Wednesday 29 March 2023

‘स्वच्छोत्सवा’त महाराष्ट्रातील 12 स्वच्छता दूत महिलांचा सहभाग

 


नवी दिल्ली, 29 : स्वच्छ भारत मिशन-नागरी अंतर्गत साजरा करण्यात आलेल्या स्वच्छोत्सवात महाराष्ट्रातील 12 स्वच्छता दूत महिलांचा सहभाग असून अन्य राज्यातील एकूण 300 स्वच्छता दूत महिला उपस्थित होत्या.

येथील हॅबीटॅट सेंटर मध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ भारत मिशन- नागरीच्या अंतर्गत स्वच्छोत्सव उपक्रमात आंतरराष्ट्रीय शुन्य कचरा दिवस (International day of Zero Waste) राबविण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय गृहनिर्माण नागरी व्यवहार मंत्री हरदिप सिंग पूरी, सचिव मनोज जोशी आणि अन्य वरीष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यातून स्वच्छ भारत अभियानाचे सहायक आयुक्त महेश चौधरी उपस्थित होते.

यामध्ये देशभरातील स्वच्छता क्षेत्रातील कार्यरत निवडक बचत गटातील प्रातिधिनिक महिला स्वच्छता दूत या कार्यक्रमास उपस्थित होत्या. महाराष्ट्रातील  नगरपालिका, महानगरपालिकेतील एकूण 12 महिलांचा समावेश होता.

बचत गटांच्या माध्यमातून स्वच्छेतेशी संबंधित काम करीत असतांना मान, सन्मान आणि धन आयुष्यात कमविता  आले असल्याची भावना यावेळी सर्वच महिलांनी व्यक्त केली. हाताला मिळालेले  कोणतेही काम लहान मोठे नसुन त्यातून मिळणारे समाधान महत्वाचे असल्याची प्रतिक्रीयाही यावेळी या महिलांनी दिली.

 

महाराष्ट्रातून  सहभागी महिला स्वच्छता दुत

महाराष्ट्रातील नगरपालिका महानगरपालिकतून  निवडक 12 महिला स्वच्छता दूत  या स्वच्छोत्सव कार्यक्रमास उपस्थित होत्या. यामध्ये  नागपूर महानगरपालिकेने  सावित्री बचत गटाला भंगार विक्रीसाठी दिनदयाळ अंत्योदय योजने अंतर्गत  प्रोत्साहन दिले असल्याचे  बचत गटाच्या संगीता रामटेके यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील  जोत्सना झुमनाके या कावेरी बचत गटामार्फत डंपींग यार्ड चे काम करतात.  यामध्ये त्या  ओला आणि सुखा कचरा वेगवेगळा करून त्यातून कपोस्ट आणि वर्मी कपोस्ट खत तयार करतात.

परभणी महानगरपालिकेच्या नव उमेद वस्ती स्तरच्या अध्यक्षा चतुरा चव्हाण यांनी स्वत:च्या टेरेसवर गार्डन करून भाज्या प‍िकविल्या. पुढे त्यांनी कंपोस्‍ट खत ब‍नविण्याचे प्रशिक्षण घेतले. आता त्या इतरांना प्रशिक्ष‍ित करतात. परभणीच्याच जनहीत संस्थेच्या उपाध्यक्ष तस्लीम पठाण या ही ओला कचरा आणि सुखा कचरा वेगळा करून त्यातून कपोस्ट खत बनविण्याचे ते काम करतात आणि इतरांनाही प्रशिक्ष‍ण देतात. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीच्या रूखसाना या देखील ओला कचरा सुखा कचरा वेगवेगळा करण्याचे काम करतात. यातून त्या कंपोस्ट खत, गांडूळ खत, वर्मी खत तयार करून हे खत विकतातअकोल्यातील अशोका वस्ती स्तर संघाच्या पुष्पा राऊत यांना अकोला  महानगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय स्वच्छता करण्याचे कंत्राट मिळालेले आहे. त्यांच्यासह 10 महिला या कामात आहेत. अकोल्याच्याच निर्भया वस्ती स्तर संघाच्या आरती मेघे यांनी शहरात घंटा गाडी आणि सार्वजनिक पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले असून त्यात त्यांना यश मिळाले. यासह त्यांचा समुह सार्वजनिक शौचालय स्वच्छता राखण्याचे काम करतो.

 भुसावळ येथील मल्ल्हारी वाघ या आलो आणि सुखा कचरा वेचण्याचे काम करतात. नाशिकवरून आलेल्या  रत्नमाला पात्रे याही  ओला कचरा सुखा कचरा वेचतात. जालन्याच्या श्रीमती लोखंडे या घंटा गाडीत कचरा गोळा करण्याचे काम करतात. मालेगाव नगरपालिकेच्या स्वच्छता कामगार कमला धिवरे या ही प्रतिनिधी म्हणुन उपस्थित होत्या. राजधानी दिल्लीत या स्वच्छता दूतांचा झालेल्या सन्मानामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो कराhttp://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर /वि.वृ.क्र. 56/दि.29.03.2023

 

Thursday 23 March 2023

राजधानीत शहीदांना अभिवादन




नवी दिल्ली, 23 : भारतीय स्वातंत्र्य लढयात महत्वाचे  योगदान देणारे शहीद भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज अभिवादन करण्यात आले.

            कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी आयुक्त ‍ श्रीमती निवा जैन  यांनी  शहीद भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार  यांच्यासह  महाराष्ट्र  सदनाच्या  अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

                          महाराष्ट्र परिचय केंद्रात शहीदांना अभिवादन

               महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात शहीद भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आज अभिवादन करण्यात आले. परिचय  केंद्राच्या प्रभारी उपसंचालक(माहिती) अमरज्योत कौर अरोरा  यांनी  शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित  सर्व अधिकारी कर्मचा-यांनी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.                           

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत अरोरा /वि.वृ.क्र. 57 /दि.23.03.2023                              


 

Wednesday 22 March 2023

महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान








कुमार मंगलम बिर्ला, सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण तर

4 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

 

 

नवी दिल्ली, दि. 22 : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणा-या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

 

          राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते. आज प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील 6 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला आणि सुमन कल्याणपूर यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर श्री.भिकू रामजी इदाते, श्री राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर) व्यापार आणि उद्योग, श्री प्रभाकर भानुदास मांडे आणि श्री रमेश पतंगे साहित्य व शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कुमार मंगलम बिर्ला यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल  पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. ते आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आहेत. या समूहाला शंभर वर्षांहून अधिक जुना वारसा आहे.

 

प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायन श्रीमती. सुमन कल्याणपूर यांना कला क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय संगीत उद्योगातील शीर्ष 3 महिला पार्श्वगायिकांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात, त्यांनी अनेक भाषांमध्ये असंख्य हिट गाणे दिले आहेत.

 

4 मान्यवरांना आज पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला

 

श्री राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर) यांना व्यवसाय आणि उद्योग शेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार श्रीमती रेखा झुनझुनवाला यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला.

 

श्री भिकू रामजी इदाते हे ‘दादा इदाते’ या नावाने प्रसिद्ध असलेले एक महान विचारवंत, वक्ते, लेखक, नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. जे डीएनटी समुदायांच्या उत्थानासाठी आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या शोषित लोकांच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जातात.

 

डॉ प्रभाकर भानुदास मांडे हे लोककथा, लोक संस्कृती आणि साहित्यातील आघाडीचे  विद्वान समजले जातात. डॉ मांडे यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय  चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. त्यांच्या ‘गावगाड्या बाहेर’ आणि ‘सांकेतिक गुप्त भाषा: परमार आणि स्वरूप’ या पुस्तकांसाठी त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 1991 मध्ये डी. लिट. देऊन सन्मान केला आहे.

 

श्री रमेश रघुनाथ पतंगे हे नामवंत लेखक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते मुंबईतील हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय, सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद आणि समरसता अध्ययन केंद्र आणि विवेक व्यासपीठ अशा संस्थांचेही ते सहसंस्थापक आहेत. त्यांनी सामाजिक समता आणि देशभक्तीचा प्रचार करणारी 52 पुस्तके लिहिली आणि प्रकाशित केली आहेत.

 

राष्ट्रपती यांनी राष्ट्रपती भवन येथे आयोजित नागरी पुरस्कार समारंभ-I मध्ये 2 पद्मविभूषण, 4 पद्मभूषण आणि 2023 साठी 47 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.   

00000

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                              अ.क.अरोरा/ वृ.क्र.56 /दि. 22.03.2023
 

Monday 20 March 2023

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांची परिचय केंद्राला भेट


 

 

नवी दिल्ली, 20 : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला आज भेट दिली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण कार्याची माहिती जाणून घेतली. 

दिल्ली अभ्यास दौ-यावर असणा-या पुणे  श्रमिक पत्रकार संघाचे समन्वयक श्री. संदीप पाटील व श्री गणेश खळदकर व दोन महिला पत्रकारांसह 15 सदस्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

        यावेळी औपचारिक वार्तालाप झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविद्यपूर्ण माहिती प्रभारी  उपसंचालक अरोरा  यांनी दिली. महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच, दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शासनाचा जनसंपर्क साभांळताना घ्यावी लागणारी खबरदारी आदींची विस्तृत  माहितीही श्रीमती अरोरा यांनी दिली.

            महाराष्ट्र परिचय केंद्राची एसएमएस सेवा, कार्यालयाचे  तीन भाषेतील अधिकृत ट्विटर हँडल, फेसबुक पेजेस, युटयुब चॅनेल, ब्लॉग, इंस्टाग्राम, व्हॉटसॲप ग्रुप आदीं समाज माध्यमातून शासनाची प्रभावीपणे करण्यात येणारे प्रसिध्दी विषयक कार्याची  श्रीमती अरोरा यांनी माहिती दिली. सर्व पत्रकार संदस्यांना यावेळी लोकराज्य अकांच्या प्रती भेट स्वरुपात देण्यात आल्या.

Tuesday 14 March 2023

MAHARASHTRA BUDGET -2023 SOME HIGHLIGHTS ON FARMERS and FARMING

 



New Delhi, March 14:  The Government of Maharashtra presented its Budget for the Year 2023-2024 recently. Budget allocations and provisions for various sectors were announced.  Financial assistance, encouragement to natural farming, subsidies and loan waivers, accidental cover for farmers etc were made in this Budget.  Some highlights concerning farmers and farming sector are presented below.

                               ‘Namo Shetkari Sanman Nidhi Yojna’

            Rs.12,000 Sanman Nidhi For The Farmers of Maharashtra

·         Addition to Pradhanmantri Krishi Sanman Nidhi Yojana by State Government

·         NAMO Shetkari Mahasanman Nidhi Yojna

·         Rs,6,000 to every farmer  per year by State Government

·         Rs.6,000 each from Centre and State Government i.e Rs.12,000 per year to every Farmer

·         1.15 Crore Famer families to be benefited

·         Rs.6900 crore – Total provision by the State Government

 

Encouragement of Natural Farming

·         State Government to encourage natural farming

·         25 lakh hectare area will be brought under organic farming in 3 years

·         Bio-input sourcing centres will be established

·         Scope of Dr. Punjabrao Deshmukh Organic Farming Mission will be enhanced

 

AGRICULTURAL FACILITY CENTRE IN NAGPUR,

ORANGE PROCESSING UNIT IN VIDARBHA

 

·         To Form an International Agricultural Facility Centre at Dr. Punjabarao Deshmukh Agriculture College, Nagpur to promote the use of advanced technology.

·         State Government to spend Rs. 228 Crore for this Centre

·         Advanced Orange Processing Units in Nagpur, Katol, Kalameshar (Nagpur). Morshi (Amravati) and Buldhana District Rs. 20 Crore for each centre

 

                                    Irrigation – River Linking Projects

·         State will fund the Damanganga-Pinjal river linking project

·         Water from the sub-basins of the river Nar-Par Ambika, Auranga Damanganga, Vaitarna Ulhas will be utilized for bridging the deficit of Mumbai, Godavari basins.

·         This will benefit Marathwada and Nashik, Jalgaon, Nagar from North Maharashtra

·         Water from Vainganga basin will be brought in to Nagpur, Wardha, Amravati, Yavatmal, Akola, Buldhana  and Washim through Vainganga-Naiganga-Painganga river linking.

                                         

                                          Go Seva and Cow Conservation

·         Formation of Maharashtra Go Seva Commission to conserve, nature and protect indigenous cow breed.

·         Commission will implement schemes like Govardhan Govansh Seva Kendra Yojana and ‘Gomay Mulyavardhan Yojana’

·         Increasing the facilities of Embryo Fertilization and Transplantation for the protection of indigenous cow breed.

·         Rs.160 crore for the second phase of dairy development in 11 districts of Vidarbha- Marathwada.

·         New veterinary college in Ahmednagar District.

 

 Shelter And Food Facilities At APMCs For Farmers Coming to Sell Produce

·         Facilities for farmers coming to APMCs to sell their agricultural produce,

·         Rashtrasant Tukdoji Maharaj Shetkari Bhavan for shelter to famers

·         Shiv Bhojan Thali will be made available.

 

                     Farmers to Get Help In Cash Instead of Food Grains

·         Direct Financial Assistance instead of ration to the orange ration card holders in the 14 disaster affected Districts of Vidarbha-Marathwada

·         Money will be deposited directly into the Aadhar linked bank accounts

·         Rs. 1800 per farmer, per year

 

                        Establishment of ‘Shri Anna’ Excellence Centre in Solapur

·         ‘Shri Anna Mission’ in Maharashtra in the backdrop of International Millets Year 2023

·         Provision of Rs. 200 Crore

·         ‘Shri Anna’ Excellence Centre will be established in Solapur

 

                        Gopinath Munde Shetkari Suraksha Grant -in-Aid Scheme

                                Benefits up to Rs.2 lakh from the State Government  

·         Previous Gopinath Munde Accidental Insurance Scheme was implemented through insurance companies

·         Now, it is Gopinath Munde Shetkari Suraksha Grant-in-Aid Scheme

·         Farmers will be saved from all the trouble as State Government will implement the Scheme

·         Accident victim families to get benefit up to Rs.2 lakh , previously it was only up to Rs.1 lakh

 

             Comprehensive Expansion of FARM POND ON DEMAND Scheme

Comprehensive expansion of ‘Magel Tyala Shet Tale’ (Farm Pond on Demand) Scheme

·         Now farm pond drip irrigation, horticulture farm pond lining to every farmer who demands it.

·         Shade-net , polyhouse, modern sowing machine, cotton shredder to every farmer who demands its

·         Provision Rs1,000 Crore for this scheme .

 

                                    Loan Waiver Scheme for the Farmers in Maharashtra

·         The remaining eligible famers of the 2017’s Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana will be benefited.

·         This Government has provided the benefits of Mahatma Jyotirao Phule Shetkari Loan Waiver Scheme to the Farmers.

·         Rs.4683 crore were directly transferred to the accounts of Rs, 12.84 lakh eligible farmers.

 

                   Mahakrishi Vikas Abhiyan for the Farmers in Maharashtra

 

·         ‘Mahakrishi Vikas Abhiyan’ to be implemented to increase the income of the farmers

·         From production to value addition of Crops and Horticulture

·         Block and District wise Scheme for farmers groups

·         Project plans will be prepared for integrated Cropping

·         Rs.3000 crore will be made available in next five years.

 

                        Farmers in Maharashtra to get Crop Insurance in Just Re.1

·         In the previous scheme farmers had to pay 2% of insurance premium

·         Now State Government will pay the premium, no burden on farmers

·         Farmers will get Crop Insurance in Just Re.1

·         State Government to bear the cost of Rs.3 312 Crore

 

                        Development Initiatives for Dhangar Community

·         Rs,1,000 crore for Dhangar community.

·         Integration of 22 schemes, implementations through cabinet empowered committee.

·         Maharashtra Sheep and Goat Co-Operative Development Corporation will be established

·         Rs.10,000 crore will be made available for interest for interest free loans.

·         Headquarter will be at Ahmednagar.

·         Substantial funds for sheep rearing under Raje Yashvantrao Holkar Mahamesh Scheme.

                                                                        ********************

 

A K Arora/EngNews/Dt.14.3.23

Follow us on: https://twitter.com/micnewdelhi?t=_ZmCQKKOTgJdaEOKdvMn7Q&s=03