Tuesday 31 October 2023

राजधानीत सरदार पटेल यांची जयंती साजरी आणि इंदिरा गांधी यांना स्मृतीदिनी अभिवादन





नवी दिल्ली, 31 : देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली तर देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमातनिवासी आयुक्त   तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . यावेळी सहायक निवासी आयुक्त  डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी -कर्मचारी  उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून तर इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून पाळण्यात येते. यावेळी निवासी आयुक्त  तथा प्रधान सचिव श्री. रुपिंदर सिंग यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांना  राष्ट्राची एकात्मताअखंडता व सुरक्षा अबाधित राखण्याची शपथ दिली.

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात सरदार पटेल जयंती साजरी  

इंदिरा गांधी यांना स्मृतीदिनी अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली  व इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिन अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.  यावेळी प्रभारी उपसंचालक (माहिती ) अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित कर्मचा-यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

0000000000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 196दि.31.10.2023


 

Saturday 28 October 2023

'माझी माती माझा देश' उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातून अमृत कलश यात्रा दिल्लीत दाखल



नवी दिल्ली, 28:  'मेरी माटी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश' अभियानांतर्गत महाराष्ट्रातील  विविध गावांमधून  एकत्र  केलेल्या मातीचे  अमृत कलश यात्रा आज दिल्लीत   निजामुद्दीन रेल्वे स्टेशन वर दुपारी 2.30 वाजता दाखल झाली.


याबाबतचा राज्यास्तरीय सोहळा शुक्रवारी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थीतीत ऑगस्ट क्रांती मैदानावर पार पडला होता.

 

 अमृत कलश यात्रेसाठी राज्यातून 414 कलश घेऊन आलेल्या 881 स्वयंसेवकांची अमृत कलश यात्रा विशेष रेल्वेने  शुक्रवारी  मुंबई सेंट्रल रेल्वे येथून दिल्लीकडे मार्गस्थ झाली होती.  मुख्यमंत्री यांनी या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.

 

अमृत कलश यात्रा आज दिल्लीत निजामुद्दीन येथे दाखल झाली. यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार व दिल्लीत दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेने स्वयंसेवकांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्यने दिल्लीस्थित मराठी बांधव मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

 

देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ सुरु करण्यात आलेल्या देशव्यापी मेरी माती मेरा देश मोहिमेची सांगता 31 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. देशभरातून  गोळा केलेले अमृत कलश दिल्लीतील कर्तव्यपथ इथल्या अमृतवाटिका इथे संकलित करून समारंभपूर्वक स्थापन केले जाणार आहेत.  यावेळी सांस्कृतिक  कार्यक्रम आणि ध्वनिसंगीताचा समारंभ होणार आहे.

 

00000000000000

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 193, दि.28.10.2023

राजधानीत महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

नवी दिल्ली, 28: महर्षी वाल्मिकी यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंह यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार उपस्थित होत्या. या प्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 0 0 0 0 0 आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.192 / दिनांक 28.10.2023

