नवी दिल्ली, 27 : दमनगंगा आणि पिजांळ नदीजोड प्रकल्पासाठी 4500 कोटी रूपये खर्च होणार
असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
येथील
विज्ञान भवनात आज नदीजोड संदर्भातील 13 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीची
अध्यक्षता केंद्रीय जलसंपदा, नदीविकास राज्यमंत्री डॉ. संजीव बालियान यांनी केली.
यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. यासह विविध राज्यांचे
वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
दमनगंगा आणि
पिजांळ हा नदीजोड प्रकल्प लवकर सुरू व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने 21 जूलैला
श्वेतपत्रिका काढली असल्याचेही श्री महाजन यांनी सांगितले. नाशिकमध्ये दमणगंगा आणि
पिंजाळ नदीचे खोरे आहे. याला लागुनच पार-तापी-नर्मदाचे खोरे आहेत. या पाच नदया
एकत्रित जोडण्याचा प्रकल्प सुरू होत आहे. याभागातील पाणलोट क्षेत्राचा काही भाग महाराष्ट्रात
तर काही गुजरातमध्ये येतो. नदीजोडअंतर्गत जर या नदयांना जोडण्यात आले तर समुद्रात
वाहून जाणारे पाणी अडविता येणार आणि या पाण्याचा वापर शेतीसाठी आणि पिण्यासाठी
करता येईल, यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. यासह या भागातील इतर खो-यांमध्ये जिथे
पाण्याची तुट आहे, त्याठिकाणी नदीजोड माध्यमातून पाणी वळविता येईल. यावर जो काही
खर्च होणार आहे, तो खर्च केंद्र शासन करणार आहे. हे प्रकल्प राज्यासाठी अतिशय
फायदेशीर ठरणार आहे.
नदीजोड
प्रकल्पांतर्गत वैंनगंगा आणि नळदुर्ग ही भविष्यात जोडल्या जाणार आहेत, याचाही आज
आढावा घेण्यात आला. यासह आजच्या बैठकीत केन-बेटवा नदीजोड प्रकल्प-1, 2,
महानदी-गोदावरी याया नदीजोड प्रकल्पाच्या प्रारूपाविषयी चर्चा झाली,
मानस-संकोश-तिस्ता-गंगा नदीजोड प्रकल्प, नदीजोड अंतर्गत येणारे नदीखोरे, नदीजोडची
आंतरराज्य स्थिती या इतर अनुषांगिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment