Wednesday 31 May 2017

अल्पसंख्यक वर्गों के हितो की रक्षा करने वाले कानून में सुधार करने की जरुरत : ऍड. कुंभारे


नई दिल्ली, 31 : महाराष्ट्र पूर्व मंत्री एवं राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोग की नवनियुक्त सदस्य एड सुलेखा कुंभारे ने कहा कि देश में अल्पसंख्यक वर्गों के हितों की रक्षा करने वाले कानूनों में समय के साथ सुधार करना बेहद जरुरी है और इसके लिए वह प्रयास करेगी।

मंगलवार को राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोग के सदस्य के रुप में पदभार संभालने के बाद एड. कुंभारे ने बुधवार को यहां लोकनायक भवन में पत्रकारों से मुखातिब हुई। देश में अल्पसंख्यांक वर्गों के हितों की रक्षा करने के लिए सरकार द्वारा कई कानून बनाए गए है। लेकिन इनमें समय के साथ सुधार करना आवश्यक है। इसके लिए वह आयोग के अध्यक्ष तथा अन्य सदस्यों के साथ विचार-विमर्श कर इन कानूनों में सुधार करने की दिशा में आवश्यक कदम उठायेगी।


ऍड कुंभारे ने कहा कि आयोग सरकार और अल्पसंख्यक समुदाय के लोगों के बी सेतु के तौर पर काम करेगा । जहां आयोग को ऐसा लगेगा कि कुछ ऐसे कानून बनाने चाहिए जहां पर अल्पसंख्यक समुदाय को सामाजिक, शैक्षणिक और आर्थिक रुप से सक्षम बनाने के लिए ज्यादा जरुरी है. वहां हम सरकार को सलाह देंगे और चाहेंगे कि उनके उत्थान के लिए सरकार काम करे, कुछ नए संशोधन लाए, जिससे अल्पसंख्यक समुदाय के लोग देश के मुख्य प्रवाह में आ सके।

अल्पसंख्याकांसाठीच्या कायद्यांमध्ये आवश्यक बदल सुचवणार : ऍड. सुलेखा कुंभारे




नवी दिल्ली दि. ३१ : देशातील अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या कायद्यांमध्ये काळानुसार बदल होणे गरजेचे असून त्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी माहिती माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य ऍड सुलेखा कुंभारे यांनी दिली.

            लोकनायक भवन येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ऍड कुंभारे बोलत होत्या. ऍड  कुंभारे यांनी नुकतेच राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदाचा पदभार स्वीकारला यापर्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

            ऍड. कुंभारे म्हणाल्या, देशातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी केंद्र शासनाने विविध कायदे केले आहेत. बदलत्या काळानुसार या कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी  अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्याशी चर्चा करून, या कामात पुढाकार घेणार, असल्याचे त्यांनी सांगितले.
           
अल्पसंख्याक समाजाबद्दल जनतेमध्ये जनजागृती करून त्यांना समाजात आदर, मान सन्मान आणि सुरक्षितता  मिळावी यासाठी आयोग कार्य करेल, असेही त्यांनी सांगितले. अल्पसंख्याकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजापर्यंत शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधा  पुरविण्यासाठी आम्ही काम करू. तसेच, या समाजाला पोषक सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक वातावरण  निर्माण करून देऊ असेही त्या म्हणाल्या.  

राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी






नवी दिल्ली दि. ३१ :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९२ वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सचिव तथा आयुक्त आभा शुक्ला  यांनी  अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त इशु संधू ,अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात आलेल्या अभ्यागतांसह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
         000000


Tuesday 30 May 2017

अल्पसंख्यांकांच्या न्याय व हक्कांसाठी काम करेन : सुलेखा कुंभारे


                           

 
 







नवी दिल्ली, दि. ३० : देशातील अल्पसंख्यांक समाजाच्या न्याय व हक्कांसाठी काम करेन अशा भावना, महाराष्ट्राच्या माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केल्या.

            येथील लोकनायक भवन येथे आज राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष गैरूल हसन रिझवी यांच्या उपस्थितीत सुलेखा कुंभारे यांनी आयोगाच्या सदस्य पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्या बोलत होत्या. 
             कुंभारे म्हणाल्या, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग हा देशातील बौध्द, शिख, मुस्लीम, पारसी, जैन आदी अल्पसंख्याक समाजातील लोकांसाठी काम करतो. नव्याने नियुक्त झालेल्या आयोगाचे अध्यक्ष  गैरूल हसन रिझवी यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय आयोग हा देशातील अल्पसंख्यांकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या हक्कांसाठी काम करेन. अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, त्यांच्यासाठी चांगले सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक  वातावरण निर्माण करण्यावर आपला भर असेल, असे त्या म्हणाल्या.
           
