Thursday, 14 September 2017

बारामती येथील विद्याप्रतिष्ठानला ‘स्वच्छता रँकींग पुरस्कार’










            
नवी दिल्ली, १४ : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या पुणे जिल्हयातील बारामती येथील विद्याप्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते स्वच्छता रँकींग पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
             केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने हॉटेल अशोक येथे आज स्वच्छता रँकींग पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले. उच्च शिक्षण विभागाचे सचिव के.के. शर्मा, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. व्ही.एस.चव्हाण यावेळी उपस्थित होते. यावेळी  स्वच्छतेच्या मानदंडाची प्रभावी अंमलबजावणी करणा-या देशातील २५ उच्च शिक्षण संस्था विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशातील एकूण ६ महाविद्यालयांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा यात समावेश आहे.
                      महाविद्यालय परिसरात उत्तम स्वच्छता, पुरेशी स्वच्छता गृहे, शुध्द पिण्याचे पाणी आदी मानकांची विद्याप्रतिष्ठानने प्रभावी अंमलबाजवणी केल्याने या महाविद्यालयाला स्वच्छता रँकींग पुरस्काराने गौरविण्यात आले.
              या पुरस्कारासाठी विविध श्रेणींमध्ये देशातून एकूण ३ हजार ५०० अर्ज आली होती यात अंतिम फेरीत १७४ अर्ज पोहचली होती. अंतिमत: छाननी करून २५ संस्थांची निवड करण्यात आली. यात देशातील ५ विद्यापीठ, ६ महाविद्यालये, ७ तंत्रशिक्षण संस्था आणि ७ शासकीय संस्थांचा समावेश आहे.                          

                                                                       00000

No comments:

Post a Comment