Friday 27 October 2023

'मेरी माटी मेरा देश' अभियान के तहत अमृत कलश यात्रा का महाराष्ट्र राज्य स्तरीय समारोह मातृभूमि के प्रति प्रेम और संस्कृति के प्रति सम्मान महत्वपूर्ण है -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नई दिल्ली, दि. 27: छत्रपती शिवाजी महाराज की प्रेरणा को केंद्रबिंदु मानकर केंद्र और राज्य सरकारें काम कर रही है। इंफ्रास्ट्रक्चर, बिल्डिंग, बड़े प्रोजेक्ट, भौतिक सुविधाओं के साथ-साथ अपनी मातृभूमि के प्रति प्रेम, संस्कृति के प्रति सम्मान भी उतना ही जरूरी होने की भावना महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अगस्त क्रांति मैदान में राज्य स्तरीय समारोह 'अमृत कलश यात्रा' के आयोजन मे व्यक्त की। राज्य सरकार के सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य निदेशालय और बृहन्मुंबई नगर निगम की ओर से आजादी के अमृत महोत्सव के अवसर पर 'मेरी माटी मेरा देश' (माझी माती माझा देश) अभियान चलाया जा रहा है। इस अभियान के तहत अगस्त क्रांति मैदान में राज्य स्तरीय समारोह 'अमृत कलश यात्रा' का आयोजन किया गया था । जिसमे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोल रहे थे। सांस्कृतिक मामलों के मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, कौशल विकास, रोजगार, उद्यमिता, नवाचार मंत्री और मुंबई उपनगर के संरक्षक मंत्री मंगलप्रभात लोढ़ा मुख्यमंत्री के प्रमुख सचिव और प्रमुख सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे, शहरी विकास विभाग के प्रमुख सचिव के. गोविंदराज, ग्रामीण विकास विभाग के प्रमुख सचिव एकनाथ डावले, बृहन्मुंबई नगर निगम के आयुक्त और प्रशासक डॉ. इकबालसिंह चहल, मुंबई शहर कलेक्टर राजेंद्र क्षीरसागर, मुंबई उपनगरीय जिला कलेक्टर डॉ. राजेंद्र भोसले, नेहरू युवा केंद्र के राज्य समन्वयक राजेंद्र मालुरे आदि उपस्थित थे। मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि अगस्त क्रांति मैदान एक ऐतिहासिक मैदान है. यहीं से 'भारत छोड़ो' का नारा पूरे देश को दिया। 9 अगस्त को इसी मैदान से 'मेरी माटी मेरा देश' पहल की शुरुआत की गई थी. 'मेरी माटी मेरा देश' एक कार्यक्रम है जो राष्ट्रवाद और देशभक्ति को प्रोत्साहन देता है। राज्य सरकार छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा से काम कर रही है। विदेशी निवेश, इंफ्रास्ट्रक्चर में महाराष्ट्र अग्रसर रहा है। जैसे-जैसे देश की अर्थव्यवस्था विश्व स्तर पर तीसरे स्थान पर छलांग लगा रही है, महाराष्ट्र की भूमिका महत्वपूर्ण होने वाली है। मुख्यमंत्री श्री.शिंदे ने कहा कि हमारा प्रदेश देश का ग्रोथ इंजन है। गांवों से एकत्रित की गई मिट्टी को अमृतकलशों के माध्यम से मुंबई में आज लाया गया है। इस समय सभी ने अमृत कलशों का स्वागत किया और बडे आनंद से भाग लिया। अमृत कलश को नई दिल्ली स्थित अमृत वाटिका ले जाया जाएगा. इस स्थान पर देशभर से लाई गई मिट्टी एकत्र की जाएगी। एकता की सच्ची भावना यहीं देखने को मिलेगी. राज्य के सांस्कृतिक कार्य विभाग ने एक अच्छी योजना बनाई है और इसके लिए उन्होंने विभाग के मंत्री सुधीर मुनगंटीवार और उनके सभी सहयोगियों सराहना की । मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा की, शिव राज्याभिषेक दिवस के 350 वर्ष पूरे हुए है। हम जल्द ही शिवकालीन “वाघनख” (Tiger Claw) को राज्य में ला रहे हैं। मंत्री श्री. मुनगंटीवार ने कहा कि आजादी का अमृत हमें शहीदों और वीरांगनाओं ने दिया है. यह कलश सुराज्य द्वारा किया जाना है। यह समय हर किसी के लिए अपने राज्य और देश के प्रति योगदान देने का है।' हमें ऐसे प्रधानमंत्रियों और मुख्यमंत्रियों का सौभाग्य प्राप्त है जो आम आदमी के हित में काम करते हैं। मुख्यमंत्री के प्रमुख सचिव और प्रमुख सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे ने कहा हम देश के लिए बलिदान देने वाले शहीदों को याद कर उन्हे नमन करते है। हमने सभी गांवों और शहरों में विभिन्न कार्यक्रमआयोजित किए। हमारा राज्य देश में अग्रणी है। अमृत कलश यात्रा के लिए राज्य से 414 कलश लगभग 900 स्वयंसेवकों के साथ एक विशेष रेले व्दारा दिल्ली जा रहे हैं।

Wednesday 25 October 2023

पंतप्रधान यांची महाराष्ट्राला गुरुवारी भेट

 





शिर्डी दर्शन, निळवंडे धरणाचे जलपूजन, 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन

 

86 लाखांहून अधिक शेतकरी लाभार्थ्यांना लाभ देणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ पंतप्रधानांच्या हस्ते सुरू

 

नवी दिल्ली, 25 : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राच्या दौ-यावर असणार आहेत.  या दौऱ्यादरम्यान ते 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन तसेच 86 लाखांहुन अधिक शेतकऱ्यांना  ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ  देतील व निळवंडे धरणाचे जलपूजन करुन कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील.

 

 पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान दुपारी एकच्या सुमारासपंतप्रधान अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोहोचतील. श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा आणि दर्शन करुन,  मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही ते करणार आहेत. दुपारी  दोन वाजतापंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन करतील आणि धरणाच्या कालव्याचे जाळे राष्ट्राला समर्पित करतील. तद्नंतर 3.15 च्या सुमारासश्री मोदी शिर्डी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून आरोग्यरेल्वेरस्ते आणि तेल आणि वायु यांसारख्या क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील.

शिर्डी येथील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन

शिर्डी संस्थान येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त  नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या नवीन इमारतीत विविध सुविधांची सोय करण्यात आली आहे. यामध्ये दहा हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह अनेक वेटिंग हॉल, क्लोक रूमस्वच्छतागृहेबुकिंग काउंटरप्रसाद काउंटरमाहिती केंद्रासारख्या वातानुकूलित कक्षांची सोय करण्यात आली आहे .

 

 

 

निळवंडे धरणाचे जलपूजन व डाव्या काठाचे कालव्याचे जाळे देशाला करतील समर्पित

शिर्डी संस्थानचे दर्शन घेउुन पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरणाच्या डाव्या काठाचे (८५ किमी) कालव्याचे जाळे राष्ट्राला समर्पित करतील. यामुळे पाण्याचे पाइप वितरण जाळे सुकर होईल व सात तालुक्यांतील (अहमदनगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक जिल्ह्यातील एक) 182 गावांना याचा लाभ होईल. या धरणासाठी सुमारे 5177 कोटी रुपये खर्चून ते विकसित केले जात आहे.

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ चा शुभारंभ- 86 लाख शेतक-यांना मिळणार लाभ

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ चा पंतप्रधान श्री मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार. या योजनेचा महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची अतिरिक्त रक्कम देऊन त्यांना लाभ होईल.

पंतप्रधान श्री मोदी यांच्या व्यस्त दौ-यात ते अहमदनगर शासकीय रूग्णालयामधील आयुष हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण, कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (186 किमी)जळगाव ते भुसावळ जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (24.46 किमी); NH-166 (पॅकेज-I) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरणइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा आदि प्रकल्पांचे उद्घाटन तसेच माता व बाल आरोग्य शाखेची पायाभरणी, आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचे वाटप करतील.

गोवा येथे सायंकाळी 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन

            महाराष्ट्राच्या दौरा संपन्न झाल्यानंतर श्री मोदी गोवा राज्याला भेट देतील. राज्यात पहिल्यांदाच होणा-या 37व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करतील. मड़गाव येथे होणा-या या खेळांमध्ये देशभरातील 10000 पेक्षा अधिक खेळाडू  28 ठिकाणी 43हून अधिका क्रीडाशाखांमध्ये सहभागी होणार आहेत.

                                                                 00000000

Tuesday 24 October 2023

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा कुपवाडा (जम्मू काश्मीर) येथे उभारण्यासाठी राजधानीतून रवाना निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांच्या कडून पुतळ्याची पूजा करून कुपवाडासाठी रवाना

 






नवी दिल्ली, 23 : जम्मू आणि काश्मीर सीमेवर कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून हा पुतळा राजधानी सि्थत महाराष्ट्र सदनातून निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते  कुपवाडा कडे आज सकाळी रवाना करण्यात आला.