आयोगाचे अध्यक्ष तथा सदस्य हे मुळात सामाजिक कार्यकर्ते असल्याने त्यांचा समाजाचा चांगला अभ्यास आहे. त्यांना अल्पसंख्यांकाच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे आयोग अधिक सक्षमपणे काम करेल. आम्ही अल्पसंख्याक जनता व सरकार यांच्यामध्ये सेतु बांधण्याचे  काम करू अशाही  कुंभारे म्हणाल्या.
                              
                                  प्रधानमंत्री व मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार

         कुंभारे यांनी आयोगाच्या सदस्यपदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. 

                                               वडिलांची आठवण     

            राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य पदाचा पदभार स्वीकाराताना वडीलांची आठवण होत असल्याचे कुंभारे म्हणाल्या. १९७२ ते १९७८ या काळात वडील खासदार असताना त्यांच्या दिल्लीतील २०२, साऊथ एव्हेन्यू या शासकीय निवासस्थानी आम्ही येत असू, आज त्या आठवणी ताज्या झाल्याचे त्यांनी सांगितले. वडीलांकडून मिळालेल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून आयोगाच्या सदस्य म्हणून उत्तम कार्य करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.    

Friday 26 May 2017

प्रा. सुखदेव थोरात यांना डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार



नवी दिल्ली, दि. 26 : प्राध्यापक सुखदेव थोरात यांना आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वर्ष 2011 चा डॉ. आंबडेकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. केलेल्या कामाचे उचित मुल्याकंन झाले असून पुरस्काराने समाधानी असल्याची भावना प्रा. थोरात यांनी व्यक्त केली.
        विज्ञान भवन येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत येणा-या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानाच्यावतीने दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी महत्वपूर्ण योगदान देणा-या मान्यवरांना राष्ट्रपतीच्या हस्ते डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार‍वितरीत करण्यात आले. या सोहळयात वर्ष 2011, वर्ष 2012 तसेच वर्ष 2014 साठी देशभरातील तीन संस्था आणि एका व्यक्तीला यावेळी सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रूपये रोख प्रशस्तीपत्र असे आहे.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री विजय सांपला, रामदास आठवले, कृष्णपाल, डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दारा संभय्या, सचिव जी. लथा कृष्णराव मंचावर उपस्थित होत्या. यावेळी प्रा. सुखदेव थोरात यांना वर्ष 2011 चा डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. सुखदेव थोरात हे मुळचे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचे आहेत. त्यांनी अर्थशास्त्र विषयात ‍दिल्लीतील जवाहर लाल नेहरू विद्यापीठातून पीएच.डी. केली.  1989 ते 1991 पर्यंत आईओवा स्टेट विद्यापीठ, युएसमध्ये प्रा. थोरात अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. यासह इंटरनेशनल फुड पॉलिसी रिसर्च इंस्टीटयूट, वाशिंगटनमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत होते.  2006 ते 2011 दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली.  
        प्रा. थोरात यांना 2008 मध्ये भारत सरकारने पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केले. सध्या ते भारतीय समाज विज्ञान संशोधन परिषद (आईसीएसएसआर) चे अध्यक्ष आहेत. यासह जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणुनही कार्यरत आहेत.

प्रा. थोरात यांचा जाती प्रथा, जातीय भेदभाव, अर्थव्यवस्था आणि गरिबी या विषयाचे विश्लेषक आहेत. यासह डॉ. आंबेडकरांनी लिहीलेल्या पुस्तकांचे गाडे अभ्यासक आहेत. प्रा. थोरात यांनी आतापर्यंत 21 पेक्षा अधिक शैक्षणिक पुस्तके लिहीलेली आहेत. यासह त्यांचे 100 पेक्षा अधिक लेख प्रकाशित झालेले आहेत. 

Thursday 25 May 2017

Byte of Hon'ble C.M. Maharashtra on Helicopter Crash


* (मराठी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलीकॉप्टर क्रॅशनंतर   प्रतिक्रिया, सगळयांच्या आशीर्वादाने मी सुखरूप तसेच सहयोगी सुरक्षीत.

