नवी
दिल्ली, २३ :
भारतीय स्वातंत्र्य लढयात महत्वाचे योगदान देणारे शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव
यांना आज शहीद दिनानिमित्त राजधानीत अभिवादन करण्यात आले.
कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान
सचिव तथा गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त
लोकेश चंद्र यांनी शहीदांच्या
प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र
परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून
आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात शहीदांना आदरांजली
स्वातंत्र्य लढयात
प्राणांची आहुती देणा-या शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना महाराष्ट्र परिचय
केंद्रात अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी
प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, माहिती
अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे, उपसंपादक रितेश
भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली
वाहिली.
000000
No comments:
Post a Comment