Saturday 30 March 2019

महाराष्ट्र परिचय केंद्रातील मुरलीधर हरणे यांना निरोप















नवी दिल्ली, 30 :  महाराष्ट्र परिचय केंद्राचे मराठी टंकलेखक मुरलीधर हरणे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यांना कार्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला.

                        श्री. हरणे यांच्या निरोप समारंभाचे आयोजन आज परिचय केंद्रात करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे  यांनी  पुष्प गुच्छ व भेट वस्तू देवून श्री हरणे यांचे स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी , पत्रकार, कार्यालयाचे निवृत्त अधिकारी -कर्मचारी आणि महाराष्ट्र सदनाचे आजी-माजी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

            श्री. हरणे यांनी  आपल्या पदाच्या जबाबदारी सोबतच कार्यालयाच्या ग्रंथालयातही यशस्वीरित्या सेवा दिली. 38 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर श्री हरणे सेवानिवृत्त झाले. कामाप्रती समर्पणभाव आणि प्रामाणिकता यामुळे ते सर्वप्रिय कर्मचारी ठरले.

  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi      
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.106/  दिनांक ३०.०३.२०१९ 









Monday 25 March 2019

पुणे येथील एमएमसीसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परिचय केंद्राला भेट





नवी दिल्ली, २५ : पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या(एमएमसीसी) जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण कार्याची माहिती जाणून घेतली.    
दिल्ली अभ्यास दौ-यावर असणा-या  एमएमसीसी वाणिज्य महाविद्यालयाच्या वृत्तपत्र विद्या विभागाच्या 23  विद्यार्थी व विद्यार्थीनींनी अभ्यास दौ-याचे समन्वयक  व विभाग प्रमुख प्रा. संतोष शेणई, सहयोगी प्राध्यापक  स्वप्नजा मराठे यांच्यासह आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
        यावेळी औपचारिक वार्तालापही झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविद्यपूर्ण माहिती उपसंचालक दयानंद कांबळे यांनी दिली. महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच, दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शासनाचा जनसंपर्क साभांळताना घ्यावी लागणारी खबरदारी आदींची विस्तृत  माहितीही श्री.कांबळे यांनी दिली.
            महाराष्ट्र परिचय केंद्राची एसएमएस सेवा, कार्यालयाचे  तीन भाषेतील अधिकृत ट्विटर हँडल, फेसबुक पेजेस, युटयुब चॅनेल, ब्लॉग, इंस्टाग्राम, व्हॉटसॲप गृप आदींच्या माध्यमातून शासनाची प्रभावीपणे करण्यात येणारी प्रसिध्दी याविषयीही श्री. कांबळे यांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.                        
उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण कार्याविषयीचे सादरीकरण केले.   
                                                                 0000
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                          00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.105/दि. 25.03.2019






Friday 22 March 2019

राजधानीत शहीदांना अभिवादन









  

नवी दिल्ली, दि. 23 : भारतीय स्वातंत्र्य लढयात महत्वाचे योगदान देणारे शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना आज शहीद दिनानिमित्त राजधानीत अभिवादन करण्यात आले.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                       
                                           0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 104 / दिनांक  23.03.2019

Wednesday 20 March 2019

महाराष्ट्रातील निवडणूक खर्च निरीक्षकपदी शैलेंद्र हांडा यांची नियुक्ती





नवी दिल्ली, दि. 20 : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून निवृत्त सनदी अधिकारी शैलेंद्र हांडा यांची नियुक्ती केली आहे.

            केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी, महाराष्ट्र आणि तामीळनाडू राज्यातील लोकसभा निवडणूक काळात होणा-या निवडणूक  खर्चावर  लक्ष ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून अनुक्रमे शैलेंद्र हांडा आणि मधू महाजन या निवृत्त सनदी अधिका-यांची नियुक्ती केली आहे.

 श्री हांडा यांना आयकर खात्याच्या तपास विभागात कार्य करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. निवडणूक यंत्रणेद्वारे केल्या जाणाऱ्या कामांवर श्री हांडा लक्ष ठेवणार आहेत. तसेच निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहचवत मतदारांना रोख रक्कम, दारू वाटणा-या व  इतर  प्रलोभण दाखविणा-या व्यक्ती/संस्था यांच्याविरुद्ध ‘सी-व्हीजील’द्वारे आणि ‘१९५०  या मतदार हेल्पलाईनवर’ प्राप्त झालेल्या माहिती आणि तक्रारींच्या आधारे कठोर कारवाई करण्याचे अधिकार श्री हांडा याच्याकडे असतील.        

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                       
                                           0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 103 / दिनांक  20.03.2019

Saturday 16 March 2019

महाराष्ट्रातील 6 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान



















अनिलकुमार नाईक यांना पद्मविभूषण तर डॉ.कुकडे यांना पद्मभूषण  

नवी दिल्ली, दि. 16 : प्रसिध्द उद्योजक अनिलकुमार नाईक यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मविभूषण तर डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्मपुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील 6  मान्यवरांचा यात समावेश आहे. 
 
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या देशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून एका मान्यवरास पद्मविभूषण, एका मान्यवरास पद्मभूषण तर चार मान्यवरांस पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ,केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

             पद्म पुरस्कार वितरणाच्या आज दुस-या टप्प्यात 3 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 48 पद्मश्री  पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातून व्यापार व उद्योग-पायाभूत सुविधा  क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे समूह अध्यक्ष अनिलकुमार नाईक यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोच्च मानाच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  
डॉ अशोक कुकडे यांना पद्मभूषण                                         
            वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. अशोक कुकडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. कुकडे यांनी लातुर येथे विवेकानंद हॉस्पिटलची स्थापना केली व या माध्यमातून त्यांनी गरीब रूग्णांना  रास्तदरात आरोग्य सुविधा पुरविण्याचे मोलाचे कार्य केले आहे.
                         चार मान्यवरांना पद्मश्री                                        
         या समारंभात 48 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील 4  मान्यवरांचा  समावेश आहे. कला व चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द अभिनेते मनोज वाजपेयी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनोज वाजपेयी हे अभिनयाच्या विशीष्ट शैलीसाठी प्रसिध्द असून पठडीबाहेरच्या भूमिकांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. चित्रपटांतील वैविद्यपूर्ण भूमिकांसाठी त्यांना यापूर्वी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

सामाजिक कार्य व प्राणी कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सैय्यद शब्बीर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले . दुष्काळी भागातील गुरांची देखभाल घेण्यात सैय्यद शब्बीर यांचे अमूल्य योगदान आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून गायींची देखभाल व त्यांना जगविण्याचे काम ते अव्याहतपणे करीत आहेत.
            प्रसिध्द अभिनेते दिनयार काँट्रॅक्टर यांनी कला व नाटय क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री. काँट्रॅक्टर हे विनोदी भूमिकांसाठी प्रसिध्द असून पारसी आणि गुजाराती रंगभूमीवर त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.  श्री. काँट्रॅक्टर यांनी  चित्रपटांमधून साकारलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिल्या आहेत.
          सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करून वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे प्रा. सुदाम काटे  यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रा. काटे यांनी भारत देशात सिकसेल आजाराबाबत संशोधन क्षेत्राचा पाया रोवला. प्रा. काटे हे महाराष्ट्र ,गुजरात आणि मध्यप्रदेशातील आदिवासी भागांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती व उपचाराचे कार्य करीत आहेत.
गणतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला यावर्षी देशातील पद्म पुरस्कार प्राप्त 112 मान्यवरांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण 11 मान्यवरांचा समावेश होता. पैकी 6 जणांना आज सन्मानित करण्यात आले.  11 मार्च  2019 रोजी  पद्मपुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यात 4 पुरस्कार  प्रदान करण्यात आले.                                                                  
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                       
                                           0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 102 / दिनांक  16.03.2019






