नवी
दिल्ली, २६ : बैलगाडा शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींनी
स्वाक्षरी केली आहे. यामुळे या विधेयकावर अखेर शिक्कामोर्तब झाले .
राज्य
विधीमंडळाने बैलगाडा शर्यत विधेयक पारीत केले होते. हे विधेयक राष्ट्रपतींकडे
स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले होते. या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी
केल्याने या विधेयकातील अटी व शर्तींच्या
अधीन राहून राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होणार आहेत.
तामिळनाडूतील जलीकट्टूच्या पार्श्वभूमीवर राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा
सुरू व्हावी अशी मागणी विविध स्तरातून होत होती. लोकप्रतिनिधींनी ही मागणी विधीमंडळात
लावून धरली होती. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी बैलगाडा शर्यत
संदर्भात पशु क्रूरता प्रतिबंधक कायद्यामध्ये सुधारणा विधेयक विधानसभेत ठेवले होते. राज्याच्या विधानसभेनी या
विधेयकाला मंजुरी दिली होती. मात्र,
राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीमुळे या विधेयकाचे कायदयात रुपांतर झाले नव्हते. आज अखेर
राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्याने
राज्यात बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला .
0000
No comments:
Post a Comment