 * (हिंदी) महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के लातुर मे हुयें हेलीकॅाप्टर क्रॅश के बाद, श्री फडणवीस ने बयान दिया, स्वयं सहीत सभी सहयोगी सुरक्षित होनी जानकारी दि.


       *    (English ) Chief Minister of Maharashtra  Shri Devendra Fadnvis Informed,  'With the                           blessings of people of Maharashtra and Nation, I'm safe.My team is fine too. Please do not                  believe any rumours'.(25-05-2017)


Wednesday 24 May 2017

उच्च श्रेणी लघू लेखक सी.टी.रामचंद्रन यांना निरोप

           
  
 

                                                

नवी दिल्ली, दि. २४ : महाराष्ट्र परिचय केंद्राचे उच्च श्रेणी लघू लेखक सी.टी.रामचंद्रन हे नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले असून आज त्यांना कार्यालयाच्यावतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.

            श्री. रामचंद्रन यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात एकूण ३१ वर्ष सेवा दिली. नियतकामासोबतच श्री. रामचंद्रन यांनी कार्यालयाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यालयाच्यावतीने श्री. रामचंद्रन यांचा सत्कार केला. श्रीमती रामचंद्रन यांचा सत्कार माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी केला. परिचय केंद्रातील श्री. रामचंद्रन यांचे जुने सहकारी, कुटूंबीय आणि पत्रकार  यावेळी उपस्थित होते.
                               

          श्री. रामचंद्रनसोबत दिर्घकाळ काम करणारे सहकारी कर्मचारी व अधिकारी यांच्यासह उपस्थितांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.                 

Saturday 20 May 2017

अशांतीतूनच लेखन स्फुरते : एम.जे.अकबर



               डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या शांती की अफवांए पुस्तकाचे प्रकाशन  
नवी दिल्ली दि. २० : समाजात विविध क्षेत्रातील अशांती हीच विचारास प्रवृत्त करते व त्यातून साहित्यकृती जन्माला येते डॉ. ज्ञानेश्वर मुळेंनाही त्यातूनच प्रेरणा मिळाली असावी म्हणूनच त्यांनी एक उत्तम काव्य संग्रह वाचकांसाठी आणला अशा भावना केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे.अकबर यांनी व्यक्त केल्या.  
        साहित्यीक व परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे लिखीत आणि आलोकपर्व प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित शांती की अफवाएं या काव्य संग्रहाचे येथील प्रवासी भारतीय केंद्रात प्रकाशन झाले त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. अकबर बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष बलदेवभाई शर्मा यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजेजू ,न्यूज ऑब्जर्व्हर पोस्टचे मुख्य संपादक ओंकारेश्वर पांडे यावेळी उपस्थित होते.   
            श्री . अकबर म्हणाले, समाजात विविध क्षेत्रात असलेली अशांतता ही साहित्यीकाला स्वस्थ बसू देत नाही. साहित्यीकाच्या मनात या सर्व अशांतीमुळे विचारांचे आंदोलन सुरु असतात यासर्वांचा परिपाक म्हणून उत्तम साहित्यकृती जन्माला येते. डॉ. मुळे यांनी हाच धागा पकडला म्हणूनच अफवांमध्ये शांततेचा शोध घेणारा नायक हा त्यांच्या कवितेचा मूळ आत्मा ठरतो असे त्यांनी सांगितले. भारतीय परराष्ट्र सेवेत कार्य करताना स्वत:तील साहित्यीक जीवंत ठेवत डॉ. मुळे यांनी  केलेले वैविध्य पूर्ण  लेखन कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. 
            श्री. किरेन रेजीजू म्हणाले, डॉ. मुळे हे परराष्ट्र सेवेतील उत्तम अधिकारी आहेत. देशासह परदेशात त्यांच्या उत्तम कार्याची महती  ऐकायला मिळते. परराष्ट्र सेवेतील आपल्या अनुभवांना त्यांनी साहित्यात उतरवले आणि वाचकांपुढे मांडले ही महत्वाची उपलब्धी आहे. हिंदी सोबतच ते मराठी या आपल्या मातृभाषेतही लेखन करतात त्यामुळे राजभाषा विभागाचा मंत्री म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. डॉ. मुळे यांनी अजुनही लेखन करून साहित्याची सेवा करावी अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.            
               प्रशासनात येऊनही आपल्यातील साहित्यीक कसा जीवंत आहे आणि तो दिवसेंदिवस कसा प्रगल्भ होत आहे हे डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांनी यावेळी शांती की अफवाएं या काव्य संग्रहातील कौन क्या बोला आणि फालुजा या कविताही सादर केल्या.  
              ओंकारेश्वर पांडे यांनी यावेळी  डॉ. मुळे यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला, बलदेवभाई शर्मा यांनी डॉ. मुळे यांच्या काव्य संग्रहातील बारकावे आपल्या भाषणात मांडले. पत्रकार तथा आलोकपर्व प्रकाशनाचे प्रमुख रामगोपाल शर्मा यांनी आभार प्रदर्शन केले.


                                                          000000  

राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा





नवी दिल्ली दि. २० : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन म्हणून शनिवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली . 

कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सचिव तथा निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. श्रीमती शुक्ला यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त अजितसिंग नेगी, राजीव मलीक यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा  
            महाराष्ट्र परिचय केंद्रात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक  दयानंद कांबळे यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यांनी उपस्थित कर्मचा-यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. यावेळी कार्यालयात आलेल्या अभ्यागतांसह कार्यालयातील कर्मचा-यांनीही प्रतिमेस आदरांजली वाहिली. 

Thursday 18 May 2017

हरियाणा माहिती विभागाच्या अधिका-यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट










नवी दिल्ली, 18 : दिल्ली स्थित हरियाणा राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक जगदीप दुहान आणि जनसंपर्क अधिकारी अशोक राठी यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.

         महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी यावेळी श्री दुहान यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी          श्री. दुहान व श्री राठी यांना दिली.  उभय अधिका-यांना यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना  भेट देऊन या अधिका-यांनी  माहिती जाणून घेतली.  या अधिका-यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.       

                                                                       00000

सरल व नम्र पर्यावरणवादी हमने खो दिया


       अनिल माधव दवे जी के निधन पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री की श्रध्दांजली 

मुंबई/नई दिल्ली दि. 18 : केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे जी के निधन से महाराष्ट्र के महत्त्वपूर्ण परियोजनाओं कों बढावा देने वाला सरल तथा नम्र पर्यावरणवादी हमने खो दिया है, इन शब्दों में  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने  श्रध्दांजली अर्पित कि है.
अपने  शोकसंदेश में मुख्यमंत्री ने कहा, श्री. दवे जी के निधन से मुझे बडा आघात पहुंचा है. महाराष्ट्र के महत्वपूर्ण परियोजनाओं के संबंध में मै सदैव उनके संपर्क में था. उन्होंने भी स्वयं ध्यान दे कर इन परियोजनाओं को गतिशील बनाने हेतु आवश्यक मंजुरी पर शिघ्र कार्यवाही की थी. विशेष रूप से मुंबई के नागरिकों के जीवन की गुणवत्ता बढाने में महत्वपूर्ण साबित होने वाले प्रस्तावित समुद्र तटीय मार्ग तथा अपशिष्ट प्रसंस्करण केंद्र को उन्होंने तत्काल प्रभाव से पर्यावरण संबंधी मंजुरी प्रदान की. उनके इस योगदान का महाराष्ट्र को सदैव स्मरण रहेगा. छत्रपति शिवाजी महाराज के जीवनचरित्र के अभ्यासक रहे श्री. दवे जी का व्यक्तित्व बहुत ही सरल, विनम्र तथा संवेदनशील था. 
00000

Wednesday 17 May 2017

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले ‘लोकराज्य’ अंकाचे कौतुक










        
नवी दिल्ली, 17 : केंद्र शासनाला तीन वर्षपूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्य अंकाचे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कौतुक केले.
            महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी आज शास्त्री भवन येथे श्री.रामदास आठवले यांना महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने प्रकाशित मे  महिन्याचा लोकराज्य’ अंक भेट दिला. यावेळी श्री. आठवले यांनी या अंकातील विविध लेख, मुलाखती आणि महत्वपूर्ण माहिती आदी वाचले. या अंकातील लेख व मुलाखतींचा आशय, अकांची मांडणी उत्तम असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली.
या विशेषांकाच्या माध्यमातून केंद्र शासनाची विविध क्षेत्रातील उपलब्धी , महाराष्ट्राला विविध क्षेत्रासाठी दिल्लीतून मिळालेला निधी आणि राज्यासंबंधी  घेण्यात  आलेले महत्वाचे निर्णय आदी उत्तम प्रकारे या अकांतून वाचकांपर्यंत पोहचविण्यात येत असल्याचेही श्री. आठवले यांनी सांगितले.     

