Wednesday 27 September 2023

सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ स्पर्धेत पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक

 







नवी दिल्ली, दि.27 : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेजस्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मधाचे गाव पाटगावम्हणून विकसित होत असलेले पाटगावहे कांस्य पदक विजेते गाव ठरले आहे. राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव पाटगावची निवड झाली आहे.

   नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट व पर्यटन विभागाच्या सचिव व्ही. विद्यावती यांच्या हस्ते  देण्यात आलेला हा पुरस्कार पर्यटन विभागाच्या पुणे विभागीय उपसंचालक शमा पवार, महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी, पाटगावचे सरपंच विलास देसाई, मधपाळ वसंत रासकर यांनी स्वीकारला.

   शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबविणाऱ्या पाटगावची सामाजिक, नैसर्गिक, आर्थिक निकषाच्या आधारे या स्पर्धेसाठी निवड झाली होती. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 750 हून अधिक गावांमधून केवळ 35 गावांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. यापैकी 5 गावांना सुवर्ण, 10 गावांना रौप्य तर 20 गावांना कांस्य पदक मिळाले आहे.

युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑरगनायझेशन, युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅम, जी -20, केंद्रीय पर्यटन मंत्रालय व केंद्रीय वन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने या गावांचा वर्षभर विकास करण्यात येणार आहे. रुरल टुरिझम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया ही देशपातळीवरील संस्था देशातील या 35 गावांचा विकास करणार आहे.

               सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पाटगावसह पाच ग्रामपंचायती एकत्र येवून याठिकाणी तयार होणाऱ्या शुद्ध व नैसर्गिक मधाची निर्मिती करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा नियोजन समितीच्यावतीने पाटगाव मध्ये मधाचे गाव पाटगावहा उपक्रम राबविण्यात येत असून याव्दारे ही गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत आहेत.  हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रोत्साहन देत निधी उपलब्ध करुन दिला आहे. मध विक्री व मध पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर यांनी सुरुवातीपासून या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी यासाठी सहकार्य केले. मध उद्योगाबरोबरच या ठिकाणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वेळोवेळी बैठका घेवून सुक्ष्म नियोजन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील तसेच नाबार्ड, खादी व ग्रामोद्योग विभाग, महसूल, ग्रामविकास, पर्यटन विभागासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केले आहे. नाबार्डच्या सहकार्यातून पाटगाव मधउत्पादक शेतकरी कंपनीस्थापन करण्यात आली असून या माध्यमातून मध उत्पादक, विक्रेत्यांसह महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन देत पाटगावबरोबरच आजूबाजूच्या गावांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी व मध निर्मिती व विक्री उद्योगाला चालना देण्यात येत आहे. 

          पाटगावच्या मधाचे ब्रँडींग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटींगसाठी प्रशासनाच्या वतीने सुक्ष्म नियोजन सुरु आहे. अधिकाधिक मध उत्पादकांना प्रशिक्षण देणे, मधपाळांना मधपेट्या देणे, आवश्यक कर्ज पुरवठा होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. पाटगावसह शिवडाव, अंतुर्ली, मठगावतांब्याची वाडी या ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये मधपाळ तयार करुन येथील नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

          या उपक्रमांतर्गत पाटगाव परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते पाटगाव मार्गावर माहिती फलक लावण्यात आले आहे. तसेच पर्यटन संचालनालयाच्यावतीने पर्यटकांसाठी याठिकाणी न्याहारी व निवासाची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी सुविधा अधिक दर्जेदार पध्दतीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  पाटगावमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत माहिती देणारे माहिती केंद्र तयार करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांना मधाच्या पेट्या, मधनिर्मिती प्रक्रिया पाहता येण्यासाठी लवकरच या ठिकाणी हनी पार्क (मध उद्यान) तयार करण्यात येणार आहे. पाटगाव मध्ये सुरु होणाऱ्या सामुहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणाऱ्या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळ येणाऱ्या पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल.

0 0 0 0 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

                                     अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.178  / दिनांक 27.9.2023

 

 

 


Monday 25 September 2023

राजधानीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी





नवी दिल्ली २५ :  पंडितडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा  प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही प्रतिमेस पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी अभिषेक जाधव यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्‍यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

0000000000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 177, दि.25.09.2023


 

Thursday 21 September 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का कार्यालय अब व्हाट्सएप चैनल पर! योजनाओं, निर्णयों के बारे में सटीक, आधिकारिक जानकारी प्राप्त होगी

 


नई दिल्लीदि. 21: 'आम आदमी के मुख्यमंत्रीइस नाम से मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अब व्हाट्सएप के जरिए राज्य की जनता से सीधे 'जुड़गए हैं. गणेश उत्सव के पहले दिन मुख्यमंत्री सचिवालय के व्हाट्सएप चैनल 'सीएमओ महाराष्ट्रका श्री गणेश कर दिया गया है. मुख्यमंत्री द्वारा लिए गए निर्णयोंकैबिनेट के निर्णयोंसरकारी योजनाओंपांच विभिन्न विकास परियोजनाओं आदि की सटीक और आधिकारिक जानकारी अब इस माध्यम से सीधे लोगों तक पहुंचाई जाएगी।

 

             दुनिया भर में संचार का एक प्रभावी और उपयोगी माध्यम बन चुके व्हाट्सएप ने चैनलों के माध्यम से एक नया मंच उपलब्ध कराया है और मंगलवार को (19 सितंबर) मुख्यमंत्री सचिवालय का एक अलग चैनल लॉन्च किया गया है। इस प्रमाणित चैनल को यूजर्स से सकारात्मक प्रतिक्रिया मिल रही है और चैनल लॉन्च करने के कुछ ही समय के भीतर 40 हजार से ज्यादा यूजर्स ने चैनल को फॉलो किया है।

 

             मुख्यमंत्री श्री शिंदे के नेतृत्व में राज्य में विभिन्न जनकल्याणकारी योजनाएं प्रभावी ढंग से लागू की जा रही हैं। मुख्यमंत्री ने इसे लागू करते हुए जनोन्मुखी योजनाओंविकास परियोजनाओं की सटीक एवं वस्तुनिष्ठ जानकारी जनता तक पहुंचाने के लिए आधुनिक तकनीक का उपयोग करने के निर्देश दिए हैं ताकि सरकार की योजनाओं एवं निर्णयों की जानकारी लोगों तक पहुंचे तो उन्हें लाभ मिल सके। मुख्यमंत्री श्री शिंदे ने हमेशा जनता तक पहुंचने पर जोर दिया हैअब संचार अधिक प्रभावी होगा क्योंकि मुख्यमंत्री द्वारा लिए गए निर्णयों और सरकारी योजनाओं की जानकारी सीधे स्मार्ट फोन पर प्राप्त की जा सकेगी।

 

             वर्तमान में मुख्यमंत्री सचिवालय के जनसंपर्क कार्यालय के माध्यम से जनता को सूचित करने के लिए एक्स (ट्विटर)फेसबुकइंस्टाग्रामयूट्यूबथ्रेड्सकूटेलीग्राम और अन्य सोशल मीडिया के साथ-साथ इंस्टेंट मैसेजिंग ऍप का उपयोग किया 'सीएमओ महाराष्ट्रनाम से एक अलगप्रमाणित चैनल 'श्रीगणेशलॉन्च किया गया।

 

चैनल को फ़ॉलो करें:

             जब आप व्हाट्सएप ऐप पर 'अपडेटमेनू पर जाते हैंतो वहां एक चैनल सेक्शन होता है और वहां 'चैनल ढूंढेंमें 'सीएमओ महाराष्ट्रटाइप करने के बाद आपको चैनलों की सूची में यह सत्यापित चैनल दिखाई देगाइस पर क्लिक करें और फ़ॉलो करें यह और आपको बिना किसी प्रयास के सभी अपडेट मिलेंगे। https://whatsapp.com/channel/0029Va4FQfl72WTydH1lnP3h लिंक पर क्लिक करते हैंतो वे 'CMO महाराष्ट्रचैनल को फॉलो कर सकते हैं।

 

 

00000000000

अमरज्योत कौर अरोरा /21.09.2023

पुणे येथे 22 सप्टेंबरपासून दुसरी खेलो इंडिया लीग सुरु

 


नवी दिल्ली 21 : भारतीय क्रीडा प्राधिकरणप्रादेशिक केंद्र मुंबई यांनी महाराष्ट्र ऍथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने खेलो इंडिया महिला ऍथलेटिक्स लीग (शहर/विभाग स्तर) 2023 ही बहुप्रतिक्षित स्पर्धापुणे येथे  होणार असल्याची घोषणा केली आहे.

ही  स्पर्धा 22 सप्टेंबर 2023 पासून बाबुराव सणस मैदानसारसबागपुणेयेथे होणार आहे. देशभरातील प्रत्येक शहरातील सुमारे 300 खेळाडू 14 स्पर्धा प्रकारांमध्ये (ट्रॅक आणि फील्ड आणि रोड इव्हेंट श्रेणींमध्ये) सहभागी होतील. एक खेळाडू जास्तीत जास्त प्रकारांमध्ये सहभागी होऊ शकतो.

