Wednesday 27 January 2021

नागपूर व पुणे येथील नदी पुर्नरूज्जीवन योजनेतंर्गत 1 हजार कोटींच्या निव‍िदांना मंजुरी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 



नवी दिल्ली 27 : नागपूर येथील नाग नदी आणि पुणे येथील मुळा-मुठा नदी पुर्नरूज्जीवन योजनेतंर्गत विकासकामांसाठी 1 हजार कोटी रूपयांच्या निविदांना मंजुरी देण्याचा निर्णय आज घेण्यात आल्याची माहिती, केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.    

श्री गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या निवासस्थानी आयोजित महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांची प्रगती आणि समस्या संदर्भात आढावा घेण्यात आला. या बैठकीस केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावेडकर, राज्याचे जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार  सर्वश्री ग‍िरीष बापट, डॉ. सुभाष भामरे, सुनिल मेंढे आणि जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुण्यातील मुळा-मुठानदी आणि नागपुरातील नागनदीच्या पुर्नरूज्जीवन योजनेतंर्गत विविध कामांचा आढावा याबैठकीत घेण्यात आला. या योजनेतंर्गत करावयाच्या विविध विकास कामांसाठी  जपानच्या जायका कंपनीसोबत करार करण्यात आलेला आहे. पुण्यातील मुळा-मुठा नदी विकासकामांसाठी 1200 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. तर नागनदी विकासकामांसाठी 1700 कोटी रूपये खर्च येणार आहे. आजच्या बैठकीत  या दोन्ही नद्यांच्या पुर्नरूज्जीवनसंदर्भातील विविध विकासकामांसाठी एक हजार कोटी रूपयांच्या निव‍िदांना मंजुरी देण्यात आली असल्याचे श्री गडकरी यांनी बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

यासह   केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री शेखावत यांच्याकडून  नागनदी पुर्नरूज्जीवन योजनेसाठी आखलेल्या समितीमध्ये पर्यावरण विषयक तज्ज्ञ नेमण्याच्या सूचना करण्यात आल्‍याचेह श्री गडकरी यांनी म्हणाले.

 

                       

                                  

केंद्र पुरस्कृत सिंचन प्रकल्प पुढील दोन वर्षात पूर्ण केले जातील :

                                                                  जलसंपदा मंत्री जयंत पाटील

पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जल संजीवनी योजना  केंद्र शासन पुरस्कृत सिंचन योजनांतर्गत राज्यातील विविध सिंचन प्रकल्प  पुढील दोन वर्षात पूर्ण केले जातील, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प हा 2023 पर्यंत पूर्ण केला जाईल, कोविड महासाथीमुळे या प्रकल्पातील कामांची गती मंदावली होती तसेच काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या विषयासंदर्भात आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. केंद्राकडून पूर्ण मदतीचे आश्वासन मिळाले. या राष्ट्रीय प्रकल्पासाठी केंद्र व राज्याकडे पुरेसा निधी उपलब्ध असून या कामांना गती देण्याबाबत आजच्या बैठकीत एकवाक्यता झाली, असल्याचे श्री पाटील म्हणाले.  

यासह पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत येणारे 26 प्रकल्प  आणि बळीराजा जल संजीवनी योजने अंतर्गत येणारे 91 प्रकल्पांना केंद्राकडून अर्थसहाय्य केले जाते. या योजनांमधील प्रकाल्पांची कामे अंतीम टप्प्या असून एकूणच प्रकल्प येत्या दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत पुर्ण केले जातील. याशिवाय ज्या प्रकल्पांना पुर्ण करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत अशा प्रकल्पांविषयी राज्यपालांशी चर्चा करून प्रकल्पांना गती देण्याचे काम केले जाईल,  असे ही श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील जींगाव, सुलवाडे आदी मोठया जलसिंचन प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्पांचा दर्जा मिळावा, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली, यासह नदीजोड प्रकल्पासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली, असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.

Monday 25 January 2021

महाराष्ट्रातील 4 अग्निशमन अधिका-यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर




नवी दिल्ली,  दि. 25 : अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनिय कामगीरीसाठी महाराष्ट्रातील 4 अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना  राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहिर झाले आहे.

सर्वोत्कृष्ट सेवेसाठी  श्री देवेंद्र प्रभाकर पोटफोडे (मुख्य अग्निशमनअधिकारी) यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक, तर उत्कृष्ट सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक यामध्ये  संजय दादाजी पवार (प्रभारी मुख्य अग्निशमनअधिकारी), धर्मराज नारायणराव नकोड (सहाय्यक स्टेशन अधिकारी), राजाराम कालु केदारी (अग्रणी फायरमन)  यांचा समावेश आहे.


महाराष्ट्रातील तीन तुरुंग कर्मचा-यांना सुधारात्मक सेवा पदक



 

नवी दिल्ली, 25 : देशातील 52 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणा-या सुधारात्मक सेवा पदकांस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मंजुरी दिली आहे. तुरूंगसेवेत कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल  सुधारात्मक सेवा पदक प्रदान करण्यात येतात.