पुणे,अहमदनगर आणि बडनेरा रेल्वे स्थानके स्वच्छतेत आघाडीवर राज्यातील एकूण 38 रेल्वे स्थानकांचा समावेश








 नवी दिल्ली, 17 : देशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांची यादी आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केली. यादीत अ 1 श्रेणीत महाराष्ट्रातील पुणे रेल्वे स्थानकाने 9 वे स्थान पटकावत पहील्या दहात स्थान मिळवले. तर, अ श्रेणी मध्ये अहमदनगर ने तिस-या व बडनेरा रेल्वे स्थानक सहाव्या स्थानावर आहे.
रेल्वे भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी देशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांचा समावेश असलेल्या ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांची नावे जाहीर केली. यावेळी रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहन आणि रेल्वे बोर्डाचे ए.के.मित्तल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यादीत अ 1 श्रेणीत महाराष्ट्रातील 10 रेल्वे स्थानकांचा तर, अ श्रेणी मध्ये 28 अशा एकूण 38 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे .
रेल्वे मंत्र्यांनी पुणे, बडनेरा व लोणावळा रेल्वे स्थानकांचे केले कौतुक
यावेळी बोलताना रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी देशातील रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेबाबत होत असलेल्या सुधारणांबाबत समाधान व्यक्त केले. त्यांनी यावेळी पुणे व लोणावळा रेल्वे स्थानकांचा विशेष उल्लेख करत या रेल्वे स्थानकांनी मागील वर्षी पेक्षा स्वच्छता यादीत केलेल्या सुधारणेबाबत कौतुक केले. ते, म्हणाले, गेल्यावर्षी 75 व्या स्थानावर असलेल्या पुणे रेल्वे स्थानकाने आपल्या कामात महत्वपूर्ण सुधारणा करीत पहील्या 10 स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. या रेल्वे स्थानकावर समाजातील विविध घटकांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याने हा बदल झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. बडनेरा रेल्वे स्थानकाने गत वर्षीच्या 269 व्या स्थानाहून थेट 6 व्या स्थानावर झेप घेतली आहे. लोणावळा रेल्वे स्थानकानेही 312 व्या स्थानाहून थेट 29 वे स्थान मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले.
 असे झाले परिक्षण
गेल्या वर्षीपासून रेल्वे मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचे विविध मानकांवर नामांकित संस्थेच्यावतीने परिक्षण करण्यात येते. यावर्षीही देशातील रेल्वे स्थानकांचे दोन श्रेणींमध्ये परिक्षण करण्यात आले. ज्या रेल्वे स्थानकांहून वर्षाकाठी 50 कोटींपेक्षा ज्यास्त प्रवाशी प्रवास करतात अशा रेल्वे स्थानकांना अ 1 श्रेणी मध्ये तर 6 ते 60 कोटीं प्रवाशी प्रवास करणा-या रेल्वे स्थानकांना अ श्रेणी मध्ये ठेवण्यात आले. रेल्वे स्थानका शेजारील खुल्या परिसरात स्वच्छता गृह, मुख्य प्रवेश द्वारा शेजारी स्वच्छतागृह व अन्य स्वच्छता. तसेच रेल्वे स्थानकावर खुल्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था, विक्रेत्यांची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रतिक्षालय, रेल्वे रूळ आणि पादचारी बाबींचे नीट निरीक्षण करून या रेल्वे स्थानकांना मानांकन देण्यात आले आहे. या सर्वांसाठी 1000 गुण ठरविण्यात आले होते पैकी विविध मानकानुसार गुणांकन करण्यात आले.
                                        मुंबई उपनगरीय रेल्वेच्या 7 स्थानकांचा यादीत समावेश
स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत मुंबई उपनगरीय रेल्वेच्या 7 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यात वांद्रे, मुंबई सेंट्रल, मुंबई सीएसटी, कल्याण जंक्शन, ठाणे, दादर आणि पनवेल या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील स्वच्छ रेल्वे स्थानके