 

राज्याचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा समारंभपूर्वक कुपवाडा येथे 20 ऑक्टोंबर 2023 रोजी मुंबई येथून रवाना करण्यात आला होता. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते.

 

हा पुतळा महाराष्ट्रातून  निघून काश्मीरकडे मार्गस्थ होणार. दिल्लीहून रवाना होण्यापूर्वी यानिमित्ताने दिल्ली मराठी प्रतिष्ठान तर्फे येथील महाराष्ट्र सदनात  काल  उशीरा रात्री  एक लहान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी प्रतिष्ठान तर्फे  निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव श्री रूपिंदर सिंग, सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावरमेजर जनरल सुजित पाटील, ' आम्ही पुणेकर' संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या सोहळ्यास दिल्लीतील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  मुंबईतील राजभवनातून रवाना होणारा छत्रपतींचा हा पुतळा बडोदा, दिल्लीमार्गे रस्त्याने प्रवास करून साधारण दहा ते बारा दिवसात कुपवाडा येथे पोहोचेल. 

 

आम्ही पुणेकरया संस्थेच्या वतीने जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे  भारत पाक सीमेवर मराठ्यांच्या पराक्रमाची माहिती देण्यासाठी छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. 'आम्ही पुणेकर फाउंडेशन' 'छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेला हा पुतळा कुपवाडा येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटला स्थापनेसाठी देण्यात येणार आहे. भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स च्या ४१ व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते दि. २० मार्च २०२३ रोजी झाले. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल असा बनवला गेला आहे.

 

'आम्ही पुणेकर' या संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी माहिती देताना सांगितले की परिस्थिती  अनुकूल असल्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 7 नोव्हेंबर रोजी पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल.

0 0 0 0 0

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.190  / दिनांक 24.10.2023

 

 


Thursday 19 October 2023

Skill Development training will usher in a new dawn in the life of India’s youth - PM Narendra Modi - Prime Minister inaugurates Pramod Mahajan Rural Skill Development Center Praises the concept of Maharashtra, association of opportunity and training important Skill Development Centers will prove to be employment temples - CM Eknath Shinde

 








Mumbai, Oct 19 : Skill Development Training will usher in a new dawn in the life of India’s youth. This training will play an important role in creating a developed Bharat. From this point of view, the Pramod Mahajan Rural Skill Development Center scheme of Maharashtra is important, said Prime Minister Narendra Modi praising the skill development initiative of the state today.  Such skill development centers will prove to be temples of employment, said Chief Minister Eknath Shinde exuding confidence.

          Prime Minister Narendra Modi today inaugurated through the videoconferencing system 511 Pramod Mahajan Rural Skill Development Centers set up in 350 taluks of the state by the State Government’s Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Department.

          On this occasion, Chief Minister Eknath Shinde, Dy CM Devendra Fadanvis, Dy CM Ajit Pawar, Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Minister Mangal Prabhat Lodha, State Chief Secretary Manoj Saunik, and others were present at the dais at the function held at Sahyadri Guest House. Similarly, public representatives, all revenue officers, district collectors, ZP CEOs and Senor Officers, Center Coordinators, and citizens were present at their respective centers and places. All these centers were connected to the main function through the videoconferencing system.

          Mentioning the ongoing festival of Navratri and extending best wishes Prime Minister Modi said a mother cares for her son’s happiness and success. In such a pious atmosphere we are launching this innovative concept for training the youth. This will bring a new dawn in their life. There is a great demand for trained Bharatiya youth all over the world. The population of senior citizens is increasing in other countries across the world. According to a survey, there is a need for 40 lakh trained youth in about 16 countries across the world. They are in great demand in sectors like construction, health, tourism, hospitality, education and transport. Through such skill development programs we can create a trained manpower not only for Bharat but for the entire world, Modi said.

