Thursday 30 November 2017

महाराष्ट्राला पाच राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार








नवी दिल्लीदि. ३० : जागतिक अपंग दिनानिमित्त देण्यात येणारे राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार- २०१७ जाहीर झाले आहेत. महाराष्ट्राला ५ पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिनांक ३ डिसेंबर या जागतिक अपंग दिनी विज्ञानभवनात होणार आहे.   

           केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्यावतीने हे पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतात. दिव्यांगजणांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थाउत्कृष्ट दिव्यांगजन कर्मचारीदिव्यांगजणांसाठी कार्य करणाऱ्या संशोधन संस्था  अशा एकूण १४ श्रेणीमध्ये हे पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्रातील दोन व्यक्ती आणि ३ संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

         मुंबई येथील प्रणय पुरुषोत्तम बुरडे व पुणे येथील गौरी गाडगीळ यांना मानसिक दुर्बलता व मानसिक स्थूलता या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामासाठी हापुरस्कार जाहीर झाला आहे. अपंगत्वावर मात करत प्रणय बुरडे यांनी स्वबळावर रोजगार मिळवला असून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. डाऊन सिंड्रोम आजारानेग्रस्त व्यक्तींना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रणय बुरडे कार्यरत आहे. डाऊन सिंड्रोम या आजारावर मात करून दिव्यांगांच्या ऑल्म्पिकमध्ये भारतासाठी देान वेळा रजत पदक पटकाविणारी पुण्याची गौरी गाडगीळ ने दिव्यांगांसाठी आदर्श निर्माण केला आहे. गौरीच्या यशाची दखल मराठी चित्रपटसृष्टीनेही घेतली असून यलो’ हा मराठी चित्रपट तिच्या यशोगाथेवर प्रदर्शीत झाला आहे.

           दिव्यांगासाठी कार्यरत सर्वोत्तम संस्थामध्ये देशभरातून दोन संस्थाची निवड झाली. यात पहिला क्रमांक नवी मुंबई महानगर पालिकेच्या वाशी येथील ई टी सी  या दिव्यांगांना शिक्षण, प्रशिक्षण व सेवा देणा-या संस्थेला जाहीर  झाला. पालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन, महापौर अनंत सुतार आणि संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वर्षा भगत पुरस्कार स्वीकारणार आहेत.
               
           

             दिव्यांगासाठी पुस्तक प्रकाशित करणा-या देशातील उत्कृष्ट ब्रेल प्रेस चा एकमेव पुरस्कार मुंबई वरळी येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया(नॅब) या संस्थेला जाहीर झाला आहे. ही संस्था १९५२ पासून कार्यरत असून संस्थेचे सचिव डॉ. विमल कुमार डेंगळा आणि कार्यकारी संचालक पल्लवी कदम पुरस्कार स्वीकारणार आहेत.

            दिव्यांगजणांसाठी सुलभ संकेतस्थळ  निर्माण करण्यासाठी दिला जाणारा उत्कृष्ट संकेतस्थळ पुरस्कार जळगाव च्या द जळगाव  पीपल को ऑपरेटिव्हबँकेस’ जाहीर झाला आहे . हि बँक १९३३ पासून कार्यरत असून बँकेने  दिव्यांगांना हाताळण्यास सुलभ असे संकेतस्थळ तयार केले आहे. या कार्याची दखल घेत बँकेची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बँकेचे अध्यक्ष  भालचंद्र पाटील हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

        या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत, राज्यमंत्री द्वय कृष्णपाल गुर्जर आणि रामदास आठवले यांच्या उपस्थितीत दिनांक ३ डिसेंबर २०१७ ला सकाळी ११ वाजता येथील विज्ञान भवनात होणार आहे.

अधिकृत माहिती , वृत्त व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा. http://twiteer.com/micnewdelhi




Monday 27 November 2017

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात “स्टार्टअप व स्टँडअप महाराष्ट्र” ला पुरस्कार






नवी दिल्लीदि. २७ : प्रगती मैदान येथील 37 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राचे स्टार्टअप  स्टँडअप महाराष्ट्र या दालनास सजावट व सदरकरणासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सी आर चौधरी यांच्या हस्ते विशेष प्रशंसनीय प्रमाणपत्र देऊन आज सन्मानीत करण्यात आले.

 राज्याचे उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड आणि सहव्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रगती मैदान येथे आयोजित एका समारंभात आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेचे(आयटीपीओ) मुख्य व्यवस्थापकीय संचालक सी.एल.गोयल, कार्यकारी संचालक दिपक कुमार यावेळी उपस्थित होते.
  
