Thursday 26 November 2020

राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा

 

                   







नवी दिल्ली, 26 :  महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज संविधान दिनसाजरा करण्यात आला.  कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात राज्य घटनेच्या उद्देशिकेचेसामुहिकपणे वाचन करण्यात आले. यावेळी निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त निधी पांडे, यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी-कर्मचारी वर्ग उपस्थित होते.    

                   महाराष्ट्र परिचय केंद्रात संविधान दिन साजरा

महाराष्ट्र परिचय केंद्रातसंविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी परिचय केंद्राच्या अधिकारी कर्मचा-यांनी  राज्य घटनेच्या उददेशिकेचे सामुहिकपणे वाचन केले. यावेळी दयानंद कांबळे उपसंचालक (माहिती), माहिती  अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह  परिचय केंद्राचे कर्मचारी  वर्ग उपस्थित होते.

Friday 20 November 2020

Financial Assistance by BARTI for UPSC Civil Services



New Delhi, 20 : Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI), Pune has announced Financial Assistance Scheme of Rs. 50,000/- for Candidates of Scheduled Caste of Maharashtra State to those who have qualified UPSC Civil Services (Preliminary) Examination 2020.  The said Exam was conducted on 4th October, 2020 and result of the same was declared on UPSC website on 23rd October, 2020.

 

In this year 2020, BARTI, Pune has announced to give Financial Assistance of Rs. 50,000/- (Onetime) for UPSC Civil Services (Main) Examination 2020 for eligible Scheduled Caste candidates of Maharashtra State.

 

As announced by Director General, of BARTI Shri. Dhammajyoti Gajbhiye, eligible candidates can visit BARTI’s website for eligibility criteria and Application Form to get Financial Assistance Scheme for UPSC Civil Services (Main) Examination 2020. Filled application form and mandatory documents before 8th December, 2020, till 5.30 pm. 

 


देशात सर्वाधिक आयुष्यमान भारत केंद्र महाराष्ट्रात

 



नवी दिल्ली 20, : सार्वजनिक आरोग्य सेवांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचावा यासाठी आयुष्यमान भारत या योजनेची सुरूवात केंद्र शासनाने 2018 मध्ये केली. यातंर्गत देशभरात 50 हजाराहून अधिक आयुष्यमान भारत आरोग्य व कल्याण केंद्र (एचडब्ल्यूसी) कार्यरत आहेत. यामध्ये सर्वाधिक 6381 केंद्र महाराष्ट्रात आहेत.

महाराष्ट्रात असणारी 6381 आरोग्य व कल्याण केंद्रांमध्ये 4117 सहायक आरोग्य केंद्र आहेत. ही दुर्गम  तसेच ग्रामीणपातळीवर कार्यरत आहेत. 1825 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून  ही निमशहरी भागात कार्यरत आहेत. 439 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, जी महानगरपालिका असणा-या भागात कार्यरत आहेत. ही आरोग्य केंद्रे आरोग्य विभागाचा कणा असून या केंद्राच्यामाध्यातून राज्यात नियमित प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान केली जाते.

आरोग्य आणि कल्याण केंद्राच्या माध्यमातून लोकांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान केली जाते. यातंर्गत माता, नवजात अभ्रके, पौगंडावस्थेतील पोषण, संसर्गजन्य रोगांचे नियंत्रण यासाठी ही केंद्र कार्यरत आहेत. यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी प्लॅटफॉर्मच्या अंमलबजावणीचेही एचडब्ल्यूसी काम पाहते. यामध्ये रूग्ण-ते-डॉक्टर, ओपीडीची सेवा, डॉक्टर-ते डॉक्टर टेलिकन्सलटेशनची सेवाही पुरविण्यात येते.

      कोविड 19 च्या महासाथीच्या काळात एचडब्ल्यूसी ने महत्वपुर्ण जबाबदारी पार पाडली आहे. गावपातळीपर्यंतचे आरोग्य विभागाचे नियोजन, देखरेख, प्रक्रियेचे साखळी यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि केंद्रशाासित प्रदेशांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे शक्य होऊ शकले, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अभनिंदन करतांना व्यक्त केले. या महासाथीच्या परिस्थितीत लाखो लोकांना आवश्यक सेवा दिल्याबद्दल आघाडीचे आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी आणि आशा सेविकांचे विशेष आभार केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी मानले. कोविडच्या परिस्थितीत त्यांचे योगदान अनुकरणीय असल्याचेही त्यांनी नमुद केले.

एचडब्ल्यूसीच्या माध्यामातून संपर्क ट्रेसिंग, समुदायाचे निरीक्षण करणे, रूग्णांची लवकर ओळख पटवणे या सारख्या बाबींमध्ये मदत झाली आहे. यासह नवजात बालके, वृध्द आणि इतर आजार असणा-या गटांच्या संरक्षणासाठी, आवश्यक त्या आरोग्य सेवा या काळात या केंद्रामार्फत प्रदान करण्यात आल्या आहेत.

Thursday 19 November 2020

सर्वंकष कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिकला ग्राम स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

 


नवी दिल्ली, दि. 19 : स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)अंतर्गंत सर्वंकष आणि सातत्यपुर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांना आज राष्ट्रीय पुरस्काराने स्मानित करण्यात आले.

 

जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने दूरदृष्य प्रणालीच्यामाध्यमातून सरपंच संवाद आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि राज्यमंत्री  रतनलाल कटारिया व विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)अंतर्गत अनेक निकष ठरविण्यात आलेले आहेत. ज्या जिल्ह्यांनी सातत्यपुर्ण उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा 20 जिल्ह्यांना आज राष्ट्रीय पुरस्काने सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठरविलेल्या निकषांमध्ये 100 % हगणदारी मुक्त जिल्हा असणे, वैयत्किक तसेच सार्वजनिक स्वच्छतेविषयी स्थानिकांमध्ये अधिकाधिक जागृकता निर्माण करणे, त्यांना योग्य ती माहिती पुरविणे, त्यांना प्रशिक्षित करणे, त्यांच्याशी संवाद वाढविणे या बांबीचा  समावेश आहे.

 

नाशिक जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आणि कोल्हापूर जिल्हा‍ परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी दूरदृष्य प्रणालीच्यामाध्यमातून केंद्रीय मंत्री श्री शेखावत यांच्याशी सवांद साधला.

 

       नाशिक आणि कोल्हापूर  जिल्ह्यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आनंद व्यक्त करीत संबधित जिल्हा परिषदांच्या पदाधिकारी, अधिकारी व सर्व यंत्रणेने केलेल्या श्रमाची ही फलश्रुती असल्याचे  व्यक्त केले.  २ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात राज्याला ५ पुरस्कार मिळाले होते, ग्रामीण स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र यापुढेही अग्रेसरच राहील आणि राज्यातील ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावेल यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रयत्नशील राहील, असा विश्वास श्री पाटील यांनी  व्यक्त केला.

महाराष्ट्र सदनात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

 

 




नवी दिल्ली, १९ : देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात  साजरी करण्यात आली.

                 कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त निधी पांडे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून पाळण्यात येते. यावेळी निवासी आयुक्त यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना  राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

परिचय केंद्रात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

महाराष्ट्र परिचय केंद्रात  इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे  यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस  पुष्प अर्पण करून अभिवादन केले. परिचय केंद्राच्या  अधिकारी-कर्मचा-यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

उपसंचालक यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मकेची शपथ दिली.

Thursday 12 November 2020

राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्राची सरशी राज्याला एकूण 6 पुरस्कार; जलसंपत्ती नियमनात महाराष्ट्र दुसऱ्यांदा अव्वल









नवी दिल्ली, 12 : जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय जल पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे.  जलसंपत्ती नियमनात राज्याने दुसऱ्यांदा अव्वल स्थान पटकाविले असून  विविध क्षेत्रात एकूण 6 पुरस्कार पटकाविले आहेत.