          Making a mention of opportunities available in construction, modern agriculture, and entertainment-media sectors, Prime Minister Modi said that it would be in the right earnest to provide training in soft skills to those youth who want to try their luck abroad through these skill development centers of Maharashtra. In the past, skill development was taken that seriously, and therefore, due to the absence of training the youths had to suffer a loss though they had capacity and opportunities.

          Now we have set up an independent ministry for skill development and made separate financial provisions for it. Crores of youths are being provided training through the Prime Minister Skill Development Centers. Even today, in many artisan families the legacy of traditional knowledge is handed down the generations in rural areas. They need support and backing. We are implementing the Vishwakarma Shram Sanman Yojana to provide support and backing to them. They are given modern equipment and good training. These 511 training centers in Maharashtra will be useful in extending the Vishwakarma Yojana, the Prime Minister exuded confidence.

          In his speech, the Prime Minister made mention of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar’s thoughts on industrialization and the contribution of Kranti Jyoti Savitribai Fule in the field of women’s education without caring much for the …

******************

Follow us on:  https://twitter.com/micnewdelhi

AkArora_EngNews_19.10.2023 


Wednesday 18 October 2023

विपणन हंगाम 2024-25 साठी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


 


नवी दिल्ली,18 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम 2024-25 साठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करायला मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी रास्त भाव मिळावा यासाठी सरकारने विपणन हंगाम 2024-25 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ केली आहे.मसूरच्या एमएसपीमध्ये  425 रुपये प्रति क्विंटल तर पांढरी मोहरी आणि काळ्या मोहरी साठी 200 रुपये प्रति क्विंटल दराने वाढ मंजूर करण्यात आली आहे. गहू आणि करडईसाठी प्रत्येकी 150 रुपये प्रतिक्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे. बार्ली आणि हरभऱ्यासाठी अनुक्रमे 115 रुपये प्रति क्विंटल आणि 105 रुपये प्रति क्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे.

सर्वसमावेशक उत्पादन खर्चाचा संदर्भ विचारात घेऊन, कामगारांची मजुरी, बैल किंवा यंत्राद्वारे केलेल्या आणि इतर कामांची मजुरी, भाडेतत्वावर घेलेल्या जमिनीचे भाडे तसेच बियाणे, खते, सेंद्रिय खते, सिंचन शुल्क यासारख्या सामग्रीच्या वापरावर झालेला खर्च, शेतीची अवजारे आणि शेत बांधणीवरील घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, पंप संच इत्यादींसाठी झालेला डिझेल/वीज इ.इंधनाचा खर्च, इतर किरकोळ खर्च आणि कौटुंबिक मजुरीचे मूल्य यांचा या सर्व खर्चामध्ये समावेश आहे.

विपणन हंगाम 2024-25 साठी अनिवार्य रब्बी पिकांसाठी एमएसपी मधील  वाढ  देशभरातील सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट इतकी निश्चित करण्याच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 च्या घोषणेनुसार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या सरासरी उत्पादन खर्चावर अपेक्षित सर्वात जास्त 102% भाव गव्हासाठी मिळणार असून त्या खालोखाल पांढरी- काळी मोहरी या पिकांसाठी 98 %,  मसुरला 89 %, हरभऱ्याला 60 %,बार्लीला  60% तर करडईला 52 % अधिक भाव  मिळणार आहे. रब्बी पिकांच्या या वाढलेल्या एमएसपीमुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळतील आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळेल.

अन्न सुरक्षा वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी सरकार  तेलबिया, कडधान्ये आणि श्री अन्न/भरड धान्यांच्या पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देत आहे. किंमत धोरणाव्यतिरिक्त, सरकारने  आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या तसेच शेतकऱ्यांना तेलबिया आणि कडधान्ये लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी दर्जेदार बियाणे पुरवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान , प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आणि राष्ट्रीय तेलबिया आणि पाम तेल अभियान यांसारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

त्याचबरोबर, किसान क्रेडिट कार्ड योजनेचे लाभ देशभरातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, सरकारने किसान रिन पोर्टल (KRP), केसीसी घर घर अभियान, आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांबाबत वेळेवर योग्य निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी वेळेवर आणि अचूक हवामान माहिती प्रदान करण्यासाठी हवामान माहिती नेटवर्क डेटा सिस्टम (WINDS) सुरू केले आहेत. कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणणे, आर्थिक समावेशकता वाढवणे, डेटाचा योग्य वापर  करणे आणि देशभरातील शेतकऱ्यांचे जीवनमान  सुधारणे हे  या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे.