        प्रगती मैदान येथे  दिनांक १४ नोव्हेंबर २०१७ पासून भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून आज मेळाव्याचा समारोप होत हे. 'स्टार्टअप इंडियाही या मेळाव्याची मध्यवर्ती संकल्पना आहे.महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्यावतीने स्टार्टअप  स्टँडअप महाराष्ट्र हे राज्यात उद्योग क्षेत्राच्या प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले. राज्यातील प्रतिभावान तरूण उद्योजकांचे ६० प्रकल्प या ठिकाणी  दर्शविण्यात आले.

       दालनाच्या मुख्यद्वाराचे खास आकर्षण ठरले ते अमोल यादव या तरूण उद्योजकाने निर्माण केलेली विमानाची प्रतिकृती. मुंबई-अहमदाबाद ही देशातील पहिली बुलेट ट्रेन, मुंबई- नागपूर समृद्धीमार्ग आणि त्याचे फायदे याठिकाणी विविध आकर्षक देखाव्यांच्या माध्यमातून दर्शविण्यात आले. स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी आणि लहान उद्योजकांना मिळालेली संधी  आकर्षकपणे मांडण्यात आली . याची दखल व्यापार मेळाव्याच्या परिक्षक मंडळाने घेतली व महाराष्ट्राची निवड विशेष प्रशंसनीय प्रमाणपत्र पुरस्कारासाठी झाली.


                               पुरस्कार मिळाल्याचा आनंद – हर्षदीप कांबळे

पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना राज्याचे उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे म्हणाले, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राला प्रथमच असा पुरस्कार मिळत आहे त्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याचा  खूप आनंद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप व स्टँडअप महाराष्ट्र या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न केले. देशातील पहिले विमान निर्माण करणारे राज्याचे सुपूत्र अमोल यादव यांना आवश्यक प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी श्री. फडणवीस यांनी प्रधानमंत्री कार्यालयाशी सतत संपर्क करून हे प्रमाणपत्र मिळवून दिले. या प्रातिनिधिक उदाहरणावरूनच राज्यात स्टार्टअप इंडिया या कार्यक्रमाच्या यशाची माहिती मिळते. येथील महाराष्ट्र दालनात राज्यात स्टार्टअप व स्टँड महाराष्ट्र योजनेच्या माध्यमातून सुरु असलेले उद्योग प्रभावीपणे दर्शविण्यात आले. त्याची दखल घेतल्यानेच आज हा पुरस्कार मिळाला आहे.

                              पुरस्कार म्हणजे शासनाच्या प्रयत्नांची पावती -‍ शिवाजीराव दौंड

स्टार्टअप व स्टँडअप महाराष्ट्र च्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी राज्यशासनाने निर्माण केलेली उत्तम व्यवस्था आणि त्या माध्यमातून तरूण उद्योजकांना झालेला फायदा महाराष्ट्र दालनात प्रभावीपणे दर्शविण्यात आला. राज्य शासनाच्या प्रयत्नांची माहिती आम्ही भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात येणा-या देश विदेशातील उद्योजक व सामान्य नागरीकांपर्यंत पोहचवू शकलो याची पावती म्हणजेच महाराष्ट्र दालनास  मिळालेला हा पुरस्कार असल्याचे श्री. दौंड म्हणाले.                 
         
                     केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची महाराष्ट्र दालनास सदिच्छा भेट

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज महाराष्ट्र दालनास सदिच्छा भेट दिली. राज्याचे उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड आणि सहव्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी श्री. आठवले यांचे स्वागत केले. यावेळी श्री. आठवले यांनी महाराष्ट्र दालनात प्रदर्शीत करण्यात आलेल्या राज्यातील स्टार्टअप व स्टँडअप प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. महाराष्ट्र दालनास मिळालेल्या पुरस्काराबद्दल श्री. आठवले यांनी शुभेच्छा दिल्या.
             


आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात “स्टार्टअप व स्टँडअप महाराष्ट्र” ला पुरस...