Friday 15 March 2019

महाराष्ट्रात ११ लाख तरूण प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क



         
राज्यात ८ कोटी ७३ लाख मतदार
नवी दिल्ली, 15 : मतदार नोंदणीत महाराष्ट्रातील तरुणांचा पुढाकार उल्लेखनीय असून राज्यातील 11 लाख99  हजार527 तरूण मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
            केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवरीत ही माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रासह देशात होऊ घातलेला लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रात  मतदारांची  एकूण संख्या 8 कोटी 73 लाख 29 हजार 910 आहे. राज्यात 18 ते 19 वर्ष वयोगटात अर्थात प्रथमच मतदार म्हणून नोंदणी करणा-या तरूणांची संख्या 11 लाख99हजार 527  आहे. हे तरुण प्रथमच लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. देशात 18 ते 19 वर्ष वयोगटातील मतदारांची एकूण संख्या 1कोटी 50लाख 64हजार 824 आहे.  
                                             मतदार नोंदणीत महिलांचीही आघाडी 
                                                  4 कोटी  16 लाख महिला मतदार
             मतदार नोंदणीमध्ये राज्यात महिला मतदारही आघाडीवर आहेत. राज्यातील पुरुष व महिला मतदारांचे प्रमाण एक हजार पुरुष नोंदणीकृत मतदारामागे नोंदणीकृत 911 महिला मतदार असे आहे. राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 29 हजार 910 नोंदणीकृत मतदार आहेत. यापैकी  4 कोटी 57लाख 1 हजार 877 पुरुष तर  4 कोटी 16 लाख 25 हजार 950 महिला मतदार आहेत. राज्यात 2 हजार 83 नोंदणीकृत तृतीय पंथी मतदार आहेत.  
                    एक हजार लोकसंख्येमागे मतदार नोंदणीचे प्रमाणही राज्यात उल्लेखनीय आहे. राज्यात एक हजार लोकसंख्ये मागे 710 नोंदणीकृत मतदार आहेत. तर राज्यात एकूण 48 लोकसभा जागांसाठी चार टप्प्यात  एकूण 95 हजार 475 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे.            
                                             देशात 89 कोटी 87लाख मतदार
                         देशातील 29 राज्य आणि 7 केंद्रशासीत प्रदेशांमध्ये आजमितीस एकूण 89 कोटी 87लाख 68 हजार 978 मतदार आहेत. यामध्ये 46 कोटी 70 लाख 4 हजार 861  पुरुष मतदार आहेत तर 43 कोटी 16 लाख 89 हजार 725 महिला मतदार आहेत. देशभरात 31 हजार 292  तृतीय पंथी मतदार आहेत.
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                    
                                           0000  
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 101 / दिनांक  15.03.2019




Thursday 14 March 2019

राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान


  




