नवी
दिल्ली दि. 1 : केंद्रीय कृषी
मंत्रालयातंर्गत येणा-या ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ च्यावतीने आज महाराष्ट्राला 4 पुरस्कार प्राप्त झाले. हे पुरस्कार
केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग आणि केंद्रीय कृषी राज्य मंत्री कृष्णा राज यांच्या
हस्ते प्रदान करण्यात आले.
येथील पुसा राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रातील ए.पी. शिंदे
सभागृहात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘जागतिक दुग्ध दिना’चे औचित्य साधून कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग, राज्यमंत्री
कृष्णा राज आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत राष्ट्रीय गोपाल रत्न आणि अन्य पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात
आले.
यावर्षी नाशिक जिल्ह्यातील बागलान (ता.) मधील तरसाळी येथील
अनिरूद्ध पाटील यांना राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री पाटील हे अभियंता असून काही काळ त्यांनी नोकरी केली. नंतर गावी येऊन
त्यांनी ‘सारजा डेरी फर्म’ सुरू केले. सध्या त्यांच्याकडे 130
देसी गीर गायी आहेत. या गायींपासून दरदोज 200 लीटर दूध मिळते. गायींचे संगोपन, दुग्ध व्यवसाय, देशी गोवंशाची वाढ
व्हावी यासाठी प्रचार-प्रसार करणे, स्थानिक शेतक-यांना पशुधनाचे महत्व पटवून
देण्याचे काम ते करतात. याशिवाय गायीपासून दुग्ध, गोमुत्र, गायीच्या शेणापासून
गौरी, देशी गायीचे तूप, सेंद्रीय खत आदीचे उत्पादनही करतात. त्यांच्या या विशेष कार्याची
दखल म्हणून त्यांना आज राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रूपये रोख, सन्मान चिन्ह असे आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल
महाराष्ट्राला आज पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त
कांतीलाल उमफ यांनी स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप 51 हजार रूपये आणि सन्मान चिन्ह
असे आहे.
उत्कृष्ट पशुचिकित्सकाचा पश्चिम झोनचा पूरस्कार सातारा
जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शासकीय पशुचिकित्सक पॉलीक्लिनीकचे सहायक आयुक्त डॉ.
अंकुश परिहार यांना केंद्रीय कृषी राज्य मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मागील 22 वर्षापासून ते
पशुचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. या पॉलीक्लिनीकमध्ये पशुंसाठी एक्स-रे मशीन,
शस्त्रक्रियेची अद्यावत सूविधा आहे.
पश्चिम झोनचा व्दितीय पूरस्कार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर
येथील पशुचिकित्सालयातील सहायक आयुक्त डॉ. दिनकर र्बोडे यांना केंद्रीय कृषी राज्य
मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात.
पूरस्काराचे स्वरूप 30 हजार रूपये आणि सन्मान चिन्ह असे आहे.
No comments:
Post a Comment