नवी
दिल्ली, 18: चंद्रपूर येथे राष्ट्रीय स्तरावरचे कौशल्य विद्यापीठ स्थापन
करावे, अशी सूचना केंद्रीय कौशल्य विकास
मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सहाय्य केंद्र
शासन करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
महाराष्ट्राचे अर्थ व वनेमंत्री
सुधीर मुनगंटीवार, कामगार व कौशल्य विकासमंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज श्री. प्रधान यांची भेट घेऊन चंद्रपूर येथे
राष्ट्रीय स्तरावरचे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासंदर्भात सादरीकरण केले व
या केंद्रासाठी लागणाऱ्या 70 कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी
मागणी केली.
कौशल्य विकासासाठी 70 कोटी
निधी देऊ – प्रधान
महाराष्ट्राने सादर
केलेला कौशल्य विकास केंद्राचा प्रस्ताव अत्यंत प्रभावी असून,
या केंद्रासाठी लागणारा 70 कोटी रुपयांचा निधी
केंद्र शासन देईल,अशी ग्वाही देऊन श्री. प्रधान म्हणाले,
चंद्रपूर येथे होणाऱ्या या केंद्रास कौशल्य विकास विद्यापीठात
रूपांतरीत करावे अशी सूचना केली. या विद्यापीठाच्या माध्यमातून आदिवासी लोकांना
कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळाल्याने त्यांना रोजगार उपलब्ध होईल तसेच या
विद्यापीठास आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त होईल असा विश्वासही त्यांनी
व्यक्त केला. महाराष्ट्रात विविध भागात एकूण सहा कौशल्य विद्यापीठ स्थापन करावेत
असेही त्यांनी यावेळी सूचविले.
कौशल्य विकास
केंद्रामुळे पाच राज्यांना लाभ – मुनगंटीवार
चंद्रपूर येथे
प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रामुळे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश,
छत्तीसगड, ओडिशा व तेलंगणा येथील तरुणांना
याचा लाभ होणार आहे, अशी माहिती श्री. मुनगंटीवार यांनी
बैठकीत दिली. राज्यशासनाच्या कौशल्य विकास विभाग व वन विभागाच्या संयुक्त
विद्यमाने हे केंद्र उभारण्यात येणार आहे.या केंद्राच्या माध्यमातून विविध 64
प्रकारचे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे,अशी माहितीही श्री. मुनगंटीवार
यांनी या बैठकीत दिली.
याबैठकीस
महाराष्ट्राच्या वन विभागाचे सचिव विकास खारगे, कौशल्य
विकास सचिव असीम गुप्ता, कौशल्य विकास सचिव रवींद्रन,
वन अकादमीचे संचालक अशोक खडसे, राष्ट्रीय
कौशल्य विकास केंद्राचे संचालक मनीष कुमार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment