नवी दिल्ली,5 :
महाराष्ट्रातल्या उद्योगक्षेत्रात महिलांचा वाटा सध्या 9 टक्के आहे, पुढील पाच
वर्षात तो 20 टक्क्यांपर्यंत नेण्याचा शासन प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
‘पुढचे पाऊल’ ही दिल्लीतील संस्था व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने
येथील कस्तुरबागांधी मार्ग स्थित
महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले
आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या
पहिल्या सत्रात “उद्योजकता, महाराष्ट्राचे अर्थकारण आणि व्यापाराच्या संधी”
या विषयावर आयोजित चर्चा सत्रात श्री सुभाष देसाई बोलत होते. यावेळी केंद्रीय
वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु मंचावर उपस्थित होते.
यावेळी सुभाष देसाई म्हणाले, महिला उद्योजकांना शासन भांडवल
उपलब्ध करून देणार असून या भांडवलात राज्य शासन निम्मा वाटा उचलणार आहे. विदेशात
उद्योग विषयक प्रदर्शन भरविण्यासाठी महिला उद्योजकांना 50 लाख रूपयांचे अनुदान
शासन देणार आहे. तसेच वीज दरातही सवलत देण्यात येईल अशी माहितीही श्री.देसाई यांनी
यावेळी दिली.
उद्योग
वाढीसाठी पायाभूत सुविधा महत्वाची – सुरेश प्रभु
उद्योगक्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा
प्रकल्प महत्वाचे आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु यांनी
या चर्चासत्रात केले. उद्योग वाढले तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, असे
नमूद करून ते म्हणाले, मी रेल्वे मंत्री असताना विविध रेल्वे प्रकल्पांसाठी 1.25
लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
केंद्र
शासनाच्या धर्तीवर राज्याने इलेक्ट्रीक वाहन धोरण स्वतंत्र रित्या आणले आहे. या
धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पेट्रेाल-इंधन वर खर्च कमी होईल असा विश्वास श्री
देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी या चर्चासत्रात सिडकोचे उपाध्यक्ष
तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. भूषण गगराणी, मी महाराष्ट्र ट्रस्ट चे श्री. अभिजित पाटील, पायोनिअर इंडिया कंपनीचे कंट्री
मॅनेजर श्री रोहित कुलकर्णी, मराठे ज्वेलर्सचे श्री. कौस्तुभ मराठे व खादी
ग्रामोद्योगाचे अध्यक्ष श्री. विशाल चोरडिया उपस्थित होते.
श्री.भुषण गगराणी यांनी राज्यात ईज ऑफ
डुईंग बिजनेस वर प्रकाश टाकला व राज्यात सुरु असलेले विविध पायाभूत सुविधा
प्रकल्पांची माहिती दिली.
श्री. विशाल चोरडिया यांनी खादी
ग्रामोद्योग अंतर्गत सुरु असलेले प्रकल्प कलात्मक कोल्हापूर व महाखादी
बद्दल माहिती दिली. आज तंत्रज्ञानक्षेत्रात राज्य अग्रेसर असून या
तत्रंज्ञानाने राज्य तसेच देश प्रगती करेल.एखद्या व्यवहाराला नेटवर्क ची जोड
दिल्याने उद्योजक व गिऱ्हाईक दोघांना ही लाभ
होऊ शकेल असे सांगितले.
No comments:
Post a Comment