अ 1 श्रेणी स्थानके
अ.क्र. विभाग रेल्वे स्थानक श्रेणी
1 मध्य रेल्वे पुणे जंक्शन 9
2 पश्चिम रेल्वे बांद्रा 15
3 मध्य रेल्वे सोलापूर 21
4 पश्चिम रेल्वे मंबई सेंट्रल 27
5 मध्य रेल्वे मुंबई सी.एस.टी 44
6 मध्य रेल्वे नागपूर 54
7 मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस् 60
8 मध्य रेल्वे कल्याण जंक्शन 63
9 मध्य रेल्वे ठाणे 68
10 मध्य रेल्वे दादर 70

अ श्रेणी स्थानके
अ.क्र. विभाग रेल्वे स्थानक श्रेणी
1 मध्य रेल्वे अहमदनगर 3
2 मध्य रेल्वे बडनेरा 6
3 मध्य रेल्वे अमरावती 11
4 मध्य रेल्वे बल्लारशाह 18
5 मध्य रेल्वे चंद्रपूर 20
6 मध्य रेल्वे वर्धा 21
7 मध्य रेल्वे भुसावळ 24
8 मध्य रेल्वे लोणावळा 29
9 मध्य रेल्वे दौंड 42
10 मध्य रेल्वे अकोला 45
11 मध्य रेल्वे शिर्डी 51
12. मध्य रेल्वे लातूर 53
13 मध्य रेल्वे कोपरगांव 54
14 पश्चिम रेल्वे अंकलेश्वर 63
15 दक्षिण मध्य रेल्वे परभणी जंक्शन 83
16. दक्षिण पूर्व मध्य गोंदिया 84
17 मध्य रेल्वे कोल्हापूर 101
18 मध्य रेल्वे मिरज जंक्शन 104
19 मध्य रेल्वे पनवेल 111
20 मध्य रेल्वे जलगांव 115
21 दक्षिण मध्य रेल्वे नांदेड 116
22 मध्य रेल्वे नाशिक रोड 123
23 दक्षिण मध्य रेल्वे औरंगाबाद 131
24 दक्षिण मध्य रेल्वे जालना 137
25 मध्य रेल्वे मनमाड जंक्शन 175
26 मध्य रेल्वे चाळीसगांव 186
27 मध्य रेल्वे शेगांव 193
28 उत्तर पश्चिम रेल्वे नागपूर 270

Monday 15 May 2017

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन धोरण सर्वसमावेशक : मदत व पुनर्वसन मंत्री श्री पाटील










