Saturday 30 July 2016

छत्रपति शिवाजी अंतरराष्ट्रीय हवाईअड्डे को राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार




नई दिल्ली, 30 जुलाई : पर्यटन को बढ़ावा देने की दृष्टि से उत्कृष्ट सेवा प्रदान करने हेतु मुंबई के छत्रपति शिवाजी अंतरराष्ट्रीय हवाईअड्डे को राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार से नवाजा गया। यह पुरस्कार लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन के हाथो प्रदान किया गया।
शनिवार को यहां विज्ञान भवन में केंद्रीय पर्यटन मंत्रालय की ओर से आयोजित कार्यक्रम में यात्रा, पर्यटन और आवभगत उद्योग के विभिन्न खंडो के लिए वर्ष 2014-15 के लिए राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार सम प्रदान समा प्रदान किए गए। इस मौके पर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा,समारोह का आयोजन पर्यटन विभाग की ओर से विज्ञान भवन में किया गया था.
कार्यक्रम में राज्य के छत्रपति शिवाजी अंतरराष्ट्रीय हवाईअड्डे को देश के महानगरों के हवाईअड्डों में से पर्यटन को बढावा देने की दृष्टि से उत्कृष्ट सेवा प्रदान करने के लिए आज पुरस्कृत किया गया। छत्रपति शिवाजी अंतरराष्ट्रीय हवाईअड्डे के कारपोरेट व्यवहार विभाग के महानिदेशक राहुल बैनर्जी तथा मार्केटिंग के उपाध्यक्ष रवीन पिटों ने यह पुरस्कार स्वीकार किया।
छत्रपति शिवाजी अंतरराष्ट्रीय हवाईअड्डा देश के मध्य, दक्षिण तथा पश्चिम में स्थित महानगरों को जोडता है। इस हवाईअड्डे से रोजना लगभग 190 विमानों की आवाजाही होती है। देश-विदेश के करीब 85 स्थानों के लिए यह हवाईअड्डा काफी सुविधाजनक है।
महाराष्ट्र के केसरी टूर्स को पुरस्कार
देश का स्वर्ग कहे जाने वाले कश्मीर में वर्ष 2014-15 में सर्वाधिक संख्या में पर्यटकों को ले जाने के लिए केसरी टूर्स को पुरस्कृत किया गया। केसरी टूर्स के संस्थापक केसरी पाटिल तथा सुनिता पाटिल यह पुरस्कार स्वीकार किया। केसरी टूर्स ने 2014-15 में 7481 पर्यटकों को जम्मू-कश्मीर की सैर कराई है।  केसरी टूर्स को लगातार दूसरे साल भी यह पुरस्कार हासिल हुआ है।
महाराष्ट्र के सुपूत्र शेफ मच्छिन्द्र कस्तुरे सम्मानित
स्वादिष्ट खाना बनाना यह एक कला है और कलाकार होने के नाते कला को विकसित करते रहना मेरा कर्तव्य है। देश के उत्कृष्ट शेफ के रुप में गौरवांवित शेफ मश्छिन्द्र कस्तुरे ने यह बात पुरस्कार प्राप्त करने के बाद अपनी प्रतिक्रिया देते हुए कहीं। मच्छिन्द्र कस्तुरे मूल रुप से पुणे के रहने वाले है। 1980 के दशक में उन्होने होटल व्यवस्थापन क्षेत्र में पदार्पण किया। विभिन्न जगहों पर काम कर चुके कस्तुरे भारतीय पर्यटन विकास महामंडल में शेफ के तौर पर काम करने का मौका मिला. उन्होंने कई जगह काम किया.
दिल्ली स्थित अशोक होटल में तबादला होने के बाद उन्हे अपनी कला को निखारने का और एक मौका मिल गया। कस्तुरे पहले ऐसे व्यक्ती जिन्होने राष्ट्रपति भवन में मुख्य शेफ के तौर पर काम किया किया है। वहां उन्होने अद्यावत किचन तंत्र विकसित किया। राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय मेजबानों की मेजवानी की। उन्होने यहां 208-2014 तक जिम्मेदारी संभाली।

छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार





नवी दिल्ली 30 : पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल  छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाला वर्ष 2014-15 चा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
        विज्ञान भवनात आज केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2014-15 चा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा  विभाचे सचिव तसेच ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.
        राज्यातील छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळा ला देशभरातील महानगराच्या विमानतळामधून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल आज पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाचे कॉरपोरेट व्यवहार विभागाचे महाव्यवस्थापक राहूल बॅनर्जी आणि एरो मार्केटींगचे उपाध्यक्ष रवीन पिंटो यांनी स्वीकारला.
छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील मध्य, दक्षिण आणि पश्चिममध्ये    असणा-या 29 शहरांना जोडते. या विमानतळावरून  दररोज जवळपास 190 विमानांची ये-जा होते. देश-विदेशातील 85 ठिकांणासाठी छत्रपती शिवाजी अतंरराष्ट्रीय विमानतळ प्रवाश्यांना सोयीस्कर होते. पर्यटनाचा विचार करता हे विमानतळ देश-विदेशातील पर्यटकांसाठी आवडते विमानतळ आहे.
  
विविध श्रेणीत महाराष्ट्रातील केसरी टूर्सला  पुरस्कार
        भारताचे नंदनवन असणा-या काश्मीरामध्ये सर्वाधिक पर्यटक वर्ष 2014-15 मध्ये  घेऊनसाठी  केसरी टूर्स ला पुरस्कृत करण्यात आले. केसरी टूर्सचे संस्थापक केसरी पाटील आणि सूनिता पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यांनी 2014-15 मध्ये 7481 पर्यटकांना काश्मीरची सहल घडविली आहे. हा पुरस्कार त्यांना सलग दुस-या वर्षी मिळाला आहे.

महाराष्ट्राचे सुपूत्र शेफ मच्छिंद्र कस्तूरे यांचा सन्मान
        जेवण बनविणे ही कला आहे आणि कलाकार म्हणून कलेला विकसीत करत राहणे माझे कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रीया देशातील उत्कृष्ट शेफ म्हणून पुरस्कृत झालेले शेफ मच्छींद्र उमाकांत कस्तुरे कार्यकारी शेफ, द अशोका हॉटेल यांनी दिली.
मच्छींद्र कस्तूरे हे मुळचे पुण्याचे आहेत. 1980 च्या दशकात हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रात शिरून या क्षेत्रातील विविध ठीकाणी काम करून भारत सरकारच्या भारतीय पर्यटन विकास मंहामडळात शेफ म्हणून रूजू झाले आणि येथून श्री कस्तूरेच्या कारकीर्दीला नवीन वळण लागले, पर्यटन विकास मंहामंडळ अंतर्गत येणारे बिहार, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्रातील हॉटेल्समध्ये काम केले.

दिल्ली येथील अशोका हॉटेलमध्ये बदली झाली आणि श्री कस्तूरे यांना आणखी एक संधी मिळाली. राष्ट्रपती भवनात मुख्य शेफ म्हणून काम करण्याची. श्री कस्तूरे हे प्रथम असे शेफ आहेत ज्यांनी राष्ट्रपती भवनात काम केले. तीथे त्यांनी अद्यावत किचन यंत्रणा उभारली. राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय पाहुण्यांसाठी मेजवाणी त्यांनी केलेली आहे. राष्ट्रपती भवनात श्री कस्तूरे यांनी चीफ शेफ म्हणून 2008 ते 2014 पर्यंत काम केले आहे. 

Friday 29 July 2016

इंदू मिल स्मारक : राज्यमंत्री आठवले यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली दि 29 -- इंदुमिलमधील उभारण्यात येणाऱ्या   डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे  काम त्वरित मार्गी लागण्यासाठी इंदुमिलमधील सर्व जमीन राज्यशासनाकडे त्वरित हस्तांतरित करावी व हे समारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे
व्हावे अशी मागणी  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन केली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांचे लंडन मधील घराचे लोकार्पण झाल्यानंतर त्या स्मारकाची काळजी घेणारे  व तेथे भेट देणाऱ्यांसाठी ते स्मारक नेहमी खुले राहावे यासाठी तेथे  केअरटेकर नियुक्त करण्यात यावे  अशी  सूचना आठवले यांनी  यावेळी झालेल्या चर्चेत केली

Wednesday 27 July 2016

Implementation of the schemes should be people-oriented -Chief Secretary Swadheen Kshatriya















New Delhi 27 :
 The right combination of information of Central Government’s Socio-Economic Survey and the Adhaar would make the government schemes more people-oriented, said Chief Secretary of Maharashtra Government while participating in a National Conference Organised by NITI AAYOG.