Saturday 25 November 2017

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात “स्टार्टअप व स्टँडअप महाराष्ट्र” ला पुरस्कार घोषित


















नवी दिल्ली, दि.26 : प्रगती मैदान येथे सुरु असलेल्या 37 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात  महाराष्ट्राचे स्टार्टअप स्टँडअप महाराष्ट्र या दालनास सर्वोत्कृष्ट सजावट व सदरिकरणाचा पुरस्कार शनिवारी रात्री उशिरा घोषित झाला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सी.आर.चौधरी यांच्या हस्ते सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर 2017 रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
        प्रगती मैदान येथे  दि.14 ते 27 नोव्हेंबर 2017 या कालावधीत भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 'स्टार्टअप व स्टैंडअप इंडिया' ही या मेळाव्याची मध्यवर्ती संकल्पना असून महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्यावतीने स्टार्टअप स्टँडअप महाराष्ट्र हे राज्यात उद्योग क्षेत्राच्या प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले. संकल्पना मांडताना राज्यात स्टार्टअप स्टँडअपयोजनेच्या माध्यमातून नव्याने उद्योग उभारणी करणा-या राज्यातील प्रतिभावान तरूण उद्योजकांचे प्रकल्प दर्शविण्यात आले . 
        अमोल यादव या तरूण उद्योजकाने निर्माण केलेल्या विमानाची प्रतिकृती दालनाच्या मुख्यद्वाराचे खास आकर्षण आहे. मुंबई-अहमदाबाद ही देशातील पहिली बुलेट ट्रेन, मुंबई नागपूर समृद्धीमार्ग आणि त्याचे फायदे ही याठिकाणी दर्शविण्यात आले आहेत. याशिवाय राज्यातील लघु उद्योजकांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तू, महिला उद्योजिकांद्वारे निर्मित वस्तू, महाराष्ट्राची प्रसिद्ध पैठणीही याठिकाणी प्रदर्शन व विक्रीस ठेवण्यात आली.
           स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी आणि लहान उद्योजकांना मिळालेली संधी, लघुउद्योगास चालना देणारे राज्याचे धोरण, विदेशी गुंतवणूक, पर्यटन आदी  विषयांना स्पर्श करणारे आकर्षक महाराष्ट्र दालन यंदा राज्याच्यावतीने उभारण्यात आले . 
            महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते आणि  राज्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या उपस्थितीत 14 नोव्हेंबर 2017 रोजी झाले. 23 नोव्हेंबर 2017 रोजी या व्यापार मेळाव्यात राज्याची  वैविध्यपूर्ण सांस्कृती दर्शविनारा 'महाराष्ट्र दिन' कार्यक्रम साजरा झाला. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले या कार्यक्रमास उपस्थित होते.






























Thursday 23 November 2017

महाराष्ट्राची लोककला देशाला भुरळ पाडणारी : केंद्रीय राज्यमंत्री आठवले















       आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दिन साजरा
नवी दिल्ली, २३ : महाराष्ट्राची लोककला ही समृध्द असून संपूर्ण देशाला या लोककलेने भुरळ घातली आहे असे गौरवोद्गगार केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले.
येथील प्रगती मैदानावर ३७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात आयोजित महाराष्ट्र दिनाचे उदघाटन श्री. आठवले यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला,गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त लोकशचंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय,सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा तसेच, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी  उपस्थित  होते.

          श्री. आठवले म्हणाले, लावणी, दिंडी नृत्य, कोळी नृत्य आदी महाराष्ट्रातील लोककला या देशाला भुरळ पाडणा-या आहेत. राज्याला नररत्नांप्रमाणेच लोककलेचीही मोठी परंपरा असून  ही परंपरा देशाला समृध्द करणारी आहे. महाराष्ट्रातील लोककलेमध्ये राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडते. आज भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दिनाच्या माध्यमातून ही लोककला देश-विेदशात पोहचत असल्याचा अभिमान वाटतो .

        महाराष्ट्राच्या समृध्द सांस्कृतिक वारशाचे दमदार सादरीकरण

महाराष्ट्र दिना निमित्त आयोजित एक माती अनेक नातीकार्यक्रमातील गण-गौळण, शेतकरी नृत्य, खानदेशी नृत्य, दिंडी, अभंग, वासुदेव आदी लोककलांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृध्द सांस्कृतिक वारशाच्या दमदार सादरीकरणाने  प्रगती मैदानात उपस्थित देश-विदेशातील प्रेक्षकांची मन जिंकली.
 भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात दररोज सायंकाळी हंसध्वनी सभागृह येथे व्यापार मेळाव्यात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या अंतर्गत व्यापार मेळाव्याच्या दहाव्या दिवशी आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

