नवी
दिल्ली, ९ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने राष्ट्रीय संरक्षण
प्रबोधिनी व भारतीय नौदल अकादमी या नामांकीत संस्थाच्या प्रवेशासाठी घेण्यात
आलेल्या स्पर्धेत देशातील एकूण ४४७ विद्यार्थ्यांची निवड झाली असून महाराष्ट्रातील
२८ विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने पुणे
येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि केरळ मधील कन्नुर जिल्हयात स्थित भारतीय
नौदल अकादमीच्या प्रवेशासाठी घेण्यात
आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या लष्कर, वायुदल
व नौदल या अभ्यासक्रमाच्या १४० व्या तुकडीसाठी व भारतीय नौदल अकादमीच्या १०० व्या
तुकडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने १० सप्टेंबर २०१७ रोजी लेखी परिक्षा घेतली होती. यानंतर उतीर्ण झालेल्या उमेदवाराची
संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाच्यावतीने
मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. यासंदर्भातील अंतिम निवड यादी आज जाहीर
करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील २८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
000000
No comments:
Post a Comment