नवी दिल्ली 14 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा सन्मान प्रदान करण्यात आले.
हेड कॉन्स्टेबल रविंद्र बबन धनवाडे यांना मरणोपंरात शौर्य चक्र
दिनांक 26 ऑगस्ट 2017 मध्ये जम्मु आणि काश्मीरातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) हेड कॉन्स्टेबल रविंद्र बबन धनवाडे यांनी या चकमकीत सर्वोच्च बलिदान दिले. हेड कॉन्स्टेबल धनवाडे यांना मरणोपंरात शौर्य चक्राने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांची आई आणि पत्नी यांनी स्वीकारला.
राष्ट्रीय राइफल्सचे महेश सप्रे यांना शौर्य चक्र
राष्ट्रीय राईफल्स 44 तुकडीचे महेश सप्रे यांनी 3 ऑगस्ट 2018 रोजी जम्मु आणि काश्मिरमध्ये एका गावात झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांशी दोन हात केले. यामध्ये एका दहशतवाद्याला जख्मी केले तर अन्यंना पळवून लावले त्यांच्या समयसुचकतेमुळे मोठी घटना टळली. त्यांच्या या अदम्य पराक्रमासाठी त्यांना आज शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.
मराठी भाषिक 3 सैन्य अधिका-यांना परम विशिष्ट सेवा मेडल
लेफ्टनन जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना त्यांच्या सैन्यातील उत्कृष्ट सेवेबद्दल ‘परम विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आले. यापुर्वी त्यांना ‘अतिविशिष्ट सेवा मेडल’, ‘सेवा मेडल’, ‘विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आलेले आहे.
लेफ्टनन जनरल सुदर्शन श्रीकांत हसबनीस यांना सैन्यातील उत्कृष्ट सेवेबद्दल आज ‘परम विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आले. यापुर्वी यांना ‘विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आलेले आहे.
मेजर जनरल (निवृत्त) विजय ज्ञानदेव चौघुले यांनाही सैन्यातील धैर्ययुक्त सेवेबद्दल ‘परम विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आले. यापुर्वी या ‘विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आलेले आहे.
मराठी भाषिक 3 सैन्य अधिका-यांना अति विशिष्ट सेवा मेडल
लेफ्टनन जनरल शंशाक ताराकांत उपासणी यांना सैन्यातील साहसपुर्ण सेवेसाठी ‘अति विशिष्ट सेवा मेडल’ ने गौरिावण्यात आले. यापुर्व त्यांना ‘सेवा मेडल’, ‘विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आलेले आहे.
जम्मु आणि काश्मिर राईफल्सचे ब्रिगेडीयर संजीव लांघे यांना सैन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी आज ‘अति विशिष्ट सेवा मेडल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एयर कमांडर धनंजय वसंत खोत फ्लाईंग पायलट यांनी देश संरक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना आज ‘अति विशिष्ट सेवा मेडल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची ‘मपकें’ला भेट
















नवी दिल्ली, 14: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माजी महासंचालक व विद्यमान राज्य उतपादन शुल्क आयुक्त, श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा  यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.
कार्यालयाचे उपसंचालक, श्री दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी, श्रीमती अमरज्योत कौर अरोरा, लेखा अधिकारी निलेश केदारे व सर्व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी परिचय केंद्राच्या कार्याची वैविध्यपूर्ण माहिती श्री कांबळे यांनी दिली. तसेच श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी महासंचालक पदावर असताना, परिचय केंद्रात दहा वर्षापूर्वी भेट दिल्याचे सांगितले.
दिल्ली कार्यालयामार्फत होत असलेल्या कामांचे कौतूक करताना, सुसज्ज ग्रंथालय, स्वच्छ कार्यालय, आयएसओ-9001 प्रमाणित व आधुनिक  प्रसार माध्यमांचा  वापर या सर्व बाबींमुळे दिल्ली चे माहिती व जनसंपर्क कार्यालय हे नावलौकिक कमवत असून, महाराष्ट्र राज्याच्या सर्व उपाययोजनांची माहिती देते असल्याची प्रतिक्रिया दिली व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा ही त्यांनी यावेळी दिल्या.

Wednesday 13 March 2019

मद्यपेयांवर आता वैधानिक चेतावणी आवश्यक अन्न व सुरक्षा मानकांचे नियम मद्यपेयांवर लागू होणार