             मुंबई येथील हृदया आर्ट गृपच्या ४० कलाकारांनी एक माती अनेक नाती या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. गणेश वंदनेने  या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे  दर्शन घडविणारे उगवला सुर्य नारायण..., ऐरणीच्या देवा.... , तसेच, पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडविणारे दिंडी नृत्य सादर करण्यात आले. थेट प्रेक्षकांमधून निघालेली वारक-यांची दिंडी पाहून उपस्थितांनी उभे राहून दिंडीला मानवंदना दिली. शेतकरी नृत्य, खानदेशी नृत्य या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांच्या टाळया मिळवल्या. महाराष्ट्राच्या कडा-कपारीत राहणा-या ठाकर जमातीचे दर्शन घडाविणारे नृत्य, संताचे अध्यात्मिक विचार उलगडणारे भारूड आदींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विविध लोककला व लोकनृत्यांचा आविष्कार असणा-या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिबींबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद लाभला.                           
                                     ००००००




Wednesday 22 November 2017

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात २३ नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्र दिन’











नवी दिल्ली, २२ :  प्रगती मैदान येथे सुरु असलेल्या ३७ व्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात गुरूवार दिनांक २३ नोव्हेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र दिन साजरा होनार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शण घडणार आहे.  
भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा २०१७ ला १४ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली. या मेळाव्यात दररोज सायंकाळी हंसध्वनी सभागृह येथे व्यापार मेळाव्यात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या उपक्रमाअंतर्गत दिनांक २३ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता. येथील हंसध्वनी  सभागृहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात  येणार आहे.  
 या कार्यक्रमाचे उदघाटन सचिव तथा निवासी आयुक्त आभा शुक्ला यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई येथील हृदया आर्ट गृप चे ४० कलाकार यावेळी एक माती अनेक नातीहा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार  आहेत. 
                                                      ००००


                                    

Tuesday 21 November 2017

“महाराष्ट्र खाद्यो बहुत स्वादिष्ट थिला” उडिया खवय्यांनी घेतला महाराष्ट्रीय व्यंजनांचा आस्वाद







नवी दिल्ली, 21 : पुरण पोळीझुनका भाकरचिकन कोल्हापुरी आदी महाराष्ट्रीय व्यंजनांचा आस्वाद घेणा-या उडिया खवय्यांची बोलकी प्रतिक्रिया होती महाराष्ट्र खाद्यो बहुत स्वादिष्ट थिला अर्थात महाराष्ट्राचे भोजन खुप स्वादिष्ट आहेप्रसंग होता येथील ओडिशा भवनात ओयाजित महाराष्ट्र अन्न महोत्सवाचा.
एक भारत श्रेष्ठ भारत या सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत आज येथील ओडिशा भवनात पुरणपोळीसह महाराष्ट्राचे व्यंजन खवय्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन ओडिशा भवनाचे मुख्य निवासी आयुक्त डॉ. सुशील कुमार भार्गव आणि सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी केलेयावेळी गुतंवणूक्‍ तथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्रअपर निवासी आयुक्त समीर सहायसहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा तसेच ओडिशा भवनाचे निवासी आयुक्त संजीव मिश्रासहायक निवासी आयुक्त टीप्रधान आणि  सह निवासी आयुक्त रिता महापात्रा यांच्यासह दिल्ली स्थित ओडिशा राज्याचे प्रशासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एक भारत श्रेष्ठ भारत’ ही योजना केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने देशभर राबविण्यात येत आहे. देशातील राज्या-राज्यांमधे सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या माध्यमातून संबंध  दृढ व्हावे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. दिल्ली स्थित विविध राज्यांच्या भवनांमध्येही या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील व्यंजनांचा आस्वाद ओडिशा भवन येथील अधिकारी- कर्मचारी , भवनातील पाहुणे व आगंतुकांसह दिल्लीकरांनी आज घेतला

डिसेंबर ला महाराष्ट्र सदनात उडिया अन्न महोस्त्वडॉसुशील कुमार भार्गव
एक भारत श्रेष्ठ भारत’ या कार्यक्रमाअंतर्गत्‍ ओडिशा भवनातील आजचा ‘महाराष्ट्र अन्न महोत्सव’ यशस्वी झाला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून उभय राज्यांतील खाद्य संस्कृती समजून घेता येईल व पर्यायाने सांस्कृतिक संबंधही दृढ होतील. या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून 5 डिसेंबर 2017 ला कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात ‘उडिया अन्न महोस्त्व’ आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती ओडिशा भवनाचे मुख्य निवासी आयुक्त डॉ. सुशील कुमार भार्गव यांनी दिली.

येथील चाणक्यपुरी भागातील बार्डोलोई मार्ग स्थित ओडिशा भवनाच्या हिरवळीवर  आज खवय्यांसाठी खास महाराष्ट्रीय व्यंजनांची मेजवाणी देण्यात आली. देलिना महापात्रा यांनी महाराष्ट्राची फिश फ्राय,चिकन कोल्हापुरीचा आस्वाद घेतला. यानंतर त्यांनी  दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. त्या म्हणतात,महाराष्ट्रीयन व्यजंने खुपच चविष्ट व रुचकर आहेत. विशेषत: आम्हाला फिश फ्राय , चिकन कोल्हापुरी ही व्यजंने फार आवडली.  अधिशंकर अलांग म्हणतातउडिया आणि महाराष्ट्रीय व्यजंनामध्ये मला बरेच साम्य आढळतेमला पुरणपोळी  आणि श्रीखंड ही गोड पदार्थ फारच आवडलीतसेच झुनका भाकरसावजी पनीर ही व्यजंनेही फार आवडली.
             महाराष्ट्र अन्न महोत्सवात ही व्यजंन ठरली खास

या अन्न महोत्सवात राज्यातील  व्यजंनांनी खास  वाहवाही मिळवीली. पुरणपोळी, श्रीखंड, झुनका-भाकर, भरली वांगी, भरली भेंडी, दाल कोल्हापुरी, सावजी पनीर, मसाले भात, चिकन कोल्हापुरी, फीश फ्राय, सोलकडी ही व्यजंने उडिया खवय्यांच्या पसंतीस उतरली.    
                                   
                                       लोकराज्य अंक प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद
 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात येणारे राज्य शासनाचे मुखपत्र लोकराज्य अंकाचे प्रदर्शनही या महोत्सवात लावण्यात आले, यास उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी  लोकराज्य या मराठी अंकासह महाराष्ट्र अहेडहा इंग्रजी भाषेतील अंक आणि  हिंदी भाषेतील लोकराज्य अंकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.  
        महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                               http://twitter.com/micnewdelhi

Monday 20 November 2017

ओडिशा भवनात महाराष्ट्राची ‘पुरणपोळी’ तर महाराष्ट्र सदनात ‘चेना तरकारी’












नवी दिल्ली, २० :एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेअंतर्गत २१ नोव्हेंबर २०१७ रोजी येथील ओडिशा भवनात पुरणपोळीसह महाराष्ट्राचे व्यंजन खवय्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर, २४ नोव्हेंबर २०१७ ला येथील महाराष्ट्र सदनात ओडिशाच्या चेना तरकारीसह महत्वाची व्यंजनांचा आस्वाद घेता येणार आहे.
            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एक भारत श्रेष्ठ भारतही योजना केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने ३१ ऑक्टोबर २०१७ या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जंयतीदिनापासून देशभर राबविण्यात येत आहे. देशातील राज्या-राज्यांमधील दुरावा कमी होऊन सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या माध्यमातून संबंध  दृढ व्हावे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. देशातील २९ राज्य आणि ७ केंद्रशासीत प्रदेशांमध्ये असा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दिल्ली स्थित विविध राज्यांच्या भवनांमध्येही या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांतील व्यंजनांचा आस्वाद ओडिशा भवन व महाराष्ट्र सदनातील अधिकारी- कर्मचारी व येथील पाहुणे व आगंतुकांसह दिल्लीकरांना घेता येणार आहे.
            येथील चाणक्यपुरी भागातील बार्डोलोई मार्ग स्थित ओडिशा भवनातील उपहारगृहात २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता पासून महाराष्ट्रीय व्यंजन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुरणपोळी, श्रीखंड, झुनका-भाकर, भरली वांगी, भरली भेंडी, दाल कोल्हापुरी, सावजी पनीर, मसाले भात, चिकन कोल्हापुरी, फीश फ्राय, सोलकडी आदी व्यंजनांचा आस्वाद घेता येणार आहे.          
            याच उपक्रमाअंतर्गत दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ रोजी येथील इंडियागेट भागातील कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनात दुपारी १२ वाजता पासून दिवसभर ओडिशाचे  व्यंजन उपलब्ध होणार आहेत. यात मुख्यत्वे चेना तरकारी, धांटो मिक्स व्हेज, बडी चुरा, फेना कोंडा, चटणी या शाकाखारी व्यंजनांसह चोखली मांसो, मासो बेसर, मटन ही मांसाहारी व्यंजन उपलब्ध होणार आहेत याशिवाय, ओरिया राईस, रसगुल्लाही  येथे खवय्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

                                        
       महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                               http://twitter.com/micnewdelhi                              
000000

                                                                  



                 

Saturday 18 November 2017

महाराष्ट्र सदनात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी




नवी दिल्ली, १९ : भारत देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची 100 वी जयंती आज महाराष्ट्र सदन येथे  साजरी करण्यात आली.
                 कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदनातील व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी -कर्मचारी  उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून पाळण्यात येते. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना  राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.