Saturday, 5 May 2018

उद्योग उभारणीसाठी नव उदयोजकांना शासनातर्फे विविध संधी



नवी दिल्ली, 5 : महाराष्ट्रातील नव उद्योजकांना मोठया प्रमाणात संधी उपलब्ध असून शासनातर्फे विविध संधी दिल्या जात आहेत. असा सूर महाराष्ट्रातील उद्योजक आव्हाने आणि संधी या चर्चासत्रातून निघाला.
     पुढचे पाऊल आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सदन येथे महाराष्ट्र महोत्सव जागर महाराष्ट्र दिनाचादोन दिवसीय  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज पहिल्या दिवशीच्या पाचव्या सत्रात महाराष्ट्रातील उद्योजक आव्हाने आणि संधी याविषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, केंदीय सक्ष्म, लघु, मध्यम विभागाचे आयुक्त आनंद शेरखाने, वास्तुविषारद उदय पांडे, उद्योजक प्रदीप करंबळेकर हे या चर्चा सत्रात सहभागी झाले होते. या चर्चासत्राची अध्यक्षता श्री शेरखाने यांनी केली.
           श्री देवरा म्हणाले, महाराष्ट्रात जगभरातून मोठया प्रमाणात गुंतवणुक होत आहे. या निमित्त अनेक संधी नव उदयोजकांना उपलब्ध होत आहेत. यासाठी केंद्राने सुरू केलेल्या योजनांचा लाभ महाराष्ट्र  शासनाच्यावतीने नव तरूण उदयोजकांना दिला जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
           आजची तरुण पिढी मोठया प्रमाणात उदयोजकतेकडे वळत असून वर्तमान केंद्र शासन आणि राज्य शासनाचे धोरणही नव उदयोजकांना प्रोत्साहन आणि पाठींबा देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे. कोणताही उदयोग उभारताना सृजनशीलता, सातत्य असणे गरजेच असल्याचे श्री प्रदीप करंबळेकर म्हणाले. आज व्यवसायीकतेसाठी कर्ज देण्यासाठी मोठया खाजगी कपंनी तयार आहेत मात्र, नुसत्या चांगल्या कल्पना असून चालत नाही तर त्याची अंमलबजावणी तेवढीच चांगली व्हावी अशीही अपेक्षा असते, असे विचार श्री करंबळेकर यांनी मांडले.
      शासकीय नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करणारे श्री.पांडे म्हणाले, व्यवसायात रोज नवनवीन आव्हाने असतात त्या आव्हानांना समोर जाण्याची ताकद स्वत:मध्ये निर्माण करणे व्यवसात अंत्यत महत्वाचे आहे. व्यवसायात मिळालेल्या प्रत्येक संधीच सोन करता आल पाहिजे, असे विचार श्री पांडे यांनी यावेळी मांडले.
      समारोपात श्री शेरखाने यांनी केंद्र शासनच्या सुक्ष्म, लघु, मध्यम या क्षेत्राच्या वाढीसाठी देशभर उदयोजकता केंद्र उभारण्यात आलेली असल्याची माहिती दिली. यासह केंद्र शासनातर्फे महिला उदयोजकतेसाठी उदय सखी हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगतिले. यासह मुद्रा योजना, स्टार्ट इंडिया याविषयीही सांगितले

No comments:

Post a Comment