 

000000000000

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

वृ.क्र 188, दि.17.10.2023

 

 

 

 

 

 

Monday 16 October 2023

54 व्या इफ्फीची अनुभूती घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधींची नोंदणी सुरु



 

नवी दिल्ली, 16 : गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या इफ्फीच्या 54 व्या आवृत्तीसाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाल्याची घोषणा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने केली आहे. हा महोत्सव भारत आणि जगभरातील समकालीन तसेच  क्लासिक चित्रपटांमधील उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शनांसाठीचा भव्य सोहळा असणार

इफ्फी-54 मधील माध्यम प्रतिनिधींना जगातील सर्वोत्तम चित्रपट निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ, समीक्षक, बु्द्धिजीवी आणि जागतिक चित्रपट रसिकांपैकी एक होण्याचा बहुमान मिळणार आहे.

माध्यम प्रतिनिधी नोंदणीसाठी 1 जानेवारी 2023 रोजी वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल किंवा ऑनलाइन मीडिया संस्थेशी संबंधित कार्य असणे आवश्यक असण्याबाबत माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या बातमीपत्रात म्हटले आहे. वयाची अट पूर्ण करणाऱ्या स्वतंत्र पत्रकारांनाही (फ्रीलान्सर्स) नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. नोंदणी प्रक्रिया अगदी सहज असून https://my.iffigoa.org/extranet/media/ येथे ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकेल.

'इफ्फी'ला यशस्वी करण्यासाठी, सिनेमाच्या कौतुकाची संस्कृती जोपासण्यात आणि चित्रपट निर्मिती कलेविषयी खऱ्या अर्थाने प्रेम जोपासण्यात माहिती आणि संवाद महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या महोत्सवासाठी नोंदणी करण्यासाठी आणि उपस्थित राहण्याच्या आमंत्रणाबरोबरच प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने इफ्फीच्या उत्सवात हातभार लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सिनेमाचा निखळ आनंद आणि या चित्रपटांनी विणलेल्या मनोरंजक कथा, त्यांच्या निर्मात्यांच्या आयुष्याची, स्वप्नांची, आकांक्षांची आणि संघर्षाची अनोखी झलक दाखवणारे हे प्रदर्शन 54 व्या इफ्फीत दाखवण्यात येणार आहे. चित्रपटांचा उत्सव केवळ पडद्यापुरता मर्यादित न राहता त्या पलिकडेही इफ्फी आणि इतर गाजलेल्या चित्रपट महोत्सवांचे सार स्पष्ट करणारे मास्टरक्लासेस, पॅनेल चर्चा, सेमिनार आणि संभाषणांची मेजवानी देखील मिळणार आहे.

नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही शंका असल्यास, कृपया येथे दिलेल्या मार्गदर्शक सूचना इथे (https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2023/oct/doc20231011259501.pdf ) आणि नोंदणी दुव्यावर पहा. अधिक मदतीसाठी पीआयबीशी ईमेलद्वारे pib.goa[at]gmail[dot]com वर किंवा +91-832-2956418 या क्रमांकावर फोनद्वारे संपर्क साधावा. सर्व कामकाजाच्या दिवशी भारतीय वेळेनुसार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत फोनलाइन सक्रिय असेल. नोंदणीची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 11:59:59 (भारतीय प्रमाण वेळेनुसार) निश्चित करण्यात आली आहे.

 54 व्या इफ्फीच्या ताज्या घडामोडी व अधिक माहितीसाठी, www.iffigoa.org येथे महोत्सवाच्या वेबसाइटला भेट द्या.

0000000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 186, दि.16.10.2023