नवी
दिल्ली, दि. १२ : राज्यात
विशेष व्याघ्र संरक्षण दल उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून शंभर टक्के आर्थिक मदत
देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्राचे वित्त व नियोजन, वने मंत्री सुधीर
मुनगंटीवार यांनी केली.
केंद्रीय वने व पर्यावरण
मंत्रालयाच्यावतीने विज्ञान भवनात आयोजित
विविध राज्यांच्या वनमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. केंद्रीय वने व पर्यावरण
राज्य मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली.
श्री. मुनगंटीवार म्हणाले, विशेष
व्याघ्र संरक्षण दल उभारण्यासाठी केंद्र व राज्यांमधील ६०:४० या खर्चाच्या वाटया
ऐवजी केंद्राकडून पूर्ण (शंभर टक्के) आर्थिक
मदतमिळावी. व्याघ्र प्रकल्पाच्या आतील (कोअर एरिया)भागात वास्तव्य करणा-या नागरीकांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला देण्यात येणाऱ्या १०
लाख रूपये मदतीसोबतच त्यांच्या शेत जमीनीला चालू बाजार भावाच्या चौपट रक्कम मिळावी
अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
राज्यात व्याघ्र संशोधन केंद्र
उभारण्यासाठी केंद्राने आर्थिक मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली. देशातील सर्वात
जुन्या व्याघ्र प्रकल्पांमधील एक व
महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळख असणा-या चंद्रपूर
जिल्हयातील ‘ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पावर’ पोस्टाचे तिकीट काढण्यात यावे,अशी मागणीही श्री. मुनगंटीवार यांनी केली.
या सर्व मागण्यांचा सकारात्मकपणे विचार करण्यात येईल असे आश्वासन श्री. जावडेकर
यांनी यावेळी दिले.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘व्याघ्र संवर्धनाबाबतच्या
आशियाई देशातील मंत्र्यांच्या तिस-या परिषदेचे’ उदघाटन झाले.
देश-विदेशातील वनमंत्र्यासह राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या परिषदेस
उपस्थित होते.
00000000
No comments:
Post a Comment