नवी दिल्ली, 30 : विविध
क्षेत्रात जबाबदा-या स्वीकारतांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य गरजेचे असते,
त्यासाठी व्यायाम आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज
येथे केले.
श्री.
क्षत्रिय यांच्या हस्ते आज कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात अद्यावत ‘हेल्थ क्लबचे’ उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी ते
बोलत होते. यावेळी केंद्रीय गृह
मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव बिपीन मल्लीक, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान
सचिव श्यामलाल गोयल, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव जयश्री
मुखर्जी, सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या
निवासी आयुक्त आभा शुक्ला, राजशिष्टाचार व गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, श्री.
क्षत्रिय यांच्या पत्नी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
हेल्थ
क्लबच्या उदघाटनानंतर बोलताना श्री.क्षत्रिय म्हणाले, महाराष्ट्र सदनामध्ये
उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक हेल्थ क्लब, मसाज सेंटर आदी सुविधा सुरू झाल्याने सदनाच्या
सुरेख वास्तुला साजेसे स्वरुप प्राप्त झाले आहे. विविध क्षेत्रात काम करताना
चांगल्या आरोग्यासाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य गरजेचे आहे. “वेळ
मिळताच मी, स्वत: वॉकींग, स्वीमिंग करतो तसेच टेनिस खेळतो” असे श्री.क्षत्रिय यांनी यावेळी
सांगितले.
महाराष्ट्र सदनात निवासास राहणा-या
अभ्यागतांसाठी अत्याधुनिक हेल्थ क्लब उभारण्यात आला आहे. या हेल्थ क्लबमध्ये मल्टी
स्टेशन, आर्च ट्रेनर, अपराईट सायकल, रिकमंड बाईक, ट्रेड मिल आदी अत्याधुनिक यंत्र
आहेत.
०००००
No comments:
Post a Comment