Thursday 30 June 2016

औरंगाबाद-तलवाडी महामार्गाच्या चौपदरीकरणास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

                   
नवी दिल्ली दि. ३० : राज्यातील औरंगाबाद-तलवाडी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या चौपदरी करणाच्या कामास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.  
               पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठीत अर्थविषयक समितीने ही मंजुरी दिली. या मंजुरी नुसार औरंगाबाद –तलवाडी महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी करण्यात येणारे भूमी अधिग्रहण, पुनर्वसन आणि अन्य बाबींसाठी एकूण २०२८.९१ कोटी खर्च अपेक्षित आहे.या निर्णयामुळे राज्यातील पायाभूत सुविधांची बळकटी करण्यास मदत होणार असून या भागातील  नागरिकांच्या वेळेची व पैस्यांची बचत होणार आहे. 
राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेच्या(एनएचडीपी) चौथ्या टप्प्याअंतर्गत औरंगाबाद-तलवाडी या ८७ किलो मीटर महामार्गाचे चौपदीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याचे वित्त- नियोजन आणि बांधकाम हे बांधा -वापरा व हस्तांतरीत करा’(बीओटी)  तत्वावर होणार आहे. 
औरंगाबाद-तलवाडी महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील आणि या भागातील विकासाला चालना मिळेल. साधारणत: १ किलो मीटर रस्ता बांधण्यासाठी ४ हजार ७६ मजुरांची  गरज पडणार असल्याचे अनुमान आहे त्यानुसार, ३ लाख ५४ हजार ९० लोकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.      

                                           ००००००

Wednesday 29 June 2016

महाराष्ट्रातील दिक्षा भूमी, महाड व चिचोलीच्या विकासासाठी केंद्राकडून निधी


             




नवी दिल्ली दि. २९ : महाराष्ट्रातील दिक्षाभूमी, महाड आणि चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी  तसेच बौध्द धर्माशी संबंधित स्मारकांच्या विकासासाठी केंद्र शासनाने २८.८० कोटींच्या अतिरीक्त निधीला बुधवारी मंजुरी दिली आहे.
    
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहेलोत यांनी आज या अतिरीक्त निधीला मंजुरी दिली . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षा निमित्त देशभर राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा भाग म्हणून डॉ. आंबेडकरांशी संबंधित देशातील  महत्वाच्या ठिकाणांच्या विकासाचे काम केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रातील नागपूर येथील दिक्षा भूमीच्या नुतनीकरणाच्या कामासाठी ९.४ कोटी अतिरीक्त निधीला मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर जिल्हयातील  चिचोली येथील स्मारकाच्या विकासासाठी १७.०३ कोटी तर रायगड जिल्हयातील महाड या ऐतिहासिक ठिकाणाच्या विकासासाठी २.३६ कोटींच्या अतिरीक्त  निधीला मंजुरी देण्यात आली आहे.   
  000000





महाराष्ट्रात सर्वाधिक 96 टक्के ऊस थकबाकी अदा


नवी दिल्ली दि. २९ : देशातील प्रमुख  ऊस उत्पादक राज्य म्हणून ओळख असणा-या महाराष्ट्रातील ऊस कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतक-यांची सर्वाधिक ९६ टक्के थकबाकी अदा केली आहे. महाराष्ट्रासह देशातील एकूण ऊस उत्पादक राज्यांमधे ९२ टक्के थकबाकी अदा करण्यात आल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
         केंद्रीय वाणीज्य व व्यापार मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.
मंत्रालयाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात(२०१५-१६) देशात २३० दशलक्ष मेट्रीक टन ऊस उत्पादन झाले आहे. तर देशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एकूण ५२ हजार ९०० कोटी रूपये थकबाकी पैकी ९२ टक्के थकबाकी अदा करण्यात आली असून आता केवळ ४ हजार २२५ कोटींची थकबाकी  उरली आहे. चालू गाळप हंगामा अखेर महाराष्ट्रात साखर काखान्यांनी ऊस उत्पादक शेतक-यांना ९६ टक्के थकबाकी अदा केली असून आता ५९० कोटींची थकबाकी उरली आहे.
     अन्य ऊस उत्पादक राज्यांमधे कर्नाटक राज्यात ९४ टक्के थकबाकी अदा करण्यात आली आहे. तर, उत्तर प्रदेशात ८६ टक्के थकबाकी अदा करण्यात आली आहे. 
   केंद्र सरकार ऊस थकबाकीबाबत सातत्यपूर्णपणे देखरेख ठेवत असून राज्यांना जलदगतीने थकबाकी देण्यासंदर्भात दिशानिर्देश देत आहे
                                                                 0000 

Sunday 26 June 2016

राजधानीत राजर्षि शाहू महाराज जयंती साजरी


नवी दिल्ली दि. २६ : राजर्षि शाहू महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांनी राजर्षि शाहू महाराज  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त भारती झाडे, डॉ. किरण कुलकर्णी, अजितसिंग नेगी, संजय आघाव यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
 महाराष्ट्र परिचय केंद्रात राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन
 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यालयात  उपस्थित कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.


Wednesday 22 June 2016

Centre to issue amended caste certificate format for converted to Buddhism from scheduled castes soon:





                                                                                                    Rajkumar Badole
 
New Delhi, 22: The efforts and follow up taken by the Maharashtra Government to ensure the persons converted to Buddhism from scheduled castes get all the central government reservation benefits has borne fruits. Maharashtra Social Justice and Special Assistance Minister Rajkumar Badole has informed the Centre would soon issue amended caste certificate format for the persons converted to Buddhism from scheduled castes.
This decision was taken during a meeting between a delegation of state officials led by Badole and Union Social Justice and Empowerment Minister Thaawarchand Gehlot at his office in Shastri Bhavan on today. Mentioning this, while addressing a press conference at Maharashtra Sadan, later, Mr. Badole said centre’s decision would benefit all the persons converted to Buddhism from scheduled castes in various states, including Maharashtra. Member of Parliament Ramdas Athawale and Chairman of the Maharashtra SC Commission C L Thule were also present for this meeting with the union minister.
     Speaking with the media persons, Mr. Badole told about having articulated the issue point-wise to Mr. Gehlot in today’s meeting. He also mentioned about Mr. Gehlot along with the secretary of his ministry being positive about the issue and accordingly a decision being also taken by the Centre to issue amended caste certificate format for the persons converted to Buddhism from scheduled castes soon.  
                      The persons converted to Buddhism from scheduled castes all over the country would be benefited by this decision in availing the reservations in jobs and education in central and state governments, which in turn would have the way for their economic betterment. This decision has ensured a step forward towards addressing a 26 year old pending problem closely concerned with person converted to Buddhism from scheduled castes, told Mr. Badole.

                   The constitutional amendments made in 1990 had clearly stated about extending all the benefits of the scheduled castes to the persons converted to Buddhism from scheduled castes or Nav-Bauddhas, told Mr. Badole. He pointed out this decision was pending since 1990 for the lack of being implemented since day one. The persons converted to Buddhism from scheduled castes were devoid of reservation benefits meant for scheduled castes in jobs, education and economic development by the Central Government.
Mr.Badole studied the issue in-depth and persuaded a continues correspondence with Union Social Justice and Empowerment Ministry and his today’s meeting with Union minister Thaawarchand Gehlot was in the connection of this issue itself.

अनुसूचित जातीतील धर्मांतरीत बौध्दांसाठी सुधारीत जात प्रमाणपत्र लवकरच निघेल





                          

  