NITI (National Institution for Transformation of India) AAYOG had organized a National Conference of Chief Secretaries and Planning Secretaries of all the states and union territories at Vigyan Bhawan in New Delhi. Kshatriya was speaking in this conference. Additional Secretary of Planning Department of Maharashtra Sunil Porwal, Resident Commissioner and Secretary Abha Shukla, Investment and Protocol Commissioner Lokesh Chandra were also present for the conference.

Comprehensive information is necessary before implementing any scheme, for which there is a need to make a right combination of information generated through Socio-Economic Survey of Central Government with the Adhaar. This would ensure benefits of government schemes to percolate to the last beneficiaries.

There is a need for exchanging the success stories of implementation of various schemes by different states through such conference being organised every six months. He said the Video-conferences by the Prime Minister help a great degree to address the problems related to the schemes.

Kshatriya informed the participants in the conference about various schemes and projects being implemented in the state. This included the State Government deciding to construct 5,000 lakes through people’s participation after successful implementation of ‘Jalyukt Shiwar’ scheme. He told that there a big number of local people in the state are being benefitted by Jalyukt Shiwars this year. Apart from this, services are being provided to the citizens through public services delivery act and Aaple Sarkar initiatives, he said.

Taking a step ahead the state administration has decided to exclude the requirement of attestation of documents through a gazatted officer and replacing it by self attestation. This has minimised public inconvenience. Laks of citizens are disbursed with variety of certificates and documents through different camps being organised by the Revenue Department. He also informed that the State Government has created a facility that ensures the school students to get all their documents and certificates in the future without applying for them.

State Government is also taking efforts to reduce the burden of long time pending cases with the courts.

Several fundamental questions were discussed in details during this conference. This includes scheme based expenses and other expenses. Several other issues like changing the financial year, evaluation of the schemes, rate of growth, five years plans and finance commission were discussed during this conference.

योजनांची अंमलबजावणी लोकाभिमूख असली पाहीजे- मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय





















नवी दिल्ली 27, केंद्र शासनाच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणातील माहिती व आधार’ यांची एकत्र सांगड घातल्यास शासकीय योजना लोकाभिमूख होतील, अशी सूचना महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी निती आयोगाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय परीषदेत केली.
            विज्ञान भवन येथे निती आयोगाच्यावतीने (नॅशनल इंस्टीटयुट फॉर ट्रान्सफारमींग इंडियासर्व राज्यांचे तसेच केंद्र शासित प्रदेशांचे मुख्य सचिव तथा नियोजन सचिव यांची राष्ट्रीय परीषद आयोजित करण्यात आली होती. या परीषदेत श्री क्षत्रिय बोलत होते. यावेळी राज्याचे नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, गुंतवणुक तथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र उपस्थित होते.
            कोणतीही योजना राबविण्यासाठी परिपूर्ण माहितीची आवश्यकता असते, यासाठी केंद्र शासनाच्या सामजिक व आर्थिक सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती व आधार यामधील माहिती याची एकत्र सांगड घालण्याची आवश्यकता आहे. यामुळे शासकीय योजनांचा लाभ हा शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यात मदत होणार आहे.
            विविध राज्याने राबविलेल्या यशस्वी योजनांचे आदान प्रदान दर सहा महिण्यांनी राष्ट्रीय परीषद घेऊन झाले पाहिजे. पंतप्रधानांव्दारे घेण्यात येणा-या व्हिडीयो कांन्फरसिंगमुळे योजनांमध्ये असणा-या समस्यांचा निपटारा लवकर लवकर  होत असल्याचे म्हणाले.
            श्री क्षत्रिय यांनी राज्यातील विविध यशस्वी योजना व प्रकल्पांची माहितीही यावेळी दिली. यामध्ये जलयुक्त शिवार’ योजनेतंर्गत दर वर्षी लोकसहभागातून राज्यात 5000 तळे बांधण्याचे निश्चीत केले आहे. यावर्षी राज्यात जलयुक्त शिवारांमुळे स्थानिक लोकांना फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यासह सेवा हमी कायदा, आपले सरकार यामाध्यमातून नागरीकांना सेवा पुरविली जात आहे असेही सांगितले.
राज्य शासनाने एक पाऊल पुढे टाकत राजपत्रित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची आवश्यकता वगळून स्वत: कागदपत्रे प्रमाणित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सामान्य नागरीकांची गैरसोय टळत आहे. राजस्व विभागातर्फे वेळोवेळी राबविण्यात येणा-या शिबीर अभियानाव्दारे लाखो नागरीकांना विविध दाखले दिले जातात. यासह शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यात असणारे सर्व कागदपत्रे अर्ज न करता मिळत असल्याच्या सूविधा राज्यशासनाने निर्माण केल्या आहेत, अशी माहिती दिली.
            राज्यशासन फेरफार  न्यायालयच्या माध्यमातून ब-याच कालावधीपासून प्रलंबीत असणारे प्रकरणे लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे.

            यावेळी अनेक मुलभूत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये योजना आधारीत खर्च व इतर खर्च, आर्थिक वर्ष बदलण्याबाबत, योजनांचे मुल्यमापन, विकास दर, पंचवार्षीक योजना, वित्त आयोगासंदर्भातील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. 

Monday 25 July 2016

राष्ट्रपती भवनात नवीन हायटेक संग्रहालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन






नवी दिल्ली, 25 :  राष्ट्रपती भवनातील परिसरात नवीन हायटेक संग्रहालयाचे उदघाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी राष्ट्रपती प्रतीभा देवीसिंह पाटील, उपराष्ट्रपती महमंद हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्यासह केंद्रीय मंत्री व गणमान्य उपस्थित होते.
        उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान म्हणाले, इतिहास, कला, संस्कृती यांचे अद्यावत तंत्रज्ञानाच्या सहायाने चित्रण करून हे संग्रहालय बनविण्यात आले आहे. संग्रहालय बनवितांना शास्त्रोक्त पद्धतीचा उपयोग करण्यात आला आहे. या माध्यमातून इतिहासाला पुनर्जीवीत करण्यात आले असून हे संग्रहालय भारतीयांसाठी दिशा दर्शक ठरेल, असे गौरवोदगार त्यांनी यावेळी काढले. राष्ट्रापतींनी हे संग्रहालय उभारण्यासाठी  घेतलेल्या पुढाकाराबद्दल श्री मोदी यांनी श्री मुखर्जी यांचे अभिनंदन करून राष्ट्रपती पदाची चार वर्षे आज पूर्ण झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
8 ऑक्टोंबर 2014 ला 88 वर्ष पूर्ण झालेल्या राष्ट्रपती भवनाच्या दुस-या टप्प्यातील संग्रहरलयाचा पाया ठेवण्यात आला होता. या संग्रहालयाचे क्युरेटर सरोज घोष हे आहेत.
हे अत्याधुनिक संग्रहालय 10,000 वर्ग मीटर क्षेत्रफळामध्ये बांधलेले आहे. यामध्ये आतापर्यंतच्या राष्ट्रपतींना मिळालेल्या अनमोल भेट वस्तू ठेवलेल्या आहेत. या संग्रहालयाचा प्रथम टप्पा ऑगस्ट 2014 मध्ये जनतेसाठी खुला करण्यात आला. विविध मौल्‌यवान वस्तू, चित्र, ऐतिहासिक दस्ताऐवज दर्शविण्यात आले आहेत.
या संग्रहालयात राष्ट्रपती भवनाचा इतिहास, ब्रिटिश व्हाईसराय, स्वातंत्र्य आंदोलनाचे मुख्य टप्पे,  भारतीय गणराज्याची स्थापना, संविधान निर्मिती, आतापर्यंतच्या 13 राष्ट्रपतींचा जीवन परीचय, त्यांची  कार्यशैली, महत्वपूर्ण अतिथींची माहिती, राष्ट्रपती भवनाचा परीसर,  आजुबाजूचे वातावरण, तीथे काम करणारे लोक या सर्वाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

