Saturday, 17 February 2018

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळयाचे उद्घाटन

                        

नवी दिल्ली, 17 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती सोहळयाचे उद्घाटन सोमवारी सांयकाळी 6 वाजता जनपथमार्गावरील इंदिरा गांधी कला केंद्रात होणार असून हा कार्यक्रम अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे.
        राजधानीत 1920 फेब्रुवारी 2018 रोजी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या आयोजनांसह शिवजयंती सोहळा साजरा होणार असून राष्ट्रपती या सोहळयाच्या मुख्यकार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या पटांगणावर सायंकाळी  6 वाजता होणा-या या कार्यक्रमास करविर अधिपती शाहु छत्रपती महाराज यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यासह नौदल प्रमुख ॲडमीरल सुनील लांबा, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत,  कर्नल ऑफ द रेजिमेंट मराठा लाईट इन्फेट्री पी.जे.एस.पन्नु , जनरल जे.जे. सिंग (निवृत्त) या कार्यक्रमास उपस्थिती राहणार.
           या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारीत "शिवगर्जना' महानाट्याचा प्रयोग सादर होणार आहे.
शिवजयंती सोहळयाचा कार्यक्रम  
19 फेब्रुवारी
सकाळी 9 :30 : 11 : 00 -  महाराष्ट्र सदन (कस्तुरबा गांधी मार्ग) येथे शिव जन्मोत्सव (पाळणा)चा  कार्यक्रम आयोजित  

सकाळी 1 1 : 00 ते दुपारी 01 :00 - महाराष्ट्र सदन ते  कस्तुरबा गांधी मार्ग, राजपथ ते इंदिरा गांधी राष्ट्रीय ला     केंद्रापर्यंत  शोभायात्रा
दुपारी  01 : 00 ते सांयकाळी 4 :00 – रक्तदान शिबिर  (इंदिरा गांधी राष्ट्रीय ला केंद्र, जनपथ रोड)

दुपारी 02 : 00 ते सांयकाळी 05 : 00 -  इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे (सिंहनाद) तुतारी, ढोल ताशे पथक, वासुदेव, गोंधळ, वारकरी दिंडी, र्कितन, लेझीम ईत्यादींचे सादरीकरण.  
सायंकाळी 6 : 00  मुख्य उद्घाटनाचा कार्यक्रम 
7 : 00 - शिवछत्रपतींच्या जीवन चरित्रावर आधारीत "शिवगर्जना' महानाट्याचा प्रयोग
 
                                    20
 फेब्रुवारी
सायंकाळी 7 : 00 - "शिवगर्जना' महानाट्य प्रयोगाचे पुन्हा सादरीकरण

       महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा  :  http://twitter.com/micnewdelhi
 
                                                     ०००००००



No comments:

Post a Comment