राजकुमार बडोले
 नवी दिल्ली, 22 : अनुसूचित जातीतून धर्मांतरीत झालेल्या बौध्दांना केंद्रामधे अनुसूचित जातीचे सर्व लाभ मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्यास यश आले. यासंदर्भात केंद्र शासन लवकरच सुधारीत जात प्रमाणपत्र नमुना काढणार असल्याची, माहिती महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
शास्त्रीभवन येथे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत यांच्या सोबत आज सकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. बडोले बोलत होते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमधील अनुसूचित जातीतून धर्मांतरीत झालेल्या बौध्दांना या निर्णयामुळे मोठा लाभ होणार आहे. खासदार रामदास आठवले, महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल.थुल यावेळी उपस्थित होते.
श्री. बडोले म्हणाले, सदर विषयाची मुददेसुद मांडणी करुन आजच्या बैठकीत श्री. गहलोत यांना या विषयाची माहिती दिली . यावर श्री. गहलोत व मंत्रायलयाचे सचिव यांनी सहमती दर्शविली व त्यानुसार केंद्र शासन अनुसूचित जातीतील धर्मांतरीत बौध्दांसाठी सुधारित जात प्रमाणपत्र नमुना काढेल असा निर्णय आज घेण्यात आला .
देशातील बहुतांश राज्यांतील अनुसूचित जातीतील बौध्द धर्मांतरीत लोकांना याचा केंद्र व राज्य सरकारांमधे नौकरी शिक्षण व आर्थिक विकास याबाबत फायदा होईल. या निर्णयामुळे मागील २६ वर्षां पासून प्रलंबित असलेल्या अनुसूचित जातीतून बौध्द धम्म स्वीकारलेल्या लोकांच्या जीव्हाळयाचा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल पडले असल्याचे श्री. बडोले म्हणाले.
१९९० च्या घटना दुरुस्ती अन्वये अनुसूचित जातितील धर्मांतरीत बौध्दांना/नव बौध्दांना सर्व सोई सुविधा व तरतूदींचे लाभ देण्यात येतील असा निर्णय झाला होता. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. हा विषय १९९० पासून प्रलंबित होता. बौध्द धम्म स्वीकारलेल्या अनुसूचित जातीचे लोक केंद्रसरकारकडून नौकरी, शिक्षण व आर्थिक विकासासाठी देण्यात येणा-या सवलतींपासून वंचित होते.
याबांबींचा सखोल अभ्यास करुन श्री बडोले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालया सोबत पत्र व्यवहार केला व याच संदर्भात आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांची भेट घेतली. सदर बैठकीस खासदार रामदास आठवले, केंद्र सरकारचे वरीष्ठ अधिकारी , महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री सी.एल.थुल, व राज्याच्या सामाजिक न्याय मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tuesday 21 June 2016

महाराष्ट्र सदनात झाली योगासने








नवी दिल्ली, २१ : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात(एनसीआर) आज दुसरा अंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्याची लगबग होती. तशीच ती महाराष्ट्र सदनातही बघायला मिळाली निमित्त होते, महाराष्ट्र सदनात मंगळवारी आयोजित दुस-या अंतरराष्ट्रीय योग दिवसाचे.
           कोपर्निक्स मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर आज सकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ऐस-पैस जागेवर अंथरण्यात आलेली सतरंजी आणि टापटीप पोशाखांमधे दिसणारे अधिकारी कर्मचारी योगासनाच्या वेशात दिसत होते. पहिल्या रांगेत निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त भारती झाडे, डॉ. किरण कुलकर्णी, संजय आघाव आणि त्यानंतर अगदी शिस्तित व रांगेत बसलेले महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह यावेळी मोठया संख्येत सहभागी झाले होते.
            कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंचावर गुडगांव येथील मोक्षायतन इंटरनॅशनल योग आश्रमाच्या डॉ. संयोग लता यांनी महत्वपूर्ण योगसनांची माहिती दिली व प्रात्याक्षिक करून दाखवली. योगसानाचे महत्व सांगताना डॉ, संयोग लता म्हणाल्या, दैनंदिन कामातून वेळ काढून सोप्या आणि नेटक्या पध्दतीने योगासने केल्याने कार्यतत्पर व निरोगी राहण्यास मदत होते. त्यांनी यावेळी विविध योगासनांचे फायदेही समजाऊन सांगितले. जवळपास एक तास चाललेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. संयोग लता यांच्या मार्गदर्शनाखाली ताडासन, भुजंगासन, प्राणायम, कपालभाती, बध्दकोनासन,अनुलोम-विलोम, वज्रासन, मक्रासन शवासन आदी आसने केली. ‘सर्वेत्र सुखीन संतू ....’ अर्थात जगात सर्वत्र आरोग्य व शांतता नांदू दे या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
                                                          0000

Wednesday 15 June 2016

हुमन प्रकल्पाबाबत राज्य वन मंडळाने नव्याने प्रस्ताव सादर करावा : जावडेकर



नवी दिल्ली, 15 :  चंद्रपूर जिल्हयातील हुमन प्रकल्पबाबत राज्य वन मंडळाने  नव्याने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना केंद्रीय . केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर यांनी केल्या.
 इंदिरा पर्यावरण भवनात हुमन प्रकल्पाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीची अध्यक्षता श्री जावडेकर यांनी केली.  यावेळी राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार,  आमदार संजय धोटे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव  इकबाल सिंग चहल, वन विभागाचे सचिव विकास खारगे, चंद्रपूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अ.वी. सूर्वे, तसेच मुख्य अभियंता र.. चौहान यांचासह केंद्रातील पर्यावरण व वने विभागाचे  वरीष्ठ अधिकारी   उपस्थित होते.
                        हुमन प्रकल्प हा  चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यात सिरकाडा या गावाजवळ हुमन नदीवर प्रस्तावित असणारा मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे वनजमीन बाधीत होत असल्यामुळे वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत वनेत्तर वापराकरिता केंद्र शासनाच्या पर्यावरण व वने मंत्रालयाची अंतीम मान्यता नसल्यामुळे १९८४-८५ पासून या प्रकल्पाची कामे स्थगित करण्यात आली.  राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने एक समिती नेमुन प्रकल्प परिसरातील वन्यजीवाच्या भ्रमणमार्ग उपलब्धतेबाबत अभ्यास करून अहवाल सादर करावा असे निर्देश केंद्रीय मंत्री श्री जावडेकर यांनी दिले.
                        वनीकरण भरपाई निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण  (CAMPA) याच्या अंतर्गत राज्यातील वनसंरक्षण कामांसाठी १९६ रूपये आज मंजूर करण्यात आले. यासह  राज्याने पुढील तीन वर्षाचे नियोजन करावे, असे निर्देशही श्री जावडेकर यांनी यावेळी  दिले. कॉम्पाचा ठराव संसदेत मंजूर झाल्यास राज्याला यातंर्गत 2 हजार कोंटी प्राप्त होतील.

                            
                                     रेल्वेच्या जागेवर वृक्षारोपन करण्यासाठी तत्वत: मान्यता


रेल्वे भवन येथे  रेल्वे मंत्रालयाचे  वरिष्ठ अधिकारी आणि राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार वनविभागाचे सचिव विकास खारगे यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली.
            रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक लवकरच वनविभागाच्या सचिवांशी याबाबत सविस्तर चर्चा करतील. तसेच यासंदर्भात लवकरच सामंजस्य करार केला जाईल. सामाजिक कॉरपोरेट निधी (सीएसआर) च्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात येण्याबाबतही विचार केला जाईल, असे आजच्या बैठकीत ठरले.  याविषयातील तांत्रिक बाबींवर वन विभाग रेल्वेला पाठबळ पुरवणार. याअंतर्गत रेल्वे विभाग 5 लाख हेक्टर जागा उपलब्ध करुन देणार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा प्रकारचा हा प्रकल्प प्रथमच महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे.

राज्यातील विविध पर्यटनविषयांबाबत
केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी दर्शवीली सकारात्मकता


