नवी दिल्ली, 29 : मूळचे पुण्याचे असणारे विजय केशव
गोखले यांनी आज विदेश सचिव पदाचा पदभार स्वीकारला, हा बहुमान मिळवीणारे ते दुसरे
महाराष्ट्रीय व पुणेकर आहेत.
केंद्र शासनाच्यावतीने 1 जानेवारी 2018 रोजी विजय गोखले यांचे नाव नवीन विदेश सचिव म्हणून
जाहीर करण्यात आले होते. रविवार दिनांक 28 जानेवारी 2018
रोजी विदेश सचिव डॉ. एस. जयशंकर यांचा कार्यकाल संपला
असून विजय गोखले यांनी आज या पदाचा पदभार स्वीकारला. पुढील 2 वर्षांपर्यंत ते या पदावर
राहणार आहेत.
श्री गोखले हे भारतीय
परराष्ट्र सेवेच्या 1981 तुकडीचे अधिकारी आहेत. चीन आणि भारत
यांच्यात निर्माण झालेला डोकलाम वाद सोडवण्यात
विजय गोखले यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांनी जर्मनीत भारताचे राजदूत
म्हणून काम केले आहे. हाँगकाँग, चीन आणि अमेरिका या देशांमध्येही त्यांनी काम केले
आहे. विदेश सचिव पदाचा पदभार स्वीकारण्याआधी ते विदेश मंत्रालयाच्या आर्थिक
संबंधाचे सचिव म्हणून काम करीत होते.
यापूर्वी पुण्याचे राम
साठे यांनी 1979 ते 1982 या
कालावधीत विदेश सचिव पदाची जबाबदारी
सांभाळली आहे. त्यांच्यानंतर एका महाराष्ट्रीय व पुणेकराला दुस-यांदा या पदाचा बहुमान मिळाला आहे.
******
No comments:
Post a Comment