Friday, 20 April 2018

राजधानीत ५ व ६ मे रोजी ‘महाराष्ट्र महोत्सवाचे’ आयोजन : डॉ. ज्ञानेश्वर मुळे


                                                       नवी दिल्ली दि. 20 : महाराष्ट्र दिनानिमित्त कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात ५ व ६ मे २०१८ रोजी महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असेल,अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव तथा पुढचे पाऊलसंस्थेचे संस्थापक व निमंत्रक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी  आज दिली.

                 दिल्लीत विविध मंत्रालये व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत महाराष्ट्रातील अधिका-यांच्या पुढाकाराने पुढचे पाऊलया संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध विधायक उपक्रम राबविण्यात येतात. सदर संस्था प्रथमच महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करीत असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगीतले.     

                                         मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
     दोन दिवसीय महाराष्ट्र महोत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून त्यांनी तत्वत: निमंत्रण स्वीकारले असून  विविध केंद्रीय मंत्री, विविध क्षेत्रातील दिग्गजांचा या  सहभाग असेल असे डॉ. मुळे यांनी सांगीतले. महाराष्ट्र सदनात गुरुवार १९ एप्रिल २०१८ रोजी  झालेल्या संस्थेच्या सभासदांच्या बैठकीत महाराष्ट्र महोत्सवातील कार्यक्रमांची रूपरेषा व आखणी पूर्ण झाली आहे.                                       

या महोत्सवादरम्यान महत्वाच्या विषयांवर परिसंवाद आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख सांगणारे खास सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. या महोत्सवा दरम्यान संस्थेच्या संकेतस्थळाचे व स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.     

दिल्लीत कार्यरत विविध मराठी संस्था व मराठी  माणसांना एकत्र आणणे, महाराष्ट्रातील तरूणांना भविष्यासाठी  दिल्लीतील विविध क्षेत्रातील संधी व करीअरसाठी प्रेरीत करणे, राजधानीत महाराष्ट्रीय जनतेला एकत्रीत आणून महाराष्ट्राची मुद्रा उमटविने हा या महाराष्ट्र महोत्सवाचा उद्देश असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगीतले.                 
                 
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
         000000


No comments:

Post a Comment