नवी
दिल्ली, दि. 18 : टाळ आणि मृदुंगाच्या गजरात कस्तुरबा गांधी
मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे नाशिकचे
खासदार हेमंत गोडसे यांनी गुढी उभारून
मराठी नव वर्ष ‘गुढी पाडवा’ साजरा केला.
महाराष्ट्र सदनाच्या प्रागंणात छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पुतळया शेजारी उभारण्यात आलेल्या गुढीची पुजा अर्चना पारंपरिकरीत्या श्री गोडसे यांनी केली. यावेळी महाराष्ट्राचे
माजी मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र सदनातील अधिकारी, केंद्र शासनातील मराठी
अधिकारी, सदनात वास्तव्यास असलेले अभ्यागत मोठया संख्येने उपस्थित होते. या
सर्वांनीही गुढीचे पुजन केले.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातही ‘गुढी पाडवा’ साजरा करण्यात
आला. निवासी आयुक्त व प्रधान सचिव आभा शुक्ला, प्रधान सचिव व आयुक्त (राजशिष्टाचार, गुंतवणूक) लोकेश चंद्र यांनी गुढी उभारून उपस्थित अधिकारी
कर्मचारी यांना नव वर्षारंभाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर निवासी आयुक्त समीर
सहाय, सहायक निवासी आयुक्त इशु सिंधु, विजय कायरकर, अजितसिंग नेगी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी
अमरज्योत कौर अरोरा, यासह महाराष्ट्र सदन तसेच
महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी - कर्मचारी यावेळी
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment