Tuesday 29 March 2022

Maharashtra Receives Four National Water Awards - President of India presents 3rd National Water Awards







 

New Delhi, 29: Maharashtra’sSurdi Village Panchayat, Solapur, Dapoli Nagar Panchayat, Ratnagiri,GramVikasSanstha of Aurangabad and Agrowon, Sakal Media received theNational Water Awards, for their exemplary work in the ‘Water Management’ sector, at the hands of the President, Shri Ram NathKovind, today.

An Award Ceremony instituted by the Ministry of Jal Shakti was held at VigyanBhavan, in which a total of 57 Awards in 11 categories were awarded to recognize and encourage exemplary work in the field of water management,expansion of water campaign to underline the importance of water in our daily life. The Ministry awarded the efforts made by the States, Districts, individuals, Organizations in an effort to attain the Central Government’s vision of a ‘Jal Samridh Bharat’.

The President presented the third National Water Awards and also launched the Jal Shakti Abhiyan: Catch the Rain campaign 2022 in today. Present on the occasion were Union Minister of Jal Shakti Shri Gajendra Singh Shekhawat, MoS Shri Prahlad Singh Patel and Shri BishweswarTudu along with other senior dignitaries.

            A Total of 57 Awards were distributed, in which Maharashtra State received four National Water Awards under various categories.  The Surdi Village Panchayat of Solapur received third rank in the Best Village Panchayat Category. The Dapoli Nagar Panchayat of Ratnagiri ranked second in the category of Best Urban Local Body. In the NGO category performing outstandingly well in the water management sector, the GramVikasSanstha of Aurangabad ranked third, where as in the Best Media category, the AgrowonSakal Media Private Limited bagged the second Best Award.

Dapoli Nagar Panchayat, Ratnagiri Ranks 2ndUnder ‘Best Urban Local Body’

The Dapoli Nagar Panchayat in Ratnagiri District received the second Best Award in the category of Best Urban Local Body.  Panchayat President, Smt.MamtaMore received this Award at the hands of the Union Jal Shakti Minister, Shri Gajendra Singh Shekhawat. The Award consists of a citation and a Memento.

This Panchayat has undertaken several water conservation measures, including the rejuvenation of the Nargoi Dam. For its successful interventions in water management, the Dapoli Nagar Panchayat has been awarded 2nd Prize in the Best Urban Local Body category at the 3rd National Water Awards 2020.

Surdi Village Panchayat, Solapur Ranks Third Under Best Village Panchayat

The Surdi Village in the Solapur District received the third Best Award in the category of ‘Best Village Panchayat Award’ (West Zone). Senior Social Worker, Shri MadhukarDoiphode received this prestigious Award at the hands of the Union Jal Shakti Minister, Shri Gajendra Singh Shekhawat. A Memento and a Citation was also presented at this time.

            This Village Panchayat had been facing water crisis past few years. Through public participation, a sum of Rs60 lakhs and undertook several water related activities and through the villagers perseverance and hard work, today the village is free from water crisis.

GramVikasSanstha, Aurangabad Ranks 3rdUnder Best NGO Category

GramVikasSanstha, an NGO in Aurangabad District of Maharashtra received the third Award under the Best NGO Category.  The Secretary, Shri NarhariShivpure received this Award along with a Memento and a Citation. The sansatha is working towards the goal of sustainable development with the support of various sections of the society. The main areas of thrust are water resources management, sustainable rural development, training, research, health and empowerment of women.

Agrowon, Sakal Media P. Ltd. Ranks 2ndUnder Best Media (Print & Electronics)

The second rank under the Best Media (Print and Electronics) category was awarded to the Agrowon, Sakal Media Private Limited. Agrowon isthe world’s first daily on agriculture. The Director and Editor, Shri AdinathChavan received this Award at the hands of the Secretary, Jal Shakti Department, Smt.Vini Mahajan.  The Award consists of a Citation and a Memento.

A total of 57 awards were presented in eleven categories- States, Organizations, Individuals,- Best State, Best District, Best Village Panchayat, Best Urban Local Body, Best Media (Print & Electronic), Best School, Best Institution/RWA/Religious organization for campus usage, Bes Industry, Best NGO , Best Water  User Association, and Best Industry for CSR Activity.   

 

महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान

 


                


नवी दिल्ली, दि. 29 : जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सुर्डी ग्राम पंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ग्रामविकास संस्था, औरंगाबाद या गैरसरकारी संस्थेला आणि दै. ॲग्रोवनला आज राष्ट्रीय जल पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.   

 

येथील विज्ञान भवनात आज तीस-या राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत,  केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, बिश्वेश्वर टुडू आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 याप्रसंगी 11 श्रेणीत 57 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती यांच्या हस्ते देशपातळी प्रथम क्रमांक पटकविणा-या राज्य, संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आले. उर्वर‍ित पुरस्कार केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.  महाराष्ट्राला एकूण चार राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार स्वरूप मानचिन्ह, प्रशस्ती पत्र आणि रोख रकम प्रदान करण्यात आलेली आहे.

पश्चिम झोनमधील उत्कृष्ट ग्रामपंचायत श्रेणीतील तिस-या क्रमांचा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी ग्रामपंचायतला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ग्रामपंचायतेतील ज्येष्ठ समाज सेवक मधुकर गणपत डोईफोडे आणि प्राचार्य विनायक डोईफोडे यांनी स्वीकारला.

सुर्डी या गावाने लोकसहभागातून पाण्याची उपलब्धता वाढवून दुष्काळावर मात केली आहे.  सुर्डीमध्ये एकेकाळी दुष्काळाचे सावट होते मात्र, लोकसहभागातून 60 लाख रूपये एवढा निधी जमा करून, पाण्याच्या पातळी वाढविण्यासंदर्भात कामे केली गेली. याचा परिणाम गावाबाहेर गेलेले लोक पुन्हा परत आलेत. गावाची प्रगती पूर्वीपेक्षा अधिक आहे. गाव आता सदाहर‍ित आणि उत्पन्न वाढणारे झाले असल्याचे श्री डोईफोडे यांनी सांगितले.

उत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था श्रेणीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतला दुस-या क्रमांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार, नगर पंचायत अध्यक्षा ममता बिपीन मोरे, नगर पंचायतचे पाणी पुरवठा अधिकारी स्वप्न‍िल महाकाळ  यांनी स्वीकाला. 

 दापोली येथील नारगोली धरण पुनरूज्‍जीवन  मोहीम यशस्वी करुन येथील नगरंपचायतीने लोकसहभागातून पाणी टंचाईवर मात केली त्याचबरोबर धरणाचेही मजबुतीकरण, खोलीकरण  केले. त्यामुळे आता भरपूर पाणीसाठा होत आहे. यामुळे नगर पंचायत टँकरमुक्त झाले असल्याची प्रतिक्रिया श्रीमती ममता मोरे यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर दिली.

उत्कृष्ट गैरसरकारी संस्थेच्या श्रेणीत औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्था गैरसरकारी संस्थेला आणि विवेकानंद संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला संयुक्तर‍ित्या त‍िस-या क्रमांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपूरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

ग्रामविकास संस्था मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मागील दोन दशकांपासून कार्य करीत आहे. औरंगाबादच्या दक्ष‍िणेत असणा-या  चित्ते नदी खो-यामध्ये चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियानाचे काम केले. सुरूवातीला पीण्यासाठी, शेतीसाठी, पशुधनासाठी पाण्याचा अभाव होता. जनतेच्या सकात्मक प्रतिसादातून चित्ते नदी खो-यात माथा ते पायथा असा शास्त्रीय, तांत्रिक, सामाजिक आणि आर्थिक अभ्यास करून सर्वसमावेशक आराखडा तयार करून कम्पार्टमेंट बाँईडिंग, सीसीटी, नदीपासून 17 किलो मिटरवर 25 स‍िमेंट बंधारे बांधण्यात आले. नदीचे रूंदीकरणही करण्यात आले. नदीच्या कॅचमेंट परिसरातील 29 पैकी 12 पाझर तलावातील 70 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. 2 कोटी  40 लाखाचे काम लोकसहभागातून केलेले आहे. आता या भागातील भूजल पातळी 3 ते 4 मीटर वाढली असल्याचे, श्री शिरपूरे यांनी सांगितले.

मुद्रित आणि प्रसार माध्यमांनी जल व्यवस्थापनात केलेल्या उत्कृष्ट कामांच्या श्रेणीमध्ये ॲग्रोवन, सकाळ मिडीया प्रा. ली. या संस्थेला दुस-या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ॲग्रोवन चे संपादक-संचालक आदिनाथ चव्हाण यांनी स्वीकारला.

श्री चव्हाण यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले, ॲग्रोवनच्या माध्यमातून गेल्या 16 वर्षांपासून पाण्याच्या जन-जागृतीचे काम करीत आहोत. विशेषत: शेतक-यांसाठी हे दैनिक काम करते आहे. शेतक-यांच्या शेकडो यशकथा ॲग्रोवनने प्रकाशिक केल्या आहेत. यासोबतच शेतक-यांसाठी तालुकापातळीवर परिसंवाद, चर्चासत्रे आयोज‍ित केलेली आहेत. यासह सरपंच परिषदेच्या व्यासपीठावरून जन-जागृती केलेली आहे. याची दखल घेत आज पुरस्कार मिळाला असून अंत्यत आनंद होत आहे, हा पुरस्कार शेतक-यांना अर्पण करीत आहे , अशी प्रतिक्रिया यांनी श्री चव्हाण दिली.

 

                                                           0000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर/वि.वृ.क्र. 7 / दि. 29.0.2022

Monday 28 March 2022

महाराष्ट्रातील चार मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मपुरस्कार प्रदान





स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव
नवी दिल्ली, दि. 28 : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्मपुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील चार मान्यवरांचा यात समावेश आहे.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित दिमाखदार सोहळयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देश-विदेशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण तर ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण, प्रसिध्द पार्श्व गायक सोनू निगम आणि आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना (मरणोत्तर) पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती एम.वैंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पद्म पुरस्कार वितरणाच्या आज दुस-या टप्प्यात 2 पद्मविभूषण, 5 पद्मभूषण आणि 53 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण या मानाच्या नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका आणि विदुषी म्हणून डॉ अत्रे यांचा भारतीय अभिजात संगीतात नावलौकिक आहे. ख्याल गायकीसोबतच ठुमरी , दादरा,गझल, उपशास्त्रीय संगीत,नाटय संगीत,भजन व भावसंगीत अशा संगीत प्रकारात त्यांचे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा देश-विदेशात प्रसार करण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. ‘स्वरमयी’, ‘सुस्वराली’, ‘स्वरांगिणी’, ‘स्वररंजिनी’ या संशोधनपर संगीतविषयक पुस्तकांसह ‘अंत:स्वर’ या काव्यसंग्रहाचे लेखनही त्यांनी केले आहे. कलाश्रेत्रातील योगदानासाठी त्यांना यापूर्वी पद्मभूषण (2002) आणि पद्मश्री (1990) या नागरीसन्मानानेही गौरविण्यात आले आहे.

लावणी सम्राज्ञी ज्येष्ठ लोकगीत गायिका सुलोचना चव्हाण यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या 75 वर्षांपासून त्या गायनक्षेत्रात कार्यरत आहेत. श्रीमती चव्हाण या, 1946 पासूनच हिंदी चित्रपटांमध्ये गायन करू लागल्या. ‘ही माझी लक्ष्मी’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये गायनास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी गुजराती,भोजपुरी,तामिळ,पंजाबी भाषांमध्येही भजन ,गझल असे विविध प्रकारचे गायन केले आहे.

प्रसिध्द पार्श्वगीत गायक सोनू निगम यांनाही कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. लॉर्ड ऑफ कॉर्ड्स नावाने प्रसिध्द असलेल्या सोनू निगम यांनी हिंदी, मराठीसह एकूण 10 भाषांमध्ये 4 हजार गीत गायिली आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना (मरणोत्तर) पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता आज या कार्यक्रमात त्यांच्या पत्नी वीणा तांबे यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला . डॉ. तांबे यांनी आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसार आणि संशोधनात गेल्या साडेतीन दशकांपासून अधिक काळ कार्य केले. त्यांनी आयुर्वेदिक औषधीशास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपीवरही संशोधन केले आहे. त्यांनी लाखो रुग्णांवर उपचार केले. दूरचित्रवाणीहून त्यांनी हजारो कार्यक्रमांद्वारे आयुर्वेदाचा प्रचार- प्रसार केला . त्यांनी आयुर्वेदावर 50 हून अधिक पुस्तके लिहीली आहेत.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वि.वृ.क्र. 56 / दि. 28.03.2022


 

Friday 25 March 2022

देशाच्या निर्यात क्षेत्रात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर


 

निती आयोगाचा ‘निर्यात सज्जता निर्देशांक’जाहीर

नवी दिल्ली, दि. 25 : निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने निती आयोगाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशांक-2021’ अहवालात 77.14 गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे.
देशाच्या निर्यात क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या आधारावर, निती आयोगाने आज ‘निर्यात सज्जता निर्देशांक-2021’ (Export Preparedness Index) (दुसरी आवृत्ती) जाहीर केला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव बी.व्ही.आर. सुब्रमन्यम यांच्या उपस्थितीत हा निर्देशांक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

तीन प्रमुख मानकात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर
दोन उपमानकात राज्याचा पहिला क्रमांक
या अहवालात एकूण 4 प्रमुख मानके आणि 11 उपमानकांच्या आधारावर देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्यात क्षेत्रातील प्रगती मांडण्यात आली आहे.चार पैकी तीन प्रमुख मानकांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून पायाभूत सुविधा आणि निर्यात प्रोत्साहन धोरण या उपमानकात राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

धोरणात्मक मानकामध्ये 82.47 गुण, व्यापार परिसंस्था (इकोसिस्टीम) 86.42 आणि निर्यात परिसंस्था मानकात 81.27 गुण मिळवत महाराष्ट्र या तिन्ही प्रमुख मानकात देशात दुसऱ्या स्थानावर राहिले आहे. यासोबतच निर्यात कामगिरी या प्रमुख मानकामध्ये 49.37 गुणांसह राज्य देशात तिसऱ्या स्थानावर राहिले आहे.

उपमानकांमध्येही महाराष्ट्राची उत्तम कामगिरी राहिली आहे. यातील,‘पायाभूत सुविधा’ आणि ‘निर्यात प्रोत्साहन धोारण’ या दोन उपमानकात 100 गुण मिळवत राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ‘आर्थिक सुलभता’ आणि ‘वाहतूक उपलब्धते’तही महाराष्ट्राने देशातील अग्रगण्य राज्यांमध्ये स्थान मिळविले आहे. यासोबतच व्यापार पोषक वातावरण, संस्थात्मक संरचना, निर्यातविषयक पायाभूत सुविधा, व्यापार सहाय्य,संशोधन व विकासात्मक पायाभूत सुविधा,वृध्दी व अभिमुखता, निर्यात विविधीकरण अशा उपमानकातही महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे या अहवालात नमूद आहे.
चार प्रमुख व 11 उपमानकांच्या आधारे महाराष्ट्राला 77.14 गुणांसह या निर्देशांकात दुसरा क्रमांक मिळाला आहे. 78.86 गुणांसह गुजरात पहिल्या स्थानावर आहे. यापूर्वी ‘निर्यात सज्जता निर्देशांक-२०२०’ (प्रथम आवृत्ती) मध्येही महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकाविला होता.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वि.वृ.क्र. 55 / दि. 25.03.2022