 

या लीगमध्ये होणा-या  विविध क्रीडाप्रकारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

ट्रॅक आणि फील्ड: 100 मी, 200 मी, 400 मी, 800 मी, 1500 मी, 5000 मी लांब उडीतिहेरी उडीगोळा फेकथाळी फेकभालाफेक.

खेळाडूंना आपली नावे खालील लिंकवर नोंदणी करता येईल:

http://www.smrsports.in/athletic/registration/1694443132R1Fg1s5hIkqOzcm9fJYxbNhfgyKhtenM

खेलो इंडिया महिला ऍथलेटिक्स लीगमध्ये महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यातील महिला खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. धावणेउडीथ्रो आणि रोड रेस यासह विविध ट्रॅक आणि फील्ड क्रीडाप्रकारात खेळाडूंना चमकण्याची एक विलक्षण संधी असेल.

खेलो इंडिया महिला लीगचा मुख्य उद्देश केवळ देशांतर्गत स्पर्धा संरचना आणि महिला खेळाडूंची प्रतिभा ओळख मजबूत करणे नाही तर महिला खेळाडूंना स्पर्धा करण्यासाठी आणि करिअर म्हणून क्रीडा क्षेत्रात त्यांचे पाऊल भक्कम करण्यासाठी सक्षम करणे हा आहे.

राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात गणरायाची आरती

 





नवी दिल्ली 21 : महाराष्ट्र सदनात यंदाही  गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. राज्यपाल  श्री. रमेश बैस यांनी आज सायंकाळी महाराष्ट्र सदनातील गणरायाचे दर्शन घेतले  व श्री गणेशाची विधिवत आरती केली.

 

यावेळी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, निवासी आयुक्त व प्रधान सचिव रुपिंदर सिंग, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी राज्यपाल श्री बैस  यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व  जनतेला सुख, समृद्धी लाभू दे, अशी प्रार्थना केली.


****************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.176  / दिनांक 21.9.2023

 

 

 

 


Tuesday 19 September 2023

National Capital Rolls Out Red Carpet For Ganpati Bappa Huge Crowds Take the First Glimpse of Bappa AT Maharashtra Sadan






New Delhi, Sep. 19: With loud shrills of “Ganpati Bappa Morya”, the National Capital was abuzz and anxious to welcome their favourite deity, the Lord of the Wisdom, ‘Ganpati Bappa’.  Maharashtra Sadan and many Ganesh Mandals in Delhi and NCR gave a warm welcome to Lord Ganesha, on the first day of Ganeshotsav.

The entire city geared up to celebrate Ganeshostav. Of late, the installation of Ganpati idols and celebration of 10 day long Ganesh Festival has increased in  Northern India. Maharashtra Sadan has installed a grand Ganpati Idol in its premises and everyone present was in a vibrant and festive mood today.

All the devotees of Lord Ganesha, gathered at Maharashtra Sadan to welcome the Lord Ganpati, the remover of  obstacles and the Lord of Wisdom. The pious idol was installed by the Sarvajanik Ganesh Utsav Samiti. Resident Commissioner Shri Rupinder Singh performed the PranPratisthapana Puja at Sadan. Present during this time were Assistant Resident Commissioners, Smt. Smita Shelar and many other officers and employees.

There are many Ganesh Mandals in and around the National Capital. They too celebrate the festival with lots of enthusiasm and host a series of cultural programmes all the ten days. These consist of folk dances, songs, famous Lavani dance, Drama, Musical evenings, Kirtans and like. Maharashtra Sadan will host a number of cultural performances during the ten day festival.

The occasion, also known as Vinayaka Chaturthi or Vinayaka Chavithi, honors the arrival on earth of Lord Ganesha, the elephant-headed God said to bring wisdom and remove obstacles from the paths of the lives of true believers. Introduced in 19th Century, by freedom fighter Lokmanya Tilak, today it is widely celebrated in India and abroad.

******************

Follow us on:  https://twitter.com/micnewdelhi

AkAroraEngNews/19.9.2023 


 

महाराष्ट्र सदनात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन

 






नवी दिल्ली, 19: ढोल ताशांवरील ठेका आणि गणपती बाप्पा मोरया च्या घोषाने कोपर्निकस मार्ग येथील महाराष्ट्र सदन आज निनादले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी जमली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तीमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात दिसून आले.

 

महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने महाराष्ट्र सदनात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.  तसेच दिल्लीच्या वेगवेगळया भागातील विविध गणेश मंडळांतही उत्साहाच्या वातावरणात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

 

महाराष्ट्राच्या कानाकोप-यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.

 

महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आयोजित गणेशोत्सवात सदनाचे  निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग  यांनी गणरायाची पूजा केली. सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी, कर्मचारी, दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गणेश भक्त यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी, आज सकाळी येथील परिसरात जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हे जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. मिरवणुकीनंतर पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होवून गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

 

दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास ३० मराठी गणेशोत्सव मंडळातही गणरायाची प्राणप्रतिष्ठापना आज करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला.

 

गणेशोत्सव काळात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांच्यावतीने या काळात महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठमोळया लावणीसह विविध लोकनृत्य, नाटक, सांगितीक कार्यक्रम, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन येथील गणेशमंडळांनी यावर्षी केले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत मराठींसह अमराठी गणेशभक्तही दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील गणेशोत्सवात मोठया प्रमाणात सहभागी होतात.

 

00000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 174 / दिनांक 19.9.2023

 

 


Sunday 17 September 2023

राजधानीत प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी






 

नवी दिल्ली, 17 : केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे  आज साजरी करण्यात आली.

 

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग  यांनी  प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी  व  कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

00000000000000

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 173दि.17.09.2023


 

Saturday 16 September 2023

महाष्ट्रातील 7 कलावंताना पुरस्कार

संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

नवी दिल्ली, 16 : संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या, ज्या कलाकारांना त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कोणताही राष्ट्रीय सन्मान न मिळालेल्या 84 कलाकारांना विशेष एक-वेळ पुरस्काराने उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या हस्ते गौरविण्यात आले असून यात महाराष्ट्रातील सात कलावंताचा समावेश आहे.

लोककलेसाठी डॉ. प्रभाकर भानुदास मांडे, सतारसाठी पं. शंकर कृष्णाजी अभ्यंकर, कथ्थकसाठी चरण गिरधर चाँद व डॉ. पद्मजा शर्मा, संगीतासाठी उस्ताद उस्मान अब्दुल करीम खान, तारपा लोकसंगीतासाठी भिकल्या लडक्या धिंडा आणि तमाशा लोकनाट्यासाठी डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर या  मान्यवरांचा कला क्षेत्रातील योगदानासाठी आज  संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने  गौरविण्यात आले.

येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रापती, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री श्रीमती मिनाक्षी लेखी, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा व्यासपीठावर उपस्थित होत्या.

आझादी का अमृत महोत्सवांतर्गत  75 वर्षांवरील 84 कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने गौरविण्यात आले. या दिग्गज कलाकारांमध्ये 70 पुरुष आणि 14 महिला उत्कृष्ट कलाकारांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वात वयस्क मणिपूरचे 101 वर्षांचे युम्नाम जत्रा सिंग आहेत. या यादीत गौरी कुप्पुस्वामी आणि महाभाष्याम चित्तरंजन या दोन महिला कलाकारांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला.

         पुरस्कार प्राप्त  या कलाकारांत आंध्र प्रदेश,गुजरात,तेलंगणा ,उत्तरप्रदेशतील  तीन, पंजाब, दिल्ली, पुडूचेरी, अरुणाचल प्रदेशातील दोन, महाराष्ट्रातील सात, आसाम ,तामिळनाडू,केरळ, राजस्थानातील पाच , बिहार,कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर,  उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिसातील चार , गोवा, जम्मू काश्मीर, झारखंड ,लदाख ,लक्षद्विप ,छत्तीसगड ,मेघालय, सिक्कीम, त्रिपुरामधील प्रत्येकी एक कलाकारांचा यात समावेश आहे. ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

00000000000000

-पुरस्कार विजेत्यांबाबतची माहिती-

* डॉ. प्रभाकर भानुदास मांडे *

श्री प्रभाकर भानुदास मांडे यांना त्यांच्या मराठी लोककलातील विद्वत्तेबद्दल संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रभाकर भानुदास मांडे हे लोककथा, लोकसंस्कृती आणि साहित्याचे ज्येष्ठ संशोधन अभ्यासक आहेत. त्यांनी 17 वर्ष मराठवाडा विद्यापीठात रीडर म्हणून काम केल्यानंतर 1993 मध्ये वरिष्ठ प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. गांवगड्या बाहेर, रामकथेची मौखिक परंपरा, लोक रंगभूमी, मागणी त्याचे मांगते, सहित अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या विविध प्रकाशनातून त्यांनी प्रचलित ज्ञान आणि कलेचे लपलेले पैलू शहरी लोकांसमोर आणले आहेत आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या  पदव्युत्तर स्तरावरील या अभ्यासक्रमात समावेश केला आहे.

