ये राज्याचे योगदान  हे आकर्षक पॅनलच्या माध्यमांतून येथे भेट देणा-यांपर्यंत पोहचविण्या आले. ‘व्हर्च्यअलटुरीजमच्या माध्यमातून  शिर्डी येथील साई बाबा मंदीरबीबी का बरा,अंजीठा-वेरूळ लेण्या आणि ताकर्ली समुद्र किना-याची सफरघडविण्यात आलीअन्य एका एलइडीवर फेस रिकग्नेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणेरी पगडीमहाराष्ट्राचा फेटा परिधान करण्याचा आनंदयेथे येणा-या प्रेक्षकांनी घेतलाया दालनास भेट देणा-या शाळकरी , महाविद्यालयीन मुलांनी पझल गेमच्या माध्यमातून लोकमान्य टिळक,छत्रपती शाहू महाराज आदी महा पुरूषांचे चित्र जोडून या महापुरुषांविषयी जाणून घेतले.  ऑगमेटीक रियॅलीटी या तंत्रज्ञानाचा प्रयोग करूनराज्यातील ताडोबा अभयारण्यात वाघाला कुरवाळण्याचा अनुभव येथे मिळाला.
                 राज्यातील हस्तकला दर्शविणारे दालनही येथे उभारण्यात आले. यात राज्यातील ७ लघु उद्योजकांनी  सहभाग घेतला. पैठणीसाडयावारली पेटींगलाखाच्या बांगडयाकोल्हापूरी चपला, हुपरी ज्वेलरी, आयुर्वेदिक साबण , पॅच वर्क, सतार आदी वस्तुंचे स्टॉल येथे लावण्यात आले. प्रदर्शनासोबतच या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या, मोठया प्रमाणा वस्तूंची विक्री झाल्याले लघु उद्योजकांनी समाधान व्यक्त केले.  
खाद्य दालनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लज्जतदार व्यंजनही येथे येणा-या प्रेक्षकांना चाखता आलीपुरण पोळीसाबुदाना खिचडी,साबुदाना वडापीठल भाकरीभरली वांगीवडा पाव, मिसळ पाव आदी मराठमोडया व्यंजनाचा खवय्ये ग्राहकांनी मनमुराद आनंद घेतला.  
             महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंकाच्या स्टॉल ला उदंड प्रतिसाद
डिजीटल दालनात महाराष्ट्र अहेड व लोकराज्य या महाराष्ट्र शासनाच्या मुखपत्राचा स्टॉल लावण्यात आला. केंद्रीय पर्यटन   सांस्कृतिक मंत्री डॉमहेश शर्मा आणि संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे  यांनी  या स्टॉलची आवर्जून पाहणी केली. लोकराज्य आणि महाराष्ट्र अहेड या अंकाच्या मांडणीचे त्यांनी कौतुक केले. महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंक त्यांना  भेट स्वरूपात देण्यात आला. प्रदर्शन काळात विविध क्षेत्रात कार्यरत अधिकारी, महाविद्यालयीन आणि स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या तरूणांचा या स्टॉल ला मोठा प्रतिसाद मिळाला. स्टॉल वर भेट देणा-यांना महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंक त्यांना  भेट स्वरूपात देण्यात आला.