राज्याचे  वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्यातील विविध सांस्कृतिक आणि पर्यटनविषयांबाबत केंद्रीय संस्कृती तथा पर्यटन मंत्री महेश शर्मा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील सर्वच संस्कृतीक तसेच पर्यटनविषयांबाबत केंद्रीय मंत्री यांनी सकारात्मकता दर्शवीली.
श्री मुनगंटीवार  यांनी आज परीवहन भवनात केंद्रीय  संस्कृतीक तथा पर्यटन मंत्री श्री शर्मा यांनी भेट घेतली. यावेळी राज्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्हयांचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, केंद्रीय विभागातील विविध विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील नांदेड येथील शिख धमींयांचे तीर्थक्षेत्र आहे. भारतातील तसेच जगभरातीलशिख भावीक येथे दर्शनासाठी येतात. येथे विमानतळाला मान्यता मिळावी. दिल्ली-पुणे-नांदेड, दिल्ली- नागपूर-नांदेड जो मार्ग सुविधाजनक असेल तो सुरू करून देण्यात यावाअशी मागणी राज्याच्या वतीने करण्यात  आली. यावर केंद्रीय  मंत्री श्री शर्मा यांनी सकारात्मकता दर्शवीली असून लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल.  
मुंबई येथील अंतरराष्ट्रीय विमातळावर मोठया प्रमाणात वर्दळ असते. ही वर्दळ थोडया प्रमाणात कमी व्हावी याकरिता जुहू येथील विमानतळाचा विकास करण्यात यावा, या मागणीबाबतही  श्री शर्मा यांनी सकात्मक आश्वासन दिले.
वर्धा जिल्हयातील सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनातील सर्वाधिक वेळ व्यतीत केला आहे.  महात्मा गांधी 1933-48 या दरम्यान होते.  येथील आश्रामाचा कायापालट व्हावा यासाठी केंद्राने निधी उपलब्ध करून दयावा, अशी मागणी श्री मुनगंटीवार यांनी बैठकीत केली. यासह राज्यातील शिवकालीन किल्ल्यांची देखभाल, रखरखाव, सुशोभीकरणासाठी निधी मिळण्याची मागणीवरही केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवीली.
राज्यातील महामार्गावरील मोकळया  जागेत  वृक्षारोपन करण्याबाबतची परवानगी  केंद्रीय  महामार्ग व परीवहन मंत्री श्री गडकरी यांनी दिली. याबाबतचा सामंज्यस करार लवकरच होणार असल्याचे श्री मुनगंटीवार यांनी बैठकी नंतर सांगितले.



चंद्रपूर जिल्हयात सैनिकी शाळा उभारण्यासाठी सामंजस्य करार







  नवी दिल्ली, 15 : चंद्रपूर जिल्हयात सैनिकी शाळा उभारण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि महाराष्ट्राचे वित्त-नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात बुधवारी सामंजस्य करार झाला.     
साऊथ ब्लॉक येथे आज श्री. मुनगंटीवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान चंद्रपूर जिल्हयात सैनिकी शाळा उभारण्यासाठी  उभय मंत्र्यांमधे सामंजस्य करार झाला. यावेळी  वनविभागाचे सचिव विकास खरगे, संरक्षण मंत्रालयाच्या मानद सैनिकी शाळा समितीचे उपसचिव( प्रशिक्षण) सुभाष चंद्रा, सैनिक शाळा समितीचे निरीक्षण अधिकारी  कॅप्टन रामबाबू,चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील उपस्थित होते.
  महाराष्ट्रात सातारा येथे १९६१ मधे देशातील पहिली सैनिकी शाळा स्थापन करण्यात आली.  आजच्या सामंजस्य करारानंतर चंद्रपूर जिल्हयात सैनिकी शाळा स्थापन होणार असून देशातील ही २६ वी सैनिकी शाळा असणार आहे. 
                    मराठवाडयात इको बटालीयन मिळावी

      महाराष्ट्रातील मराठवाडा भागात  इको बटालीयन मिळावी अशी मागणी  श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. पर्रीकर यांच्याकडे केली. ज्या भागात एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत वनक्षेत्र हे २ टक्क्यांपेक्षा कमी आहे तिथे संरक्षण मंत्रालयाच्यावतीने वृक्ष संवर्धन व वाढीसाठी इको बटालीयन आहेत. देशात उत्तराखंड,आसाम आणि दिल्ली येथे अशा प्रकारच्या बटालीयन आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रात इको बटालीयन मिळावी मागणीवर सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन पर्रीकर यांनी  दिले. १ जुलै २०१६ रोजी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे निमंत्रण  श्री मुनगंटीवार यांनी श्री. पर्रीकर यांना दिले.  

वृक्षारोपण ईश्वरीय कार्य, पंढरपू रच्या वारक-यांना एक रोपटे प्रसाद म्हणून भेट द्यावे- पंतप्रधान


            वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्याकडून वृक्षारोपण कार्यक्रमासाठी पंतप्रधानांना निमंत्रण

नवी दिल्ली. १५ :  वृक्षारोपण हे ईश्वरीय कार्य आहे, दरवर्षी  होणाऱ्या पंढरपूर वारीत भाविकांना प्रसादाच्या रुपात एक रोपटे भेट देण्यात यावे असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या वन विभागातर्फे दि. १ जुलै २०१६ रोजी करण्यात येत असलेल्या २ कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची प्रशंसा केली.
आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना दि. १ जुलै २०१६ रोजी होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. त्यावेळी वनसचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक सर्जन भगत यावेळी उपस्थित होते.

मुंबईतील लोकल रेल्वेच्या दुतर्फा असणाऱ्या मोकळ्या जागेवर महिला बचतगटांना रोपवाटिकेची कामे देण्यात यावीत, अशी सूचनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.

या बैठकीनंतर बोलतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात कृषी दिन व वन महोत्सवाचे औचित्य साधून दि. १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवड करण्यात येत आहे. राज्य आणि राष्ट्रीय वननीतीनुसार राज्यात ३३ टक्के वनक्षेत्र हवे. परंतू महाराष्ट्रात सध्या २० टक्के क्षेत्र वनाखाली आहे.  ही टक्केवारी वाढवण्यासाठी वन विभागाने इतर २२ शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक, स्वंयसेवी संघटना, शाळा- महाविद्यालये, उद्योग समूह आणि मान्यवर व्यक्तींसह लोकसहभागातून २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यात वन विभाग दीड कोटी झाडं लावत आहे तर बाकीचे ५० लाख रोपं इतर सर्वांच्या सहभागातून लावली जाणार आहेत.  मोकळ्या जागा, मैदानं, रस्त्याच्या दोन्ही बाजू, शेतीचे बांध, शाळा- महाविद्यालयाच्या जागा, वन विभागाच्या जमीनी, टेकड्या, शासकीय कार्यालयांच्याठिकाणी असलेल्या मोकळ्या जागा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारितील मोकळ्या जागा अशाठिकाणी ही वृक्ष लागवड होणार असून लावलेली रोपं जगवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.


लोकांनाही आता वृक्ष लागवडीचे महत्व लक्षात येऊ लागले आहे. लोक स्वत:हून वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. राज्यात वृक्ष लागवडीसाठी, जमीनीत पाणी मुरवण्यासाठी खुप सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. याचा लाभ वन विभाग राबवित असलेल्या दोन कोटी वृक्ष लागवडीला नक्की होईल आणि शासनाच्या या कामात लोक स्वत: पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करतील असा विश्वास निर्माण झाला असल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.  

Wednesday 8 June 2016

‘लोकराज्य’ देश में तिसरे तथा महाराष्ट्र में पहिले स्थान की मासिक पत्रिका : ‘एबीसी’ द्वारा प्रमाणीत




 
    
                              
नई दिल्ली, ०८ : महाराष्ट्र सरकार के मुखपत्र लोकराज्यमासिक पत्रिका ने देश में तिसरा तथा महाराष्ट्र में प्रथम क्रमांक प्राप्त कर नयी उँचाई हांसिल की है.

             सरकार और जनता के बीच सेतू के समान कार्य करके आम जनता तक महत्वपूर्ण जानकारी पहॅुंचाने की लंबी परंपरा रखने वाली महाराष्ट्र सरकार की लोकराज्य इस मासिक पत्रिका ने ऑडीट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन( एबीसी) के हालही में घोषित हुऐ सर्वेक्षण के अनुसार देश में सबसे ज्यादा वितरीत होणे के मामले में तिसरे स्थान पर है. इसके साथ ही लोकराज्य को महाराष्ट्र में मासिक पत्रिकाओं के श्रेणी में प्रथम स्थान प्राप्त हुआ है.

               ऑडीट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन के सर्वेक्षण अनुसार हिंदी भाषा की मासिक पत्रिका जागरण जोश प्लसदेश में प्रथम स्थान पर है तो मल्यालम भाषा की मासिक पत्रिका वनिथा दुसरे स्थान पर है. लोकराज्य तिसरे स्थान पर  है. साल २०१५ के जुलाई से दिसंबर इन छह महिनों में ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन ने किए सर्वेक्षण के तहत महाराष्ट्र में वितरीत होने वाली मासिक पत्रिकाओं के वितरण में लोकराज्य मासिक पत्रिका प्रथम स्थान पर पायी गई. एबीसीने लोकराज्य की वितरण संख्या ३,८८,१७६ होने को प्रमाणित किया है.

महाराष्ट्र सरकार के बारे में अधिकृत तथा उद्देश्य जानकारी, आकर्षक लेआउट, रंग मुद्रण, मुद्रण के लिए इस्तेमाल होने वाला उच्चतम गुणवत्ता वाला कागज यह लोकराज्य की विशेषता है. लोकराज्य ने पठनियता तथा जानकारी का प्रभावी तरह से समन्वय किया है. इस मासिक पत्रिका में जानकारी का खजाना है. राज्य तथा केंद्रीय प्रशासनिक सेवा की परीक्षा की तैयारी करने वाले छात्र-छात्राओं के लिए भी उपयुक्त है.

            महाराष्ट्र सरकार के सूचना एवं जनसंपर्क महानिदेशालय की सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर व महानिदेशक चंद्रशेखर ओक, निदेशक देवेंद्र भुजबल, शिवाजी मानकर तथा महानिदेशालय के सभी अधिकारी एवं कर्मचारियों के अथक प्रयास से लोकराज्य मासिक पत्रिका की गुणवत्ता तथा खपत बढाने में सफलता प्राप्त हुई है.
                                                              
                                                                           ००००००



Tuesday 7 June 2016

Maharana Pratap Singh Birth Anniversary Celebrated in Capital




New Delhi,07: The Birth anniversary of  courageous fighter and a great King Maharana Pratap, celebrated today at Maharashtra Sadan and Maharashtra Information Centre.
     Protocol and Investment Commissioner Lokesh Chandra paid tribute to the gallant and courageous warrior who stood for people till his last breath, other Officers, and Employees also offered flowers at the portrait of Maharana Pratap at Maharashtra Sadan and Maharashtra Information Centre.
   Maharana Pratap was legendary warrior and patriot . His gallantry and sacrifice shall keep inspiring generations. Maharana Pratap fought the battle of Haldighati which was historic.                ****************************

Note:Photos are been attach with

राजधानीत महाराणा प्रताप सिंह जयंती साजरी



नवी दिल्ली दि. 07 : शुर योध्दा महाराणा प्रताप सिंह यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. महाराष्ट्र परिचय केंद्रात महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. अंजू निमसरकर-कांबळे, एल. बी. शिंदे यांनी महाराणा प्रताप यांच्या योगदानाबाबत माहितीपर भाषणे दिली. यावेळी कार्यालयात आलेल्या अभ्यागतांसह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
000000



Saturday 4 June 2016

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ची स्वच्छता




   

नवी दिल्ली, 04 : स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत केंद्र सरकार मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मीनस(सीएसटी) येथे विशेष स्वच्छता योजना राबवणार आहे.
            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या देखरेखीत स्वच्छ भारत अभियानाची देशभर सुरूवात करण्यात आली. आता केंद्रीय नगर विकास, सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय तसेच संबंधित राज्य शासनाच्या मदतीने देशातील निवडक १०० वारसा क्षेत्र,आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या ठिकाणी विशेष स्वच्छता योजना राबवण्याचा  कार्यक्रम आखण्यात आला आहे. या संदर्भात जाहीर पहिल्या निवडक १० वास्तुंच्या यादीत मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मीनस (सीएसटी) चा समावेश करण्यात आला आहे.
 या १०० ठिकाणांपैकी पहील्या १० ठिकाणांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत जम्मु आणि काश्मीर मधील वैष्णौ देवी मंदिर पहिल्या क्रमांकावर असून सीएसटी दुस-या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशातील ताजमहल आणि मणिकर्णिका घाट, आंध्र प्रदेशातील तिरूपती मंदिर, पंजाबमधील स्वर्ण मंदिर,राजस्थान मधील अजमेर शरीफ दरगा, तामिळनाडुतील मिनाक्षी मंदीर ,आसाम मधील कामाख्या मंदिर आणि ओडिशातील जगन्नाथ पुरी चा समावेश आहे. या यादीत निवड झालेल्या राज्यातील मुख्य सचिवांसोबत ३१ मे २०१६ रोजी व्हिडीयो कॉन्फरसिंगच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली आहे. त्यांना दोन आठवडयाच्या आत या विशेष स्वच्छता अभियानाचा आरखडा मागण्यात आला आहे. संबंधित केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवांनी या अभियानाच्या यशस्वी अमंलबजावणीसाठी राज्यांना सर्वतोपरी तांत्रिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. 
सध्या देशातील पहिल्या १० ठिकाणांची यादी तयार झाली असून उर्वरीत ९० ठिकाणांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. पहिल्या यादितील १० ठिकाणांवरील विशेष स्वच्छता योजनेच्या अनुभवाच्या आधारावर उर्वरीत ९० ठिकाणच्या  स्वच्छता योजनेचा कार्यक्रम आखण्यात येणार आहे.                
                                                                            ००००
सूचना : सोबत छायाचित्र जोडली आहेत.



Friday 3 June 2016

स्व. गोपीनाथ मुंडे अदभूत लोकसंपर्क असणारे नेते – प्रकाश जावडेकर





नवी दिल्ली, 03 : समाजातील दुर्बल, पिडित, शोषित व वंचित लोकांना सक्षम नेतृत्व देणारे स्व.गोपीनाथ मुंडे हे अदभूत लोकसंपर्क असणारे नेते होते, अशा शब्दात केंद्रीय वने व पर्यावरण  राज्यमंत्री प्रकाश जावडेकर  यांनी गोपीनाथ मुंडे यांना त्यांचा द्वितीय स्मृतीदिनी आदरांजली वाहिली.
स्व. गोपीनाथ मुंडे पुण्यस्मरण समितीच्यावतीने महाराष्ट्र सदन येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांचा द्वितीय पुण्यस्मरण दिन आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. खासदार अरविंद सावंत, राजू शेट्टी यावेळी मंचावर उपस्थित होते.
 जावडेकर म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांनी समाजातील दुर्लक्षीत लोकांचे प्रश्न सोडवले. तळागाळातील लोकांकरिता काम करण्यासाठी ते सदैव तत्पर राहीले. १९७४ मधे श्री. मुंडें पुण्यात शिक्षणासाठी आले तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीने देशभरातील वातावरण भारावून गेले होते. पुण्यातील या चळवळीचे नेतृत्व श्री. मुंडेनी केले होते. यावेळी मला सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हाच मला श्री. मुंडेच्या नेतृत्व गुणाचा अनुभव आल्याचे श्री. जावडेकर यांनी सांगितले.  
 खासदार अरविंद सावंत म्हणाले , विधान परिषदेचा सदस्य म्हणून काम करताना मुंडे साहेबांचा १२ वर्ष सहवास लाभला. काही विषयांबाबत मतभिन्नता असली तरी संबंध कसे जपावे याचा वस्तूपाठ त्यांनी सहका-यांना व त्यांच्याशी संपर्कात आलेल्या अनेक माणसांना घालून दिला. मुंडे हे माणसांवर प्रेम करणारे नेते होते म्हणूनच ते लोकनेते ठरले
            खासदार राजू शेट्टी म्हणाले, मुंडे साहेबांनी शेतक-यांच्या प्रश्नांनाही वाचा फोडली त्यांनी शेतक-यांच्या चळवळींना बळ देण्याचे काम केले. त्यांच्या  नसण्याची जाणीव आजही होत असल्याचे त्यांनी सांगितले
             टीव्ही-९ मराठीचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत लिला रामदास, दैनिक सामनाचे निलेश कुलकर्णी, वैभव तांदळे  यांनीही गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजळा दिला व त्यांच्या व्यक्तीमत्वाचे इतर पैलु उलगडले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाराष्ट्र मी मराठी चे दिल्ली प्रतिनिधी  मनोज मुंडे यांनी  केले.  

                                      मान्यवरांच्या हस्ते  महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण 

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र शासनाच्यावतीने ३ ते ९ मे दरम्यान पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहेयाचे औचित्य साधत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि  खासदार अरविंद सावंत यांनी महाराष्ट्र सदानाच्या परिसरात वृक्षारोपण केले.
             ००००