 देशातील 12 तुरुंग अधिका-यांची ‘राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदकासाठी निवड करण्यात आली तसेच 39 तुरुंग अधिकारी -कर्मचा-यांना  उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे , यात महाराष्ट्रातील तिघांचा  समावेश आहे. हवालदार सर्वश्री उत्तम विश्वनाथ गावडे, संतोष बबला मंचेकर आणि बबन नामदेव खंदारे यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले.

            एका कर्मचा-याला मरणोत्तर सुधारात्मक शौर्य सेवा पदक जाहीर झाले आहे.  


 

महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर



नवी दिल्ली, दि. २५  दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील  ५९  व्यक्तींना आज जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर झालेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या परवानगीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे जीवन रक्षा पदक पुरस्कार २०२०’ आज जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील परमेश्वर बालाजी नागरगोजे यांना उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. तर जीवन रक्षा पदक पुरस्कार अनिल दशरथ खुले आणि  बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांना जाहीर झाला आहे. 

देशातील ५९ नागरीकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील एका व्यक्तीस .सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ हा  पुरस्कार  मरणोत्तर जाहीर झाला आहे.  देशातील आठ जणांना उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार  जाहीर झाले आहेत . जीवन रक्षा पदक पुरस्कार एकूण ३१ जणांना जाहीर झाले आहेत. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पुरस्कार राशी असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही कालावधीने देशातील संबंधीत राज्य शासनाच्यावतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.   

महाराष्ट्राला 57 पोलीस पदक






 








               

 

नवी दिल्ली, दि. 25 :  पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 57 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ ,13 ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 ‘पोलीस पदक जाहीर झाली आहेत.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी  एकूण 946  पोलीस पदक जाहीर झाली असून 89  पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक' (पीपीएम), 205 पोलिसांना पोलीस शौर्य पदक(पीएमजी) आणि 650 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदक (पीएम) आणि दोन राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 57 पदक मिळाली आहेत.

                        देशातील 89 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना  उत्कृष्ट सेवेकरिता  राष्ट्रपती  विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.      

                          चौघांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीपीएम)

 

1.      श्री. प्रभात कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस महासंचालक कार्यालय(भ्रष्टाचार विरोधी पथक),  वरळी, मुंबई

2.      डॉ. सुखविंदर सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक फोर्स – 1, एस. आर.पी.एफ.ग्रुप-8 च्या पुढे गोरेगाव पूर्व,मुंबई  

3.      श्री. निवृत्ती तुकाराम कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे शहर.

4.     श्री. विलास बाळकु गंगावणे, वरिष्ठ पोलिस  निरीक्षक, शाहु नगर पोलिस ठाणे माहिम (पूर्व ), मुंबई

                       राज्यातील एकूण 13 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’

 

1.      श्री. .राजा आर. ,  अतिरिक्त पोलस अध‍िक्षक.

2.      श्री. नागनाथ गुरुसिध्द पाटील, पोलस उपनिरिक्षक.

3.      श्री. महादेव मारोती मडावी, नाईक पोलस हवालदार.

4.    श्री. कमलेश अशो अर्का , नाईक पोलस हवालदार..

5.     श्री. हेमंत कोरके मडावी, पोलस हवालदार.

6.      श्री. अमुल श्रीराम जगताप, पोलस हवालदार.

7.     श्री. वेल्ला कोरके आत्राम, पोलस हवालदार.

8.     श्री..सुधाकर मलय्या मोगलीवार, पोलस हवालदार.

9.      श्री. बियेश्वर विष्णू गेडाम, पोलस हवालदार..

10.   श्री. गजानन दत्तात्रय पवार, पोलीस  निरीक्षक.

11.  श्री.हरि बालाजी एन, सहाय्यक पोलीस अध‍िक्षक.

12.  श्री.गिरीश मारोती ढेकळे, नाईक पोलस हवालदार.

13.   श्री. निलेश मारोती धुमणे, नाईक पोलस हवालदार.

 

                                राज्यातील एकूण 40 पोलिसांना ‘पोलीस पदक’ 

1.      श्री. रविंद्र अनंत श‍िसवे, पोलस सहआयुक्त,  साधु वासवानी रोड, पुणे.

2.      श्री . प्रविणकुमार  चुडामण पाटील, पोलस उपायुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई.

3.      श्री. वसंत उत्तमराव जाधव,पोलिस अध‍िक्षक, भंडारा.

4.    श्रीमती कल्पना यशवंत गाडेकर, सहाय्यक पोलस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक (सायबर) मुंबई.

5.     श्रीमती  संगीता लिओनेल शिंदे-अल्फोन्सो, पोलीस उपअध‍िक्षक,  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी

समिती, ठाणे .

6.      श्री.  दिनकर नामदेव मोहिते, पोलस  निरीक्षक, सी. बि. डी, बेलापूर, पोलस ठाणे, नवी मुंबई.

7.     श्री. मेघश्याम दादा डांगे, पोलस  निरीक्षक, अक्क्लकुवा पोलस ठाणे, नंदुरबार.

8.     श्री. मिंलिद मनोहर देसाई, पोलस  निरीक्षक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, औरंगाबाद.

9.      श्री.  विजय चितामण डोळस, पोलस  निरीक्षक, निजामपुरा पोलस ठाणे, ठाणे शहर.

10.  श्री. रविंद्र रघुनाथ दौंडकर, पोलस  निरीक्षक, वाशी पोलिस ठाणे, नवी मुंबई.

11.  श्री. तानाजी  दिगबर सावंत पोलस  निरीक्षक, स्थानिय गुन्हे शाखा, कोल्हापूर.  

12.  श्री. मनिष मधुकर ठाकरे, पोलस  निरीक्षक, गाडगेनगर, पोलस ठाणे, अमरावती शहर.

13.  श्री. राजु भागोजी  बिडकर,  पोलस  निरीक्षक, डॉ. डी.बी मार्ग, पोलस ठाणे, मुंबई.

14.श्री. अजय रामदास जोशी, पोलस  निरीक्षक, गुन्हे शाखा, अंधेरी,मुंबई शहर.

15. श्री. प्रमोद भाऊ सावंत , पोलस  निरीक्षक, तंत्रज्ञान कक्ष,मुंबई शहर.

16.  श्री. भगवान मारीबा धाबडगे, पोलस  निरीक्षक, देगलुर पोलस ठाणे, नांदेड.

17. श्री. रमेश मुगतराव कदम, पोलस  उपनिरीक्षक, खंडणी  विरोधी पथक, ठाणे शहर.

18. श्री. राजेश बाबुलाल नगरुरकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, बुलढाणा.

19.  श्री. सुर्यकांत क्रिष्णा बोलाडे, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक, रेल्वे पोलीस मुख्यालय, घाटकोपर,मुंबई.

20. श्री.  लिलेश्वर गजानन व-हाडमारे, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक, डी.एस.बी, चंद्रपूर.

21.  श्री. भारत ज्ञानदेव नाळे, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक, वाहतुक शाखा, सातारा.

22. श्री. हेमंत नागेश राणे, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक, श‍िव पोलीस ठाणे, माटुंगा, मुंबई.

23. श्री. रामदास बाजीराव गाडेकर, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक,पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. वळुज, औरंगाबाद .

24.  श्री. हेमंत काशीनाथ पाटील, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक,  रिडर ब्रँच, रायगड.

25. श्री. अशोक कमलावर मंगलेकर, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक,  रिडर ब्रँच, अमरावती शहर.

26. श्री. जीवन  हिंदुराव जाधव, सहाय्यक पोलीउपनिरीक्ष,सी.आय.यु. ब्रँच, पोलीस आयुक्तालय, मुंबई.

27.श्री. राजेंद्र रमाकांत मांडे, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक, डी.एस.बी. बेस कर्जत, रायगङ

28. श्री. ‍ विजय नामदेवराव बोरीकर, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, चंद्रपूर.

29.  श्री. पुरुषोत्तम शेषरावजी बरड, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक, पोलीस आयुक्तालय, अमरावती.

30. श्री. उदयकुमार रघुनाथ पलांडे, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट -4, उल्हासनगर, ठाणे शहर.

31.   श्री. थॉमस कार्लोस डिसोझा, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक, मुख्यालय,ठाणे.

32. श्री. प्रकाश  बाबुराव चौघुले, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक, गुन्हे शाखा, रेल्वे मुंबई.

33. श्री. सुरेश  शिवराम मोरे, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक, गुन्हे शाखा, ठाणे शहर.

34.  श्री. संजय पुंडलिक साटम, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक, बी.डी.डी. एस, सिंधुदुर्ग.

35. श्री. शाकिर गौसमोहीदिन जिनेदी, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, पिंपरी-चिंचवड.

36.  श्री. संजय रामचंद्र पवार, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नवी मुंबई.

37.श्री. शरदप्रसाद रमाकांत  मिश्रा, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक, पोलिस स्टेशन, अंबाझरी, नागपूर शहर.

38. श्री. प्रकाश ज्ञानेश्वर अंडील, सहाय्यक पोलीउपनिरीक्षक, एस.आर.पी.एफ. ग्रुप-3, जालना.

39. श्री. जयराम बाजीराव धनवाई, गुप्तचर अध‍िकारी,राज्य गुप्तचर  विभाग, औरंगाबाद.

40.  श्री. राजु इरपा उसेंडी, गुप्तचर अध‍िकारी,राज्य गुप्तचर  विभाग, सिरोंचा, गडचिरोली.