शेवटच्या
दिवशी महाराष्ट्राला १२ सुवर्ण पदक
नवी दिल्ली,
८ : केंद्रीय युवक क्रीडा
मंत्रालयाच्यावतीने आयोजित ‘खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेच्या’
पहिल्याच आयोजनात महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत ३६ सुवर्णांसह दुसरा क्रमांक
मिळविला आहे. आज या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी
महाराष्ट्राने १२ सुवर्ण पदक पटकावली यात
बॉक्सींग मध्ये ७ सुवर्ण मिळाली.
बॉक्सींग
मध्ये राज्याला ७ सुवर्ण
या स्पर्धेत आज महाराष्ट्रातील बहुंताश खेळाडूंचे अंतिम
सामने होते. बॉक्सींगमध्ये महाराष्ट्राने तब्बल ७ सुवर्ण पदक मिळवूण चमकदार
कामगिरी केली. मुलांच्या विविध वजनी गटात
५ सुवर्ण पदक आली, विशेष म्हणजे पुणे येथील बॉइज स्पोर्ट कंपनीच्या ४ खेळाडुंनी
सुवर्ण कामगिरी केली, ८० किलो वजनी गटात सतींदर , ६३ किलो वजनी गटात विजयदीप, ५०
किलो वजनी गटात नवबा सिंह आणि ४८ किलो वजनी गटात अनिल या सर्वांनी सुवर्ण पदक
जिंकली. याशिवाय, पुणे येथील बॉइज स्पोर्ट स्कुल आर्मी स्पोर्ट इन्स्टिटयूटच्या
भावेश कट्टीमनी याने ५२ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविले. मुलांप्रमाणेच
मुलींनीही बॉक्सींगमध्ये सुवर्णपदक पटकाविली यात, नागपूर येथील सेंट विन्सेट
पल्लुटी स्कुलची अल्फीया तरन्नूम हीने ८० किलो वजनी गटात सुवर्ण तर ६६ किलो वजनी गटात मुंबईच्या निर्मला मेमोरियल
फाऊंडेशन वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या मितीका गुणेले हीने सुवर्ण पदक पटकाविले.
जिम्नॅस्टीक मध्ये २ तर ज्युडो , बॅडमिंटन आणि धनुर्विद्येत प्रत्येकी १ सुवर्ण
जिम्नॅस्टीकमध्ये
मुलींनी सुवर्ण पदकांची कमाई केली. बॉल रिदमिक जिम्नॅस्टीक प्रकारात मुंबईच्या
प्रभादेवी येथील कॉनव्हेंट गर्ल्स हायस्कुलच्या क्रिशा छेडा हीने तर हुप रिदमिक
जिम्नॅस्टीक प्रकारात ठाणे येथील बिल बाँग हाय इंटरनॅशनल स्कुलच्या अनन्या सोमन
हीने सुवर्ण पदक पटकविले.
ज्युडो
क्रीडा प्रकारात ९० किलो वजनी गटात मुंबई
वांद्रे येथील सेंट ॲड्रूस महाविद्यालयाचा अदनान शेख याने सुवर्ण पदक पटकवले. धनुर्विद्येत
कम्पाउंड वैयक्तीक प्रकारात रत्नागिरी येथील एसव्हीजेसीटी इंग्लीश स्कुलच्या इशा
पवार हीने सुवर्ण पदकावर नाव कोरले.
नागपूर येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची
मालवीका बनसोड हीने मुलींच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत २१-१२ आणि २१-१० असा दणदणीत
विजय मिळवत सुवर्ण पदक पटकवले.
६ रजत पदकांची कमाई
मुलींच्या
जिम्नॅस्टीक क्लॅब रिदमीक व हुप रिदमीक जिम्नॅस्टीक प्रकारात दादर, मुंबई येथील
बालमोहन विद्यामंदिरच्या श्रीया कुलकर्णी ने २ रजत पदकांची कमाई केली. धनुर्विद्येच्या
रिकर्व वैयक्तीक प्रकारात अमरावती जिल्हयातील परतवाडा येथील गुरुकुल पब्लीक
स्कुलच्या सुमेध मोहोड याने रजत पदक पटकवले. मुलीच्या ज्युडो क्रीडा प्रकारात ७०
किलो वजनी गटात नवापाडा , ठाणे येथील
सरस्वती माध्यमिक शाळेच्या अपुर्वा पाटील हीने रजत पदक पटकवले. मुलांच्या
बॉक्सींगमध्ये ६६ किलो वजनी गटात पुणे येथील सेंट पॅट्रीक हायस्कुलच्या केशव हंस
याने रजत पदक जिंकले. मुलींच्या बॉल रिदमीक जिम्नॅस्टीक प्रकारात ठाणे येथील
हिरानंदानी फाउंडेशन स्कुलची प्रियंका आचार्य हीने रजत पदक मिळवले.
आज
महाराष्ट्राला विविध क्रीडा प्रकारात एकूण ९ कास्य पदक मिळाली.
अंतिम
पदकतालिकेत महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर
आज स्पर्धेच्या ९
व्या व अंतिम दिवशी महाराष्ट्र ३६ सुवर्ण पदक मिळवून पदतालीकेत दुसरा क्रमांक
राहीला. याशिवाय ३२ रजत आणि ४३ कांस्य पदकांसह महाराष्ट्राने एकूण १११ पदक पटकविली
आहेत. हरियाणा ३८ सुवर्णांसह पहिल्या क्रमांकावर राहिला. या सुवर्णांसह हरियाणा ने
२५ रजत आणि ३८ कांस्य पदकांसह एकूण १०२ पदकांची कमाई केली आहे. २५ सुवर्णांसह एकूण
९४ पदक मिळवून यजमान दिल्ली तिस-या क्रमांकावर राहीला.
००००००
No comments:
Post a Comment