Wednesday, 18 January 2017

महाराष्ट्रातील नवोदय विद्यालयाच्या एका शिक्षकासह 2 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पुरस्कार
















नवी दिल्ली 18 : महाराष्ट्रातील हिंगोली जिल्हयातील नवोदय विद्यालयाचे शिक्षक मनोज कुमार जोशी तसेच वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नवोदय शाळेचे विद्यार्थी सौरभ सरदार आणि विद्यार्थीनी अभिलाषा येवले यांना राष्ट्रीय पुरस्काराने मंगळवारी सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय मनुष्य बळ मंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या नवोदय ‍विद्यालयातर्फे राजधानी दिल्ली येथे राष्ट्रीय एकता समागम 2016-17 या कार्यक्रमाच्या पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन कमानी सभागृहात करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय पर्यावरण वने तसेच हवामान बदल विभागाचे सचिव अजय कुमार झा, नवोदय विद्यालयाचे आयुक्त बी.के.सिंग, राष्ट्रीय फॉडेशन जातीय सलोखा संस्थेचे सचिव भगत कुमार मंचावर उपस्थित होते. यावर्षी या कार्यक्रमाचा विषय हरित भारत स्वस्थ भारतहोता. या विषयावरच आधारीत विविध स्पर्धेचे आयोजन देशभरातील नवोदय विद्यालयात घेण्यात आले होते.
याप्रसंगी नवोदय विद्यालयात उत्कृष्ट कार्य करणा-या शिक्षकांनाही सन्मानीत करण्यात आले. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील नवोदय विद्यालयाचे शिक्षक मनोज कुमार जोशी यांनाही राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


वर्धा ‍जिल्ह्यातील नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी सौरभ सरदार याने उच्च माध्यमिक शालेय श्रेणीतील चित्रकला स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला यासह दिल्लीतस्थित शाळेंच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेतही सौरभ सरदार याने तिसरा क्रमांक पटकावला. माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेत चंद्रपूरच्या अभिलाषा येवलेचा तिसरा क्रमांक आला. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

No comments:

Post a Comment