Monday, 19 February 2018

शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भातील सुचनांचे स्वागत : पाशा पटेल


नवी दिल्ली, 19 : शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भातील सर्व स्तरांतून येणा-या सुचनांचे स्वागत असल्याचे मत, राज्याचे कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या विपणन, कृषी-पुरवठा आणि कृषी-मुल्य प्रणाली या अभ्यास गटाचे प्रमुख पाशा पटेल यांनी आज व्यक्त केले.
        येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान कॉप्लेक्स, पुसा येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्यावतीने शेतक-यांचे उत्पन्न करण्यासंदर्भातील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री पाशा पटेल बोलत होते.  या परिषदेत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भातील सविस्तर अभ्यासासाठी 7 गट बनविण्यात आलेले आहेत. यापैकी विपणन, कृषी-पुरवठा आणि कृषी- मुल्य प्रणाली याविषयावरील समितीचे प्रमुख पाशा पटेल आहेत.  
        विपणन, कृषी-पुरवठा आणि कृषी-मुल्य प्रणाली शी संबधित विषयांवर पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेत सविस्तर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशभरातील प्रातिनिधिक शेतकरी, कृषी तज्ज्ञ, कृषी माल वाहतुकदार, कृषी समिती, शीतगृह चालक,  अन्न प्रक्रिया उद्योगांशी संबंधित, केंद्रीय कृषी मंत्रालयाशी संबंधित प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

        सर्वांनी प्रत्यक्षात येणा-या समस्या मांडल्या, सोबतच त्यासंबंधित समाधान ही शोधण्यात आले. उद्या 20 फेब्रुवारी ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पाशा पटेल हे विपणन, कृषी परुवठा आणि कृषी-मुल्य प्रणालीवर आधारीत  एकीकृत सादरीकरण करतील. ज्यामध्ये शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भातील महत्वपुर्ण सुचना असणार आहेत.

No comments:

Post a Comment