Tuesday 26 September 2017

राजकीय क्षेत्राकडे तरूणांनी सकारात्मक दृष्टीने पाहावे : प्रा. राहूल कराड


नवी दिल्ली दि. 26 : राजकीय क्षेत्राकडे तरूणांनी सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे एमआयटी, पुणे या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. राहूल कराड यांनी आज परिचय केंद्रात व्यक्त केले.

            प्रा. राहूल कराड यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. या भेटीच्या वेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेत ते बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रा. कराड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे उपस्थित होत्या.
            राजकारणातील वाईट गोष्टी थांबण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी राजकारणात सक्रीय होणे गरजेचे आहे.  शिक्षित युवा वर्ग राजकारणात आल्यास देशाच्या प्रगतीला अधिकच हात भार लागु शकतो. तरुणांनामध्ये राजकारणाविषयी सकारात्मक दृष्टीकोण निर्माण करण्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रतिनिधीव्दारे प्रयत्न व्हावे. जेणे करून तरूण पिढीचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोण सकारात्मक होईल, असे प्रा. कराड यांनी चर्चे दरम्यान म्हणाले.
 राजकाणाचा पाया हा अध्यात्मिक, मौलिक विचारांवर आधारित असावा, असे म्हणत, एमआयटी ही संस्था विश्वशांतीच्या विचारांवर उभी आहे. संस्थेचा उद्देश दर्जेदार शिक्षण देण्यासोबतच चांगले विद्यार्थी घडविणे हा आहे. संस्थेने 2005 पासून राजकीय क्षेत्रातील बारकावे माहिती करून घेण्यासाठी  अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. एमआयटीमधून अभ्यासक्रम पुर्ण केलेले बरेच विद्यार्थी आज राजकारणात सक्रीय होत आहेत, अशी माहिती प्रा. कराड यांनी यावेळी दिली. एमआयटीच्या माध्यमातून विविध अभिनव उपक्रम विद्यार्थी, माहिला, शिक्षक यांच्यासाठी राबविले जातात. ज्याचा फायदा हा समाज बांधणीसाठी होत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी प्रा. कराड यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राव्दारे विविध सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर केला जात असल्याचे सांगुन, परिचय केंद्राच्या एकूणच कामकाजाचे कौतुक केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी  श्री. जाधव यांना दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने श्री. कराड यांना भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. कराड यांनी यशस्वी वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.       

No comments:

Post a Comment