दिवंगत अभिनेते विनोद खन्ना
यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
65 व्या
राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा
नवी दिल्ली, 13 : 65 व्या राष्ट्रीय
चित्रपट पुरस्काराची आज घोषणा झाली. सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा मान ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला मिळाला आहे. याशिवाय ‘धप्पा’, ‘म्होरक्या’, ‘पावसाचा निबंध’ आणि ‘मयत’ हे मराठी चित्रपट विविध श्रेणींमध्ये सर्वोत्तम
ठरले आहेत. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार तर
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला
आहे.
विनोद खन्ना व
श्रीदेवी यांना मरणोत्तर पुरस्कार
राष्ट्रीय
चित्रपट पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्रसिध्द दिग्दर्शक शेखर कपूर व सदस्यांनी आज
शास्त्रीभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वर्ष 2017 च्या
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. यावर्षी मानाचा दादासाहेब फाळके
पुरस्कार बॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते दिवंगत विनोद खन्ना यांना जाहीर झाला. भारतीय
चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाची अमीट छाप सोडणा-या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी
यांना ‘मा’ या हिंदी चित्रपटातील
भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘नगरकिर्तन’ या पंजाबी चित्रपटासाठी रिध्दी सेन
यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रजत कमळ आणि 50 हजार रूपये
रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘कच्चा लिंबु’ : सर्वोत्तम मराठी चित्रपट
प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्कृष्ट
चित्रपटांचीही घोषणा यावेळी करण्यात आली. मराठी भाषेसाठी ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाची सर्वोत्तम चित्रपट
म्हणून निवड करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून मंदार
देवस्थळी यांची निर्मिती आहे. दिग्दर्शक व निर्मात्यास रजत कमळ आणि 1 लाख रूपयांचा
पुरस्कार प्रदान करण्यात येईल. निपून धर्माधिकारी दिग्दर्शित आणि सुमतीलाल शाह
निर्मित ‘धप्पा’ या मराठी चित्रपटास
राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार जाहीर
झाला आहे. रजत कमळ आणि 1 0लाख 50
हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘म्होरक्या’ : सर्वोत्तम बाल चित्रपट
अमर देवकर
दिग्दर्शित व कल्याण पाडाळ निर्मित ‘म्होरक्या’ हा मराठी चित्रपट देशातील सर्वोत्तम बाल चित्रपट ठरला आहे. स्वर्ण कमळ
आणि १ लाख ५० हजार असे या पुरस्काराचे
स्वरूप आहे. ‘म्होरक्या’ या चित्रपटासाठी
यशराज क-हाडे यांना विशेष उल्लेखनीय पुरस्कारही जाहिर झाला आहे. पुरस्कार स्वरूपात
प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल.
नॉनफिचर मध्येही मराठीचा दबदबा
नॉनफिचर चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला
मिळाली ‘पावसाचा निबंध’ या चित्रपटासाठी प्रसिध्द दिग्दर्शक
नागराज मंजुळे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला. स्वर्ण कमळ
आणि 1 लाख 50 हजार रूपये रोख पुरस्काराचे स्वरूप आहे. याच चित्रपटाचे ऑडीओग्राफर
अविनाश सोनवने यांना सर्वोत्कृष्ट ऑडीयोग्राफीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रजत कमळ
आणि ५० हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘मयत’ : सर्वोत्कृष्ट लघुपट
सुयश शिंदे दिग्दर्शित व
निर्मित ‘मयत’ हा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला आहे. समर्थ महाजन
यांना ‘द अनरिजर्व’ चित्रपटासाठी बेस्ट ऑन लोकेशन साऊंड रेकॉर्डीस्ट हा पुरस्कार
जाहिर झाला आहे. रजत कमळ आणि ५० हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शिल्प कलेवर आधारित ‘पोयट्री
ऑन फॅब्रीक चेंदारीनामा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी
राजेंद्र जांगळे यांना बेस्ट प्रमोशनल फिल्मचा
पुरस्कार जाहीर झाला आहे. रजत कमळ आणि 50 हजार असे
पुरस्काराचे स्वरूप आहे. नॉनफिचर चित्रपट श्रेणीत स्वप्निल कपुरे दिग्दर्शित ‘आफ्टरनून’ या चित्रपटास विशेष उल्लेखनीय पुरस्कार
जाहीर झाला आहे. पुरस्कार स्वरूपात प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
‘व्हीलेज रॉकस्टार्स’ सर्वोत्कृष्ट चित्रपट
‘व्हीलेज
रॉकस्टार्स’ हा आसमी भाषेतील चित्रपट देशातील सर्वोत्कृष्ट
चित्रपट ठरला आहे. स्वर्ण कमळ आणि 2 लाख 50 हजार रोख असे या पुरस्काराचे स्वरूप
आहे.
00000
सोबत
: छायाचित्र जोडले आहेत.
No comments:
Post a Comment