नवी दिल्ली,
२ : पुणे श्रमिक पत्रकार
संघाच्या सदस्यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे १२ सदस्य दिल्ली अभ्यास दौ-यावर
असून त्यांनी आज परिचय केंद्रास भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे
यांनी या सदस्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा,
माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार यावेळी उपस्थित होते.
यावेळी
अनौपचारिक गप्पा झाल्या. श्री. कांबळे यांनी परिचय केंद्राच्या कार्याविषयी माहिती
दिली. परिचय केंद्राच्यावतीने शासनातील जनसंपर्क विषयावर आयोजित राष्ट्रीय
कार्यशाळा, आधुनिक माध्यमांच्या युगाची पाऊले ओळखून शासनाच्या जनसंपर्कासाठी
कार्यालयाने समाज माध्यमांचा केलेला प्रभावी उपयोग याविषयी त्यांनी माहिती दिली.
याशिवाय दिल्लीस्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व समन्वय
साधून जनसंपर्क विषयक कार्यातील सकारात्मक उपक्रमांच्या देवाण घेवाणीत या
कार्यालयाचा पुढाकाराबाबतही माहिती दिली.
महाराष्ट्र
परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात
येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची
माहिती श्री. कांबळे यांनी दिली. या
पत्रकारांना यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने यांना भेट स्वरूपात
देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट
देऊन या पत्रकारांनी माहिती जाणून घेतली.
पुणे
श्रमिक पत्रकार संघाचे वैविद्यपूर्ण कार्य व उपक्रम याविषयीही उपस्थितांनी माहिती
दिली. पत्रकार संघाच्या सदस्यांमध्ये विजयकुमार म्हस्के, चैत्राली देशमुख , अशोक
जावळे, भाग्यश्री जाधव, हिरा सर्वदे, प्रतिक्षा काटे-पारखी, सचिन गोरवेल,नेताजी
गायकवाड, विजयकुमार सांगळे, शैलेंद्र भोसले, महेश बर्दापूरकर आणि शंकर कावडे यांचा
समावेश होता.
००००००
No comments:
Post a Comment