Saturday 23 July 2016

लोकमान्य टिळक यांनी जाज्वल्य राष्ट्रभक्ती जागृत केली : सुकृत खांडेकर












               लोकमान्य टिळक यांची 160 वी जयंती राजधानीत साजरी
नवी दिल्ली, 23 : लोकमान्य टिळक यांनी पारतंत्र्याच्या काळात भारतीयांमध्ये जाज्वल्य राष्ट्रभक्ती निर्माण केली, असे प्रतिपादन केसरी वृत्त पत्राचे कार्यकारी संपादक सुकृत खांडेकर यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकमान्य टिळक यांची 160 वी जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी श्री खांडेकर बोलत होते. यावेळी परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, पत्रकार कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थिातांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण अभिवादन केले.
जवळपास शंभर सवाशे वर्षापूर्वी देश  पारतंत्र्यात असतांना लोकमान्य टिळक यांनी ब्रिटीशांच्या विरोधात तत्कालीन परिस्थितीत केलेले आंदोलन भारतीयांना सदैव स्फूर्ती देयक राहील. शिक्षक, सामाजिक क्षेत्रात, पत्रकार, या सर्वच क्षेत्रात टिळकांनी काम केले असून या प्रत्येक क्षेत्रातून राष्ट्रभक्तीचा संदेश दिला असल्याचे श्री खांडेकर म्हणाले.
टिळकांची प्रत्येक कृती ही आरचणीय आहे. विपरीत परिस्थितीत मनोबल न ढासळता जिद्दीने सतत काम  करत राहण्याची प्रेरणा लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तीत्वातून मिळते. त्यांच्या हयातीतच  टिळकांना मोठेपण लाभले. त्यामुळेच देशभरात लोकमान्य टिळकांच्या प्रतिमा त्यांच्या नावाच्या संस्था, मंडळे आहेत व सर्व भारतभर त्यांची जयंती मोठया उत्साहाने साजरी केली जाते, असेही श्री खांडेकर म्हणाले.
आज लोकप्रिय असणारी राजकीय पत्रकारीतेचा पाया हा लोकमान्य टिळकांनी रचला असल्याचे, उपसंचालक  दयानंद कांबळे म्हणाले.  संपादक म्हणून संपूर्ण जबाबदारी स्वीकारून वेळे प्रसंगी तुरूंगवासही सहन करणारे असे टिळकांचे ठाम व्यक्तीमत्व होते. त्यांनी सुरूवात केलेल्या प्रखर पत्रकारितेमुळे ब्रिटीश सरकारही घाबरले होते. वाचकांशी पत्रव्यवहार, संवाद आणि पारतंत्र्यांची प्रखर जाणीव त्यांच्या लेखातून दिसून येत होती. देशाभिमान, स्वदेशीचा वापर, सार्वजनिक गणेशात्सावाच्या माध्यमातून लोकजागृती अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या, त्यांची संपूर्ण जीवनगाथा आजही प्रेरणास्त्रोत असल्याचे श्री कांबळे यांनी सांगितले.

महाराष्ट्र सदनात लोकमान्य टिळकांना अभिवादन



कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांनी लोकमान्य टिळक यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Friday 22 July 2016