नवी दिल्ली 13 : मद्यपेय बाटलींवर अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाव्दारे ठरवून देण्यात आलेले मापदंड अंकित करने बंधनकारक करण्यात आले असून याची अमलबजावणी 1 एप्रिल 2019 पासून सुरू होणार आहे. यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची माहिती राज्य शुल्क उत्पादन आयुक्त प्राजक्ता लंवगारे यांनी दिली.
येथील अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या एफडीए भवन येथे आज सर्व राज्याच्या राज्य शुल्क उत्पादक आयुक्त आणि अन्न विभागाच्या आयुक्तांची बैठक आयोजित करण्यात आली . या बैठकीत राज्याच्या शुल्क उत्पादन आयुक्त श्रीमती लंवगारे आणि सहआयुक्त अन्न व औषधी प्रशासन सी.बी. पवार उपस्थित होते.
आज झालेल्या बैठकीत अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाव्दारे मद्यपेय मानक नियम 2018 व्दारे ठरवून दिलेल्या नियमांची अमलबजावणी काटेकोरपणाने व्हावी, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
  2006 च्या शासन निर्णयाप्रामाणे सर्व प्रकारची मद्यपेय आता अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या कक्षेत आलेले आहेत. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात ठरवून दिलेले नियम पालन करण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.  यामध्ये मद्यपेय  बाटलींच्या बाहेरील बाजुस मद्यांमध्ये  समाविष्ट असलेले घटक,  प्रमाण,  ऍलर्जीक, वैधानिक चेतावणी नमुद करणे आवश्यक आहे.
मद्यपान हे आरोग्याला धोकादायक’, सुरक्षित रहा, मद्यपान करून गाडी चालवु नका असे 1 एप्रिल 2019 पासून प्रत्येक मद्यपेयावर लिहीणे बंधनकारक असेल. ही वाक्य इंग्रजीसह मातृभाषेत लिहीणे सक्तीचे राहील.

मद्यपेयांवरील ' लेबल ' तपासणीसाठी महाराष्ट्र सज्ज
                                                                      प्राजक्ता लंवगारे
प्रत्येक मद्यपेय बाटलीवर अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण विभागाने ठरवून दिलेले मद्यपान हे आरोग्याला धोकादायक’ ‘सुरक्षित रहा, मद्यपान करून गाडी चालवु नका ही वाक्य 1 एप्रिल 2019 पासून लिहीणे बंधनकारक असून ही तपासण्यासाठी राज्यातील राज्य उत्पादन शुल्क आयुक्तालय आणि अन्न व औषधी प्रशासन विभाग सज्ज असल्याचे आयुक्त श्रीमती लंवगारे यांनी सांगितले.
अन्न  सुरक्षा आणि मानक प्राधिकरण विभागाची नियमावली येण्यापुर्वी उत्तम गुणवत्ता दाखविण्यासाठी मद्यपेय उत्पादक ब्रिटीश मानक संस्थे कडून प्रामाणिकृत असल्याचे लेबल अंकित करीत असत. आता मात्र, तसे करणे अवैद्य मानले जाणार आहे. मद्यपेय उत्पादकांना अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण विभागाने आखुन दिलेल्या नियामवलीचे पालन करने अनिवार्य असणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्राच्या शुल्क उत्पादन आयुक्तालयाने राज्यातील सर्वच मद्यपेय निर्मित उत्पादकांशी,  भागधारकांशी, किरकोळ विक्रेतांशी  बैठकी घेऊन त्यांना याबाबत अवगत केले आहे. त्यामुळे राज्यात 1 एप्रिलपासून याची अमलबजावणी करणे सोपे होईल, अशी माहिती श्रीमती लंवगारे यांनी बैठकीनंतर दिली.

Tuesday 12 March 2019

Works of Gandhi And Bhave Inspired Me To Serve in Remote Areas : Padma Shri Dr. Ravindra And Dr. Smita Kolhe