नवी दिल्ली, 15 : महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन धोरण सर्वसमावेशक असल्याचे,  प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय आपत्ती निवारण समिती (एनपीडीआरआर) च्या  दुस-या  बैठकीचे आयोजन विज्ञान भवन येथे करण्यात आले होते. या बैठकीची अध्यक्षता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. यावेळी श्री पाटील बोलत होते. यावेळी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी, केंद्रीय गृह राज्य मंत्री किरेन रिजिजु, हंसराज अहिर, विविध राज्यांचे मदत व पुर्नवसन मंत्री, वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्याने मागील 25 वर्षात लहान- मोठया अशा नैसर्गिक तसेच मानवनिर्मित  अनेक आपत्तींचा यशस्वी मुकाबला केला आहे. यासाठी राज्याने आपत्ती व्यवस्थापन धोरणात सर्वसामवेशकता आणली आहे. या धोरणामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून,  प्रशासकिय अधिकारी कर्मचारी ते सामान्य नागरीकांचा समावेश आहे.
 महाराष्ट्र हे देशातील प्रथम असे राज्य आहे जिथे स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे.  1995 मध्येच राज्यात  जोखीम भेद्यता आकलन (एचआरवीए) करण्यात आले आहे.  याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात  आपत्ती व्यवस्थापन  निपुण अधिकारी नियुक्त केले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार सर्वच शासकिय विभागात आपत्ती निवारणासंदर्भात पाऊले उचलली जात आहेत. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्यामाध्यमाने तालुका ते राज्यस्तरावरील सर्व अधिका-यांचे  आपत्ती जोखीम निवारण कार्यक्रम तयार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात आपत्ती प्रतिसाद दल
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर राज्यातही राज्य आपत्ती प्रतिसाद दला ची स्थापना करण्यात आली आहे. नागपूर, पुणे, धुळे या आणि अन्य ठिकाणी या दलाची तुकडी तैनात केली आहे. हे दल आपत्ती काळात लगेचच प्राथमिक सोयी उपलब्ध करून देऊ शकतात. यासह शांती काळात या दलाचे काम आपत्ती प्रवण क्षेत्राचा शोध घेणे, तसेच बचावात्मक प्रशिक्षण देण्याचे अतिरीक्त कामही सोपविण्यात आलेले आहे.
9 वी आणि 10 वी च्या अभ्यासक्रमात आपत्ती व्यवस्थापन विषय
जनतेत जागृती करण्याबरोबर  त्यांना शिक्षित करने ही महत्वपुर्ण आहे. विद्यार्थी ही भुमिका अधिक सक्षमपणे पार पाडु शकतात, त्यासाठी 9 वी आणि  10 वीच्या अभ्यासक्रमात आपत्ती व्यवस्थापन विषय शिकवले जात आहेत. यासह राज्यातील शाळेंमध्ये सुरक्षा कार्यक्रमही राबविण्यात येत आहेत. यातंर्गत प्रथम टप्पात राज्यातील  15 जिल्हयांमध्ये 1500 शाळेत हा कार्यक्रम राबविला,  असल्याची माहिती श्री पाटील यांनी दिली. 
राज्य शासन 40 ते 50 कोटी वृक्षारोपण करणार
वाढत्या औद्योगिकीकरण, शहरीकरणामुळे वन क्षेत्रात घट झाली आहे. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने  मागील वर्षापासून वन महोत्सव या अंतर्गत 1 जुलै 2016 ला राज्यभरात 2 कोटी वृक्ष लागवड केली आहे. हा कार्यक्रम राज्यभर  अत्यंत यशस्वी झाला. येत्या दोन तीन वर्षात राज्य शासन 40 से 50 कोटी वृक्षारोपण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. या लक्ष्य पुर्तीसाठी गावातच नर्सरी सुरू करण्यात येईल. त्यामुळे रोजगारही मिळणार तसेच स्थानीक ठिकाणी रोपटेही मिळतील.
दुष्काळ सदृश्य ठिकाणांसाठी जलयुक्त शिवार
महाराष्ट्रातील काही जिल्हे हे दुष्काळ प्रवण भागात मोडतात अशा ठिकाणी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून  जमीनीतील पाण्याचे स्तर वाढविण्यात आले आहे. पावसाचे पाणी रोखुन जमीनीत मुरण्याचे काम जलयुक्त शिवारमुळे होत आहे. शेततळे, तलाव,  झ-यामधील पाणी अधिककाळ टिकून राहण्यासाठी  गड्डयांची लांबी-रुंदी वाढविली जात जाते.  त्यामुळे दुष्काळ सदृश्य भागात पाण्याच्या टंचाईचा प्रश्न कमी प्रमाणात उदभवल्याचे अनुभव आले आहेत.

भुमिगत केबलिंग व्यवस्था
राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीमला कमी करण्याच्या दुस-या टप्प्यातील कार्यक्रमात महाराष्ट्राला सामील करण्यात आले असून या कार्यक्रमातंर्गत  भुमिगत केंबलिंग व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुद्धा विद्युत प्रवाह कायम राहील.
दुष्काळाला रोखण्यासाठी युनिसेफ सोबत तंत्रसहाय
राज्य शासनाने दुष्काळ प्रवण जिल्ह्यासाठी जागतिक संस्था युनिसेफ ची मदत घेतली आहे.  यातंर्गत शासकीय अधिका-यांना प्रशिक्षित करण्याचा उद्देश आहे.  युनिसेफच्या तांत्रिक सहायाने उस्मानाबादमधील दुष्काळ रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत.

00000

Friday 12 May 2017

परिचारिका या आरोग्य सेवांच्या अग्रभागी : राष्ट्रपती













महाराष्ट्रातील 3 परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 12 :  परिचारिका या राष्ट्रीय आरोग्य सेवांच्या अग्रभागी असल्याचे प्रतिपादन, राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केले. राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील 3 परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
        फ्लोरेंस नाइटिंगेल यांच्या जन्मदिन हा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते देशभरातील 35 परिचारिकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा, आरोग्य सचिव सी.के मिश्रा, वरीष्ठ अधिकारी, विविध शासकीय रूग्णालयातील परिचारिका उपस्थित होत्या.
राष्ट्रपती म्हणाले, परिचारिकांच्या योगदानावरच आरोग्य क्षेत्राचे यश अवलंबून आहे. भारतासारख्या विकसनशील व्यवस्थेमध्ये परिचारिका, आरोग्य सेविका, आरोग्य सहायिका यांची भूमिका महत्वपूर्ण असून, त्या कमी खर्चात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रदान करतात. राष्ट्राला या सेवेचा गर्व आहे. 20 व्या तसेच 21 व्या शतकात आरोग्य सेवांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा झालेल्या आहेत. त्यामुळेच शहरी तसेच ग्रामीण जीवनमान उंचावले आहे. यासह माता मृत्युदर, नवजात शिशु मृत्युदर नियंत्रित करण्यामध्ये मोठे यश आले असल्याचे, राष्ट्रपती म्हणाले.
आरोग्य सेवांमध्ये मानदंड ठरविणे ही काळाजी गरज असल्याचे यावेळी राष्ट्रपती म्हणाले. 2017च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाची प्रशंसाकरून यामध्ये नवनवीन शोध, संशोधन, आणि आधुनिक काळाशी सुसंगत बदल सुचविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय परिचारिका या स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या भूमिका पार पाडीत आहेत. त्यामुळे व्यावसायिक विकास तसेच मनुष्य बळ विकास धोरण निश्चित करणे आवश्यक असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.
        याप्रसंगी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या देशभरातील 35 परिचारिकांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याहस्ते राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील 3 परिचारिकांचा समावेश आहे. पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रशस्तीपत्र, आणि 50 हजार रूपये रोख असे आहे. हा पुरस्कार 1973 पासून प्रदान करण्यात येतो.
        मुंबईतील टाटा मेमोरियल रूग्णालयाच्या नर्सिंग अधिक्षक श्रीमती स्वप्ना जोशी या मागील तीन दशकापासून परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी कॅन्सरग्रस्त बालकांसाठी विशेष कार्य केले आहे.  बालकांना होणारे कॅन्सर (ऑन्कोलॉजी) यामध्ये श्री जोशी यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच याविषयांवर अधिक संशोधनासाठी त्यांनी माय चाईल्ड मॅटर्स या प्रकल्पावर काम केले. सध्या त्या अन्य परिचारिकांना कॅन्सरग्रस्त बालकांना कशा पद्धतीने हाताळायला हवे याबाबत प्रशिक्षण देतात. वैद्यकिय शस्त्रक्रिया नर्सिंग हे पुस्तक श्रीमती जोशी यांनी लिहीले आहे. तसेचप्रसुती शास्त्रातील नर्सिंग या पुस्तकाच्या त्या सहलेखिका आहेत. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेत अनेक शोध प्रंबध सादर केलेले आहेत. श्रीमती जोशी या नोंदणीकृत परिचारिका तसेच नोंदणीकृत मिडवाईफ आहेत. श्रीमती जोशी यांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
        जळगाव जिल्ह्याच्या,चोपडा तालुक्यातील अडावत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका चंद्रकला चव्हाण यांनाही आज राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्या मागील 32 वर्षापासून आरोग्य सेविका म्हणून समर्पित तसेच उत्साही भावनेने काम करीत आहेत. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, प्रसुतिपूर्व आरोग्य विषयक जागरूकता आणि राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात त्या नेहमी पुढाकार घेतात. त्यासाठी स्थानिक पातळीवर त्यांच्या गौरवही करण्यात आलेला आहे. कुशल बाळंतपण, नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रमातही त्या हिरीरीने भाग घेतात. स्थानिक पातळीवर आरोग्य संदर्भात मोठया प्रमाणात जागरूकता केल्यामुळे 2013-14 मध्ये त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक प्रसूती झाल्याची नोंद आहे. आरोग्य क्षेत्रासोबतच त्या केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्येही स्वयंस्फुर्तपणे भाग घेतात.

        जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील ढेकु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका श्रीमती कल्पना गायकवाड यांनाही आज राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. ढेकु येथील आरोग्य  क्षेत्रात मागील 28 वर्षापासून त्या सेवा देत आहेत. प्रसुतीपूर्व तसेच प्रसुती दरम्यान मातेची तसेच नवजात शिशुची काळजी यासह कुटुंब कल्याण या संबधीत त्यांनी सर्वाधिक कार्य केले आहे. केंद्र शासनाच्या सर्वच आरोग्य संबधित कार्यक्रम त्या मोठया उत्साहाने राबवितात. त्यांच्या या कामाची प्रशंसा स्थानिक पातळीवरही करण्यात आली आहे.