जागतिक व्यापार मेळयात महाराष्ट्र दालनाचे
उदघाटन केंद्रीय श्री प्रभु यांच्या
हस्ते
नवी दिल्ली, 14 : राज्यातील प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्रित
असावा यासाठी केंद्र शासन प्रयत्नरत असून महाराष्ट्राने यादिशेन पाऊले उचलली आहेत
असे, प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांनी आंतरराष्ट्रीय
व्यापार मेळयात महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन करतांना केले.
प्रगती
मैदान येथे दि.१४ ते २७ नोव्हेंबर २०१७ या
कालावधीत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले असून 15 क्रमांकाच्या
हँगरमध्ये महाराष्ट्राचे दालन उभारण्यात आलेले आहे. या दालनाचे उद्घाटन केंद्रीय
मंत्री श्री प्रभु यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत, याप्रसंगी केंद्रीय
वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सी.आर चौधरी, राज्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण
पोटे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग
विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी दौंड आणि उद्योग विभागाचे विकास
आयुक्त हर्षदिप कांबळे, आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयाचे मुख्य व्यवस्थापकिय संचालक श्री
गोयल उपस्थित होते.
महाराष्ट्र
देशातील एक पुढारलेले राज्य असून महाराष्ट्राने उद्योग क्षेत्रात बरीच उंच भरारी
घेतली आहे. हा विकास काही मोठया महानगरातच झाल्याचे दिसून येते. हा विकास चौफेर
व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रीया श्री. प्रभु यांनी यावेळी
व्यक्त केली.
‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेवर आधारीत आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात महाराष्ट्राला भागीदार
राज्य बनविले होते. या प्रदर्शनात महाराष्ट्रामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय
उद्योजकांनी गुंतवणूक करण्यास ईच्छा
दर्शवीली होती. मुख्यमंत्र्याशी झालेल्या चर्चेनुसार कोकण, मराठवाडा, पश्चिम
महाराष्ट्र, विदर्भ या चारही ठिकाणी औद्योगीकरण राबवायचे आहे. या ठिकाणांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येईल.
फार्चुनमध्ये जाहीर झालेल्या 500 कंपन्यांच्या मुख्यकार्यकारी अधिका-यांशी
व्यक्तीगत पातळीवर हॉटलाईनच्या माध्यमातून
चर्चा सुरू केलेली आहे, अशी माहिती श्री प्रभु यांनी यावेळी दिली.
कोकण
विभागाचा पाहिजे तसा औद्योगिक विकास झालेला नसुन येथेही उद्योग उभारणीचे प्रयत्न
सुरू असल्याचे श्री प्रभु यावेळी म्हणाले. महाराष्ट्राचा सर्वांगीण औद्योगिक विकास
होणे गरजेचे असून विकास कसा होईल याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे श्री
प्रभु म्हणाले. महाराष्ट्राला 720 किलोमिटरचा समुद्री किनारा लाभाला असून येथे
किनारी निर्यात क्षेत्र (कोस्टल एक्सपोर्ट झोन) उभारता येतील याचेही प्रयत्न सुरू
असल्याचे श्री प्रभुंनी सांगितले.
महाराष्ट्र दालनात ‘मेक इन महाराष्ट्रा’चे प्रतिबिंब : प्रविण पोटे
‘मेक इन इंडिया’ च्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या पुढाकाराने ‘मेक इन महाराष्ट्र’ ही संकल्पना राज्यात राबविली जात
असून त्याचे प्रतिबिंब महाराष्ट्र दालनात दिसते, अशी प्रतिक्रिया उद्योग राज्य
मंत्री श्री पोटे यांनी व्यक्त केली.
हजारो उद्योजक या मेक इन महाराष्ट्राच्या
माध्यमातून तयार झालेले आहेत. त्यापैकी 60
उद्योजक या दालनात आहे. महाराष्ट्रामध्ये इतर राज्याच्या तुलनेत अधिक
औद्योगिक गुंतवणूक झालेली आहे. आर्थिक
वर्ष 2014-15 च्या तुलनेत यावर्षी जवळपास 3.5 लाख कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक
राज्यात झालेली आहे. उद्योग उभारणीसाठी लागणा-या नाहरकत प्रमाणपत्रांची संख्या
सुरूवातीला 86 च्या जवळपास होती ती केवळ 25 पर्यंत आणलेली आहे. उद्योजकाला ताबडतोब काम सुरू करता यावा यासाठी
पुर्ण पाठींबा राज्य सरकारकडून देण्यात येतो, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री श्री
प्रवीण पोटे यांनी महाराष्ट्र दालनाच्या उद्घाटनानंतर माध्यमाशी बोलताना दिली.
