नवी
दिल्ली, 23 : महाराष्ट्रातील सुनील तोटे यांना शेतीमध्ये नाविन्यपूर्ण
प्रयोग राबविल्याबद्दल आज ब्रिक्स च्या ‘ब्रिक्स अलायन्स-बिझनेस फोरम’ तर्फे सन्मानित करण्यात आले. केंद्रीय प्रधानमंत्री
कार्यालय राज्यमंत्री जितेंद्र सिंग व ‘ब्रिक्स अलायन्स-बिसनेस फोरम’च्या अध्यक्षा लरीसा
झेलेंटसोवा यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
येथील ताज डिप्लोमॅटीक एनक्लेव मध्ये
दिनांक 21 ते 23 पर्यंत ‘ब्रिक्स अलायन्स-बिझनेस फोरम’ च्या तीन दिवसीय
परिषदेचे आयोजन करण्यात आले. आज समारोपीय समारंभात ब्रिक्स अलायन्समध्ये सामील
असणा-या देश-विदेशातील विविध क्षेत्रात नाविन्यपुर्ण
काम करणा-या ‘ब्रिक्स अलायन्स-बिझनेस फोरम’ च्या तर्फे सन्मानित
करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय
प्रधानमंत्री कार्यालय राज्यमंत्री जितेंद्र सिंग, ‘ब्रिक्स अलायन्स-बिझनेस फोरम’ च्या अध्यक्षा लरीसा
झेलनस्टेवा, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ‘ब्रिक्स अलायन्स-बिझनेस फोरम’ च्या वतीने देश-विदेशातील विविध क्षेत्रात नाविन्यपुर्ण
कार्य करणा-या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील सुनील
तोटे यांचा यामध्ये समावेश होता.
फळ-भाज्यांच्या लागवडीचा नाविन्यपुर्ण प्रयोग
सुनील तोटे हे मुळचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामधील कानगाव चे
आहेत. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून ते बांधकाम व्यवसायिक
म्हणून ओळखले जातात. मात्र, मुळ शेतकरी कुंटूबात जन्माला आल्यामुळे शेतीविषयी ओढ
आहे. पांरपरिक शेती न करता काही प्रयोगशील करण्याची ईच्छा होती. 20 एकर शेतीमध्ये
त्यांनी शेवगा, कोहळ, कारले, काकडी, दूधी
भोपळा अशा 5 फळ-भाज्यांची लागवड केली. आणि 1 कोटीचे उत्पन्न मिळविले. त्यांच्या या
प्रयोगशील लागवडीबद्दल आज त्यांना आंतराराष्ट्रीय संघटनेव्दारे सन्मानित करण्यात
आले.
वर्तमानात ते शेतक-यांना एकत्रित करून कंत्राटी शेती करण्याकडे प्रेरित करीत
आहेत. आतापर्यंत त्यांनी 80 हजार शेतक-यांना जोडलेले आहे. सर्वांनी मिळून शेती
केल्यास सर्वांनाच नफा वाटून मिळणार, अशी संकल्पना या मागची आहे.
‘ब्रिक्स’ हे संघटन आंतराराष्ट्रीय पातळीचे असून सध्या या संघटनेशी 36 राष्ट्रे
जुळलेली आहेत.
हे संघटन विविध विषयांवर काम करते यामधले ‘ब्रिक्स अलायन्स- बिझनेस फोरम’ हे मुख्यत: ब्रिक्स देशांमधील
गुंतवणुकीसाठी आर्थिक सहकार्य
देण्याचे कार्य करते. बिसनेस फोरम हे डिजीटल इकोनॉमी, उद्योग, परिवहन, पायाभूत
सूविधा, बँकींग, आर्थिक सेवा आणि विमा, आरोग्य, ऊर्जा, खनिजे आणि त्यांची
उपयुक्तता, कृषी व अन्न प्रक्रिया, वस्तु आणि किरकोळ विक्री, कौशल्य विकास, संशोधन
आणि सेवा, प्रसार माध्यमे, मनोरंजन आणि जीवनशैली क्षेत्रात कार्य करते.
000000
सूचना सोबत छायाचित्रे जोडली आहेत.
मपकेंनदि-अंजूनिमसरकर,मा.अ.,वृत्त क्रं.207दि.23-05-18
No comments:
Post a Comment