Tuesday, 6 March 2018

महाराष्ट्र परिचय केंद्राची जनसंपर्क गॅलरी ठरतेय अभ्यागतांचे आकर्षण













नवी दिल्ली, ६ : दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राने निर्माण केलेली जनसंपर्क गॅलरी आता अभ्यागतांचे आकर्षण ठरू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांच्या दिल्लीतील सर्व बैठकांची क्षणचित्रे तसेच परिचय केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती हे या गॅलरी चे वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्र म्हणजे दिल्लीतील मिनी महाराष्ट्र. १९६१ पासून महाराष्ट्र आणि देशाच्या राजधानीमधील मोलाचा दुवा म्हणून हे कार्यालय काम करीत आहे. दिल्लीतल्या मराठी माणसांचे परिचय केंद्र म्हणजे हक्काचे व्यासपीठच. साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, प्रशासन या सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचा इथे राबता असतो. महाराष्ट्राशी संबंधित दिल्लीत काहीही घडले तर परिचय केंद्र हे तिथे असणारच. गेल्या तीन वर्षात परिचय केंद्राने सोशल मीडिया च्या माध्यमातून दिल्ली व महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांशी चांगला संपर्क तयार केला आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून परिचय केंद्र दिल्ली व महाराष्ट्रातल्या ४ हजारांहून अधिक पत्रकारांशी संपर्कात आहे.

जनसंपर्क गॅलरी ठरतेय आकर्षण

महाराष्ट्र परिचय केंद्रात नेहमीच मान्यवरांचा राबता असतो. या मान्यवरांना दिल्लीतील महाराष्ट्र छायाचित्राच्या रुपात कळावा यासाठी जनसंपर्क गॅलरी तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४ सालापासून दिल्लीत जेव्हढ्या बैठक झाल्या त्या सर्व बैठकांची छायाचित्रे कॅपशनसह गॅलरी मध्ये देण्यात आली आहेत,तसेच परिचय केंद्राच्या विविध उपक्रमांची छायाचित्रेही गॅलरीत समाविष्ट करण्यात आली आहेत. गेल्या तीन वर्षात 300 हून अधिक मान्यवरांनी परिचय केंद्रास भेटी दिल्या आहेत, यामध्ये पद्मश्री, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार विजेत्यांबरोबरच देश- विदेशातील पत्रकारांनीही कार्यालयास भेटी दिल्या आहेत.

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

00000

No comments:

Post a Comment