Wednesday 25 April 2018

नवी मुंबई व पुणे महापालिकेस ‘हडको’ चा उत्कृष्ठ कार्यप्रणाली पुरस्कार





नवी दिल्ली,25 एप्रिल : नवी मुंबई व पुणे महापालिकेसह 6 खाजगी संस्थांना ‘हडको’ चा उत्कृष्ठ कार्यप्रणाली पुरस्कार आज नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आले.
हडको चा 48 व्या वर्धापन दिनानिमित्त्‍ आयोजित संमारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदिपसिंह पूरी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास हडको चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. एम. रविकांत, गृहनिर्माण विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा, हडको चे मुख्य वित्तीय अधिकारी राकेश कुमार अरोरा आदि उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेच्या दोन उपक्रमांना पुरस्कार

नवी मुंबई महापालिकेच्या ई-तक्रार निवारण प्रणाली व दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण करणारे शिक्षण-प्रशिक्षण-सुविधा केंद्र या उपक्रमासाठी उत्कृष्ठ कार्यप्रणाली पुरस्कार प्रदान करण्यात आले. 4 लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., महापौर जयवंत सुतार ई.टी. सी . केंद्राच्या संचालक डॉ. वर्षा भगत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पुणे महापालिकेस दोन पुरस्कार
पुणे महानगरपालिकेने सार्वजनिक खाजगी सहभागी तत्वावर (पी.पी.पी) राबविलेला र्स्माट सिटी लाईटिंग या प्रकल्पास उत्कृष्ठ कार्यप्रणाली पुरस्कार मिळाला आहे. पुणे शहरात 84 हजार एलईडी बल्ब बसविण्यात आले असून यामुळे महापालिकेची दरमहा दीड कोटी रुपयांची बचत होत आहे. नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणून या प्रकल्पाची नोंद घेऊन महापालिकेस हडको चा उत्कृष्ठ कार्यप्रणाली पुरस्कार देण्यात आला. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील वाहतुक पाहता या रस्त्याचे रुपांतरण करुन र्स्माट सिटी डिझाईन या संकल्पनेवर आधारीत नियोजनबध्द आराखडा तयार केल्याबद्दलही महापालिकेस पुरस्कृत करण्यात आले. 4 लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती शितल उगळे व मुख्य अभियंता अनिरुध्द पावसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सहा खाजगी संस्थांनाही पुरस्कार

‘किफायतशीर ग्रामीण/नागरी गृह निर्माण- नवीन,उदयोन्मुख आणि आपत्ती प्रतिरोधक घरे’- या श्रेणीअंतर्गत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कर्जतच्या उडान कॉस्ट इफेक्टिव हाऊसिंग संस्थेला मिळाला. हा पुरस्कार यां संस्थेचे संस्थापक श्री. समीप पदोरा यांनी स्वीकारला. याच श्रेणीत लोणावळ्याच्या ‘शांतीवन डिझाईन अन्ड हाऊसिंग’ या संस्थेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या संस्थेचे संस्थापक श्री. पिकिंश शहा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
देशातील ‘वास्तुचे जतन व संवर्धन’ श्रेणीत मुंबई येथील वर्ष 1916 साली बांधण्यात आलेले रॉयल ओपेरा हाऊस या जुन्या तसेच सांस्कृतिक वास्तुला ‘मूर्त स्वरुप’ अबाधित ठेवून संवर्धन केल्याबाबत ‘आभा नारायण लांबा असोसिएट’ या संस्थेला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. या श्रेणी अंतर्गत नाशिकची संस्था श्री. धनंजय शिंदे डिझाईन स्टुडिओ ‘उदाजी- पूर्वीचे वर्ष’ या प्रकल्पासाठी तर मुंबईच्या आर्किटेक्ट विकास दिलावरी या संस्थेला मुंबईतील एकोणीसाव्या शतकातील कारंजे संवर्धनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. हरित इमारत या श्रेणीअंतर्गत मुंबई येथील ‘वन अविघ्न पार्क’ या प्रकल्पासाठी विवेक भोळे असोसिएटला पुरस्कार द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. द्वितीय पुरस्कार प्राप्त संस्थांना 2 लाख रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते .

No comments:

Post a Comment