यासह महाराष्ट्र दालनाची प्रतिकृती ही विमानाच्या आकाराची आहे. कॅप्टन अमोल यादव
यांनी महाराष्ट्रात विमान उद्योग निर्मितीचा कारखाना उभाण्यास सुरूवात केली असून
याच संकल्पनेवर हे महाराष्ट्र दालन उभे आहे अशी माहिती श्री पोटे यांनी दिली.
महाराष्ट्र
दालन उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योक आयुक्त हर्षदिप कांबळे, यांनी केले
तर राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक शिवाजीराव दौंड यांनी
केले.
“स्टार्टअप आणि स्टँडअप” महाराष्ट्र दालन
महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास
महामंडळाच्यावतीने “स्टार्टअप आणि स्टँडअप महाराष्ट्र” हे राज्यात उद्योग क्षेत्राच्या प्रगतीचे
दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार
मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. “स्टार्टअप
इंडिया” ही मध्यवर्ती संकल्पना आहे.
संकल्पना मांडताना राज्यात ‘स्टार्टअप आणि स्टँडअप’ योजनेच्या माध्यमातून नव्याने उद्योग उभारणी करणा-या राज्यातील
प्रतिभावान तरूण उद्योजकांचे प्रकल्प दर्शविण्यात आले आहेत. प्रदर्शनात या
योजनेच्या माध्यमातून उद्योग उभारणा-या राज्यातील ६० उद्योजकांचे स्टॉल्स आहेत.
तरूण उद्योजक अमोल यादव यांनी तयार केलेले भारतीय बनावटीचे विमान, अमरावतीचे मंगेश
वानखेडे इनोव्हेटीव्ह पार्किंग सोल्युशन, उस्मानाबाद जिल्ह्यातील खवा कल्सटर भुम, १५
मिनीटांमध्ये ‘वेब पोर्टल’ तयार करून
देणारे स्टार्टअप, मुंबई आयआयटीच्या विद्यार्थीनीने तयार केलेले कमी किमंतीत
उपलब्ध होणारे महिलांचे सॅनेटरी नॅपकीन, दिव्यांगासाठी व्हिलचेयर,
विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला अधिक वाव देण्यासाठी मांडण्यात आलेले विविध
स्टॉल्स अतीशय आकर्षक आहे.
विमानाच्या आकाराचे मुख्यव्दार खास आकर्षण
कॅप्टन अमोल यादव या तरूण उद्योजकाने
निर्माण केलेल्या विमानाची प्रतिकृती दालनाच्या मुख्यद्वाराचे खास आकर्षण आहे.
मुंबई-अहमदाबाद ही देशातील पहिली बुलेट ट्रेन, मुंबई नागपूर समृद्धीमार्ग आणि
त्याचे फायदे ही याठिकाणी दर्शविण्यात आले आहेत. याशिवाय राज्यातील लघु
उद्योजकांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तू, महिला उद्योजिकांद्वारे
निर्मित वस्तू, महाराष्ट्राची प्रसिद्ध पैठणीही याठिकाणी प्रदर्शन व विक्रीस
ठेवण्यात आले आहेत.
स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील
महाराष्ट्राची भरारी आणि लहान उद्योजकांना मिळालेली संधी, लघुउद्योगास चालना
देणारे राज्याचे धोरण, विदेशी गुंतवणूक, पर्यटन आदी विषयांना स्पर्श करणारे आकर्षक महाराष्ट्र दालन
यंदा राज्याच्यावतीने उभारण्यात आले आहे.
२३
नोव्हेंबर रोजी साजरा होणार ‘महाराष्ट्र दिन’
व्यापार उद्येागासह या मेळाव्यात सहभागी विविध देश आणि
राज्यांच्यावतीने आपली सांस्कृतिक परंपरा दर्शविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर
केला जातो. याअंतर्गत २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रगती मैदान येथील ‘हंसध्वनी रंगमंच’ येथे ‘महाराष्ट्र दिन’ साजरा
होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यापार मेळयास भेट देणा-या
देश-विदेशातील उद्योजक व ग्राहकांना
राज्याच्या वैविद्यपूर्ण संस्कृतिचे दर्शन होणार आहे.
No comments:
Post a Comment