महाराष्ट्रात 2 लाख कोटींचे रस्ते बांधणार- नितीन गडकरी


नवी दिल्ली दि.22 : येत्या 5 वर्षात महाराष्ट्रात 2 लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधण्यात येतील. भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी यावर्षाच्या वार्षिक योजनेत 50 हजार कोटी रुपये मंजूर केले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुध्दा 50 हजार कोटींचे नियेाजन तयार केले आहे. पालखी महामार्गासाठी 6 हजार कोटी रुपयांची तरतूदही लवकरच केली जाईल,अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली.
येथील परिवहन भवनात आज महाराष्ट्रातील प्रलंबित महामार्ग व जमीन अधिग्रहन यासंबंधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधला. यावेळी श्री गडकरी यांनी महाराष्ट्रातील 1 हजार 9 किलो मीटर लांबीच्या रस्ते बांधकामाबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी श्री गडकरी म्हणाले, महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहण प्रक्रिया युध्द पातळीवर हाती घ्यावी. जमीन अधिग्रहणासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्राला यापूर्वीच 4 हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्यासाठी अधिक निधी लागल्यास तोही देण्यात येईल असे श्री गडकरी यांनी यावेळी सांगितले.
पालखी मार्गासाठी 6 हजार कोटी रुपये
महाराष्ट्रासाठी पंढरपूरची वारी हा श्रध्देचा विषय आहे,यासाठी पालखी महामार्ग तयार होणे गरजेचे आहे. या पालखी महामार्गासाठी 6 हजार कोटी रुपये केंद्र शासनमार्फत तात्काळ देण्यात येतील, या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल ही तातडीने तयार करण्यात येईल,अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. देहु रोड ते पंढरपूर व आंळदी ते पंढरपूर या 500 किलोमीटरच्या चौ पदरी पालखी मार्गासाठी राज्यशासनाने जमीन अधिग्रहण तात्काळ सुरु करावे. या महामार्गाचा आराखडा तयार आहे असेही श्री गडकरी यांनी यावेळी सांगितले .
नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी 8 हजार कोटी रुपये
“नागपूर-सोलापूर-रत्नागिरी” या 8 हजार कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाबाबत राज्यशासनाने जमीन अधिग्रहण प्रक्रिया युध्द पातळीवर सुरु करावी. हा महामार्ग रत्नागिरी येथून सुरु होऊन कोल्हापूर,सांगली,सोलापूर, उस्मानाबाद,औसा, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा या जिल्हयांतून जाऊन नागपूर येथे संपणार आहे.या महामार्गामुळे विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र व कोंकण या विभागांना लाभ होणार आहे, हे लक्षात घेऊन जमीन अधिग्रहण प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असे श्री गडकरी यांनी यावेळी सांगितले.
नागपूर-रत्नागिरी या महामार्गाअंतर्गत 1) नागपूर-बुटीबोरी(28.8किमी.) 2) बुटोबोरी-वर्धा(59.19किमी.) 3) वर्धा-यवतमाळ(64.92 किमी) 4) यवतमाळ-महागाव(80.19किमी.) 5) महागाव-वारंगा (66.88किमी.) 6) वारंगा-लोहा(67.56किमी.) 7)लोहा-चाकुर (62.20किमी.) 8)चाकुर-औसा(58.76किमी.) 9)औसा-तुळजापूर(67.42किमी.) 10) तुळजापूर-सोलापूर (46.00किमी.) 11) सोलापूर-सांगली (195.15किमी.) 12) सांगली-कोल्हापूर (76.10किमी.) 13) कोल्हापूर-रत्नागिरी (137.28किमी.) असे एकूण 1 हजार 9 किलोमीटर लांबीच रस्ता तयार होणार आहेत.
2 हजार 400 हेक्टर जमीन अधिग्रहण होणार
नागपूर-रत्नागिरी या महामार्गाअंतर्गत राज्य शासनाला 2 हजार 400 हेक्टर जमीन अधिग्रहण करावी लागणार आहे. या अधिग्रहणासाठी लागणारा निधी केंद्र शासन देण्यास तयार आहे. राज्य शासनाने जमीन अधिग्रहण प्रक्रीया व वन विभागाशी संबंधीत विषयांबाबत तात्काळ कार्यवाही करावी, जेणेकरुन या महामार्गाच्या बांधकामासाठी केंद्र शासन आवश्यक निधी उपलब्ध करुन देईल, असे ही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
पनवेल-इंदापूर रस्त्यासाठी 560 कोटी रुपये
महाराष्ट्रासाठी यापूर्वी 4 हजार 200 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे नियोजन होते, आता 22 हजार कि.मी. लांबीचे महामार्ग तयार करण्यात येणार आहेत अशी माहिती देऊन श्री गडकरी म्हणाले पनवेल-इंदापूर या रस्त्यासाठी स्टेट बँकेने 560 कोटी रुपये देण्याचे मान्य केल्यामुळे लवकरच या रस्त्याच्या बांधकामास सुरुवात केली जाईल. कोल्हापूर-सांगली या रस्त्याच्या कामासंदर्भात लवकरच मार्ग काढला जाईल असे श्री गडकरी यांनी सांगितले .
सागरी महामार्गासाठी महाराष्ट्राने प्रस्ताव पाठवावा
महाराष्ट्रातील सागरी ‍किना-यालगत जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा पर्यटकांचे आकर्षण ठरु शकेल. केंद्र शासन सागरी महामार्गासाठी लागेल तेवढा निधी देण्यास तयार आहे, यासाठी महाराष्ट्राने सागरी महामार्गासाठी प्रस्ताव तयार करावा अशी सूचना श्री गडकरी यांनी यावेळी केली.

माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट





                           
नवी दिल्ली दि. २२ : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.  

            परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी डॉ. राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी श्री. कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती दिली. डॉ. राऊत यांना महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना  डॉ. राऊत  यांनी भेट देऊन माहिती घेतली .  

                                                                     000000 


Thursday 21 July 2016

सर्वाधिक ध्वज दिन निधी संकलन के लिए महाराष्ट्र पुरस्कृत



सर्वाधिक ध्वज दिन निधी संकलन के लिए महाराष्ट्र पुरस्कृत

नईदिल्ली,21: महाराष्ट्र को सर्वाधिक ध्वज दिन निधी संकलन के लिए गुरुवार को पुरस्कृत कि गया। केंद्रीय रक्षामंत्री मनोहर पर्रिकर ने यह पुरस्कार प्रदान किया गया, जिसे राज्य के कौशल विकास एवं पूर्व सैनिक कल्याण मंत्रीसंभाजी पाटिल ने स्वीकार किया।
यहां के विज्ञान भवन में केंद्रीय सैनिक बोर्ड की 30 वीं  बैठक  आयोजित की गई थी। इस दौरान यह पुरस्कार प्रदान कियागया। इस मौके पर केंद्रीय रक्षा मंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे तथा अन्य वरिष्ठ अधिकारी मौजूद थे। राज्य की ओर से राज्यमंत्री संभाजी पाटिल, सचिव श्यामलाल गोयल, केंद्रीय सैनिक बोर्ड महाराष्ट्र के निदेशक सुहास जतकर भी मौजूद थे।
उल्लेखनीय है कि महाराष्ट्र ने वर्ष 201516 में सर्वाधिक 28 करोड़ से भी अधिक ध्वज निधी संकलित किया है। राज्य के कैबिनेट मंत्री श्री पाटिल ने कहा कि इस निधी को संकलित करने का लक्ष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में बनाई गई योजना से ही प्राप्त हो सका है।
इस मौके पर श्री पाटिल ने बताया कि राज्य में सेवानिवृत्त सैनिकों को अन्य सेवाओं में 15 प्रतिशत आरक्षण दिया जाता है। राज्य सरकार की ओर से सेवा निवृत्ति के 1 से 2 व र्ष पूर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोग तथा अन्य कौशल विकास प्रशिक्षण दिया जाता है। इसका मुख्य उद्देश यही है कि वे सेवा निवृत्ती के बाद भी वे मुख्य प्रवाह में बने रहे।

कौशल विकास का पश्चिमी केंद्र नागपुर में स्थापित होगा
कौशल विकास का पश्चिमी केंद्र नागपुर में स्थापित होगा। यह जानकारी आज राज्य के कौशल विकास मंत्री संभाजी पाटिल निलंगेकर ने महाराष्ट्र सदन में आयोजित संवाददाता सम्मेलन में दी। इस केंद्र में महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश के अलावा केंद्र शासित दीव व दमण तथा दादरा नगर हवेली इन राज्यों का समावेश होगा।
महाराष्ट्र सूचना केंद्र को दी भेंट

राज्य के कौशल विकास मंत्री संभाजी पाटिल ने आज महाराष्ट्र सूचना केंद्र को भेंट देकर इसके अंतर्गत हो रहे कार्य की सराहना की। केंद्र के उप-निदेशक दयानंद पाटिल ने शॉल तथा पुष्पगुच्छ देकर उनका स्वागत किया। इस दौरान उन्होने केंद्र द्वारा जारी गतिविधियों की जानकारी ली।