* डॉ. पद्मजा शर्मा *

कथ्थक नृत्यातील योगदानाबद्दल डॉ. पद्मा शर्मा  यांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती पद्मा शर्मा यांनी 1959 मध्ये भातखंडे महाविद्यालयातून कथ्थकमधील नृत्य निपुराण ही पदवी  मिळवली होती. त्यांनी मुंबईतील ललित कला एज्युकेशन ट्रस्टमध्ये नृत्य शिक्षक आणि कोरिओग्राफर म्हणूनही काम केले आहे. त्या वल्लभ संगीत विद्यालय, मुंबईच्या नृत्य विभागाच्या प्रमुख म्हणूनही काम केले आहे.

* शंकर कृष्णाजी अभ्यंकर *

श्री शंकर कृष्णाजी अभ्यंकर यांना हिंदुस्थानी वाद्य संगीत सितारमधील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री शंकर कृष्णाजी अभ्यंकर यांचा जन्म 1934 साली महाराष्ट्रातील सातारा येथे झाला, त्यांनी गांधर्व महाविद्यालय मंडळ सतार वादनात अलंकार ही पदवी मिळवली. त्यांचा संबंध ग्वाल्हेर घराण्याशी असून त्यांनी कुमार गंधर्व यांच्याकडून बंदिश आणि रचनेचे प्रशिक्षण घेतले आणि पंडित रविशंकर यांच्याकडून सतार वादनाचे प्रशिक्षण घेतले.


                                                        * भिकल्या लडक्या धिंडा *


महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातून भिकल्या लडक्या धिंडा, हे उत्कृष्ट तारपावादक म्हणून  त्यांची ओळख आहे. आपल्या वडिलांकडून मिळालेली ही कला त्यांनी तारपाची निर्मिती आणि वादन या दोन्ही कार्यांतून जोपासली. अनेक युवकांना ते वादनाचे धडे देतात. जवळपास दहा फूट लांबीचा तारपा हे धांडा यांचे वैशिष्ट्य. भिकल्या धिंडा यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी तारपावादनाने रसिकांना मोहवले आहे. ते स्वतः तारपा वाद्याची निर्मिती करून चरितार्थ करतात. आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी अवघे आयुष्य वेचणारे धिंडा यांच्यावर अमृत पुरस्काराने गौरव झाला.

 

* श्री. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर *

 

महाराष्ट्राच्या लोकरंगभूमीतील (खादी गंमत) योगदानाबद्दल श्री हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर यांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात 11 ऑक्टोबर 1946 रोजी जन्मलेल्या श्री. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर यांनी विदर्भातील खडी गंमत, डडार आणि दहाका या जुन्या पारंपरिक लोकनाट्यांचे पुनरुज्जीवन करून, नव्या पिढीपर्यंत नेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. श्री बोरकर यांना सांस्कृतिक मंत्रालयाची वरिष्ठ फेलोशिपही मिळाली आहे.

 

* चरण गिरधर चाँद *

 

श्री चरण गिरधर चाँद यांनी त्यांचे वडील नारायण प्रसाद यांच्याकडून कथ्थक नृत्याचे प्रारंभिक प्रशिक्षण घेतले. तसेच गायन आणि हार्मोनियम, तबला, पखावाज, नाळ आणि इतर वाद्ये शिकली. कथ्थक नृत्याच्या प्रचारासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कार्यशाळा आणि व्याख्याने-प्रात्यक्षिके मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आली आहेत. कथ्थक नृत्यातील योगदानाबद्दल श्री चरण गिरधर चाँद यांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

* उस्मान अब्दुल करीम खान *

 

श्री उस्मान अब्दुल करीम खान यांना हिंदुस्थानी वाद्य संगीत - सतारमधील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील श्री उस्मान अब्दुल करीम खान हे संगीतकारांच्या घराण्यातील आहेत. ते सहाव्या पिढीतील संगीतकार आणि तिसऱ्या पिढीतील शास्त्रीय सितार वादक आहेत. वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी सतार वादन शिकायला सुरुवात केली. 1985 मध्ये पॅरिसमध्ये 24 तासांचे राग सत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये सितार वादक म्हणूनही त्यांनी भाग घेतला होता. 1988 मध्ये, त्याच शहरात 9 तासांच्या संपूर्ण रात्र त्यांनी मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. ललित कला मंदिर, मलेशियाच्या हिंदुस्थानी संगीताचे आंतरराष्ट्रीय डीन म्हणून त्यांचे नामांकन करण्यात आले असून, त्यांना ‘सतार नाद योगी’ ही पदवी देखील बहाल करण्यात आली आहे.