सांगली जिल्हयाला नदी पुररूज्जीवनासाठी तर अमरावती जिल्हयातील शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी सोसायटीला पहिला पुरस्कार मिळाला. याशिवाय नाशिक, जळगाव आणि बीड जिल्हयांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलसंधारण क्षेत्रात वैविध्यपूर्ण व उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाच्या कार्याचा गौरव म्हणून 'राष्ट्रीय जल पुरस्कार 2019' चे वितरण करण्यात आले.  हे पुरस्कार 11 व 12 नोव्हेंबर असे दोन टप्यात उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांचे हस्ते दूरष्य प्रणालीद्वारे प्रदान करण्यात आले. यावेळी विविध 12 श्रेणींमध्ये एकूण 88 पुरस्कार प्रदान करण्यात आले यात महाराष्ट्राला एकूण 6 पुरस्कार मिळाले.

जलसंपत्ती नियमनात महाराष्ट्र देशात पुन्हा अग्रेसर

या कार्यक्रमात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात देशातील सर्वोत्कृष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्राधिकरणाचे सदस्य तथा जनसंवाद प्रमुख बॅरी. विनोद तिवारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राज्यातील उपलब्ध जलसंपत्तीचे न्यायोचित, समन्यायी व टिकाऊ वितरण व व्यवस्थापन यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा, 2005’ अन्वये जलसंपत्ती नियमन प्राधिकरण स्थापन झालेले आहे. राज्यातील भू-पृष्ठावरील उपलब्ध जलसंपत्तीचे तसेच भू-जलाचे हे प्राधिकरण नियमन करते, प्राधिकरणाने स्वायत्तपणे जनहितार्थ घेतलेले निर्णय व त्यांच्या अंमलबजावणीने जलक्षेत्रात झालेला सकारात्मक परिणाम, अधिनियमाने विहित केलेल्या जबाबदाऱ्यांची अंमलबजावणी, पाण्याचा काटेकोर वापर, जल प्रदूषणावर नियंत्रण, सांडपाण्याचा पुनर्वापर यासाठी केलेली जनजागृती यांचा सर्वकष विचार करुन केंद्र शासनाने देशातील सर्वोकृष्ट जल नियमन प्राधिकरण या संवर्गातील प्रथम पुरस्कारासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची सलग दुसऱ्यांदा निवड केली आहे. 

 नदी पुररूज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला

नदी पुनरूज्जीवन श्रेणी मध्ये देशातील एकूण 6 विभागांमध्ये प्रत्येक विभागातील सर्वोत्तम तीन जिल्हयांना पुरस्कार प्रदान  करण्यात आले. पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्हयाला अग्रणी नदीच्या पुनरूज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सांगली जिल्हयाच्या खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे उगम असलेली अग्रणी नदी दिडशे वर्षांपूर्वी वाहती होती. मात्र,मध्यंतरीच्या काही दशकांत ही नदी कोरडी होती व या नदिचे काही क्षेत्र लुप्त झाले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जिल्हयातील टंचाईग्रस्त भागात पाणी साठे निर्माण करण्याच्या कार्यांतर्गत अग्रणी नदी पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेतले. जिल्हा प्रशासनाने खानापूर , तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यातील 55 कि.मी. लांबीची अग्रणी नदी बारमाही करण्याच्या ध्यासाने  कार्य केले.  राज्य शासनाची योजना, जलबिरादरीसह सिंचन क्षेत्रात कार्यरत सेवाभावी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने व लोकसहभागने वर्षानुवर्षे कोरडया पडलेल्या नदिला पुनरुज्जीवन मिळाले. नदिच्या उगमापासून खोलीकरण आणि रूंदीकरणातून भव्य पात्र निर्माण झाले.

            याशिवाय अमरावती जिल्हयातील शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी सोसायटीला  सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्थेचा पहिला तर नाशिक जिल्हयातील दिंडोरी येथील वाघाड प्रकल्पाला या श्रेणीमधे दुसऱ्या क्रमांकांचा पुरस्कार केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. शाह निमनीकरा सोहोमजी यांनी वाघाड प्रकल्पाच्या वतीने तर विजय देशमुख यांनी शरद पाणी वापर संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्विकारला.

