Monday, 21 May 2018

राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा













नवी दिल्ली दि. २१ : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची २७ वी पुण्यतिथी  दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन म्हणून सोमवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली . 

कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधानसचिव तथा निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. श्रीमती शुक्ला यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा,अजितसिंग नेगी, राजीव मलीक यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा  

            महाराष्ट्र परिचय केंद्रात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यांनी उपस्थित अधिकारी व  कर्मचा-यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह यावेळी कार्यालयात उपस्थित  पत्रकार, अभ्यागत व कार्यालयातील कर्मचा-यांनीही प्रतिमेस आदरांजली वाहिली. 

                                                          000000  



No comments:

Post a Comment