Thursday 24 March 2022

क्षयरोग रुग्णांमध्ये लक्षणीय घटीसाठी महाराष्ट्राला एक सुवर्ण तर दोन कांस्यपदक






नवी दिल्ली, दि. 24 : क्षयरोग रुग्णांमध्ये लक्षणीय घट घडवून आणणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सुवर्ण पदक तर अकोला आणि बीड जिल्हयांना आज येथे कांस्यपदक प्रदान करण्यात आले.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित “स्टेप अप टू एन्ड टीबी 2022” शिखर परिषदेत क्षयरोग रुग्णांमध्ये लक्षणीय घट घडवून आणणाऱ्या राज्य व जिल्ह्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्हा श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना सन्मानित करण्यात आले. वर्ष 2015 च्या तुलनेत वर्ष २०२१ पर्यंत क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये ६० टक्के पेक्षा जास्त घट घडवून आणणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याला यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया,राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.अहमदनगर जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवत दहीफळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पदक,५ लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या शिखर परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जिल्हा श्रेणींच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.अकोला आणि बीड जिल्ह्यांना वर्ष 2015 च्या तुलनेत वर्ष २०२१ पर्यंत क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये २० टक्के पेक्षा जास्त घट घडवून आणण्याच्या कामगिरीसाठी यावेळी कांस्यपदकाने गौरविण्यात आले. अकोल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हरी पवार आणि बीड जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पदक, २ लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे तर केंद्रीयमंत्री डॉ. मनसुख मांडविया,डॉ. भारती पवार यांच्यासह विज्ञान-तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी विज्ञानभवनात उपस्थितांना संबोधित केले.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वि.वृ.क्र. 54 / दि. 24.03.2022


 

‘उन्नती’ ने झाली प्रगती

 



महात्मा गांधी नरेगा योजनेच्या उन्नती प्रकल्पातंर्गत

महाराष्ट्रातील  6 प्रशिक्षित उमेदवार सन्मानित

 

नवी दिल्ली, दि. 24 : केंद्र शासनाच्या उन्नती प्रकल्पातंर्गत, आरसेटीच्या माध्यमातून (ग्रामीण स्वंय रोजगार प्रशिक्षण) प्रशिक्ष‍ित होऊन आर्थिकर‍ित्या  सक्षमपणे आपली आणि आपल्या कुंटुबीयांची जबाबदारी पार पाडीत असल्याच्या भावना हिंगोली जिल्ह्यातील  चिचोली येथील वंदना भगत यांनी व्यक्त केल्या. पतीचे निधन झाले. दोन मुल आहेत. शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतले आणि यातूनच संपूर्ण कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आज  दिल्लीत येऊन पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्यासह अन्य 5 प्रशिक्ष‍ित उमदेवारांना सन्मानित करण्यात आले.

 

            महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत येणा-या उन्नती या प्रकल्पातंर्गत प्रशिक्ष‍ित होऊन स्वंयरोगार करणा-या देशभरातील एकूण 75 उमेदवारांचा आज सन्मान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील  6 उमेदवारांचा समावेश आहे.

येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय सभागृह मध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या उन्नती प्रकल्पातंर्गत प्रशिक्ष‍ित होऊन स्वंयरोजगार सुरू करणा-या 75 उमेदवारांना सन्मानित करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 या कार्यक्रमात केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह ग्रामीण विकास राज्य मंत्री साध्वी निरंजन ज्योती, श्री फग्गन सिंह कुलस्ते आणि पंचायती राज राज्य मंत्री श्री कपिल मोरेश्वर पाटिल यांचयासह  सचिव (ग्रामीण विकास) श्री नागेंद्र नाथ सिन्हा आणि संयुक्त सचिव (महात्मा गांधी नरेगा) श्री रोहित कुमार उपस्थित होते.

आज झालेल्या कार्यक्रमात उन्नतीच्या माध्यमातून प्रशिक्षित उमेदवारांनी आपले मनोगत मंचावरून मांडलेत.  त्यांच्या आयुष्यात या घेतलेल्या प्रशिक्षणातून झालेला बदल अतिशय सकात्मक असा आहे.

उन्नती  प्रकल्पाविषयी

उन्नती प्रकल्प हा कौशल्यावर आधारीत प्रशिक्षण देणारा प्रकल्प आहे. यातंर्गत महात्मा गांधी नरेगा लाभार्थ्याांना आरसेटी(ग्रामीण स्ंवय रोजगार प्रशिक्षण)च्यामाध्यमातून कौशल्य आधारीत प्रशिक्षण देऊन ज्ञान आणि आजीविकेमध्ये वाढ व्हावी असे प्रयत्न करते. यामुळे आंशिक रोजगारामधून पूर्णकालीन रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केला जातो. उन्नती अंतर्गत आतापर्यंत एकूण 18,166 उमेदवारांना प्रशिक्षित केले आहे.

महात्मा गांधी नरेगा योजने अंतर्गत त्यांना एक वर्षा मागे 100 दिवस रोजगार पूर्ण केले असेल अशा  कुटूबांतील एका प्रौढ (18-45वयोगटातील) व्यक्तीला प्रशिक्षण दिले जाते.  

महाराष्ट्रातील 5 प्रशिक्ष‍ित उमेदवारांविषयी

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पंचायत समितीच्या लाभार्थी मनिषा बोचरे या जीजामाता महिला बचत गटाच्या आहेत.  त्यांनी शेळीपालनचे प्रशिक्षण आरसेटी(ग्रामीण स्वंय रोजगार प्रशिक्षण )च्या माध्यमातून घेतले. त्यांच्याकडे एक बोकड आणि  10 शेळी आहेत. त्यांच्या लेंडयांचे लेंडी खत तयार करून विकतात. गरजेच्यावेळी शेळी विकताही येते. यापासून चांगला कुटूबांचा उदरनिर्वाह होतो. आज मिळालेल्या पुरस्काराबद्दल खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगीतले.

परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथील मुंजाजी शिवणकर हे मनरेगामध्ये मजूर म्हणून काम करतात मजूरीतील रकमतून काटकसर करून म्हैस विकत घेतली. पुढे दोन म्हशी झाल्यात त्याचे दूध विकून उदरनिर्वाह करीत असे आरसेटीमधून म्हशीच्या शेणापासून गांडूळ खत बनविण्याचे प्रशिक्षिण दिले. त्याचा लाभ होतो आहे. दररोजचे 2000 ते 25000 रूपये म्हशींच्या दूधापासून उत्पन्न मिळत. संपूर्ण कुटूबांचे पालनपोषण चांगल्यारीतीने होत असल्याचे अनुभव मांडलेत.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील दिनेश गावंडे यांनाही आज पुरस्कार मिळाला. त्यांनी गुलाबराव बचत गट सुरू करून यामध्यमातून ते रोपवाटिका चालवितात. यांनी आरसेटी मधून रोपावाटिकेचे प्रशिक्षण घेतले. रोपवाटिकेमध्ये फळ झाडे, फुल झाडांच्या 150 कलमा उपलब्‍ध असल्याचे त्यांनी सांगीतले. सुरूवातीला 2 गुंटे जमीन होती. आता 2 एकरामध्ये रोपावाटिका असल्याचे सांगीतले, या सर्व प्रवासात शासनाकडून मिळालेल्या मदतीबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले.

ओंकार जाधव हा तरूण मुलगा कोल्हापूर जिल्ह्यातील गंधीनलाल येथील आहे. त्यांचा पिढीजात दुग्ध व्यवसाय आहे. त्यात फारसा काही आर्थिक फायदा होत नसल्याचे दिसल्यावर त्यांनी आरसेटीकडून प्रशिक्षण घेतले. यामुळे वैरणाचा दुर्पयोग न होता पुरेपूर वापर होऊ लागला. आणि उत्पन्नात भरघोस वाढ झाल्याचे सांगितले.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील अंबादास मेरगल यांनाही उन्नती अंतर्गत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार होते परंतु ते आज  उपस्थित नव्हते.

आजच्या पुरस्कार सोहळयासाठी उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र अहिरे, पुण्याचे विस्तार अधिकारी किरण मोरे, सहायक राज्य एमआयएस रविद्र भुते,  , सहायक कार्यक्रम अधिकारी सतीश घोडके लाभार्थ्यांसह उपस्थित होते.

 

        आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                              00000

अंजू निमसरकर/22-03-2022

Wednesday 23 March 2022

राजधानीत शहीदांना अभिवादन






 नवी दिल्ली, दि. 23 : भारतीय स्वातंत्र्य लढयात महत्वाचे  योगदान देणारे शहीद भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आज शहीद दिनानिमित्त महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथे अभिवादन करण्यात आले.

            कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव समीर कुमार बिस्वास  यांनी  शहीद भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे,सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार  यांच्यासह  महाराष्ट्र  सदनाच्या  अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

                          महाराष्ट्र परिचय केंद्रात शहीदांना अभिवादन   

            महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात शहीद भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आज अभिवादन करण्यात आले. परिचय  केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा  यांनी  शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू  निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार  यांच्यासह  उपस्थित  कर्मचा-यांनी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.                           

                                                         0000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

वि.वृ.क्र. ५२ / दि. २३.0.2022