            जलसंधारणात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीना ही यावेळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये जळगाव जिल्हयातील अनोरे ग्रामपंचायतीने दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला. राज्यमंत्री श्री कटारिया यांच्या हस्ते सरपंच तुकाराम पाटील यांच्यासह ग्राम पंचायत सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जलसंधारणात उत्कृष्ट कार्यासाठी देशातील कांही व्यक्तींना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. बीड जिल्हयातील अंबाजोगाई येथील अनिकेत लोहिया यांना पश्चिम विभागात जलयौध्दयाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                     ०००००

दयानंद कांबळे/ वि.वृ.क्र.102 / दि.12.11.2020

 


Friday 6 November 2020

                    महाराष्ट्राचे कोरोना उपाययोजनेंतर्गत उल्लेखनीय कार्य

                         आर्थिक कार्य विभागाच्या अहवालात नोंद

 

नवी दिल्ली, 6 : महाराष्ट्रात कारोना बाधीत रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१ टक्के असून ऑक्टोबर महिन्यात यात उल्लेखनीय सुधारणा झाली आहे, अशी सकारात्मक नोंद केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक कार्य विभागाच्या मासिक अहवालात घेण्यात आली आहे.

         जगासह भारतात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झाला असून केंद्र व राज्य सरकारांनी या महामारीचा सामना करण्यासाठी  विविध उपाय योजना अवलंब‍िल्या आहेत. महाराष्ट्राने उत्तम आरोग्य सेवा  आणि   रास्त दरात कोरोना चाचण्या उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत घरोघरी जावून सर्वेक्षण करणे आदी महत्वाच्या उपाय योजना केल्या आहेत. परिणामी ऑक्टोबर २०२० महिन्यात राज्यात कोरोना बाधितांचे प्रमाण घटले असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे आर्थिक कार्य विभागाच्या ऑक्टोबर २०२० च्या मासिक अहवालात दिसून आले आहे.

                                           राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट  

सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत देशात ऑक्टोबर महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सुधारणा झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्येही स्थिती सुधारल्याचे अहवालात दिसून येते तर कर्नाटक, केरळ आणि तामीळनाडू या राज्यांनी स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रात १० लाख लोकांमागे १३ हजार ९४५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यातील

६.३  टक्के रूग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१ असल्याचे अहवालात नमूद आहे. राज्यात कोरोनाने मृत होणा-यांचे प्रमाण २.६ टक्के आहे. आठवडयाला सरासरी रूग्ण वाढ दर हा ०.३ टक्के असल्याचे या अहवालात  दिसून येते. राज्यात १० लाख लोकांमागे ७५ हजार ७२७ कोरोना चाचण्या केल्या जात असून आतापर्यंत ९२ लाख ५० हजार २५४ चाचण्या करण्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

                   राज्यात रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात कमालीची सुधारणा झाली आहे.आतापर्यंत १५ लाख ५१ हजार २८२ रूग्ण बरे होवून घरी  गेले आहेत. पुणे जिल्हयात ३ लाख ६ हजार २०८ रूग्ण बरे झाले आहेत तर मुंबई मध्ये २ लाख ३४ हजार ५५१, ठाणे जिल्हयात २ लाख ४ हजार६९०, नागपूर जिल्हयात ९६ हजार ८८८ आणि नाशिक जिल्हयात ९१ हजार ५०७ कोरोना बाधित रूग्ण बरे होवून घरे गेले असल्याचे आर्थिक कार्य विभागाच्या आकडेवारीत दिसून आले आहे.

                आम्हाला ट्विटरवर फॉलो करा htpp://twitter.com/MahaGovtMic                                                       

                                                     ००००

 

रितेश भुयार / वि.वृ.क्र.१०१/ दि.०६.११.२०२०

 

 

Tuesday 3 November 2020

नदी पुनरुज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला





               अग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्याला राष्ट्रीय जल पुरस्कार

 

नवी दिल्ली, 3 :  सांगली जिल्हयातील अग्रणी नदिच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर  दखल  घेण्यात आली असून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी जिल्हयाची निवड झाली आहे. पुढील आठवडयात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

            केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जल क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी वर्ष 2019 चे 'राष्ट्रीय जल पुरस्कार' घोषित झाले आहेत. विविध 12 श्रेणींमध्ये एकूण 88 पुरस्कार जाहीर झाले आहेत. नदी पुनरूज्जीवन श्रेणी मध्ये देशातील एकूण 6 विभागांमध्ये प्रत्येक विभागातील सर्वोत्तम तीन जिल्हयांना पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत. पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्हयाला अग्रणी नदिच्या पुनरूज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.पश्चिम विभागात चार राज्य आणि दोन केंद्रशासीत प्रदेशांचा समावेश आहे.    