New Delhi, 12:  The Works of Mahatma Gandhi and Vinoba Bhave inspired me to work in the remote areas and serve the rural people, expressed Padma Shri Awardee, Dr. Ravindra Kolhe at Maharashtra Information Centre today.
Dr. Ravindra and his wife Dr. Smita Kolhe were in the Capital to receive the Padma Shri Award at the hands of the President, Shri Ramnath Kovind on Monday. This is the second Doctor couple from Maharashtra to be awarded this prestigious award. The first was Dr Abhay and Dr Rani Bung in the field of Medicine.
The Deputy Director, Shri Dayanand Kamble welcomed Dr. Ravindra Kolhe with a Shawl and a bouquet, while the Public Relations Officer, Amarjyot Kaur Arora welcomed his wife, Dr. Smita Kolhe with a shawl and a bouquet.
An informal discussion was held concerning the Award and their experiences serving the Korku and Gond Adivasis located in the Bairagad Village at Melghat Taluka in Amravati District. The duo was conferred the Padma Shri Award for their extensive contribution in transforming the lives of the tribals of Melghat through affordable medical health care. Not only this, this couple has succeeded in making this region a Farmer-suicide-Free zone.
The journey to Melghat started from Amravati and all transport ended at Harisal, from where one had to walk 40 km to reach Bairagarh village, said Dr. Kolhe. Children were dying in Melghat due to malnutrition, pneumonia, malaria, cholera, etc, informed Dr. Kolhe.  Since 34 years, Dr Kolhe has worked tirelessly to improve the lives of the people in Bairagarh by providing them with affordable healthcare.  Adding further he said, 'I decided to work in this remote area as there were no proper roads leading to the village. We had to walk around 40 kms to reach Bairagarh village itself.'
Dr. Kolhe and his wife Dr. Smita Kolhe have transformed the lives of the tribals by improving their health; the village has gained access to electricity, roads and helped them in effective farming. Sharing his experiences, he said that he started his medical consultation with Re 1 and past 30 years, he has now increased it to Rs 2/- which is very nominal. Though, initially it was difficult to survive, when I got married but subsequently, my wife, Dr. Smita adjusted in these surroundings and we are happily practicing here.
Dr Ravindra Kolhe has an MBBS degree and provides medical treatment patient; his wife Dr Smita specialises in Ayurveda, and provides traditional medicine and treatment to the villagers.
Speaking about his journey, Dr. Kolhe said that his father was working with Indian Railways.  When I was pursuing MBBS from Nagpur, everyone was keen that I finish my studies and return to Shegaon, my village, for; I was to be the first Doctor in the family.  However, little did anyone know that I would choose a complete different path in life and would serve in the remote areas, informed Dr. Kolhe.
Speaking further, Dr. Ravindra Kolhe said, was highly inspired by the books of Mahatma Gandhi and Vinoba Bhave. After finishing MBBS, he decided to use his skills not for earning money but to help the most needy. The only question before him was: Where should I start my journey? But, soon enough, this question too was answered by the cover page of the book Where There is No Doctor, written by David Werner. The cover of the book showed four people carrying a patient, with the words – “Hospital 30 miles away” –written below.
Dr. Kolhe decided he wanted to offer his services at some place that was far away from any medical facility. He chose Bairagarh, a small village in Melghat, Maharashtra. The journey to Melghat started from Amravati and all transport ended at Harisal, from where one had to walk 40 km to reach Bairagarh.
Dr. Kolhe left Bairagarh to complete his MD in 1987. He prepared his thesis on malnutrition in Melghat. His thesis attracted the attention of the world towards this subject – BBC radio covered Melghat, thus bringing it to everyone’s notice, informed the Doctor. He returned to Melghat again, but not alone, this time. He wanted a true companion. He started searching for his right match, but stated four conditions. First, the girl should be ready to walk for 40 km (the distance to be covered to reach Bairagarh). Second, she should be ready for a ‘Rs. 5 wedding’ (court marriages at the time cost Rs. 5). Third, she should be willing to manage financially with Rs. 400 per month (Dr. Kolhe charged Re. 1 per patient and had almost 400 patients every month). And lastly, she should be ready to beg too, not for herself but if needed, for the welfare of others. And this is how I met, Dr. Smita after rejecting 100 girls. Melghat  got a second doctor.
Dr. Smita Kolhe
A very poised Lady, Dr. Smita started speaking in her soft tone. She narrated how she started from Nagpur, but quickly adapted the living style in the Adivasi area of Melghat. Sharing one of the emotional incident, she said when she was expecting the first child, Dr. Kolhe decided to do the delivery himself in the same simple way as he did for the villagers. But due to some complications during the delivery, the baby was infected by meningitis, pneumonia and septicemia. People started suggesting that the mother and baby should be moved to a better hospital in Akola. However, I decided to stay back and have the baby treated just like other village children would be in the same condition. This earned them respect from villagers, she said.
***********************