 

                  अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल

 

सांगली जिल्हयाच्या खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे उगम असलेली अग्रणी नदी दिडशे वर्षांपूर्वी वाहती होती. मात्र,मध्यंतरीच्या काही दशकांत ही नदी कोरडी होती व या नदिचे काही क्षेत्र लुप्त झाले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जिल्हयातील टंचाईग्रस्त भागात पाणी साठे निर्माण करण्याच्या कार्यांतर्गत अग्रणी नदी पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेतले. जिल्हा प्रशासनाने खानापूर , तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यातील 55 कि.मी. लांबीची अग्रणी नदी बारमाही करण्याच्या ध्यासाने  कार्य केले.

राज्य शासनाची योजना, जलबिरादरीसह सिंचन क्षेत्रात कार्यरत सेवाभावी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने व लोकसहभागने वर्षानुवर्षे कोरडया पडलेल्या नदिला पुनरुज्जीवन मिळाले. नदिच्या उगमापासून खोलीकरण आणि रूंदीकरणातून भव्य पात्र निर्माण झाले.

हे पात्र खानापूर तालुक्यामध्ये 22 कि.मी. इतके आहे. उगमापासून तामखडी, जाधववाडी, गोरेवाडी, बेणापूर, बलवडी, करंजे, सुलतानगादे आदी गावांतील स्थानिकांनी  या कार्यात सक्रीय श्रमदान दिले. त्यामुळे जवळपास 2 कोटी मूल्य असणारी ही कामे अवघ्या 65 लाख रुपयांमध्ये पूर्णत्वास आली.
या कामांतर्गत नदीपात्रातील 3 लाख, 70 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला . त्यामुळे नदीचे पात्र 50 फूट रुंद 6 फूट खोल करण्यात प्रशासनाला यश आले . या नदीपात्रात ठिकठिकाणी 50 ते 60  नालाबांध घालण्यात आले . त्यामुळे साठणाऱ्या पाण्याचा लाभ परिसरातील जनतेला झाला आहे.अग्रणी नदी बारमाही झाल्याने नदीकाठच्या 21 गावांना  लाभ झाला. तसेच अग्रणी खोरे बारमाही होऊन या खोऱ्यातील 105 गावात जलक्रांती  घडून आली.

हा पुरस्कार म्हणजे अग्रणी  नदी खो-यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सन्मान -

                                                                          आयुक्त शेखर गायकवाड

राष्ट्रीय जल पुरस्कार हा अग्रणी नदी खो-यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांचा सन्मान असल्याच्या भावना सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा राज्याचे  विद्यमान साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना व्यक्त केल्या .

अग्रणी नदीच्या एकूण 55 कि.मी.च्या पुनरुज्जीवनाचे कार्य केवळ दीड वर्षात पूर्ण करण्यात आले व नवीन 34 बंधारे बांधले. विशेष म्हणजे यात उगमापासून लुप्त झालेल्या 22 कि.मी. नदी पात्राचे पुनरुज्जीवन करण्यात आले. दिडशे वर्षांनतर अग्रणी पुन्हा प्रवाहीत झाली व सुमारे 28 हजार शेतक-यांच्या जीवनामध्ये यामुळे आनंद निर्माण झाल्याचे श्री गायकवाड यांनी सांगितले. या कार्याची प्रेरणा घेवून कर्नाटकातील तीन गावांनी  लोकवर्गणीतून हे कार्य पुढे चालविले आहे ही बाबही त्यांनी यावेळी अधोरेखीत केली.

 

         

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा htpp://twitter.com/MahaGovtMic                                                         

                                     ०००००

रितेश भुयार / वि.वृ.क्र.100/ दि.3.11.2020